पर्सनल एक्सिडंट इन्शुरन्स व टर्म इन्शुरन्स मधला फरक – Personal accident insurance and Term insurance

Personal accident insurance व Term insurance मधील फरक

आपल्याला जर आपले आर्थिक भविष्य सुरक्षित ठेवायचे असेल तर विमा पाँलिसी खरेदी करणे किती महत्वाचे आहे हे तर आपणास चांगलेच ठाऊक आहे.

जगातील अशी कुठलीच व्यक्ती नाही जिला स्वताच्या आर्थिक भविष्याची आणि आपल्या कुटुंबाच्या आर्थिक भविष्याची काळजी नाही.

म्हणजे आज आपल्या सगळयांनाच आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आर्थिक भविष्याची काळजी आहे.म्हणुन आपण प्रत्येक जण विमा पाँलिसी खरेदी करायला प्रथम आणि विशेष प्राधान्य देत असतो.

पण जेव्हा आपण विमा पाँलिसी खरेदी करत असतो तेव्हा आपल्याला तिथे देखील विविध आँप्शन दिसुन येत असतात.

ह्याच कारणाने आपल्यासाठी कोणती विमा पाँलिसी खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरेल हे आपणास कळत नसते.

अशा परिस्थितीत आपल्याला ज्या पाँलिसीची खरेदी केल्यानंतर त्यातून जास्तीत जास्त नफा प्राप्त होत असतो.आपण अशा पाँलिसी घेण्याला अधिक महत्व देत असतो.

अशा वेळेला विम्यातुन प्राप्त होणारा फायदा लक्षात घेता आपल्याला हा प्रश्न पडत असतो की आपण term insurance घ्यायला हवा की personal accident insurance.

यादोघांमध्ये कोणाची निवड करावी यात आपला खुप गोंधळ उडत असतो.

म्हणुनच आपल्या मनातील हा संदेह दुर व्हावा आणि आपल्याला योग्य ती इंशुरन्स पा़ँलिसी आपल्या गरजेनुसार खरेदी करता यावी?यासाठी आज आपण
Term insurance आणि personal accident insurance या दोघांमध्ये कोणता फरक आहे हे जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Term insurance म्हणजे काय?

Term insurance ही एक अशी इंशुरन्स पाँलिसी आहे.जी एका निश्चित तसेच विशिष्ट time period साठी आपणास insurance coverage प्रदान करत असते.

See also  Depression - नैराश्य कारण, लक्षण व उपचार विषयी माहीती - Depression information in Marathi

यात पाँलिसी होल्डरचा पाँलिसी टाईम पिरीअडमध्ये जर मृत्यु झाला तर त्याच्या मृत्युनंतर इंशुरन्स कंपनी त्याच्या नाँमिनीला इंशुरन्सचे एक फिक्स अमाऊंट देत असते.

यात आपण कमीत कमी premium charges भरून जास्तीत जास्त insurance protection प्राप्त करू शकतो.शिवाय पाँलिसी होल्डरचा पाँलिसी पिरीअडमध्ये मृत्यु झाल्यावर त्याच्या कुटुंबाला देखील आर्थिक साहाय्य प्राप्त होत असते.

म्हणुन आज प्रत्येक जण आपल्या मृत्युनंतर देखील आपल्या कुटुंबाचे हाल होऊ नये यासाठी कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी टर्म इंशुरन्स खरेदी करत असतो.

Personal accidental insurance म्हणजे काय?

मित्रांनो आपल्या आयुष्यात कुठलीही घटना प्रसंग सांगुन घडुन नसतो.आज आपल्या आजुबाजुला रस्त्यांवर आज आपण अनेक अपघात घडताना बघत असतो.

अणि अपघात ही एक अशी गोष्ट आहे जी आपण वाहन चालवताना कितीही दक्षता घेतली तरी अकस्मातरीत्या अपघात हे होतच असतात फक्त कधी यात आपली चुक असते तर कधी आपली चुक नसताना देखील समोरच्या वाहन चालकाच्या बेधुंद आणि बेजबाबदार वाहन चालविल्याने कित्येक जणांना अपघातात आपले प्राण गमवावे लागत असतात.

कधी कधी ह्या अपघातात आपल्याला किरकोळ मुक्का मार बसत असतो तर कधी अपघातात आपल्याला शारीरीक अपंगत्व देखील येत असते.

यातच आज दिवसेंदिवस महागाई देखील वाढते आहे.अशा परिस्थितीत आपल्या सारख्या सर्वसामान्य व्यक्तींना दवाखान्याचा महामोर खर्च केल्याने खुप आर्थिक हानी होऊ शकते.आपली सर्व आयुष्यभराची बचत यात दवाखान्याचे बील भरण्यात जाऊ शकते.

म्हणुन याचसाठी आपण personal accident insurance काढणे खुप गरजेचे असते.

कारण ह्या इंशुरन्समध्ये आपल्याला जर काही गंभीर दुखाफत,ईजा झाली किंवा आपले एखादे हाड फँक्चर झाले, आपल्याला शारीरीक अपंगत्व आले तर अशा परिस्थितीत इंशुरन्स कंपनी आपल्याला आर्थिक मदत करत असते.

आणि समजा अपघातात आपण मृत्यु पावलो तर आपल्या वारसदाराला म्हणजेच नाँमिनीला इंशुरन्स कंपनीकडुन इंशरन्सची रक्कम दिली जात असते.

Term insurance आणि personal accident insurance या दोघांमध्ये काय फरक आहे? – personal accident insurance and Term insurance

Term insurance आणि personal accident insurance या दोघा पाँलिसींमध्ये एक साम्य आहे ते म्हणजे Term insurance आणि personal accident insurance या दोघे पाँलिसीमध्ये मृत्यु लाभ कव्हर केले जात असतात.

See also  कॅलरी म्हणजे काय ? शरीराला रोज किती कॅलरी हव्यात - कॅलरी चार्ट ?what is a calorie, how many calories we need.

Term insurance आणि personal accident insurance या दोघांमधील पहिला फरक हा आहे की personal accident insurance मध्ये अपघाती मृत्यु (accidental deaths) cover केल्या जात असतात.म्हणजे समजा अघघातामुळे एखादी व्यक्ती तात्पुरता अपंग झाली आहे आणि तिला त्यामुळे नोकरीवर जाता येत नाहीये.आणि इन्कम देखील कामावर न जाता आल्याने बंद झालेले आहे अशा परिस्थितीत त्या व्यक्तीने जर personal accidental insurance काढला असेल त्याचे recovery होईपर्यत कंपनीकडुन त्या व्यक्तीला त्याच्या इन्कम नुसार महिन्याचा खर्च इंशुरन्स कंपनीकडून पुरवला जात असतो.

 

हा फायदा personal accidental insurance काढण्याचा असतो.तसेच समजा एखाद्या व्यक्तीला अपघातात पुर्णपणे अपंगत्व आले अपघातात त्याचा हात पाय डोळे इत्यादी अवयव गेला तर अशा परिस्थितीत तो व्यक्ती कामावर जाऊ शकत नसतो पैसे कमवू शकत नसतो.तेव्हा देखील त्या व्यक्तीच्या कुटुंबाला personal accidental insurance मधुन त्याच्या permanent disability percentage नुसार (50% किंवा 100%) आर्थिक मदत प्राप्त होत असते.

पण यामध्ये आपला नैसर्गिक रीत्या मृत्यु झाल्यास personal accidental insurance चा
लाभ प्राप्त होत नाही.

Term insurance मध्ये common, natural आजारपणातील मृत्यु,आणि अपघाती मृत्यु (accidental deaths) ह्या सर्व cover केल्या जात असतात.

Term insurance मध्ये इंशुरन्स प्रिमियम ठरवणारा मुख्य घटक हा policy holder चे age असते.आणि personal accident insurance premium मध्ये customer business हा प्रमुख घटक असतो.

Term insurance च्या premium च्या तुलनेत personal accidental insurance चा premium फार कमी असतो.

Personal accidental insurance मध्ये 3 risk range आहेत.फस्टमध्ये बँकर,टीचर,मँनेजर यांचा समावेश होतो.सेकंडमध्ये ठेकेदारी आणि बांधकाम क्षेत्रातील लोकांचा,मोटार सायकल ड्राईव्हर आणि गँरेज मँकेनिक हे समाविष्ट आहेत.थर्डमध्ये खाणीत काम करतात असे कामगार,वायरमन ज्यांच्यासोबत अपघात होण्याची अधिक शक्यता असते अशा जोखिमदायी व्यवसायातील व्यक्तींना समाविष्ट केले गेले आहे.

[ultimate_post_list id="39129"]