बँकेतील बचत आणि चालु खात्याविषयी माहीती – Bank saving and current account information in Marathi

Table of Contents

बँकेतील बचत आणि चालु खात्याविषयी माहीती bank saving and current account information in Marathi

मित्रांनो जेव्हा आपण कधीही कुठल्याही बँकेमध्ये आपले अकाउंट ओपन करण्यासाठी जात असतो.तेव्हा आपल्याला हे विचारले जात असते की आपणास कोणते अकाउंट ओपन करायचे आहे?करंट अकाऊंट का सेव्हिंग अकाऊंट?

अशावेळी आपण खुप गोंधळात पडत असतो बँकेत काय उत्तर घ्यावे हेच आपणास समजत नसते.कारण आपल्याला या दोघांविषयी अजिबात माहीती नसते.कारण आपण बँकेत पहिल्यांदाच गेलेलो असतो.

करंट अकाऊंट काय असते?सेव्हिंग अकाउंट काय असते?दोघांमध्ये काय फरक असतो?दोघांचे महत्व काय आहे?या विषयी आपण एकदम अनभिज्ञ असतो.

पण काळजी करू नका मित्रांनो आपल्यापैकी कोणावरही अशी वेळ पुन्हा येऊ नये याकरीता आज आपण करंट अकाऊंट आणि सेव्हिंग अकाऊंट या दोघांविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

सेव्हिंग अकाउंट म्हणजे काय?

सेव्हिंग अकाउंट म्हणजेच बचत खाते.हे अकाऊंट आपल्या पैशांची बचत करण्यासाठी ओपन केले जात असते.

सेव्हिंग अकाउंट कोण ओपन करू शकते?

सेव्हिंग अकाऊंट हे कुठलाही सर्वसामान्य नागरीक किंवा विदयार्थी देखील आपल्या पैशांची बचत करण्यासाठी ओपन करू शकतो.

सेव्हिंग अकाऊंट हे कशासाठी ओपन केले जाते?

सेव्हिंग अकाउंट हे आपल्या पैशांची बचत करण्यासाठी ओपन केले जात असते.

See also  किसान क्रेडिट कार्ड अर्ज पद्धत आता अगदी सोपी-KISAN CREDIT CARD SATURATION DRIVE

सेव्हिंग अकाउंट उघडण्याचे फायदे कोणकोणते असतात?

सेव्हिंग अकाउंट उघडण्याचे पुढील काही महत्वाचे फायदे असतात-

1) आपल्या पैशांची बचत होते.

2) बचत केलेल्या पैशांवर आपल्याला व्याज देखील मिळते.

3) सेविंग अकाउंट मध्ये आपणास अनेक बँकिग सेवा पुरविल्या जात असतात.

उदा, एटीएम,मोबाइल बँकिंग,नेट बँकिंग इत्यादी.

4)सेव्हिंग अकाऊंट ओपन केल्यावर आपणास पासबुक प्राप्त होते.

सेव्हिंग अकाऊंटचे तोटे कोणकोणते असतात?

● यात किती कालावधीत किती ट्रान्झँक्शन करायचे याचे एक लिमिट असते.

● यात आपणास ओव्हरड्राफ्ट फँसिलीटी दिली जात नाही.म्हणजे बँक खात्यात जेवढी रक्कम शिल्लक आहे त्यापेक्षा अधिक पैसे काढता येत नाही

करंट अकाउंट म्हणजे काय?

करंट अकाउंट म्हणजेच चालू खाते.करंट अकाऊंट हे खास रोजच्या दैनंदिन पैशांच्या देवाणघेवाणीच्या व्यवहारासाठी ओपन केले जात असते.

करंट अकाउंट हे फक्त मोठमोठया कंपनी,एजंसी गुंतवणुकदार,ट्रेडर हे रोजच्या पैशांच्या देवाणघेवाणीच्या व्यवहारासाठी ओपन करू शकतात.

यात आपल्यावर पैशांच्या देवाणघेवाणीची कुठलीही मर्यादा नसते.आपण पाहिजे तेवढया पैशांची देवाणघेवाण करू शकतो.

पण करंट अकाउंटमधील पैशांवर आपणास कुठल्याही प्रकारचे व्याज प्राप्त होत नसते.फक्त ह्या अकाऊंटदवारे आपणास पाहिजे तेवढी पैशांची देवाणघेवाण करता येत असते.

करंट अकाउंट कसे ओपन करायचे?

करंट अकाउंट हे आपण एकुण दोन पदधतीने ओपन करू शकतो.पहिली पदधत आहे आँनलाईन दुसरी आहे आँफलाईन.

करंट अकाउंट उघडण्याची आँफलाईन प्रक्रिया –

जेव्हा आपल्याला करंट अकाउंट आँफलाईन पदधतीने ओपन करायचे असते तेव्हा आपणास सगळयात आधी बँकेत जावे लागते.तिथे मग आपणास एक फाँर्म दिला जात असतो.तो फाँर्म आपण आपली सर्व माहीती टाकुन व्यवस्थित भरून घ्यायचा.

फाँर्ममध्ये आपल्याला काही डाँक्युमेंटची नावे दिलेली असतील त्यांची प्रत्येकी एक एक झेराँक्स त्याला जोडायची.आणि तो फाँर्म बँकेत सबमीट करायचा.

करंट अकाउंट उघडण्याची आँनलाईन प्रक्रिया-

जर आपणास आँनलाईन पदधतीने करंट अकाउंट ओपन करायचे असेल तर आपण सर्वप्रथम आपल्याला ज्या बँकेत करंट अकाउंट ओपन करायचे असेल तिच्या आँफिशिअल वेबसाइटवर जावे.

See also  ग्रो एप्लीकेशन इन्वेस्टमेंट विषयी माहीती - Groww app information in Marathi

वेबसाइटवर गेल्यावर आपणास ओपन अकाउंट नावाचे एक आँप्शन दिसुन येईल त्यावर करंट अकाउंट सिलेक्ट करून क्लिक करावे.

मग आपल्यासमोर एक करंट अकाउंट ओपन करण्यासाठी फाँर्म येतो तो व्यवस्थित भरून घ्यायचा.तसेच काही आवश्यक ती डाँक्युमेंट तिथे अटँच करावी लागतात.

अकाउंट ओपन करून झाल्यानंतर ते चालवण्यासाठी त्यात थोडे पैसे देखील असणे गरजेचे असते.काही बँकांमध्ये अकाउंट ओपन करायला खात्यात किमान दहा हजार असणे गरजेचे असते.प्रत्येक बँकेत ही रक्कम वेगवेगळी देखील असु शकते.

प्रत्येक बँकेचे आपापले काही नियम असतात त्यानुसार आपल्याकडून करंट अकाउंट ओपनिंगचे चार्जेस घेतले जात असतात.

करंट अकाउंट साठी कोणते डाँक्युमेंटस असावे लागतात?

करंट अकाउंट उघडण्यासाठी आपल्याकडे पुढील काही महत्वाचे डाँक्युमेंटस असणे आवश्यक असते-

1)अकाऊंट ओपनिंगसाठी चेक

2) पासपोर्ट साईज दोन फोटो

3) पँनकार्ड,आधार कार्ड

4) आपल्या उद्योगव्यवसायाच्या नोंदणीचे प्रमाणपत्र

5) आपल्या मालकीच्या फर्म/एजंसी/कंपनी यांचा अँड्रेस प्रूफ

करंट अकाउंट ओपन करण्याची आवश्यकता का आणि कोणास असते?करंट अकाउंट कोणास उघडता येते?

अशी एखादी कंपनी,एजंसी,फर्म ज्यांना आपल्या उद्योग व्यवसायात रोज पैशांची देवाण घेवाण करावी लागत असते.त्यांना रोज अमर्यादितपणे पैशांच्या देवाणघेवाणीचे व्यवहार पार पाडण्यासाठी करंट अकाउंट ओपन करणे आवश्यक असते.

तसेच एखादा गुंतवणुकदार ट्रेडर व्यापारी ज्याला रोज पैशांच्या देवाणघेवाणीचे मोठमोठे व्यवहार करावे लागत असतात तो देखील हे करंट अकाउंट ओपन करू शकतो.

करंट अकाउंट कोण ओपन करू शकत नाही?

सामान्य नागरिक,विदयार्थी हे करंट अकाउंट ओपन करू शकत नाही.

सर्वसामान्य व्यक्तीने आपले करंट अकाउंट का उघडु नये?

सर्वसामान्य व्यक्ती बँकेत जे आपले सेव्हिंग खाते ओपन करते त्यावर त्याला बँकेकडून काही व्याज दिले जाते पण करंट अकाउंट मध्ये असा कुठलाही प्रकार घडत नसतो.

यातील पैशावर आपणास कुठलेही व्याज प्राप्त होत नसते.शिवाय करंट अकाउंट दवारे व्यवहार करण्याचे चार्जेस देखील आकारले जात असतात जे सर्वसामान्य व्यक्तीला परवडणारे नाहीयेत.

See also  Sgx Nifty म्हणजे काय ? SGX Nifty Marathi Mahiti

करंट अकाउंट ओपन करण्याचे फायदे कोणकोणते असतात?

करंट अकाउंट ओपन करण्याचे आपणास पुढील काही महत्वाचे फायदे होत असतात-

1)करंट अकाउंट मध्ये आपणास अनेक सुविधा प्राप्त होत असतात.

उदा,चेक इशु करने,पे आँडर देणे,डिमांट ड्राफ्टचा वापर करणे इत्यादी.

2) करंट अकाउंट मध्ये आपणास ओव्हर ड्राफ्ट फँसिलिटी प्राप्त होत असते म्हणजे समजा आपल्या खात्यात 20 हजार आहे आणि आपल्याला 30 हजार काढायचे असेल तर आपण ते या अकाऊंटमध्ये काढु शकतो.

3) करंट अकाउंट मध्ये पाहिजे तेवढया पैशांची देवाणघेवाण करता येते.

4) करंट अकाउंट मधील व्यवहारासाठी आपणास अतिरीक्त चार्ज पे करावे लागते नाही.

5) करंट अकाउंट मध्ये देखील आपणास बँकिग सेवा पुरविल्या जात असतात.जशा सेव्हिंग मध्ये पुरवल्या जातात.

उदा, एटीएम,मोबाइल बँकिंग,नेट बँकिंग

6) खातेधारकास कधीही कुठल्याही ठिकाणी असताना आपल्या खात्यावरून पैसे काढता तसेच ट्रान्सफर करता येतात.

करंट अकाउंट ओपन करण्याचे तोटे कोणकोणते असतात?

करंट अकाउंट ओपन करण्याचे आपणास पुढील काही तोटे देखील होत असतात-

1)यात काही सुविधांसाठी अतिरीक्त चार्ज देखील आकारले जात असतात.

2) हे दैनंदिन व्यवहाराचे अकाउंट असल्याने येथे आपणास जास्त चार्जेस देखील भरावे लागत असतात.

3) या खात्यातील पैशांवर कुठलेही व्याज प्राप्त होत नसते.

4) करंट अकाऊंट ओपन केल्यावर आपणास पासबुक प्राप्त होत नाही.

1 thought on “बँकेतील बचत आणि चालु खात्याविषयी माहीती – Bank saving and current account information in Marathi”

Comments are closed.