टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? का घ्यावा ? Term insurance Detail information in Marathi

Term insurance Detail information in Marathi

टर्म इन्शुरन्स म्हणजे काय – Why Term insurance is Important

टर्म इन्शुरन्स हा एक प्रकारचा विमा आहे जो तुमच्या कुटुंबाच ठरवलेल्या वेळेकरता  आर्थिक संरक्षण करत असतो. टर्म या शब्दाला इथं महत्व  आहे . टर्म म्हणजे    “ठराविक वेळेकरता” या अर्थातून या विमा योजनेत उपयोग केला गेला आहे.

टर्म इन्शुरन्स काळात जर दुर्दवाने विमा धारकाचा मृत्य झाला तर  पॉलिसी नियमानुसार एक मोठी विमा रक्कम  (sum assured ) कुटुंबाला किंवा ज्यांना नॉमिनी म्हणून नेमले असेल त्यांना देण्यात येतो. जेणेकरून कुटुंबातील सदस्यांची कर्त्या माणसांच्या मृत्यूनंतर आभाळ होऊ नये.

टर्म इन्शुरन्स घेण्याआधी आपण काही बाबी समजून घेतल्या पाहिजेत.  त्यात काय फायदे असतात ,

ही पॉलिसी कशा प्रकारे तुमच्या उपयोगात येईल या गोष्टी नक्की समजावून घ्या.

आज ज्या काही विमा पॉलिसी उपलब्ध आहेत त्यात आपण दूरचा विचार केला म्हणजे मोठ्या दृष्टीकोनातून विचार केला तर , टर्म इन्शुरन्स योजना या जास्त कालावधी करता कमी किमतील प्रीमियम (साधारण 6500 Rs पासून / महिना ) देऊन एक उत्तम जीवन संरक्षण देत असतात..

वर म्हटल्याप्रमाणे काही दुर्दवी प्रसंग ओढवला च तर कुटुंब ची  आर्थिक परवड होत नाही. एक मोठी विमा  रक्कम sum assured साधारण 25 ते 50 लाख किंवा जी असेल ती (त्याला मर्यादा नाही) ती कुटुंबाला दिली जाते.

See also  ज्येष्ठ नागरीक बचत योजना SCSS माहीती - Senior Citizen Saving Scheme Details In Marathi

उदाहरण- वय आपले आज 40 आहे आणि आपण 30 वर्षा  कालावधीकरता  50 लाखाचा टर्म इन्शुरन्स घेतला आहे तर 70 वर्ष पर्यंत आपल्याला या पॉलिसी नुसार संरक्षण मिळेल, त्या आधी मृत्यू झालाच तर  50 लाख एक रकमी कुटुंबाला देण्यात येतात.

या ऐवजी आपली प्रकुर्ती ठीक राहिली. आपण पॉलिसी कालावधी पेक्ष्या जास्त जगलात तर आपला विमा संपतो, म्हणजे विमा संरक्षण  संपते. आपल्याला कोणतीही रक्कम किंवा मोबदला दिला जात नाही.

आता टर्म इन्शुरन्स काही फायदे  Term insurance Detail information in Marathi

 1. पॉलिसी आपल्याला आर्थिक संरक्षण देते,-जीवनात पूढे कही प्रतिकूल परिस्थिती उदभवली त  कुटुंबाला आर्थिक पाठबळ मिळते.
 2. गंभीर आजारात संरक्षण -हृदय आजार, किडनी आजार किंवा कॅन्सर सारखे आजार हे जीवघेणे असतात. टर्म प्लॅन सोबत असणाऱ्या अधिकच पेमेंट करून अश्या गंभीर आजाराच्या काळात संरक्षण मिळते
 3. अपघात घटना घडली तर-टर्म इन्शुरन्स सोबत अधिक प्रीमियम देऊन आपण अपघातात जीवाचे काही बरे वाईट झाले तर संरक्षण मिळू शकते.
 4. अपंगत्व आले तर-अपघातात तात्पुरत किंवा कायमच अपंगत्व आल्यास उपजीविके करता  या अधिक च्या  rider मधून आर्थिक मदत मिळू शकते.
 5.  उत्पन्न करातून सूट-या पॉलिसी करता देय असलेल्या प्रीमियम हा कर सूट करता पात्रअसतो. हा प्लॅन 1961 मधील इन्कम टॅक्स नुसार 80c प्रमाणे  कर सूट करता पात्र असतो.
 6.  प्रीमियम मध्ये सूट –विमाधारक जर दुर्दवाने  अपंगत्व मुळे किंवा गंभीर आजारामुळे प्रीमियम भरण्यास असमर्थ झाल्यास नियमानुसार पुढील प्रीमियम चे हफत्यातुन सूट मिळते.
 7. टर्म इन्शुरन्स मध्ये जास्त भर यावर दिला जातो की दुर्दवाने मृत्य ओढवल्यास कुटुंबाला आर्थिक पाठबळ असावा हा आहे, पण काही कंपन्या विमाधारक जर विमा कालावधी नंतर जीवन जगत राहिल्यास  maturity benefit देतात.

 टर्म इन्शुरन्स चे प्रकार  Term insurance Detail information in Marathi

 1. लेव्हल टर्म इन्शुरन्स -या योजनेनुसारसंपूर्ण विमा कालावधीत विमा रक्कम ही समान राहते आणि विमा धारकच्या मृत्यनंतर वारसदारांना  विमा रक्कम दिली जाते
 1. वाढता टर्म इन्शुरन्स -योजनेनुसार आपण ज्या दिवशी हा विमा घेतला त्या दिवसापासून विमा रक्कम  पुढे येणाऱ्या महागाई व काही आपल्या धेय्य नुसार ठरावीक रक्कम  दर वर्षी वाढत जातो.
 1. कमी होत जाणारा टर्म इन्शुरन्स -आपण 55-60 पार झाली, मुलं मोठी झाली, नोकरी व्यवसायात आली की साहजिकच माणसांच्या जबाबदाऱ्या कमी होत जातात हे गृहीत धरून यात विमा रक्कम व विमा हफत्या ची रक्कम ठराविक वेळेत  कमी होत जाते.
 1. TROP – मासिक हफत्याचीं परतफेड -या योजनेनुसार   विमा कालावधी समाप्त झाला की  विमाधारक  जीवन जगत असल्यास त्याने तो पर्यंत भरलेले प्रीमिअम चे हफ्ते पूर्ण परत मिळतात  परंतु हा खूप महाग विमा असून याचे नियम बारकाईने तापसले पाहिजेत.
See also  Leadership करण्याच्या पदधती तसेच प्रकार -Leadership style and types in Marathi

टर्म इन्शुरन्स घेण्यापुर्वी कृपया खालील अतिशय महत्त्वाच्या बाबी नक्की लक्ष्यात घ्याव्यात

 • विमा रक्कम – sum Assured-आपण जीवनातील ध्येय, राहणीमान जबाबदाऱ्या काय आहेत या गोष्टी लक्ष्यात घेऊनच  विमा रक्कम ठरवली पाहिजे.साधारण आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या 10-15 पट विमा घ्यावा म्हणजे 5 लाख  वार्षिक पगार असेल तर 50 लाख विमा .
 • एकदा आपण किती रकमेचा विमा हवा हर ठरवलं की नंतर च पाऊल म्हणजे किती विमा देणार. कारण विमा हफ्ता हा बऱ्याच गोष्टी वर अवलंबून असतो. त्या करता विविध कंपनी तसेच ऑनलाइन संकेतस्थळ वर  माहिती घयावी. जास्तीजास्त माहिती गोळा करण्यात काही हरकत नसते.
 • दावा निवाडा प्रमाण- क्लेम सेटलमेंट प्रमाण-claim settlement ratio-किती विमाधारका नि विमा करता अर्ज केला आणि सदरील कंपनीने किती दावे मंजूर केले , किती ग्राहकांचे दावे फेटाळून लावले याच प्रमाण तपासणे हे सर्वात महत्वाचे . या माहिती वरून आपण अंदाज बांधू शकता की कंपनी चा ग्राहकांप्रती अश्या कठीण काळात प्रतिसाद  काय असतो.
 • विमा कंपनी ची पत ,ऐपत आर्थिक संपन्नता म्हणजेच -Insurer solvency ratio -यावरून ग्राहकांना कंपनीची आर्थिक पत लक्षात येते की की कंपनी किती विमा दावे मंजूर करू शकते.  सहसा 150% हे प्रमाण असावे असे IRDAI च्या नियमानुसार आवश्यक असते.

सर्वात एक महत्वाचे मुद्दा मला आपणा सर्वांना सांगायचं तो म्हणजे लेस पे आणि प्रीमियम परतवा देणाऱ्या टर्म योजना

 • आपण एक लक्ष्यात घ्या या Limited Pay आणि TROP योजनेमध्ये दुप्पट विमा प्रीमियम आकाराला जातो, आणी विमा कालावधी संपल्या नंतर आपणास आपले हफ्ते रक्कम परत मिळते .परंतु विचार करा त्या 65-70 वयात मध्ये आपल्या गरज किती अणार?
 • आपल्याकडे health policy आहे , आपण LIC पैसे गुंतवले असणार, काही फिकड डिपॉजीट असतील काही  शेअर बाजारात पैसे असतील च मग आपल्याला उतार वयात अजून पैसे का हवेत?
 • मग त्या ऐवजी आपण निव्वळ pure टर्म इन्सुरसन्स घ्यावा आणि जी अधिक काही रक्कम उरत असेलच  योग्य ठिकणी गुंतवणूक करून वेळोवेळी त्यावर मिळणारे फायदे घेत चला.
 • आपण अधीकचा विमा भरण्या एवजी ती रक्कम चांगल्या म्युचलफंड , इक्विटीत गुंतवा तुमाला चांगला परतवा मिळेल
 • अश्याने आपला टर्म इन्सुरसन्स असेल आणि काही गुंतावूनिकीतील रक्कम आपण वेळोवेळी गरज पडलीच तर आपण पैसे काढू शकता आणि आपली आर्थिक गरज भागवू शकता.
 • टर्म इन्शुरन्स अर्ज करताना आपण सर्व माहिती जी जी विचारली गेलीय ती सर्व माहिती लिहा , कोणतीही माहिती लपवू नका . जर क्लेम करण्याची वेळ आलीच आणि काही लपवेलेली माहिती उगड झालीच तर क्लेम फेटाळला जातो
See also  एम पीन म्हणजे काय? -Mpin meaning in Marathi

Top Term Insurance Company

 1. Life Insurance Corporation India (LIC)
 2. HDFC Life Insurance
 3. Tata AIA Life
 4. Bajaj Allianz Life Insurance
 5. Exide Life Insurance
 6. Max Life Insurance
 7. Reliance Life Insurance
 8. Aegon Life Insurance
 9. ICICI Prudential Life Insurance
 10. Aditya Birla Sun Life Insurance
 11. Bharti Axa Life Insurance
 12. SBI Life Insurance
 13. Kotak Life Insurance
 14. Future Generali Life Insurance

लेखक : Post Author


पुस्तके – फिशिंग

1 thought on “टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? का घ्यावा ? Term insurance Detail information in Marathi”

Comments are closed.