Health ID card माहिती – Health Id card information in Marathi

Health ID card म्हणजे काय – Health Id card information in Marathi

health id card विषयी माहीती डिजीटल हेल्थ आयडी कार्ड ही एक अशी आरोग्यविषयक सुविधा आहे जी आपल्या देशातील नागरीकांना प्राप्त होणार आहे.

याने आपण देशातील कोणत्याही कानाकोपरयात असताना देखील स्वतावर उपचार करू शकतो.आणि यासाठी आपल्याला कुठल्याही पावती तसेच चेक रेकाँर्डची देखील आवश्यकता पडणार नाहीये.

कारण जो रूग्ण उपचार घेणार असेल त्याची सर्व माहीती त्याच्या हेल्थ आयडी कार्डमध्ये दिलेली असणार आहे.

ह्या कार्डमध्ये कोणत्या नागरीकाला,रूग्णाला कुठला आजार झाला आहे आणि याआधी त्या आजारावर कोणत्या रूग्णालयातुन त्याने उपचार घेतले आहेत हे देखील डाँक्टरांना समजण्यास मदत होणार आहे.

आजच्या लेखात आपण ह्याच health id card विषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

Health id card काय आहे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 आँगस्ट रोजी लाल किल्ला येथे डिजीटल हेल्थ कार्ड अभियानाविषयी महत्वपुर्ण घोषणा केली होती.

आयुष्यमान भारत डिजीटल अभियान(ABDM) अंतर्गत भारतातील सर्व नागरीकांना एक डिजीटल हेल्थ आयडी कार्ड दिले जाणार आहे.

ज्यात प्रत्येक नागरीकाच्या आरोग्यासंबंधीचे सर्व रेकाँर्ड डिजीटल स्वरूपात स्टोअर राहणार आहे.यात नागरीकांचा एक इलेक्ट्राँनिक मेडिकल रेकाँर्ड बनवण्यात येणार आहे.

ज्यात जो रूग्ण भारतातील कोणत्याही ठिकाणी आपल्यावर उपचार घेत असेल त्या रूग्णाने आधी कुठे उपचार घेतले होते तसेच त्याला कोणता आजार आहे इत्यादी आपल्या वैद्यकीय उपचाराबाबतची सर्व माहीती ह्यात दिलेली असणार आहे.

जर आपणास ह्या आयुष्यमान भारत डिजीटल मिशनमध्ये सहभागी व्हायचे असेल तर आपणास आपले एक डिजीटल हेल्थ आयडी तयार करावे लागणार आहे.

See also  Eat Right Station - FSSAI द्वारे गुवाहाटी रेल्वे स्टेशनला देण्यात आले ईट राईट स्टेशनचे प्रमाणपत्र Guwahati Railway Station - Eat Right Station Certificate

ह्या हेल्थ आयडी कार्ड अंतर्गत चौदा अंकाचे नंबर तयार केले जातील.आपण हे हेल्थ आयडी कार्ड एकुण दोन गोष्टींसाठी वापरू शकतो.

1)आपली ओळख प्रमाणित करण्यासाठी(for our identification)

2) आपल्या आरोग्याच्या नोंदी एकापेक्षा जास्त सिस्टीम आणि आपल्या संमतीनुसार भागधारकांपर्यंत पोहोचवण्यासाठी.

Digital Health id card अभियान चे प्रमुख उददिष्ट काय आहे?

लोकांना आपल्या आरोग्यविषयक सर्व नोंदी एकाच ठिकाणी ठेवता याव्यात हे प्रमुख उददिष्ट हे अभियान सुरू करण्यामागचे आहे.

याचसाठी आपल्याला आपल्या आरोग्यविषयक इतर जुने रेकाँर्ड हेल्थ आयडीशी लिंक करण्याची सुविधा देखील यात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Health id card चे फायदे कोणकोणते आहेत?

Health id card चे पुढीलप्रमाणे फायदे आपण घेऊ शकतो-

1)जर आपल्याला भारतातील कुठल्याही ठिकाणी एखाद्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असेल तर आपण अशा वेळी कधीही आपल्या डिजीटल हेल्थ रेजिस्टरमध्ये प्रवेश करू शकतो.आणि आपले जुने हेल्थ रेकाँर्ड तेथील डाँक्टरांना दाखवू शकतो.आणि त्यानुसार स्वतावर उपचार करून घेऊ शकतो.

2) आपण आपल्या हेल्थ आयडीसोबत आपली पर्सनल हेल्थ डिटेल असलेले रेकाँर्ड देखील लिंक करू शकतो.

3) याचसोबत आपल्या आरोग्यासंबंधीची सर्व माहीती ह्या हेल्थ आयडीमध्ये रेजिस्टर असणार आहे.

4) आपण आपल्या मुलांचे डिजीटल हेल्थ आयडी कार्ड बनवू शकतो.आणि आपला हेल्थ आयडी अँक्सेस एखादा नाँमिनी देखील अँड करू शकतो.हा नाँमिनी आपल्याला आपले पर्सनल हेल्थ रेकाँर्ड पाहण्यास तसेच मँनेज करण्यास मदत करू शकतो.

5) लोकांना आपल्या आरोग्यविषयक सर्व नोंदी एकाच ठिकाणी ठेवता येणार आहे.

6) कुठल्याही रूग्णावर उपचार करण्याआधी डाँक्टरांना त्याचे हेल्थ रेकाँर्ड हेल्थ आयडी कार्डदवारे जाणुन घेता येणार आहे.

याने डाँक्टरांना आपले म्हणजेच रूग्णाचे पुन्हा पुन्हा हेल्थ चेक अप करावे लागणार नाही.कारण आपले सर्व चाचणी अहवाल आपल्या हेल्थ आयडीच्या रेकॉर्डद्वारे डॉक्टरांसमोर डिजिटल पद्धतीने असणार आहे.(रूग्णाला कोणता आजार आहे? याआधी त्याने कुठे उपचार घेतले होते,इत्यादी.)

7) जर रूग्णाचा आजार फार गंभीर स्वरूपाचा नसेल तर डाँक्टर रूग्णाचे हेल्थ रेकाँर्ड चेक करून त्याला डिजीटल कंसल्टन्सी करून म्हणजेच डिजीटल पदधतीने आरोग्यविषयक सल्ला देऊन रूग्णाला बरे करू शकणार आहे

आरोग्याविषयी इतर महत्वपूर्ण लेख

Digital health id card साठी online apply कसे करावे?

  1. आपल्याला सर्वप्रथम नँशनल डिजीटल हेल्थ मिशनच्या आँफिशिअल वेबसाईटवर जावे लागेल.(healthid.ndhm.gov.in)
  2. यानंतर आपल्याला होम पेजवर जाऊन create your health id ह्या option वर click करावे लागेल.
  3. क्लीक केल्यानंतर आपल्यासमोर दोन option येतील यात जर आपल्याला आधार कार्डदवारे हेल्थ आयडी तयार करायचा असेल तर generate view aadhar या option वर क्लीक करून आपला आधार नंबर इंटर करावा लागेल.
  4. आणि जर आपणास मोबाईल नंबरदवारे हेल्थ आयडी कार्ड बनवायचे असेल तर आपल्याला generate view mobile number वर क्लीक करून आपला मोबाईल नंबर फिल करावा लागेल.
  5. यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP send केला जातो जो आपण तिथे बाँक्समध्ये फिल करायचा असतो.मग आपल्या मोबाईलवर ओटीपी इंटर केल्यावर आपला 14 अंकांचा हेल्थ आयडी नंबर देखील मँसेजमध्ये सेंड केला जातो सोबत एक लिंक देखील दिली जाते ज्यादवारे आपण सहज आपल्या आयडीवर लाँग इन करू शकतो.
  6. यानंतर आपल्यासमोर एक फाँर्म ओपन होईल फाँर्ममध्ये विचारलेली सर्व माहीती तिथे आपल्याला भरायची असते.(आपले नाव,जेंडर,डेट आँफ बर्थ)सोबत आवश्यक ती document देखील जोडावे लागत असतात.
  7. आणि मग शेवटी सबमीट बटणावर ओके करून फाँर्म सबमीट करायचा असतो.
  8. यानंतर आपला हेल्थ आयडी जनरेट होऊन जात असतो.
  9. लवकरच डिजीटल हेल्थ कार्ड तयार करण्यासाठी आपण driving licence चा उपयोग देखील करू शकतो यासाठी आपल्याला खालील स्टेप फाँलो कराव्या लागतील-
  10. आपल्याला सर्वप्रथम नँशनल डिजीटल हेल्थ मिशनच्या आँफिशिअल वेबसाईटवर जावे लागेल.(healthid.ndhm.gov.in)
  11. Generate id option select करावे.
  12. आणि generate view driving licence option select करावे.
  13. आणि आपला driving licence number enter करायचा असतो.
  14. Pop up menu मध्ये आपल्याला notiffy करण्यात येईल की सर्व माहीती सबमीट केल्यानंतर आपल्याला एक नाव नोंदणी क्रमांक(enrollment number) दिला जाईल.
  15. आपल्याला आपला नावनोंदणी क्रमांक जवळच्या सहभागी सुविधेकडे घेऊन जाणे आवश्यक आहे आणि आपल्याला जर आपला डिजिटल हेल्थ आयडी मिळवायचा असेल.तथापि,जर आपल्याला हेल्थ आयडीची तात्काळ आवश्यकता असेल तर आपण आपल्या आधार नंबरद्वारे आयडी तयार करू शकतो.
See also  केटो डाएट म्हणजे काय ? केटो आहार - Keto Diet Plan Information In Marathi

Health id card साठी कोणते महत्वाचे document लागत असतात?

  • आधार कार्ड
  • मोबाईल नंबर
  • लवकरच डिजीटल हेल्थ कार्ड तयार करण्यासाठी आपण driving licence चा उपयोग देखील करू शकणार आहे.
  • आधार कार्ड आणि मोबाईल नंबर दोघे लिंक असायला हवे.
  • Health id card आपण कोणत्या तीन पदधतीने बनवु शकतो?
  • मोबाईल नंबर दवारे
  • आधार कार्डदवारे
  • ड्राईव्हिंग लायसन्स

Health id card मध्ये health id number दवारे login कसे करावे?

सर्वप्रथम आपण आयुष्यमान भारत हेल्थच्या आँफिशिअल वेबसाईटवर जावे.(healthid.ndhm.gov.in)

यानंतर log in option वर जाऊन आपल्याला आपला health id number तसेच date of birth enter करावा लागेल आणि i am not robot वर tick करून सबमीट बटणावर क्लिक करावे.

यानंतर आपल्याला दोन आँप्शन दिले जातात log in view otp आणि log in view password यापैकी आपण कुठलेही एक आँप्शन निवडु शकतो.यानंतर खाली दिलेल्या लाँग इन आँप्शनवर क्लीक करावे.

Health id card online download कसे करतात?

आपल्याला सर्वप्रथम नँशनल डिजीटल हेल्थ मिशनच्या आँफिशिअल वेबसाईटवर जावे लागेल.(healthid.ndhm.gov.in)

यानंतर log in option वर जाऊन आपल्याला आपला health id number enter करावा लागेल आणि i am not robot वर tick करून सबमीट बटणावर क्लिक करावे.

यानंतर आपल्याला दोन आँप्शन दिले जातात log in view otp आणि log in view password यापैकी आपण कुठलेही एक आँप्शन निवडु शकतो.यानंतर खाली दिलेल्या लाँग इन आँप्शनवर क्लीक करावे.

यानंतर screen वर एक message disply होतो your health id card is generated त्याच्या खाली scroll करून खाली आल्यावर आपल्याला आपली सर्व हेल्थ आयडी डिटेल दिसुन येईल.आणि खाली download health id card हे आँप्शन दिसून येईल त्यावर क्लीक करून आपण आपले हेल्थ आयडी कार्ड डाऊनलोड करू
शकतो.

PHR address म्हणजे काय?

PHR address म्हणजेच आपला personal health record address.

See also  दिवसभर उत्साही राहण्यासाठी हे Energy Booster पदार्थ लाभदायक

हा आपला स्वयंघोषित युझरनेम असतो.याला information exchange आणि concent मॅनेजर (HIE-CM) मध्ये साइन इन करणे आवश्यक असते.

डेटा शेअर करण्यासाठी सर्व हेल्थ आयडीला एका कन्सेंट मँनेजरसोबत लिंक करण्यात येते.

युझर्सला आपला हेल्थ आयडी स्वता देखील जनरेट करता येऊ शकतो.फक्त आयडी तयार करत असताना आपल्याला पीएच आर अँड्रेस कन्सेंट मँनेजरसाठी सेट करावा लागत असतो.नंतर आपले हेल्थ रेकॉर्ड शेअर करावे लागते.

  1. Health id card चा customer care,helpline number-
  2. Helpline number-1800-114477-
  3. 144777(toll free)

Digital health card विषयी वारंवार विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न –

1) digital health card मुळे आपल्या privacy ला धोका पोहचु शकतो का?

डिजीटल हेल्थ कार्डमध्ये आपल्या हेल्थ संबंधी सर्व माहीती जोडली जात असते.त्यामुळे आपल्या मनात हा प्रश्न निर्माण होणे साहजिकच आहे की याने आपली privacy break होईल का?

याबाबत डाँक्टर शर्मा असे म्हणाले आहे की कुठल्याही व्यक्तीची health history open करणे तसेच जगासमोर expose करणे हा ह्या योजनेमागचा हेतु अजिबात नाहीये.

आपणास हवे असेल तर आपण हेल्थ आयडी तयार करू शकतो आणि त्याला आपले हेल्थ रेकाँर्ड जाँईन करू शकतो.याने आपण आपल्या हेल्थ संबंधित माहीती तसेच महत्वाचे डाँक्युमेंट रिअल टाईममध्ये अँक्सेस करू शकतो.

याने आपल्या privacy ला कुठलाही धोका पोहचणार नाही.