Term insurance आणि health insurance मध्ये काय फरक आहे? Difference between Term insurance and health insurance

Term insurance व health insurance मध्ये काय फरक आहे? Difference between Term insurance and health insurance

आपल्या कुटुंबाची सुरक्षा ही घरातील प्रत्येक जबाबदार आणि पैसे कमवत असलेल्या घरातील प्रमुख व्यक्तींची मुख्य जबाबदारी आहे.

इंशुरन्स संरक्षण हे आपणास अचानक accidentally घडलेल्या घटनेमध्ये प्रसंगामध्ये आर्थिक कव्हरेज प्रदान करत असते.म्हणुन insurance coverage हे आज खुप महत्वपुर्ण झाले आहे.

आपण प्रत्येक जण अशी विमा योजना खरेदी करणे अधिक पसंद करतो.ज्यात आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला सर्वाधिक संरक्षण प्राप्त होत असते.

पण जेव्हा आपण बाजारात विमा पाँलिसी खरेदी करायला जात असतो तेव्हा term insurance आणि health insurance या दोघांमधील मुख्य फरक आपणास माहीत नसल्याने आपण विमा खरेदी करताना कोणता विमा खरेदी करावा कोणता नाही नेहमी ह्या गोंधळात पडत असतो.

ज्यामुळे योग्य विम्याची निवड करायला आपणास फार कठिन देखील जात असते.

याचसाठी आपण आज Term insurance आणि health insurance मध्ये यादोघांमध्ये काय फरक असतो?हे थोडक्यात जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Health insurance म्हणजे काय?

Health insurance ही एक विमा आरोग्य पाँलिसी आहे.

ज्यात एखादा असा व्यक्ती तसेच ग्राहक ज्याने एखाद्या कंपनीची health insurance पाँलिसी खरेदी केली आहे.त्याला त्या कंपनीला monthly fix premium द्यावा लागत असतो.म्हणजेच pay करावा लागत असतो.

ज्याच्या मोबदल्यामध्ये ती health insurance company त्या कस्टमरला जर दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले तर त्याचे आरोग्यविषयक उपचार करण्यासाठी,त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी तसेच दवाखान्याचा इतर खर्च ती health insurance company पैसे खर्च करत असते.

See also  अतिचिंता ? Panic attack विषयी माहीती - Panic attack, common signs , care and more

किंवा health insurance company त्या कस्टमरला मेडिकल इमरजन्सी तसेच दवाखान्याच्या खर्चासाठी एक निश्चित रक्कम त्यांच्याकडून देत असते.

यात health insurance खरेदी करत असलेली व्यक्ती आणि कंपनी यांच्यात agreement देखील होत असते.ज्यात हे दिले जात असते की company कडुन त्या व्यक्तीला किती वर्षासाठी medical expenses,hospital expenses दिला जाईल आणि त्याबदल्यात त्या व्यक्तीला किती वर्ष premium charges भरावे लागणार आहे.

यात एक तोटा देखील असतो तो म्हणजे जी व्यक्ती ह्या पाँलिसीमध्ये प्रिमियम चार्ज भरत असते त्या व्यक्तीला पाँलिसी संपल्यानंतर त्याचे भरलेले premium ची रक्कम परत मिळत नसते.

कारण health insurance company त्याच पैशांमध्ये त्या व्यक्तीला कुठलीही आरोग्यविषयक समस्या उदभवल्यास,दवाखान्याचा खर्च करावा लागल्यास तो खर्च करण्याची हमी घेत असते.

Term insurance म्हणजे काय?

ही एक विमा पाँलिसी आहे जी आपणास एका fix time period पर्यत संरक्षण देण्याचे काम करते.

यात आपण म्हणजेच कस्टमर हा कंपनीला प्रत्येक महिन्याला ठरलेल्या एका निश्चित रक्कमेचे अमाऊंट premium charges च्या स्वरूपात देत असतो.

आणि समजा त्या पा़ँलिसीमध्ये जो कालावधी निश्चित केलेला आहे त्या कालावधीदरम्यान जर त्या पाँलिसी होल्डरचा म्हणजेच आपला जर मृत्यु झाला तर इंशूरन्स कंपनी आपण ज्या व्यक्तीला आपला नाँमिनी म्हणजेच वारस लावले आहे.त्या व्यक्तीला कंपनीच्या वतीने एक निश्चित रक्कम दिली जात असते.

जेणे करून त्या पाँलिसी होल्डरच्या मृत्युनंतर त्याच्या कुटुंबाला आर्थिक टंचाई भासत नाही.यात देखील health insurance प्रमाणे आपण जे प्रिमियम चार्ज भरत असतो तो पाँलिसी संपुष्टात आल्यावर आपल्याला refund केला जात नसतो.

कारण आपल्या त्या प्रिमियमच्या रक्कमेच्या बदल्यात इंशुरन्स कंपनी आपल्या मृत्यनंतर आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याची हमी घेत असते.

Term insurance आणि health insurance मध्ये यादोघांमध्ये काय फरक आहे?

Term insurance scheme मध्ये पाँलिसी धारक मेल्यानंतर त्याच्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण दिले जात असते.

See also  राज्य कामगार विमा योजना विषयी माहिती - Employee State insurance scheme information in Marathi

आणि health insurance policy मध्ये पाँलिसी होल्डरला वैद्यकीय तसेच दवाखान्याच्या खर्चासाठी आर्थिक संरक्षण देण्यात येते.

● Term insurance अंतर्गत policy period मध्ये पाँलिसी होल्डरचा मृत्यु झाल्यावर त्याने आपल्याला जो नाँमिनी म्हणजेच वारसदार लावलेला असतो त्या वारसदारला इंशुरन्सची पुर्ण रक्कम मिळत असते.

Health insurance अंतर्गत समजा पाँलिसी होल्डरला किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्याला वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले असेल तर त्या सर्व वैदयकीय खर्चासाठी आर्थिक संरक्षण दिले जात असते.

● Term insurance मध्ये आपणास कमी premium मध्ये जास्तीत जास्त इंशुरन्स कव्हरेज प्राप्त होत असते.

Term insurance च्या तुलनेमध्ये health insurance चा प्रिमियम चार्ज जास्त असतो.पण तरूण वयात म्हणजेच शरीर निरोगी असताना जर आपण हेल्थ इंशुरन्स खरेदी केला तर आपणास कमी प्रिमियम चार्ज लागत असतो.म्हणुन कमी वयामध्ये हेल्थ इंशुरन्स खरेदी करणे अधिक उत्तम आणि फायदेशीर देखील ठरत असते.

● Term insurance अंतर्गत आपल्याला no claim bonus चा लाभ प्राप्त होत नसतो.

Health insurance policy मध्ये आपणास NO claim bonus चा बेनिफिट प्राप्त होत असतो.म्हणजे समजा मागच्या वर्षी आपण कोणताही दावा केला नसेल तर आपण त्याच्या premium ची रक्कम कमी करू शकतो.

● Term insurance योजनेअंतर्गत आपण जो प्रिमियम भरत असतो त्याच्यावर आपल्याला इन्कम टँक्स अँक्ट 80 सी अंतर्गत tax benefit ची सुविधा देखील प्राप्त होत असते.

Health insurance policy अंतर्गत पाँलिसी होल्डरला,त्याच्या कुटुंबातील सभासदांसाठी,वयोवृदध आई वडिलांसाठी जो प्रिमियम तो भरत असतो.त्यात इन्कम टँक्स अँक्ट 80 डी अंतर्गत tax benefit ची सुविधा देखील प्राप्त होत असते