Balanced Life – संतुलित जीवनाचे महत्व – Importance of work life balance

Balanced Life – संतुलित जीवना विषयी माहीती – Importance of work life balance

मित्रांनो आपल्याला जर नेहमी आपले शरीर आणि मन निरोगी ठेवायचे असेल आणि आरोग्यदायी जीवण जगायचे असेल तर आपण आपल्या शरीराला योग्य तो पौष्टिक आहार देणे खुप महत्वाचे असते.

कुठल्याही एकाच जीवणसत्वाचा आहारात समावेश न करता विविध जीवणसत्वांचा आहारात समावेश करणे आणि व्यायाम करणे आपल्या शरीराच्या वाढीसाठी आणि विकासासाठी फार गरजेचे असते.

कारण आपल्या शारीरीक वाढीसाठी आपल्याला Minerals,Protein,Calcium,Vitamin,इत्यादीने युक्त अशा सर्व शरीराला आवश्यक पौष्टिक आहाराचे सेवण करणे म्हणजेच संतुलित आहार घेणे फार गरजेचे असते.

एकदम तसेच आपल्या आयुष्याचे देखील आहे आपल्याला जर आयुष्यात खुप सुखी,आनंदी, समाधानी आणि धनसंपन्न राहायचे असेल तर आपण आपल्या आयुष्यात प्रत्येक बाबतीत एक Balance ठेवणे फार गरजेचे आहे.

कारण जीवणात यशस्वी झालेल्या खुप जणांची अशी तक्रार असते की मी आयुष्यात पैसा नाव तर खुप कमविले पण स्वतासाठी आणि स्वताच्या कुटुंबासाठी अजिबात पुरेसा वेळच देऊ शकलो नाही.

स्वताच्या आनंदासाठी वेळच देऊ शकलो नाही,पाहिजे तेवढी Enjoyment Life मध्ये करू शकलो नाही.स्वताच्या शारीरीक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देऊ शकलो नाही.

किंवा मी आयुष्यात नातेसंबंध माणुसकी तर खुप जपली पण पाहिजे तेवढे धन आणि यश मी कमावू तसेच प्राप्त करू शकलो नाही कारण तेवढा वेळच माझ्याकडे उपलब्ध नव्हता.

अशा अनेक तक्रार आपल्या प्रत्येकाच्या असतात म्हणजेच आयुष्यात कुठे ना कुठे आपण कमी पडत असतोच.

ज्याच्याकडे खुप नाव,पैसा प्रसिदधी आहे त्याच्याकडे सुख आनंद आणि समाधान नाहीये,चांगले आरोग्य तसेच शांत झोप देखील नसते.कारण दिवसरात्र तो यश आणि पैसा कमविण्यासाठी सदैव धावतच असतो.

याला कारण आपण आयुष्यात कुठल्या गोष्टीला किती महत्व द्यायचे?किती वेळ द्यायचा याचे एक संतुलन राखलेले नसते.आपण एका गोष्टीकडे लक्ष देण्यात इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करीत असतो.आणि मग पुढे जाऊन आपल्याला Regret करण्याची वेळ येत असते.

याला कारण आपण आपल्या Work आणि Life या दोघांमध्ये एक Balance ठेवलेला नसतो.

याचसाठी आपण आजच्या लेखात आपण How To Balanced Work And Life म्हणजेच कामात आणि आयुष्यात संतुलन कसे राखायचे हे सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

कारण आयुष्य हे आपणास एकदाच मिळत असते म्हणुन आपण त्याचा भविष्याची चिंता न करता वर्तमानात भरभरून मनसोक्त आनंद लुटायला हवा.

आणि सुखी जीवणासाठी Wealth सोबत आपण Health, Happiness, Relationship,या इतर सर्व महत्वाच्या बाबींना देखील समान वेळ द्यायला हवा.

See also  स्तनांच्या कर्करोगाची लक्षणे- Breast Cancer Symptoms In Marathi

कारण पैसा,नोकरी,बिझनेस हे मुख्यकरून आपल्या आयुष्यासाठी असतात.आपले आयुष्य हे पैशासाठी,नोकरीसाठी,बिझनेस करण्यासाठी नसते.हे आपण आज कुठे तरी विसरत चाललो आहे.

चला तर मग जाणुन घेऊया आपण आपल्या Professional आणि Personal Life मध्ये Balanced कसा ठेवायचा.आणि त्यासाठी आपण काय करायला हवे.

Balanced Life म्हणजे काय?

Balanced Life म्हणजेच संतुलित आयुष्य.

Balanced Life म्हणजे काय
Balanced Life – संतुलित जीवनाचे महत्व – Importance of work life balance

आपल्या आयुष्यातील प्रत्येक महत्वपुर्ण घटक जसे की Familly, Friends, Relatives, Job Or Business Career ,आपली Physical आणि Mental Health,आपला Happiness,इत्यादी सर्व जीवनावश्यक बाबींकडे दुर्लक्ष न करता सर्वाना आवश्यक तेवढा पुरेसा वेळ देणे म्हणजेच Balanced Life जगणे होय.

Work Life Balance म्हणजे काय?Work Life Balance चे उदाहरण

आँफिसमधले काम(Work Life) आणि आपले वैयक्तिक आयुष्य(Personal Life) यात संतुलन राखणे म्हणजे Work Life Balance ठेवणे होय.

Work Life Balance चे उदाहरण –

उदा,राहुल आँफिसात गेल्यावर कामाच्या वेळी फक्त मन लावून काम करतो घरचा विचार अजिबात करत नाही जेणे त्याला आपल्या कामात रोज 100 Percent देता येतो.

आणि तो घरात आल्यावर आँफिसमधले कामाचे टेंशन Stress विसरून आपल्या Family सोबत आनंदी जीवण जगतो.आपल्या फँमिलीसोबत Quality Time व्यतित करतो.आणि आपल्या आरोग्याची देखील नियमित काळजी घेतो.

Work Life Imbalanced चे उदाहरण-

मनोज आँफिसात गेल्यावर कामाच्या वेळी खुप मन लावून काम करतो पण घरी आल्यावर देखील तो उद्याच्या मिटींगचे कसे होईल,उद्या मी Business मध्ये अजुन Profit मिळण्यासाठी काय करायला हवे.याच विचारात असतो.

म्हणून तो घरात आल्यावर देखील आँफिसमधल्या कामाच्या टेंशनमध्ये रोज सतत Stress मध्ये असतो ज्यामुळे त्याला आपल्या Family सोबत आनंदी जीवण जगता येत नाही.

आपल्या फँमिलीसोबत Quality Time व्यतित करता येत नाही.फँमिलीसोबत कुठे फिरायला देखील तो जात नाही.सतत कामात बिझी असतो ज्यामुळे त्याचे कित्येकदा पत्नीशी भांडण देखील होते.शिवाय कामाच्या टेंशनमध्ये तो वेळेवर जेवत नाही आणि त्याला रात्री शांत झोप देखील लागत नाही.ज्यामुळे तो नेहमी आजारी राहतो.तसेच त्याला नेहमी आरोग्यविषयक समस्या देखील उदभवत असतात.

Work Life Balance ठेवण्याचे महत्व तसेच फायदे काय आहेत?

● Work Life Balance ठेवल्याने आपल्याला कामासोबत आपल्या फँमिलीला आईवडील,पत्नी मुला मुलींना,मित्रांना देखील पुरेसा वेळ देता येतो.आपल्या फँमिलीसोबत काँलिटी टाईम व्यतीत करता येतो.

● Work Life Balance ठेवल्याने आपल्याला आपल्या शारीरीक आणि मानसिक आरोग्याची देखील काळजी घेता येते.आपल्या आरोग्याकडे आपले कधीही दुर्लक्ष होत नाही.

● Work Life Balance ठेवल्याने आपल्या Professional Life मुळे आपले आपल्या Personal Life कडे दुर्लक्ष होत नसते.Work Life Balance ठेवण्याचे महत्व तसेच फायदे काय आहेत

● Work Life Balance ठेवल्याने भविष्यात पुढे जाऊन आपल्याला भरपुर पैसे कमविण्याच्या नादात आपल्या फँमिलीसोबत वेळ व्यतीत करता आला नाही,आपल्या कौटुंबिक जबाबदारया तसेच कर्तव्य पार पाडता आले नाही,आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले नाही,आपल्याला आपली Life पुर्णपणे Enjoy करता आली नाही असे कुठलेही Regret म्हणजेच पस्तावा करण्याची वेळ आपल्यावर भविष्यात येत नाही.कारण आपण सर्व गोष्टींचा एक Balanced ठेवलेला असतो.

See also  चिकन मासे अणि अंडी खाण्याचे आरोग्यदायी फायदे - Egg – Fish – Chicken –health benefits.

Balanced Lifestyle म्हणजे काय?Balance Life Style चे उदाहरण

Balanced Lifestyle म्हणजे संतुलित जीवणशैली होय.

रोज सकाळी किती वेळ व्यायाम करायचा?आपण रोज किती वेळ म्हणजे किती वाजेपासुन किती वाजेपर्यत आँफिसचे काम करायचे?किती वेळ फँमिलीसोबत टाईम व्यक्तीत करायचा?रोज किती वाजता कसा आणि किती आहार घ्यायचा?

महत्वाच्या कामांना रोज किती वेळ द्यायचा बिनमहत्वाच्या कामांना रोज किती वेळ द्यायचा?इत्यादी आपल्या दैनंदिन जीवणातील जीवण शैलीबाबतीत प्रत्येक गोष्टीबाबतीत एक सुनियोजन असणे,संतुलन असणे म्हणजे Balanced Lifestyle.

Balanced Lifestyle चे उदाहरण :

अमित आपल्या Lifestyle मध्ये Balance ठेवण्यासाठी नेहमी एक Fix Time Table तयार करून ठेवतो आणि तो Follow करतो ज्यात तो रोज रात्री किती वाजता झोपायचे किती वाजता सकाळी उठायचे सकाळी सकाळी किती वेळ व्यायाम करायचा?

आपण रोज किती वेळ म्हणजे किती वाजेपासुन किती वाजेपर्यत आँफिसचे काम करायचे?किती वेळ फँमिलीसोबत टाईम व्यक्तीत करायचा?रोज किती वाजता कसा आणि किती आहार घ्यायचा?महत्वाच्या कामांना रोज किती वेळ द्यायचा बिनमहत्वाच्या कामांना रोज किती वेळ द्यायचा?इत्यादी ह्या सर्व बाबींची नोंद ठेवतो.

याने त्याला आपल्या Family, Friends, Relatives ,Job Or Business Career,आपली Physical आणि Mental Health,आपला Happiness इत्यादी सर्व महत्वाच्या बाबींकडे समान लक्ष देता येते.

आपल्या Personal आणि Professional Life मध्ये Balanced कसा ठेवायचा?

आपल्याला जर आपल्या Personal आणि Professional Life मध्ये Balance ठेवायचा असेल तर त्यासाठी आपण पुढील बाबी करायला हव्यात

1) Make Work Life Balance Sheet :

आपल्याला जर आपल्या Personal आणि Professional Life मध्ये Balance ठेवायचा असेल
आपण आपले Work Life Balance Sheet तयार करायला हवे.

ज्यात पुढील गोष्टी दिलेल्या असाव्यात –

1) आँफिसच्या कामाला रोज किती वेळ द्यायचा :(नोकरी करत असाल तर नोकरीसाठी किती वेळ द्यायचा,बिझनेस करत असाल तर बिझनेससाठी किती वेळ द्यायचा)

(किती वाजेपासुन किती वाजेपर्यत आँफिसचे काम करायचे याचे एक वेळापत्रक तयार करा आणि त्या वेळेत फक्त आँफिसच्या कामात १०० टक्के लक्ष द्या.इतर बाबींचा अजिबात विचार करू नका)

2) आपल्या Physical आणि Mental Health साठी रोज किती वेळ द्यायचा

आपल्या Personal आणि Professional Life मध्ये Balanced कसा ठेवायचा
Importance of work life balance

आपल्या Physical आणि Mental Health साठी रोज किती वेळ न चुकता व्यायाम करायचा,मेडिटेशन योगा करायचे किती तास झोप काढायची किती वाजता झोपायचे?किती वाजता उठायचे याचे एक नियोजन आखुन घ्या.

रोज किती वाजेला कसा आणि किती आहार घ्यायचा?किती वेळ रोज शुदध हवेत फिरायला जायचे याचे एक वेळापत्रक तयार करा.

See also  जागतिक अन्न सुरक्षा दिवस २०२३, थीम, पोस्टर, महत्त्व आणि इतिहास | World Food Safety Day 2023 In Marathi

रोज Stress Free आणि Happy राहण्यासाठी काय करायचे हे ठरवा –

उदा
● वर्तमानात जगणे भुतकाळातील घडलेल्या वाईट घटना प्रसंगाचे ओझे डोक्यावर न ठेवणे आणि भविष्याची देखील चिंता करू नये.

● एका वेळी एकाच कामात पुर्ण एकाग्रतेने लक्ष द्यावे.

● कोणाविषयी मनात राग,दवेष तिरस्काराची भावना न ठेवणे.कोणाचे बोलणे मनाला लावून न घेणे.सगळयात महत्वाचे म्हणजे माफ करायला शिकणे.

● जेवताना कामाचा विचार करू नये,फक्त अन्नाची चव आणि आस्वाद घेण्यावर भर द्यावा,कुटुंबासोबत असताना फक्त आपले मन आणि शरीर कुटुंबासोबतच १०० टक्के असायला हवे.

● काम करताना फक्त कामावरच १०० टक्के लक्ष द्यायचे तिथे आपला बेस्ट देण्याचा प्रयत्न करायचा.

3) आपल्या Family, Friends Relatives सोबत किती वेळ व्यतीत करायचा-

रोज कामावरून Free झाल्यावर आपण संध्याकाळचा काही वेळ आपल्या फँमिली सोबत आणि मित्रांसोबत व्यतीत करायला हवा त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारायला हव्यात याने आपला कामावरचा सर्व थकवा टेंशन दुर होऊन जाते.

यासाठी रोज कामावरून फ्री झाल्यावर फँमिलीसोबत आणि मित्रांसोबत किती वाजेपासुन किती वाजेपर्यत वेळ व्यतीत करायचा याचे एक वेळापत्रक तयार करा.

4) Fun आणि Enjoyment साठी किती वेळ द्यायचा?

● स्वताच्या Fun आणि Enjoyment साठी रोज किती वेळ द्यायचा हे ठरवा

● किती वेळ इंटरनेट,सोशल मिडियाचा वापर करायचा?

● किती वेळ बाहेर फँमिली सोबत फिरायला, शाँपिंगला जायचे?

5) आपल्या Personality आणि Skill Development साठी रोज किती वेळ द्यायचा?

● किती वेळ नवीन पुस्तके वाचायची?

● किती वेळ आपल्या Skill Upgrade करण्यासाठी रोज द्यायचा?

● रोज किती वेळ नवीन Skill शिकण्यासाठी द्यायचा?

6)Personal Time –

● दिवसभरातील किती वेळ फक्त स्वतासाठी द्यायचा?

● दिवसभरातील किती वेळ फक्त स्वतासोबत एकटयाने व्यतीत करायचा?

7) Financial Budget :

● आपल्याला Monthly किती Income ची आवश्यकता आहे आणि त्यासाठी आपण रोज किती वेळ काम करायला हवे?

● आपल्या Income मधून रोज तसेच Monthly किती पैशांची Saving वर्तमानासाठी आपण करायला हवी?

● आपल्या Monthly Income मधून किती पैशांची आपण Future साठी Investment करायला हवी?

● घरात घरखर्चासाठी Monthly किती पेमेंट द्यायला हवे?

● स्वतासाठी तसेच कुटुंबासाठी Monthly आपल्या बजेटनुसार किती खर्च करायला हवा?इत्यादी बाबींचे आर्थिक नियोजन करून घ्यावे.

8) Investment –

● आपण आपला Time, Money आणि Energy सगळयात जास्त कुठे खर्च करायला हवा? याचे देखील एक Fix नियोजन करणे.याने आपण अनावश्यक गोष्टी करणे टाळु शकतो ज्याने आपला Time, Money आणि Energy तिघांची बचत होईल आणि योग्य ठिकाणी गुंतवणुक देखील होईल.

वरील सर्व बाबींचे पालन केल्यास आपणास नक्कीच आपल्या Professional आणि Personal Life ला Balanced ठेवता येईल.आणि भविष्यात आपल्याला Regret करण्याची वेळ देखील येणार नाही.

Work life balanced विषयी वारंवार विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न –

1) आपण work life balance ठेवणे महत्वाचे आहे का ?

होय जर आपल्याला आपल्या career, goal achievement,job,business मध्ये भरपुर यश प्राप्त करून झाल्यानंतर उतारवयात पुढे जाऊन आपल्याला यश प्राप्तीच्या नादात आपल्या फँमिलीला वेळ देता आला नाही,आपली जबाबदारी कर्तव्ये पार पाडता आली नाही,आपल्या आरोग्याकडे लक्ष देता आले नाही,आपली लाईफ enjoy करता आली नाही अशी खंत मनात ठेवायची नसेल तर आपण work life balance ठेवणे फार गरजेचे आहे.