बँक गॅरंटी म्हणजे काय? Bank guarantee meaning in Marathi

बँक गॅरंटी म्हणजे काय? Bank guarantee meaning in Marathi

जेव्हा आपणास एखादी वस्तू दुसरया शहर तसेच देशातुन खरेदी करायची असते.अणि लगेच विक्रेत्याला पैसे द्यायला तात्काळ आपल्याकडे लगेच पैसे उपलब्ध नसतात.आपले पैसे यायला वेळ लागणार असतो.

अशा परिस्थितीत आपण अनोळखी असल्यामुळे विक्रेत्याला आपल्याला डायरेक्ट उधारीत वस्तू देणे सुरक्षित वाटत नसते.कारण त्याचे पैसे त्याला भेटतील किंवा नाही ही धाकधुक विक्रेत्याला असते.

अशा वेळी आपण म्हणजेच खरेदी करणारा बँक गॅरंटी ह्या सुविधेचा लाभ घेऊ शकतो.अणि विक्रेत्याकडुन माल खरेदी करू शकतो.

बँक गॅरंटी कशाला म्हणतात?

बँक गॅरंटी ही सुदधा लेटर आॉफ क्रेडिट प्रमाणे एक नाॉन फंड आधारीत क्रेडिट सुविधा आहे.

बँक गॅरंटी नेमकी काय असते याची संकल्पना आपण एका उदाहरणादवारे समजुन घेऊया.

समजा एक वस्तुंची खरेदी करणारा व्यक्ती आहे ज्याला ५०ते ६० लाखाच्या काही वस्तू खरेदी करायच्या आहेत अणि एक विक्रेता आहे जो त्याला त्याचा हा सर्व माल विकतो आहे.

पण खरेदी करणारयाकडे विक्रेत्याला देण्यासाठी लगेच रोख पन्नास ते साठ लाख नसतात त्याचे पैसे अजुन आलेले नसतात.

अशा परिस्थितीत खरेदी करणारा उधारीत वस्तू मागतो.
अणि पैसे नंतर देईल असे सांगत असतो पण विक्रेता कुठलीही ओळख तसेच गॅरंटी नसताना डायरेक्ट खरेदी करणारयाकडे आपला माल देऊ शकत नसतो कारण त्याचे पैसे त्याला नक्की भेटतीलच की नाही याचा संभ्रम त्याच्या मनात असतो.

See also  एम पीन म्हणजे काय? -Mpin meaning in Marathi

अशावेळी दोघांना बँक गॅरंटी कामी येत असते.बॅक गॅरंटी ही एक थर्ड पार्टी बँक असते जिच्याकडुन खरेदी करणारयाची गॅरंटी दिली जात असते.

बँक गॅरंटी प्राप्त करण्यासाठी वस्तू खरेदी करणारा म्हणजेच अॅप्लीक़ंट बँकेकडे विनंती करत असतो.जेणेकरून त्याला जवळ रोख पैसे नसताना देखील त्याचा माल खरेदी करता येईल.

बँक गॅरंटी विक्रेत्याला भेटल्यावर विक्रेता देखील खरेदी करणारयाकडे आपला माल निश्चिंत होऊन पाठवुन देत असतो कारण त्याला त्याच्या पैशांची बॅकेकडुन गॅरंटी हामी मिळालेली असते.

कारण हया प्रक्रियेत बँक विक्रेत्याला सांगत असते की खरेदी करणारया व्यक्तीने त्याच्या मालाचे पैसे त्याला नाही पाठविले तर स्वत बँक त्याचे पैसे फेडेल.म्हणुन विक्रेता देखील बँक गॅरंटी प्राप्त झाल्यानंतर निश्चिंत होऊन क्रेडिट बेसवर आपला माल खरेदी करणारयाकडे पाठवून देत असतो.

अणि खरेदी करणारयाने मालाचे पैसे विक्रेत्याला फेडल्यावर बँक गॅरंटी असमाविष्ट ठरत असते म्हणजे अशा प्रकरणात बँकेला खरेदी करणारयाच्या वतीने विक्रेत्याला पैसे द्यावे लागत नसतात.

बँक गॅरंटी प्रक्रियेत आपण वस्तुंची खरेदी करणारया व्यक्तीला अर्जदार म्हणजेच अॅप्लीकंट असे म्हणत असतो.अणि विक्रेत्याला आपण बेनिफिशरी म्हणजे लाभार्थी असे म्हणत असतो.

बँक गॅरंटीचा वापर  कुठे केला जातो?

बँक गॅरंटीचा वापर खरेदी विक्रीच्या व्यवहारात,शासकीय करारात देखील केला जात असतो.

याचसोबत जेव्हा एक खासगी कंपनी जेव्हा दुसऱ्या खासगी कंपनीसोबत एखादा मालाच्या खरेदी विक्रीचा करार करत असते तेव्हा त्या करारामध्ये देखील बँक गॅरंटीचा वापर केला जातो.

बँक गॅरंटीचा फायदा काय असतो?

● विक्रेता अणि खरेदी करणारा यांच्यात जो ट्रस्ट इशु तसेच क्रेडिट इशु निर्माण झालेला असतो तो दुर होऊन जातो कारण इथे बँक स्वता खरेदी करणारया व्यक्तीची गॅरंटी घेत असते.

● याचा अजुन एक फायदा होतो तो म्हणजे खरेदी करणारा क्रेडिट वर पाहीजे तितके सामान खरेदी करू शकतो ते ही त्याच्याकडे विक्रेत्याला देण्यासाठी खिशात रोख पैसे नसताना.

See also  फस्ट पार्टी,सेकंड पार्टी अणि थर्ड पार्टी इंशुरन्स म्हणजे काय?First party insurance,second party insurance and third party insurance

बँक गॅरंटीची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती आहेत?

● बँक गॅरंटी मध्ये खरेदी करणारयाने वॅलिडिटी पिरीअड स्पष्ट करणे आवश्यक आहे म्हणजे समजा खरेदी करणारयाकडे सहा महिन्याने त्याचे पैसे येणार आहे तर तो सहा महिन्यांचा वॅलिडीटी पिरीअड निवडु शकतो.हा पिरीअड तीन महिने, सहा महिने,पाच वर्ष दहा वर्ष इतका देखील आपण आपल्या गरजेनुसार निवडु शकतो.

● बँक गॅरंटी मध्ये खरेदी करणारयाने एकुण क्रेडिट रक्कम नोंदवणे गरजेचे असते.

● बँक गॅरंटी मध्ये कोणत्या पद्धतीचा करार केला जात आहे हे दिलेले असणे आवश्यक आहे.

● बँक गॅरंटी ही खरेदी करणारया व्यक्तीला फ्री मध्ये बॅकेकडुन उपलब्ध होत नसते त्याबदल्यात बँकेला देखील खरेदी करणारया व्यक्तीकडुन सिक्युरिटी हवी असते.म्हणजे समजा वस्तू खरेदी करणारयाचे जिथुन तो बँक गॅरंटी घेतो आहे तिथे जर काही डिपाॅझिट एफ डी म्युच्युअल फंड वगैरे असेल तर यांच्या सिक्युरिटीच्या आधारावर बँक त्या खरेदी करणारयाची हमी घेत असते.

बँक गॅरंटी जारी करण्याची बँकेकडून काही फी चार्ज केली जाते का?

होय बँक गॅरंटी जारी करण्यासाठी बँक खरेदी करणारया व्यक्तीकडुन काही फी चार्ज देखील घेत असते.

बँक गॅरंटी एकुण किती प्रकारची असते?

बँक गॅरंटीचे पुढीलप्रमाणे अनेक प्रकार असतात –

व्यापारातील बँक गॅरंटीचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत-

१) फायना्शिअल गॅरंटी/पेमेंट गॅरंटी –

व्यापारामध्ये जिथे वस्तुंची खरेदी विक्री केली जाते तिथे खरेदी करणारा पैसे फेडत नसेल किंवा विक्रेत्याला त्यांच्यावर विश्वास नसेल तर खरेदी करणारयाच्या वतीने बँक पैशांची गॅरंटी घेत असते अणि विक्रेत्याला पैसे फेडण्याची हमी घेत असते.

२) फाॉरेन बँक गॅरंटी -जेव्हा दोन वेगवेगळ्या देशातुन मालाच्या आयात निर्यातीचा देवाणघेवाणीचा व्यवहार केला जात असतो तेव्हा फाॉरेन चलनात म्हणजेच डाॅलर मध्ये देखील बँक खरेदी करणारयाची गॅरंटी घेत असते.

३) डिफर पेमेंट गॅरंटी –

डिफर पेमेंट गॅरंटी मध्ये खरेदी करणारा विक्रेत्याला असे सांगत असतो की आत्ता माझ्याकडे लगेच पैसे नाहीये आत्ता घेतलेल्या मालाचे मी सहा महिन्यांनी तसेच एक वर्षांनी पैसे देईल.

See also  Scheduled आणि Non Scheduled Bank यात काय फरक आहे? - Difference in Scheduled Non Scheduled Bank

करारातील बँक गॅरंटीचे प्रकार –

१)बीड बाॉण्ड गॅऱंटी –

जेव्हा एखाद्या शासकीय एजंसीला कंपनीला मोठया महागड्या वस्तुंची खरेदी करायची असते तसेच करार जारी करायचा असतो तेव्हा तेव्हा त्या शासकीय एजंसी कडुन कंपनीला बोली लावण्यासाठी सांगितले जाते.

एखाद्या बोली लावणारया गुंतवणुक दाराने जर बोली लावून करार मागे घेतला तर याने शासनाचा वेळ अणि पैसा दोघांचे नुकसान होत असते.हे नुकसान टाळण्यासाठी बीडींग केली जाते.

म्हणजे याने शासनाचे नुकसान होत नाही उलट एखाद्या बोली लावणारया गुंतवणुक दाराने जर बोली लावून करार मागे घेतला तर त्याचे बोली लावलेले पैसे वाया जात असतात.

२) अॅडव्हान्सड पेमेंट गॅरंटी –

यात विक्रेत्याला आगाऊ स्वरूपात पैसे दिले जात असतात.अणि यात विक्रेत्याने योग्य रीत्या मालाची पोहच नही केली तर खरेदी करणारयाच्या पैशांची भरपाई केली जाईल त्याला त्याचे पैसे वापस दिले जातील याची हामी घेतली जाते.

३) परफाॉर्मनस बाॉण्ड गॅरंटी –

यात अशी हमी घेतली जाते की कार्य प्रदर्शन आॉपरेशन मध्ये काही विलंब झाला बँक त्याचे पैसे परत करेल.सेवा अपर्याप्तपणे वितरीत केली गेली तरीही यात बॅकेकडुन पैसे दिले जातील.