BNPL ची माहिती – Buy Now Pay Later Marathi information
नावात म्हटल्याप्रमाणे या योजनेत ग्राहकांना उत्पादन, वस्तु विकत घेण्याची मुबा दिली जाते ,हो! आपण आता खरेदी करू शकता आणि पैसे मात्र नंतर देता येतील अशी ही योजना असते.
पूर्वी बरेचजण कर्ज घेऊन घरोपयोगीं उपकरणं, फर्निचर ,साहित्य घेण्याच्या विरोधात असत. परुंतु आता लोन किंवा कर्ज घेऊन EMI बेसिस वर खरेदी करने नवीन राहील नाही व अशी खरेदी एकप्रकारे जीवनाचा अविभाज्य भाग झालाय.
Borrowing म्हटलं का लोन किंवा क्रेडिट कार्ड्स द्वारे सहसा खरेदी आपल्या डोळ्यासमोर येते. परंतू लोन , ऋण क्षेत्रात काम करणाऱ्या वित्तीय संस्था सतत research करून ग्राहकांना जास्त उपयोगात येतील ग्राहकाना आवडतील , स्वीकारल्या जातील , सोप्या पडतील अश्या खरेदी योजना व साधन शोधत असतात, त्यातलीच एक म्हणजे BNPL- Buy Now Pay Later
BNPL – कोणत्याही खरेदी व्यवहारात आपण पैसे देतो आणि वस्तू खरेदी करतो, ती वस्तू आपल्या मालकीची होते व आपण ती आपल्या घरी नेतो, मात्र Buy Now Pay Later मध्ये खरेदी आता पैसे नंतर . यात ठराविक विक्रेत्याकडून ग्राहक तात्काळ वस्तू खरेदी करू शकतात पैसे मात्र नंतर देता येतात. यात आपण ठराविक मुदतीत हफ्ते भरत रीपेमेंट करू शकतात. तसेच पेमेंट सुद्दा व्याजमुक्त असतात.
Buy Now Pay Later चे फायदे
- ही योजना पहाता दोन्ही ना फायदेशीर आहे दुकानदारांना आणि ग्राहकांना सुद्दा.
- सर्व लहानसहान दुकान किंवा ऑनलाइन विक्रेते यांना ग्राहक तर मिळतात परंतु कमी भांडवल मुळे उधारी वर वस्तू देणं मात्र परवडत न्हव्ते अश्या विक्रेते व दुकानदारांनाकरता या योजनेने मोठा हाथ दिलाय!
- या योजनेमुळे विक्री वाढली असून, जुने ग्राहक धरून ठेवता येतात ,त्यांना BNPL ऑफर्स देऊन विक्री वाढवता येते.
- नाविन ग्राहक जे कधी क्रेडिट कार्ड्स नसल्यामुळं किंवा एक रकमी पैसे देऊ शकत नसल्याने खरेदी करू शकत नसत. ते ही या योजनेचा फायदा घेऊन वस्तू खरेदी करू शकतात.
- विक्रेत्यांचा ही उधारी अडकुन पडल्याचा धोका असतो तो कमी झाला
- महिन्याचा पगार कमी असेल, परंतु एकादी वस्तू घेणं आवश्यक असेल तर ग्राहक या योजनेतून सहज खरेदी करू शकतो.
ह्या व्यतिरिक्त या योजनेची वैशिष्ट्य-
- खरेदी केलेल्या वस्तू चे पैसे नंतर देण्याचे स्वातंत्र्य
- अर्ज करणे सोपं आणि साधे, तात्काळ मंजुरी
- वय 21 असणे आवश्यक
- योग्य क्रेडिट स्कोर असला तरी ठीक ,, खCIBIL स्कोर जास्त असणे गरजेचे नाही.
आपल्या मनात शंका आली का? की मग BNPL आणि क्रेडिट्स कार्ड मध्ये काय फरक?
- बरीच क्रेडिट कार्ड्स ही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असतात.
- BNPL मध्ये याच बाबींचा विचार करून सर्व सामान्य ग्राहकांना ही क्रेडिट सारखा काही पर्याय देता येईल हा विचार करून BNPL योजना आणल्या गेल्यात
- क्रेडिट कार्ड करता लागणारे कागदपत्रांची पूर्तता बऱ्याच जणांकडून होत नाही व यात बराच कालावधी जातो.
- BNPL योजनेत अशी काही अडचण काही नसून जलदरीत्या कर्ज मंजूर होत.
- क्रेडिट कार्ड्स मध्ये बऱ्याचदा दडलेले किंवा वरून लगेच लक्ष्यात न येणाऱ्या फि व चुपे चार्जेस असतात. असे फसवे चार्जेस BNPL स्कीम यामध्ये नसतात.
- क्रेडिट्स कार्ड्स वरून केलेल्या खरेदीचे परतफेड सहसा 1 महिन्यात करावी लागते त्यामानाने BNPL मध्ये ग्राहकांना पेमेंट परतफेडी साठी जास्त पर्याय उपलब्द करून दिले जातात त्यातून ग्राहक योग्य तो जास्त कालावधी चा पर्याय निवडू शकतो जेणेकरून त्याला जास्त वेळ परतफेडी करता मिळेल.
- प्रिमेंट करता कसला ही अधिक व्याज लावले जात नाही , क्रेडिट कार्ड मध्ये मात्र ठराविक रक्कम च प्रिपेमेंट करता येते व उरलेल्याला रक्कम वर व्याज लावले जाते.
- अश्या प्रकारे ही अतिशय उपयोगी असलेली योजना असून त्याचा आपण योग्य वापर केला तर नक्कीच उपयोगात येईल . योग्य या करता म्हटलं की आर्थिक नियोजन हे आयुष्यात खूप म्हात्वाचे असते . लोन बाबत योजना किती ही फायदेशोर असल्या तरी त्यांच्या माफक गरजेपुरता, निकड असतानाच उपयोग केला पाहिजे .
BNPL ऑफर देणार्य काही नामांकित कंपनी ची यादी
सिंपल -simpl
simpl 70 लाखाहून जास्त ग्राहकांशी जोडलं गेले असून 4000 पेक्ष्या जास्त विक्रेते simpl या प्लॅटफॉर्म सोबत करार असून या योजनेद्वारे ग्राहकांना उत्पादन विकत आहेत.
2015 त स्थापन झालेले simpl ने आज रिटेल क्षेत्रात एक विश्वसानिय म्हणून नाव कमावलेले आहे.
या प्लॅटफॉर्म वर अगदी काही क्षणात आपले ऑनलाईन खाते मंजूर होऊन आपण तात्काळ खरेदी करू शकता! . यात आपण केलेल्या खरेदी ची सर्व माहिती आपल्या खात्यात दिसते, आपल्याला आपलं बिल मात्र 15 दिवसात भरावे लागते. “यात कसलेही व्याजदर नाही
झेस्ट मनी -zest money
हे एक दुसरे BNPL क्षेत्रात अतिशय जोमाने वाढणारे प्लॅटफॉर्म असून 2016 मध्ये याची स्थापना झालीय. च्या योजनेत आपण ऑनलाईन खरेदी करून नंतर परवडतील अश्या EMI पद्धतीने आपण पैसे परतफेड करू शकता. काही ठराविक योजनेत 6 महिन्यापर्यंत परतफेडीची मुदत दिली जाते.
झेस्ट मनी नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान चा वापर करून अश्या ग्राहकांना पैसे उपलब्द करून देते ज्यांना आपल्या नेहमीच्या बॅंक्स, वित्तीय संस्था कडून लोन मिळणे कठीण जाते. त्यामुळे झेस्टमनी लोकप्रिय होत आहे.
झेस्टमनी चे पार्टनर आहेत टाटा कॅपिटल, पिरामल फायन्सन, आदित्य बिर्ला कॅपिटल. HSBC , मुथुट फायनान्स.
झेस्टमनी च वैशिष्ट्य म्हणजे नावजलेले लेंडिंग कंपनी सोबत पार्टनर शिप असल्याने आपण अगदी विमान तिकीट , फर्निचर साहित्य सारख्या मोठ्या खरेदी सुद्दा करू शकतात.
अमेझॉन पे लॅटर
आपण एकदा अमेझॉन पे लेटर च ऑनलाईन खात उघडलं की आपण त्यांनी दिलेल्या EMI पर्यायांचा वापर करून खरेदी करू शकता. यात क्रेडिट कार्ड ची गरज नाही. यात सध्या हे ऑप्शन फक्त मोबाईल एप्स मध्ये असून खरेदी मात्र आपण कॉम्प्युटर व एप्स द्वारे करू शकता.ही सुविधा खूप फायदेशीर असून आपण आपली युटिलिटी बिल सुद्धा यातुन भरू शकता. तसेच दिलेल्या मर्यादेत आपण रिपेमेंट नाही केलं तर मात्र आपल्याला थोडा आर्थिल दंड भरावा लागतो.
HDFC Flexi pay -फ्लेक्जि पे
BNPल योजणे नुसार आपण खरेदी करू शकता. पण या करता डेबिट कार्ड असणे आवश्यक असून आणि खरेदी रक्कम त्यातून वजा होते. रिपेमेंट करता कालावधी 15 ते 90 दिवस. 15 दिवसां करता आपल्याला कसल ही व्याज लागत नाही परंतू नंतर मात्र नाममात्र काही दंड भरावा लागतो.
ICICI Bank Pay Later
ही योजम ICIIC सारख्या नामवंत कंपनी कडून दिली जाते, ह्यात साधारण ४५ दिवसांची रिपेमेंट कालावधी दिला जातो
त्यानंतर आपल्या ICUCI बँक खात्यातुन रक्कम परस्पर वजा होते. वेळेवर पैसे न भरता आल्यास ठराविक दंड रक्कम भरावि लागते.