गृह कर्ज घेण्याचे फायदे आहेत? –What are the benefits of home loan in Marathi
नवीन घर खरेदी करावयाचे म्हटले तर होम लोन घेणे हे साहजिकच असते.कारण घर खरेदी करण्याइतकी रोख रक्कम आपल्याकडे लगेच उपलब्ध असावी एवढी बळकट आर्थिक परिस्थिती आपल्या सारख्या सर्वसामान्य व्यक्तींची नसते.म्हणुन मग आपण घर खरेदी करण्यासाठी तात्पुरता लोन घेणे पसंद करत असतो.
होम लोन घेतल्याने आपल्याला आपले स्वताचे घर खरेदी करता तर येतेच शिवाय याव्यतीरीक्त देखील अनेक लाभ होम लोन घेण्याचे आपल्याला मिळत असतात.त्याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही.
- होम लोन आणि होम बाईंग हे दोघे एकाच नाण्याच्या दोन बाजु असतात.कारण घर खरेदी करणे म्हटले तर त्यासाठी होम लोन घेणे ही सामान्य बाब आहे.
- आपण हे देखील नाकारू शकत नाही की बरेच जण असेही असतात जे रोख पैसे भरून आपले नवीन घर खरेदी करत असतात.पण असे खुप मोजकेच लोक असतात.
- आणि असे तेच लोक करतात ज्यांची आर्थिक परिस्थिती खुप बळकट असते.आणि त्यांना पैशांची कुठलीही अडचण येत नसते.तसेच त्यांनी आपले घर खरेदी करण्यासाठी आधीपासून पैशांची बचत करून ठेवलेली असते.म्हणुन अशा व्यक्तींना स्वताचे नवीन घर घेण्यासाठी बँकेकडुन कुठलेही लोन घेण्याची गरज भासत नसते.
- असो खुप जण असे म्हणत असतात की कर्ज घेणे ही खुप वाईट आहे.कर्ज घेणारा व्यक्ती आयुष्यात कधीच पुढे जात नाही.त्याची प्रगती होत नसते.नक्कीच विनाकारण कर्ज घेणे हे वाईट आहे.पण काही मुख्य कारणास्तव बँकेकडून कर्ज घेणे एवढेही वाईट नसते.
- आणि नाण्याची दुसरी बाजु बघायला गेले तर आपणास असे दिसुन येते की कर्ज घेण्याचे जेवढे नुकसान आहेत तेवढेच त्याचे काही फायदे देखील असतात.जे आपणास प्राप्त होत असतात.
- आजच्या लेखात आपण हेच फायदे जाणुन घेणार आहोत.होम लोन घेतल्याने आपल्याला कोणकोणते लाभ प्राप्त होत असतात.
घर खरेदी करताना घ्या काळजी – Home buying documents Marathi
होम लोन घेण्याचे कोणकोणते फायदे असतात? – What are the benefits of home loan in Marathi
होम लोन घेण्याचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत :
1) स्वताचे हक्काचे घर खरेदी करता येते:
आपल्याला प्रत्येकाला वाटते की आपले स्वताचे एक हक्काचे घर असायला हवे.जे आपल्या मालकीचे असेल जिथून कोणी आपल्याला बाहेर काढु शकत नाही.कोणी आपल्याला तिथुन अपमानीत करून निघुन जा असे म्हणु शकत नाही.आणि आपले पुर्ण आयुष्य आपण सुखात व्यतित करू शकतो.
पण आर्थिक परिस्थितीमुळे हे अजिबात शक्य होत नसते.पण जेव्हा आपण होम लोन घेतो तेव्हा हे आपले स्वप्र पुर्ण होत असते.
2) एक कायमस्वरूपी निवारा प्राप्त होतो:
जेव्हा आपण दुसरयाच्या घरात भाडे देऊन राहत असतो तेव्हा अशा परिस्थितीत घरमालक कधीही रात्री अपरात्री अचानक घर खाली करण्यास सांगु शकतो.
आणि अशा वेळी घरासाठी आपले काही पुर्वनियोजन झालेले नसल्याने ऐनवेळी नवीन घर बघण्यात शोधण्यात आपली आणि आपल्या कुटुंबियांची खुपच दमछाक होत असते.
पण होम लोन घेतल्याने आपण आपले कायमस्वरूपी घर खरेदी करू शकतो.जिथुन कोणीही आपल्याला बाहेर काढु शकत नाही.
3) होम लोन घेतलेल्या व्यक्तीच्या आर्थिक दर्जात वाढ होते :
जी व्यक्ती एकदा होम लोन घेत असते आणि त्याची वेळेवर परतफेड करत असते अशा व्यक्तींचा दर्जा बँकेच्या नजरेत अधिक वाढत असतो.कारण त्यांचा सिव्हील स्कोअर चांगला बनत असतो.
ज्याचे परिणामस्वरूप इतर बँका तसेच फायनान्स कंपनी देखील त्या व्यक्तीस लोन द्यायला लगेच तयार होत असतात.
4) माँरगेज लोन प्राप्त होते:
आपल्याकडे जर स्वताचे हक्काचे घर असेल त्याच्या आधारावर आपण बँकेकडे आपले घर गहाण ठेवून बँकेकडुन एखाद्या मोठया उद्योग व्यवसायासाठी मोठे माँरगेज लोन प्राप्त करू शकतो.याने आपल्याला अडीअडचणीच्या काळात झटक्यात पैसे जमा करायला सोपे जात असते.
5) मुलांचे लग्न लवकर जुळते:
मुलाकडे चांगली नोकरी व्यवसाय नसेल तसेच स्वताचे हक्काचे घर नसेल तर मुलीवाले आपली मुलगी द्यायला नकार देत असतात.
पण याचठिकाणी आपले स्वताचे हक्काचे घर असेल तर मुलीवाले वरपक्षाला आपली मुलगी देण्यास झटक्यात तयार होत असतात.कारण मुलीवाले हा विचार करतात की मुलाचे स्वताचे घर आहे आणि चांगला रोजगार देखील आहे ज्याने आपल्या मुलीवर भविष्यात कुठलेही आर्थिक संकट येणार नाही.
म्हणजेच याने मुलीवाल्यांला आपल्या मुलीची सुरक्षितता सुनिश्चित होत असते.आणि डोळे झाकुन ते मुलगी देत असतात.हा देखील एक मोठा फायदा आहे होम लोन घेण्याचा.
6) कमी व्याजदरात दुसरे होम लोन प्राप्त होते:
एका बँकेकडून लोन घेऊन ते वेळेवर पुर्णपणे फेडल्यावर इतर बँकांचा देखील आपल्यावरील विश्वास वाढत असतो.आणि ते देखील आपल्याला कमी व्याजदरात होम लोन द्यायला तयार होत असतात.
पहिले होम लोन घेत असलेल्या व्यक्तींसाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना लागु केली आहे ज्याने आपल्याला होम लोनच्या व्याजात बरीच सवलत प्राप्त होते.
7) संपुर्ण कुटुंबाची सोय होते :
जेव्हा आपण होम लोन घेऊन स्वताचे घर खरेदी करत असतो तेव्हा आपली स्वताची एक हक्काची प्राँपर्टी निर्माण होते.जिथे आपले कुटूंब गुण्यागोविंदाने राहु शकते.
ज्याने भविष्यात आपण ह्यातीत असलो किंवा नसलो तरी आपले कुटुंब रस्त्यावर येत नाही.कारण जाताना आपण त्यांना त्यांचे हक्काचे छत देऊन जात असतो.
याने भविष्यात आपली मुले तसेच त्यांची मुले म्हणजे आपली नातवंडे देखील आपल्या हक्काच्या घरात आनंदाने राहु शकतात.
8) कुठल्याही प्रकारची फसवणुक होत नसते :
जेव्हा आपण प्राँपर्टी म्हणजे घर खरेदी करत असतो तेव्हा त्यात फ्राँड म्हणजेच फसवणुक देखील होण्याची अधिक शक्यता असते.
पण जेव्हा आपण घर खरेदी करण्यासाठी बँकेकडून होम लोन घेत असतो तेव्हा सर्व व्यवहार हा कायदेशीर पदधतीने पार पडत असतो.ज्याने पुढे जाऊन कुठलाही फ्राँड होण्याची भीती राहत नाही.
9) इन्कम टँक्स मध्ये देखील सवलत प्राप्त होते:
होम लोन घेण्याचा अजुन एक एक फायदा आपल्याला मिळत असतो तो म्हणजे इन्कम टँक्समध्ये चांगली सुट मिळत असते.
1 thought on “Home loan घेण्याचे फायदे कोणते आहेत? What are the benefits of home loan in Marathi”
Comments are closed.