MSSC- महिला सन्मान बचत प्रमाणपत्र विषयी सविस्तर माहिती -Mahila Sanman Saving certificate scheme information in Marathi

Table of Contents

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र – mahila sanman Saving certificate scheme information in Marathi

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ह्या योजनेसाठी पात्रतेच्या अटी काय आहेत?

Mahila Sanman Saving certificate scheme - MSSC
Mahila Sanman Saving certificate scheme – महिला सन्मान बचत प्रमाणपत्र विषयी सविस्तर माहिती

ह्या योजनेचा लाभ फक्त महिला तसेच मुली यांना होणार आहे ह्या योजनेअंतर्गत फक्त महिला किंवा मुली आपले खाते उघडु शकणार आहेत.

ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी वयाची कोणतीही अट ठेवण्यात आली नाहीये.म्हणजेच कोणत्याही वयोगटातील महिलांना मुलींना ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

ह्या योजनेसाठी आपणास सुरूवातीला फक्त एकच खाते उघडता येणार आहे.संयुक्त खाते लगेच उघडता येणार नाही.

ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठलीही महिला किंवा मुलगी स्वता आपले खाते उघडु शकणार आहे अणि समजा अल्पवयीन मुलीचे खाते उघडायचे असेल तर अशावेळी एक कायदेशीर पालकाची आवश्यकता येथे भासणार आहे.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेचा मुदत कालावधी काय आहे?

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ह्या योजनेची मुदत दोन वर्षे इतकी ठेवण्यात आली आहे.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ह्या योजनेचा लाभ आपणास ३१ मार्च २०२५ पर्यंत घेता येणार आहे म्हणजे ही योजना ३१ मार्च २०२५ पर्यंतच उपलब्ध असणार आहे.

ज्यांना ह्या योजनेमध्ये गुंतवणूक करायची आहे त्यांनी ३१ मार्च २०२५ पर्यंत करायची यानंतर ह्या योजनेत आपणास गुंतवणूक करता येणार नाही.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेमधील ठेवींचे नियम काय आहेत?

ह्या योजनेमध्ये महिला तसेच मुलींना किमान हजार रुपये अणि त्यापुढे शंभरच्या पटीने पाहीजे तितकी रक्कम ठेवता येणार आहे.पण एक हजार बाराशे तसेच दोन हजार तीनशे अशा प्रकारची ठेव ह्या योजनेअंतर्गत महिला मुलींना ठेवता येणार नाही.

See also  Mortgage loan म्हणजे काय? कसा अर्ज करावा ? तारण कर्ज संपूर्ण माहीती - Mortgage loan information in Marathi

ह्या योजनेमध्ये जास्तीत जास्त दोन लाखांपर्यंत गुंतवणूक महिला तसेच मुली करू शकतात.

ह्या योजनेमध्ये संबंधित खातेदार महिला किंवा मुलीला कितीही खाते उघडता येणार आहे.पण प्रत्येक नवीन खाते हे जुन्या खात्यानंतर तीन महिन्यांच्या कालावधीने उघडता येणार आहे.

उदा,समजा एखाद्या महिलेने महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ह्या योजनेमध्ये ८ एप्रिल २०२३ रोजी ५० हजार रुपयाची गुंतवणूक केली.अणि आपले खाते उघडले त्या महिलेला अजुन दीड लाख रूपये ह्या गुंतवता येणार आहे.पण समजा त्या महिलेकडे ५० हजार रुपयेच आहेत.

अशा परिस्थितीत ती महिला ८ एप्रिल २०२३ नंतर तीन महिन्यांनी म्हणजे ८ जुलै २०२३ रोजी ५० हजार भरून तिचे नवीन खाते उघडु शकेल.पण याआधी ती महिला नवीन खाते उघडु शकणार नाही.

यानंतर समजा त्या महिलेकडे आणखी एक लाख रुपये जमा झाले तर ती महिला ८ जुलै २०२३ नंतर तीन महिन्यांनी म्हणजे ८ आॅक्टोंबर २०२३ रोजी ती महिला ह्या योजनेमध्ये एक लाख गुंतवू शकते.

प्रत्येक नवीन खाते उघडण्यासाठी तीन महिन्यांची मुदत ही किमान मुदत असणार आहे.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेमध्ये मिळणारे व्याजदर किती आहे?

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेमधील आपल्या ठेवींवर महिला तसेच मुलींना ७.५ टक्के इतके व्याज दिले जाणार आहे.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेमध्ये मिळणारे व्याजदर INTREST RATE MSSC – https://www.indiapost.gov.in/Financial/Pages/Content/Post-Office-Saving-Schemes.aspx

पण एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी ह्यातील व्याजाचा प्रकार हा तिमाही चक्रवाढ असणार आहे.

अणि समजा एखाद्या महिलेने ह्या योजनेमधील नियमांचे पालन केले नाही तर तिच्या ठेवीच्या व्याजदरावर बचत खात्याचे व्याजदर लागू केले जाणार आहे.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेमधील पैसे काढण्याचे नियम काय आहेत?

  • महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेमध्ये ठेवीदार खातु चालू केल्यावर एक वर्ष पुर्ण झाल्यानंतर जमा रक्कमेच्या चाळीस टक्के इतकी रक्कम संबंधित पोस्ट खाते तसेच बॅकेत अर्ज दाखल करून काढु शकतात.
  • ही रक्कम महिलेला एक वर्ष पुर्ण झाल्यानंतर अणि ठेवीची मुदत संपण्यापूर्वी एकदाच काढता येणार आहे याची महिला ठेवीदारांनी नोंद घ्यावी.
  • हाच अल्पवयीन मुलींच्या बाबतीत देखील असणार आहे समजा एखाद्या अल्पवयीन मुलीचे खाते असेल तर ही रक्कम एक वर्ष पुर्ण झाल्यानंतर ठेवीची मुदत संपण्यापूर्वी मुलीच्या पालकांना काढता येणार आहे यासाठी मुलीच्या पालकांना बॅक तसेच पोस्ट आॅफिस मध्ये त्या मुलीच्या वतीने पैसे काढण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे.

उदा, समजा एखाद्या महिला ठेवीदाराने खाते चालु केल्यानंतर एक वर्ष पूर्ण झाल्यावर चाळीस टक्के रक्कम न काढता फक्त २० किंवा ३० टक्केच रक्कम काढली अणि ठेवीची मुदत संपण्यापूर्वी त्याला अजुन वीस ते दहा टक्के रक्कम काढायची असेल तर असे ठेवीदारांना करता येणार नाही.उरलेली सर्व रक्कम त्या महिले खातेदाराला ठेवीची मुदत संपल्यानंतर दिली जाणार आहे.

See also  बँक आँफ इंडियाच्या स्टार होम लोन योजना विषयी माहीती - Bank of India Star home loan scheme information in Marathi

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेची मुदत पुर्ण झाल्यानंतर किती रक्कम दिली जाणार?

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेमध्ये खाते उघडल्यानंतर दोन वर्षे पुर्ण झाल्यावर ठेवीदार महिलेचे तसेच मुलीचे खाते परिपक्व म्हणजे मॅच्योर होईल.

अणि खात्यात दोन वर्षांत जेवढी रक्कम जमा झाली आहे ती रक्कम महिला तसेच मुली ठेवीदारांना दिली जाणार आहे.पण ही रक्कम प्राप्त करण्यासाठी ठेवीदार महिलेस बॅक तसेच पोस्ट आॅफिस मध्ये याबाबत अर्ज करावा लागणार आहे.

अल्पवयीन मुलींच्या बाबतीत तिच्या पालकांना हा अर्ज मुलीच्या वतीने बॅक पोस्ट आॅफिस मध्ये करावा लागेल.

मुदत पुर्ण होण्याच्या आधी खाते बंद करण्यासंबंधी काही महत्वाचे नियम –

  • जर महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेमध्ये महिला,मुलगी ठेवीदारास मुदत पुर्ण होण्याच्या आधी आपले खाते बंद करावयाचे असेल तर अशा परिस्थितीत काही नियम लागु करण्यात आले आहेत हे आपणास जाणुन घेणे आवश्यक आहे.
  • खालील दिलेल्या परिस्थितीत खाते मुदतपूर्वी बंद केले जाऊ शकते-
  • खातेदाराचा मृत्यु झाल्यास मुदत पुर्ण होण्याच्या आधी खाते बंद करता येऊ शकते.
  • खातेदाराला काही भयंकर असाध्य आजार जडला असेल ज्यावर उपचार करण्यासाठी खातेदाराला मुदत पुर्ण होण्याच्या आधी आपल्या पैशांची आवश्यकता भासत असेल तर अशा परिस्थितीत मुदत पुर्ण होण्याच्या आधी खाते बंद करता येते.
  • खातेदार अल्पवयीन आहे अणि तिच्या पालकांचे निधन झाले ज्यामुळे खाते चालु ठेवणे शक्य होत नाहीये अशा परिस्थितीत मुदत पुर्व खाते बंद केले जाऊ शकते.
  • वरील दिलेल्या परिस्थितीत खाते मुदतपूर्वी बंद करण्यात आले तर ठेवीदार महिला मुलीला आपल्या ठेवीवर ७.५ टक्के इतके व्याज दिले जाणार आहे.
  • पण समजा वरील दिलेल्या कारणांव्यतीरीक्त इतर दुसरया कारणाने खातेदारास आपले खाते मुदतपूर्वी बंद करायचे असेल तर अशा परिस्थितीत खातेदाराला दोन टक्के कमी व्याज दिले जाणार आहे.म्हणजे ७.५ टक्के न मिळता ५.५ टक्के एवढेच व्याजदर दिले जाणार आहे.
  • म्हणुन वरील दिलेल्या कारणांव्यतीरीक्त इतर दुसरया कारणाने ज्या खातेदारास आपले सदर योजना मध्ये खाते
  • खाते उघडल्यानंतर बंद करायचे आहे तर त्याने महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेमध्ये खाते उघडल्यानंतर सहा महिन्यांनी आपले खाते बंद करून घ्यायचे आहे.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेसाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे कोणती आहेत?

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • खातेदाराची ओळख अणि पत्याचा पुरावा म्हणून खालील कागदपत्रे लागणार आहेत –
  • पासपोर्ट
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • वोटर आयडी कार्ड
  • नरेगा जाॅब कार्ड जे नरेगा दवारे जारी केले आहे
  • राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही दवारे जारी केलेले पत्र ज्यात खातेदाराच्या नाव अणि पत्राची माहीती आहे.
See also  ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर | How To Use RPLI Premium Calculator In Marathi

अल्पवयीन मुलींसाठी लागणारी इतर कागदपत्रे –

अल्पवयीन मुलींना वरील पैकी जी कागदपत्रे आपल्याकडे उपलब्ध आहे ती जोडून तिचा जन्माचा दाखला देखील जोडावा लागणार आहे.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत किती रक्कम गुंतवल्यावर किती परतावा प्राप्त होईल?

जर समजा एखाद्या महिलेने ह्या योजनेत दहा हजार रूपये इतकी गुंतवणुक केली तर तिला दोन वर्षे इतक्या कालावधीने ११ हजार ६०२ रूपये प्राप्त होणार आहे.अणि व्याज १ हजार ६०२ रूपये प्राप्त होणार आहे.

जर समजा एखाद्या महिलेने ह्या योजनेत पन्नास हजार रूपये इतकी गुंतवणुक केली तर तिला दोन वर्षे इतक्या कालावधीने ५८ हजार ११ रूपये प्राप्त होणार आहे.अणि दोन वर्षाचे व्याज ८०११ रूपये प्राप्त होणार आहे.

जर समजा एखाद्या महिलेने ह्या योजनेत एक लाख रूपये इतकी गुंतवणुक केली तर तिला दोन वर्षे इतक्या कालावधीने ११६०२२ रूपये प्राप्त होणार आहे.अणि दोन वर्षांचे व्याज १६०२२रूपये प्राप्त होणार आहे.

जर समजा एखाद्या महिलेने ह्या योजनेत दीड लाख रूपये इतकी गुंतवणुक केली तर तिला दोन वर्षे इतक्या कालावधीने १७४०३३
रूपये प्राप्त होणार आहे.अणि दोन वर्षांचे व्याज २४०३३ रूपये प्राप्त होणार आहे.

जर समजा एखाद्या महिलेने ह्या योजनेत दोन लाख रूपये इतकी गुंतवणुक केली तर तिला दोन वर्षे इतक्या कालावधीने २३२०४४ रूपये प्राप्त होणार आहे.अणि दोन वर्षांचे व्याज ३२०४४ रूपये प्राप्त होणार आहे.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी वयस्कर महिलांनी फाॅर्म कसा भरायचा?

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेसाठी १८ वर्षाच्या पुढील महिला वर्गाने कशापदधतीने फाॅम भरायचा हे आपण जाणुन घेणार आहोत.

  • Post master manager मध्ये अठरा वर्षे पेक्षा अधिक वय असलेल्या महिलांनी फाॅर्म भरताना ज्या पोस्ट आॅफिस तसेच बॅकेत त्या आपले खाते ओपन करत आहेत त्या पोस्ट आॅफिसचे नाव सर्वप्रथम लिहायचे आहे.
  • यानंतर ज्या महिलेचे खाते उघडले जाते आहे त्या महिलेचे नाव लिहायचे आहे.
  • जेवढे पैसे त्या महिलेला जमा करायचे तेवढ्या पैशांची रक्कम त्या महिलेने अंक अणि शब्दात लिहायची आहे.
  • चेक डिडी नंबर मध्ये ट्रान्स्फर लिहायचे आहे.
  • नेम आॅफ डिपाॅझिटर‌ मध्ये पुन्हा त्या खातेदार महिलेचे नाव लिहायचे आहे.
  • Date of birth मध्ये खातेधार महिलेची जन्मतारीख टाकायची आहे.
  • खातेधार महिलेचा आधार कार्ड पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे.
  • यानंतर खातेदार महिलेने आधार कार्ड मधील दिलेला तिचा सध्याचा अणि कायमस्वरूपी पत्ता टाकायचा आहे.
  • यानंतर खातेदार महिलेचा मोबाईल नंबर टाकायचा आहे.
  • यानंतर अकाऊंटचा टाईप सिंगल लिहायचा आहे.
  • यानंतर आपले ओळखपत्र म्हणून आपले जे कागदपत्र देतो आहे ते आयडी प्रुफ मध्ये टाकायचे आहे.
  • पत्याचा पुरावा म्हणून जे कागदपत्र देतो आहे ते कागदपत्राचे नाव टाकायचे आहे.
  • १० नंबर मध्ये खातेदारास तीन वेळा आपली स्वाक्षरी करावी लागणार आहे.
  • यानंतर आपणास त्या खात्याची सर्व माहिती द्यायची जे आपण महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेच्या अंतर्गत ओपन केले आहे.ही माहीती न भरल्यास आपणास कमी व्याज दिले जाऊ शकते.
  • यानंतर खातेदाराने त्याची सही करायची आहे अणि अर्ज केलेल्या दिवसाची तारीख टाकायची आहे.
  • यानंतर खातेदारास त्याची नाॅमिनेशन डिटेल भरायची आहे.
  • सर्वात खाली जागेचे नाव देऊन अणि पुन्हा अर्ज करत असलेल्या दिवसाची तारीख टाकायची आहे.