केटो डाएट म्हणजे काय ? केटो आहार – Keto Diet Plan Information In Marathi

केटो डाएट प्लँनविषयी माहीती – Keto Diet Plan Information In Marathi

आपल्याला प्रत्येकालाच आपले वजन कमी करायची ईच्छा असते.

पण वजन कमी करायच्या बाबतीत जे पथ्य पानी आपण पाळणे आवश्यक असते.ते आपल्यातील बहुतेक जण पाळत नसतात. आपल्यातील खुप जण तर असा विचार करतात की आज एक दिवस बाहेरचे फास्टफुड/जंकफुड खाऊन घेतो.मग उद्या पासुन व्यायाम योगा सुरू करून वजन कमी करता येईल.

असे केल्याने दिवसेंदिवस आपल्या शरीरातील फँट वाढत जातो ज्याने लढढपणाच्या समस्येचा देखील आपणास सामना करावा लागत असतो.

कारण असे व्यक्ती उद्यापासुन व्यायाम सुरू करून वजन कमी करून टाकेन अशी स्वताची तात्पुरता फास्टफुड खाण्यासाठी समजुन तर काढतात पण कधीच व्यायाम करत नसतात.डेली वर्क आऊट आणि एक्सर्साईज करत नसतात.आणि याचमुळे बहुतेक जणांना लढढपणाच्या गंभीर समस्येला देखील सामोरे जावे लागत असते.

मग अशा वेळी आपल्यातील बहुतेक व्यक्ती एकच पर्याय निवडत असतात आणि तो म्हणजे डाएटिंग करणे.

आपण जर डाएटिंग केली तर आपले वजन लवकरात लवकर कमी होऊन आपण स्लीम होऊ शकतो.हे आपल्या सर्वानाच माहीत आहे.

पण हे डाएट फाँलो करण्यात देखील आपल्यातील खुप जण बेजबाबदारपणा हलगर्जीपणा करत असतात.

See also  आपल्या शरीरातील लाल रक्तपेशीमध्ये वाढ करणारया काही महत्वाच्या अन्नपदार्थांची यादी - red blood cells increase food list

ज्याचे परिणाम स्वरूप त्यांचे वजन आणि फँट दोघे कमी होत नसतात.उलट वजन कमी करण्याच्या नादात ते आपल्या शारीरीक आरोग्याला धोका पोहचवत असतात.

म्हणुन जर आपल्याला आपल्या शरीराची चरबी कमी करायची असेल,वजनात घट करायची असेल तर आपण योग्य तोच डाएट प्लँन फाँलो करायला हवा.

याचसाठी आज आपण वजन कमी करण्यासाठी नेहमी फाँलो करण्यात येत असलेल्या किटो डाएट प्लँँन विषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

चला तर मग क्षणाचाही विलंब न करता आजच्या आपल्या मुख्य विषयाकडे वळुया.

किटो म्हणजे काय? Meaning Of Keto Diet In Marathi

या आहारात कार्बोहायड्रेटच प्रमाण अतिशय कमी केल जाते  आणि  फँटस हे विपुल प्रमाणात घेतले जातात .म्हणजेच कमी कार्बोदके आणि जास्त चरभीयुक्त पदार्थअसलेला आहार म्हणजे किटो डाएट

किटो डाएटला आपण केटोजेनिक डाएट असे देखील संबोधित असतो.केटो डाएट मध्ये एक उच्च आणि चरबीयुक्त आहाराचा समावेश होतो.

हा डाएटचा असा प्रकार आहे ज्यामध्ये आपले शरीर उर्जा प्राप्त करायला पुर्णपणे चरबीवर अवलंबुन राहत असते.

किटो डाएटमध्ये कर्बोदकांचा समावेश फार कमी प्रमाणात केला जातो.आणि प्रथिनांचे देखील यात मध्यम स्वरुपात सेवन करावे लागते.

किटो डाएटमध्ये काही मोजक्या आणि निवडक भाज्यांचेच सेवन करायचे असते.या आहारात फळांचे सेवन केले जात नाही.

केटोसिस म्हणजे काय? -Ketosis,Keto Body Meaning In Marathi

केटोसिस ही एक प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया तेव्हा घडुन येत असते जेव्हा आपल्या शरीरात उर्जेसाठी तसेच बर्न करण्यासाठी पुरेशी कर्बोदके उपलब्ध नसतात.

किटो डाएट फाँलो करत असताना कोणकोणत्या पदार्थाचे सेवण आपण करू शकतो? Keto Diet Plan In Marathi

किलो डाएट फाँलो करत असताना पुढील काही पदार्थाचे सेवण आपण करू शकतो-

● मटण

● चिकण

● शेंगदाणे

● चीज (भारतातील लोक या आहारात भरपूर चीज खातात.)

● मासे

● बदाम

● काजु

● नारळ पाणी

● बटर

● आँलिव्ह आँईल

● अक्रोड

● अंडी

See also  पीसी ओएस म्हणजे काय? PCOS in Marathi

● अँव्हँकँडो आँईल

● अळशी

● विविध दाळीचे प्रकार

● तिखट(फक्त चवीसाठी)

किलो डाएट फाँलो करत असताना कोणकोणत्या पदार्थाचे सेवण आपण करू नये? Which Food Avoid In Keto Diet In Marathi

किलो डाएट फाँलो करत असताना पुढील काही पदार्थाचे सेवण आपण करू नये-

असे पदार्थ ज्यांच्यावर प्रक्रिया(Processed Food) करण्यात आली आहे.

● ज्या पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेट अधिक प्रमाणात आहे असे पदार्थ खाणे टाळावे.

● शर्करेपासुन बनविलेले कुठलेही गोड पदार्थ

● या आहारात फळांचे तसेच त्यांच्या रसाचे देखील सेवण करत नसतात.

कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असणारे अन्नपदार्थ कोणकोणते आहेत?(Low Carb Food In Marathi)

ज्यात कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असते असे अन्नपदार्थ पुढीलप्रमाणे आहेत-(Low Carb,Keto Food List In Marathi)-

● अंडी :

● अँव्हाकँडो :

● नटस :

● फळे :

● चीज :

● टमाटा :

● भाज्या :

● ब्रोकोली :

● फुलकोबी :

● पालक :

● सँल्मन मासा:

● झुचिनी :

● चिकन :

● स्ट्राँबेरी :

● काकडी :

● दही :

● ग्रीक दही :

● चिया बियाणे :

● मांस :

● पपई :

● सफरचंद

● नारळ पाणी :

● दुधापासुन बनवलेले पदार्थ :

● शेंगदाणे :

● सुका मेवा :

● काजु

● बदाम :

● विविध दाळीचे प्रकार

किटो डाएट फाँलो केल्याने शरीराला होणारे फायदे कोणते ? Benefits Of Keto Diet In Marathi

किटो डाएट फाँलो केल्याने आपल्या शरीराला पुढील काही फायदे होत असतात-

किटो डाएट फाँलो करण्याचा पहिला फायदा हा आहे की याने आपल्या शरीरातील स्टोअर फँट बर्न होत असतात.ज्याने आपल्या शरीरात असणारे फँट सेल्स कमी होण्यास मदत होते आणि परिणाम स्वरूपी आपले वजन हळुहळु कमी होऊ लागते.

● किटो डाएटमध्ये आपण साखरेपासुन बनलेल्या गोड पदार्थाचे सेवन करत नसतो.ज्याने आपल्याला मधुमेहाची समस्या देखील उदभवत नसते.

● किटो डाएट आपल्या कोलेस्टेराँलची पातळी सुधारण्यास मदत करत असते.ज्याने आपले हदयाचे आरोग्य उत्तम राहत असते.

● जे लोक नियमित किटो डाएट फाँलो करतात अशा व्यक्तींना फार कमी प्रमाणात भुक लागत असते.ज्याचा फायदा त्यांना वजन कमी करण्यासाठी होत असतो.

See also  न्यूट्रिशन बार म्हणजे काय ? Nutrition Bars information Marathi

● किटो डाएट फाँलो केल्याने आपल्या शरीरात भरपुर उर्जा निर्माण होत असते.कारण यात आपण चरबीयुक्त आहाराचे सेवण करत असतो.याने आपल्याला एनर्जिटिक वाटत असते.

● किटो डाएट फाँलो केल्याने आपल्याला त्वचेसंबंधी कुठलीही समस्या उदभवत नसते.
उदा,चेहरयावर पिंपल्स येणे,मुरूम पडणे,चेहरा सुजणे इत्यादी.

● आपल्या शरीरातील ब्लड प्रेशरचे प्रमाण नेहमी कंट्रोलमध्ये राहत असते जेणे आपणास हाय ब्लड प्रेशरची समस्या उदभवत नसते.

● किटो डाएट हा कर्करोगापासून आपला बचाव करण्यासाठी देखील खुप फायदेशीर ठरत असतो.असे संशोधनातुन समोर आले आहे.

किटो डाएटचे आपल्या शरीरावर होणारे दुष्परिणाम कोणकोणते आहेत?(Side Effects Of Keto Diet In Marathi)

किटो डाएटचे आपल्या शरीरावर होणारे दुष्परिणाम पुढीलप्रमाणे आहेत-

● संशोधनातुन असे समोर आले आहे की किटो डाएट फाँलो करत असताना जर आपण ते मध्येच अर्धवट सोडुन दिले तर आपले जेवढेही वजन कमी झाले आहे त्यात दुपटीने वाढ होऊ शकते.

● किटो डाएटमध्ये आपण फँटमध्ये आपण फँटयुक्त आहाराचे सेवण करत असतो.ज्याने आपल्या रक्त धमनीत जर कोलेस्टेराँलची पातळी वाढली तर ब्लाँकेज वाढण्याची संभावना तसेच तसेच आपणास हदयरोगाचा देखील सामना करावा लागु शकतो.

● जास्त चरबीयुक्त आहाराचे सेवण केल्याने आपणास किडनी स्टोनचा देखील प्राँब्लेम होऊ शकतो.

● ज्यांना लिव्हरशी संबंधित समस्या आहे अशा व्यक्तींना किटो डाएट हानीकारक ठरू शकतो.म्हणुन ज्यांना आधीपासुन लिव्हरशी संबंधित काही समस्या आहे त्यांनी आहार तज्ञांचा सल्ला घेऊनच किटो डाएट फाँलो करावे.

● किटो डाएटमध्ये साखरेचे पदार्थ खाणे बंद करावे लागते.आणि समजा शरीरातील साखरेचे प्रमाण खुपच कमी झाले तर आपल्याला लो ब्लड शुगरचा देखील प्राँब्लेम येऊ शकतो.

● आपल्या प्रत्येकाची जीवनशैली आणि आहाराचा आपल्या पाचनसंस्थेवर परिणाम होत असतो हे आपल्याला चांगलेच माहीत आहे.आणि त्यातच आपण आहारात अचानक कुठल्याही प्रकारचा बदल केला तर पचनसंस्थेवर याचा परिणाम होऊन आपणास बदधकोष्ठतेचा त्रास होण्याची अधिक संभावना असते.

किटो डाएट फाँलो करण्याचे जेवढे फायदे आहेत तेवढे तोटे देखील आहेत.

म्हणुन आपण हे डाएट फाँलो करण्याच्या अगोदर डाँक्टर तसेच आहार तज्ञांचा सल्ला एकदा नक्कीच घ्यायला हवा.याने आपल्याला पुढे जाऊन आरोग्यविषयक कुठल्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही.

किटो डाएटविषयी वारंवार विचारले जाणारे काही महत्वाचे प्रश्न –

1)किटो डाएट हे आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहे का?

किटो डाएट हे आपल्या प्रत्येकाच्या आरोग्यासाठी लाभदायकच ठरत असते पण कधीकधी किटो डाएटमुळे आपली रोजची जीवन शैली आणि आहाराची पदधत यात बदल झाल्याने हे आपल्या शरीराला नुकसानदायी ठरण्याची ठरू शकते.

म्हणुन आपण आपल्या जीवनशैली आणि आहार पदधतीला शारीरीक आरोग्याला किटो डाएट अनुकूल ठरत असेल तरच हे फाँलो करायला हवे.अन्यथा नाही.