बिलिरूबीन टेस्ट म्हणजे काय?bilirubin test information

बिलिरूबीन टेस्ट म्हणजे काय?bilirubin test information

आपल्या रक्तातील बिलिरूबीनचे प्रमाण जाणुन घेण्यासाठी ही बिलिरूबीन टेस्ट प्रामुख्याने केली जाते.

बिलिरूबीन टेस्ट ही आपल्याला कावीळ झालेला आहे किंवा नाही हे चेक करण्यासाठी केली जाते.

आपल्या शरीरातील बिलिरूबीनचे प्रमाण अधिक वाढल्याने आपणास कावीळ jaundice होण्याची शक्यता असते.

बिलिरूबीन टेस्ट म्हणजे कायbilirubin test information
बिलिरूबीन टेस्ट म्हणजे कायbilirubin test information

बिलिरूबीन टेस्टचे प्रकार किती अणि कोणकोणते आहेत?

१)अन कंजुगेटेड/इंडायरेक्ट बिलिरूबीन

२)कंजुगेटेड/डायरेक्ट बिलिरूबीन –

१)अन कंजुगेटेड बिलिरूबीन-

हा एक यकृतादवारे संयुग्मित होत नसलेला बिलिरूबीन आहे.हा बिलिरूबीन यकृतादवारे संयुग्मित होत नाही म्हणून याला अन कंजुगेटेड बिलिरूबीन असे म्हणतात.

ह्या बिलिरूबीनला इंडायरेक्ट बिलिरूबीन असे देखील म्हटले जाते.

२) कंजुगेटेड बिलिरूबीन –

हा एक यकृतादवारे संयुग्मित होत असलेला बिलिरूबीन आहे.हा बिलिरूबीन यकृतादवारे संयुग्मित होतो म्हणून याला कंजुगेटेड बिलिरूबीन असे म्हणतात.ह्याला डायरेक्ट बिलिरूबीन असे देखील म्हटले जाते.

बिलिरूबीन म्हणजे काय?

बिलिरूबीन टेस्ट म्हणजे कायbilirubin test information
बिलिरूबीन टेस्ट म्हणजे काय?bilirubin test information

बिलिरूबीन हे एक पिवळ्या रंगाचे द्रव्य तसेच पदार्थ असतो जो आपल्या शरीरातील वेस्ट प्रोडक्ट म्हणून देखील ओळखला जातो.

जेव्हा आपल्या शरीरातील लाल रक्तपेशींचे नुकसान होते तेव्हा बिलिरूबीनची निर्मिती होते.आपल्या शरीरात जितक्या प्रमाणात लाल रक्तपेशींचे नुकसान होते तेवढेच आपल्या शरीरातील बिलिरूबीनचे प्रमाण देखील वाढत असते.

बिलिरूबीन वाढण्याची प्रमुख कारणे कोणकोणती आहेत?कोणकोणत्या आजारात आपल्या शरीरातील बिलिरूबीनचे प्रमाण वाढत असते?

आपल्या शरीरातील बिलिरूबीनचे प्रमाण खालील काही आजारांमध्ये अधिक वाढत असते.

१) अॅनेमिया असणे

२)हिपेटाईटिस असणे

३) लिव्हर किरोसिस असणे

४) डक्ट स्टोन ची समस्या असणे

५) ब्लाडर स्टोनची समस्या असणे

आपल्या रक्तातील बिलिरूबीनचे प्रमाण अधिक वाढण्याची प्रमुख लक्षणे कोणकोणती आहेत?

आपल्याला खालील दिलेली लक्षणे आपल्यामध्ये दिसुन येत असतील तर आपण त्वरीत डाॅक्टरांचा सल्ला घेऊन बिलिरूबीन टेस्ट करायला हवी.

  • डोळे पिवळे पडणे
  • त्वचेचा रंग पिवळा पडणे
  • पोट दुखणे
  • मळमळ होणे
  • उलट्या होणे
  • भुक न लागणे
  • पिवळे शौचास होणे
  • शरीरावर सुज येणे
  • शरीराला खाज सुटणे
  • याचसोबत लिव्हर किरोसिस,हिपेटाईटिस,अॅनिमिया होणे ही देखील बिलिरूबीनचे प्रमाण वाढण्याची लक्षणे ठरू शकतात कारण लिव्हर किरोसिस,हिपेटाईटिस,अॅनिमिया असल्यावर देखील आपणास कावीळ होण्याची शक्यता असते.
See also  एन ए बी एचचा फुलफाँर्म काय होतो? - NABH Full Form In Marathi

बिलिरूबीनची नाॅरमल रेंज काय असते?bilirubin normal range

बिलिरूबीनची एकुण नाॅरमल रेंज ही 0.1 ते 1.2 एम जी/डीएल इतकी असते.

अन कंजुगेटेड/इंडायरेक्ट बिलिरूबीनची रेंज 0.2 ते 0.8 एम जी/डीएल इतकी असणे आवश्यक आहे.डायरेक्ट/ कंजुगेटेड बिलिरूबीनची रेंज 0.1 ते 0.4 असणे आवश्यक असते.

टोटल बिलिरूबीनची व्हॅल्यु १.४ एमजी/डीएल इतकी असणे आवश्यक आहे.

जर आपल्या रक्तातील बिलिरूबीनचे प्रमाण 2.5 पेक्षा कमी असेल तर आपणास लिव्हर किरोसिस हिपेटाईटिस अॅनिमिया ब्लाडर स्टोन डक्ट स्टोन इत्यादी आजार असण्याची शक्यता आहे.

पण आपल्या रक्तातील बिलिरूबीनचे प्रमाण 2.5 पेक्षा अधिक असेल तर हे काविळचे लक्षण मानले जाते.

वेगवेगळ्या लॅबोरेटरी मध्ये ही यांच्या रेंजमध्ये थोडाफार फरक असु शकतो.

बिलिरूबीन टेस्ट कशी घेतली जाते?

बिलिरूबीन टेस्ट ही आपल्या रक्तात कंजुगेटेड अणि अन कंजुगेटेड बिलिरूबीन किती प्रमाणात आहे हे जाणून घेण्यासाठी केली जाते.

बिलिरूबीन टेस्ट केल्याने आपणास हे लक्षात येते की आपल्या रक्तातील टोटल बिलिरूबीनचे प्रमाण किती आहे.

बिलिरूबीन टेस्ट करण्यासाठी रूग्णाच्या हातातुन रक्ताचा नमुना घेतला जातो.ही टेस्ट करण्याअगोदर कुठलीही विशेष काळजी घेण्याची पुर्वतयारी करण्याची देखील गरज नसते.