लेटर आॉफ क्रेडिट म्हणजे काय? – Letter of credit meaning in Marathi

लेटर आॉफ क्रेडिट म्हणजे काय? – Letter of credit meaning in Marathi

आपल्यातील खुप जणांना वाटते की बँक गॅरंटी अणि लेटर आॉफ क्रेडिट हे दोघे सारखेच असतात पण तसे नाहीये लेटर आॉफ क्रेडिट अणि बँक गॅरंटी हे दोघेही वेगवेगळे आर्थिक साधने आहेत.अणि यांचा हेतु देखील वेगवेगळा असतो.

आपल्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी आजच्या लेखात आपण लेटर आॉफ क्रेडिट म्हणजे नेमकी काय असते?त्याची मुळ संकल्पना काय असते?लेटर आॉफ क्रेडिट अणि बँक गॅरंटी या दोघांमध्ये काय फरक असतो हे जाणुन घेणार आहोत.

लेटर आॉफ क्रेडिट कशाला म्हणतात?Letter of credit meaning in Marathi

लेटर आॉफ क्रेडिट ही सुदधा बॅक गॅरंटी प्रमाणे नाॉन फंड आधारीत क्रेडिट सुविधा आहे.पण लेटर आॉफ क्रेडिट हे बँक गॅरंटी पेक्षा वेगळे असते.

लेटर आॉफ क्रेडिट म्हणजे काय असते?हे आपण एका उदाहरणादवारे समजुन घेऊया.

समजा एखादा विक्रेता आहे ज्याला काही सामानाची खरेदी करायची आहे पण खरेदी करणारा सामानाची विक्री करणारा दोघे वेगवेगळ्या शहरातील देशातील रहिवासी आहे.

अशा परिस्थितीत दोघेही एकमेकांच्या नजरेत अनोळखी असल्यामुळे एकमेकांवर मालाची पोहच करण्याबाबत,मालाचे पैसे मिळण्याबाबत डायरेक्ट विश्वास ठेवु शकत नसतात अणि आपापसात खरेदी विक्रीचा व्यवहार देखील करू शकत नसतात.

अणि त्यातच खरेदी करणारयाकडे जर विक्रेत्याकडुन वस्तू खरेदी करण्यासाठी रोख रक्कम नसेल तर मोठी अडचण निर्माण होऊ शकते कारण दोघे एकमेकांना अपरिचित असल्यामुळे विक्रेता खरेदी करणारयाला कुठलीही वस्तू पैसे न घेता उधार अजिबात देणार नाही.अशा वेळी थर्ड पार्टी बँकेचा यात समावेश केला जातो.

See also  बॉंड यील्ड म्हणजे काय? What is Bond yields and US job data?

लेटर आॅफ क्रेडिट कोणाकडुन जारी केले जाते?

लेटर आॅफ क्रेडिट हे बँक जारी करत असते.

लेटर आॉफ क्रेडिटचे महत्व काय आहे?

लेटर आॅफ क्रेडिट मुळे विक्रेता अणि खरेदी करणारा या दोघांनाही एक गॅरंटी प्राप्त होत असते.

यात विक्रेत्याला ही गॅरंटी मिळत असते की आपल्या विकलेल्या मालाचे पैसे आपल्याला मिळुन जातील,तसेच खरेदी करणारयाला ही खात्री पटते की आपण पैसे भरून विकत घेतलेला माल आपणास विक्रेता कडुन प्राप्त होऊन जाईन.

कारण काही अटी अहर्ता पूर्ण केल्यानंतर जसे की मालाला शिफ्ट करणे अणि आवश्यक त्या डाॅक्युमेंटसला बँकेत सादर करणे हे केल्यावर बँक स्वता विक्रेत्याच्या वतीने खरेदी करणारया व्यक्तीला पैसे देत असते.

लेटर आॉफ क्रेडिट मध्ये अर्जदार कोण असतो?

लेटर आॉफ क्रेडिट मध्ये खरेदी करणारा हा अर्जदार म्हणजेच अॅप्लीकंट असतो.

लेटर आॉफ क्रेडिटची संपुर्ण प्रक्रिया कशी असते?

● लेटर आॉफ क्रेडिट प्रक्रियेत सर्वप्रथम अर्जदार म्हणजेच खरेदी करणारा बँकेत जात असतो अणि लेटर आॉफ क्रेडिट जारी करण्याची विनंती करत असतो.

● ज्या बॅकेमधून खरेदी् करणारा लेटर आॉफ क्रेडिट जारी करण्याची विनंती करत असतो त्यालाच ओपनिंग बँक असे म्हटले जाते.

● पुढच्या टप्प्यात लाभार्थीचे बँक समाविष्ट होते म्हणजेच वस्तूची विक्री करणारा विक्रेता.म्हणजे यात ओपनिंग बँक कडुन अॅडवायझरी बँकेकडे लेटर आॉफ क्रेडिट पाठविले जात असते.

● मग यानंतर अॅडवायझरी बँकेकडुन ओपनिंग बँक कडुन पाठवलेल्या लेटर आॉफ क्रेडिटची सत्यता पडताळली जाते.ज्यात प्रोडक्टचे नाव वगैरे इत्यादी सर्व बाबी तपासल्या जातात.

● सर्व सत्यता पडताळुन झाल्यावर अॅडवायझरी बँक लेटर आॉफ क्रेडिट हे विक्रेता कडे पाठवत असते.लेटर आॉफ क्रेडिट प्राप्त झाल्यानंतर विक्रेत्याला त्याचे पैसे नक्की भेटुन जातील याची खात्री पटते मग विक्रेता मालाला खरेदी करणारया व्यक्तीकडे शिफ्ट करत असतो.म्हणजेच पाठवत असतो.

See also  थर्ड पार्टी इन्शुरन्स म्हणजे काय ? Third party Insurance Marathi mahiti

● यानंतर विक्रेत्याला बिल आॉफ लेडिंग दिले जात असते.हे एक महत्वाचे डाक्युमेंट असते.जेव्हा एखाद्या देशातुन वस्तु माल दुसरया देशात शिफ्ट केला जात असतो.

● हे बिल आॉफ लेडिंग नाॉमिनेटेड तसेच नेगोशिएटींग बँकेकडे पाठवले जात असते.मग नेगोशिएटींग बँक ह्या सर्व शिपिंग डाक्युमेंटला चेक करत असते.ज्यात मालाला योग्य रीत्या शिफ्ट केले गेले आहे की नाही याची पडताळणी केली जाते.यानंतर नाॉमिनेटेड बँक बेनिफिशरीला म्हणजेच विक्रेत्याला पेमेंट करत असते.

● यानंतर नाॉमिनेटेड बँक ओपनिंग बँककडे सर्व डाक्युमेंट पाठवते अणि पैसे पाठविण्याची मागणी करत असते.

● मग ओपनींग बँक ह्या सर्व डाक्युमेंटला अर्जदाराकडे पाठवत असते.मग अर्जदार हे चेक करतो की सर्व डाॉक्युमेंट व्यवस्थित आहे की नाही.ज्या पद्धतीने त्याने प्रोडक्ट माल मागवला आहे तो एकदम त्याचपदधतीने आला आहे की नाही.

● मग चेक करून झाल्यावर अर्जदार त्याचे अॅप्रुव्हल ओपनिंग बँक कडे पाठवत असतो.अणि ओपनिंग बँककडे पेमेंट पाठवत असतो.

यानंतर अर्जदाराने ओपनिंग बँककडे पाठवलेले पेमेंट ओपनिंग बँक नेगोशिएटींग बँककडे पाठवते असते.अणि जसे आपण सुरूवातीला पाहीले की नेगोशिएटींग बँकेने आधीच बेनिफिशरीला म्हणजेच विक्रेत्याला पेमेंट पाठवुन दिलेले आहे.