उपयोगी तेलबियां (आळीव, जवस, कारळं आणि तीळ) ची माहिती – Useful Oilseeds Marathi


Useful Oilseeds Marathi

उपयोगी तेलबियां

तेलबियांमध्ये करडई, भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन इत्यादींचा प्रामुख्याने समावेश होतो. याशिवाय काही दुर्लक्षित तेलबियांचे देखील आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये उत्पादन घेतले जाते. यामध्ये आळीव, जवस, कारळं आणि तीळ यांचा समावेश होतो.

आळीव :

  • शास्त्रीय नाव लेपिडियम सटायवम आहे. यास मराठीमध्ये आळीव नावाने ओळखले जाते. उत्पादन भारत, उत्तर अमेरिका आणि युरोपच्या काही भागामध्ये घेतले जाते.
  • आळीवच्या बियामध्ये ८० ते ८५ एंडोस्पर्म, १२ ते १७ टक्के कोंडा आणि २ ते ३ टक्के एब्रियो असतो.
  • या बिया आकाराने लहान असून त्यांचा रंग लालसर असतो. या बियांना अनन्यसाधारण औषधी महत्त्व आहे.
  • या बिया पाण्यात भिजवल्यास नंतर त्यांचा पृष्ठभाग चिकट होतो कारण त्यामध्ये म्यूसिलेजस असतात. आळीवची पाने व मुळांना विशिष्ट वास असल्यामुळे त्यांचा वापर मसाल्यासारखा देखील होतो.
  • बियांचा वापर सॅलड आणि कॉटेज चीज मध्ये केला जातो. नियमितपणे अळीवचे सेवन केल्याने रक्तक्षय बरा होण्यास मदत होते.
  • आळीव बिया व मध यांची पेस्ट करून घेतल्यास आमांश बरा होतो. तसेच कोंब आलेल्या आळीव बिया
  • खाल्ल्यास आमांश व जुलाबामध्ये आतड्यांचा दाह कमी होण्यास मदत होते.
  • किशोरवयीन मुली वे गरोदर स्त्रियांसाठी आळीव मासिक पाळी नियमितता, स्तनदा मातामध्ये दुधाची वाढ व प्रसुतीनंतरच्या इतर तक्रारींसाठी फायदेशीर आहे. आळीव पावडर गरम पाण्यासोबत
  • लहान मुलांना दिल्यास पोटाच्या विकारासाठी उत्तम उपचार आहे.
  • आळीवमध्ये गोंदाचे प्रमाण चांगळे असल्यामुळे याचा वापर गम अरेबिक व ट्रृंगाकांथ या उच्च कार्बोदकांसाठी पूरक म्हणूनही केला जातो.

जवस :

  • जवस हे लिनासी या वर्गात मोडत असून त्याचे हिंदी नाव अलशी आहे.
  • उत्तर अमेरिका व युरोपमध्ये जवस मोठया प्रमाणवर घेतले जाते.
  • आपल्या देशातील जवसाचे उत्पादन दिवसेंदिवस वाढत आहे. जवसाच्या बिया आकाराने सपाट अंडाकृती असून लालसर विटकरी ते फिकट
  • पिवळया रंगात आढळतात. जवसाच्या बिया कुरकुरीत असून विशिष्ट चव आहे.
  • जवसाचा वापर तेल, पीठ आणि पावडर तयार करण्यासाठी करतात.
  • जवस हे आरोग्यदायी तेलाचा एक चांगला स्रोत असून जवसाच्या तेलामध्ये स्निग्ध आम्ले (पी.यु.एफ.ए.) पाचक आम्लाचा चांगला स्रोत असून
  • जवसामध्ये चांगल्या गुणवत्तेचे प्रथिने, विरघळणारे तंतुमय पदार्थ आणि आरोग्यदायी रासायनिक पदार्थ पुरवण्याची उत्तम क्षमता आहे.
  • जक्सामध्ये बहुअसंपूकत स्निग्ध आम्लांचे प्रमाण जास्त आहे.
  • ईकोसानॉईडस हे रासायनिक घटक ओमेगा-३ प्रकारच्या स्निग्ध आम्लांपासून बनतात व जवसामध्ये आढळतात. हे स्निग्ध पदार्थ रक्‍तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करून हृदयाची कार्यक्षमता वाढविण्यास मदत करतात.
See also  ट्रोपोनिन टी टेस्ट म्हणजे काय? ट्रोपोनिन टी टेस्ट का केली जाते? - What is the troponin T test for?

तीळ :

  • तीळ ही ५० ते १०० सेमी. पर्यंत वाढणारी वार्षिक वनस्पती आहे. तिळाच्या बिया लहान सपाट असून त्यांचा रंग पांढरा, करडा, विटकरी किंवा काळा असतो.
  • तिळामध्ये दोन विशिष्ट घटक आढळतात. सेसामिन व सेसामोलीन त्यांचे रूपांतर सेसामॉल व सेसामिनॉल या दोन फेनॉलिक या रासायनिक अँटीऑकक्‍्सिडेंट मध्ये होते. हे घटक लिगनान या घटकाशी संबधित असून मानवी आरोग्याच्या दृष्टीने कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करून फायदेशीर ठरतात.
  • तीळ हे कॉपर व कॅल्शियम या मूलद्रव्यांचा उत्कृष्ट स्रोत असून त्यामध्ये फॉस्फरस, लोह, मॅग्रेशिअम, मँगनीज, झिंक हे मूलद्रव्य देखील चांगल्या प्रमाणात आढळतात.
  • तिळाच्या तेलाचा वापर स्वयंपाकासाठी, मसाज व आरोग्यासाठी केला जातो.
  • याशिवाय तिळाच्या तेलाचा वापर मारगारिन, साबण, औषधे, रंग व वंगण तयार करण्यासाठी करतात. सौंदर्यप्रसाधने व सुवासिके करण्यासाठी सुद्धा या तेलाचा वापर करतात.
  • तिळाच्या बिया व टरफल यांचा वापर गोड पदार्थ तसेच बेकरी व कन्फेक्शनरी पदार्थांमध्ये देखील केला जातो.

कारळं (खुरासनी) :

  • कारळं हे व्दिदल वनस्पती असून कारळ्याच्या बिया सूर्यफुलाच्या बियांप्रमाणेचे असून आकाराने लहान व रंगाने काळया असतात.
  • महाराष्ट्रातील ग्रामीण भागात कारळयाला सोरटे सुद्धा म्हणतात.
  • कारळयाच्या बियाचे आवरण काहीसे जाड व बियाच्या दलाला चिकटलेले असते आणि यामुळे हया बिया वर्षभर खराब न होता साठवून ठेवता येतात.
  • कारळयाच्या बियांमध्ये प्रथिने, तेल व विरघळणारी शर्करा चांगल्या प्रमाणात आढळते. कारळयाचे तेल फिक्कट पिवळ्या रंगाचे
  • असून निळसर रंगाची छटा सुध्दा असू शकते. कारळयाचा एक विशिष्ट प्रकारचा गोड वास येतो व चवही विशिष्ट आहे.
  • कारळयाच्या कच्च्या तेळासही आम्लता कमी असल्यामुळे अन्नपदार्थ शिजविण्यासाठी वापरता येऊ शकते. या तेलामध्ये लिनोलेईक या स्निग्ध आम्लाचे
  • प्रमाण उच्च प्रमाणात आढळते. कारळयाचे तेल सूर्यफूल तेल व करडई तेलासारखेच आहे.

संदर्भ – शेतकरी मासिक.


SIP KNOWLEDGE