Digital Marketing  म्हणजे काय? आणि 8 प्रकार. What is digital marketing and the 8 Types of Digital Marketing?

Digital Marketing  म्हणजे काय? आणि 8 प्रकार.

डिजिटल मार्केटिंग

सर्वसाधारण सामान्य लोकांच्या दृष्टिकोनातून समजून घ्यायचं तर मार्केटिंग किंवा विपणन म्हणजे ग्राहकांच्या गरजा ओळखणे आणि त्यांचे समाधान करणे.

कोणत्याही व्यवसायाच्या बाबत हे एक खूप महत्वाच कार्य आहे, कारण यशस्वी मार्केटिंग  इनबाउंड लीड म्हणजे मोठ्या प्रमाणावर ग्राहक आपल्या सेवा आणि उत्पादनं कडे  आकर्षित करू शकतात .

डिजिटल मार्केटिंग म्हणजे –

डिजिटल मार्केटिंग म्हणजे खर्‍या अर्थाने अशी मार्केटिंग पद्धत , स्ट्रेटजी  ज्यात सामान्यत: संगणक, स्मार्टफोन , टॅब्लेट किंवा इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस वापर केला जातो . यात  ऑनलाइन व्हिडिओ, डिस्प्ले जाहिराती तसेच , गूगल , बिंग सारख्या  शोध इंजिनचा  वापर आणि  पैसे देवून जाहिराती देणे आणि सोशल मीडिया वर पोस्ट द्वारे  ग्राहकांना माहिती देणे अश्या प्रकारे मार्केटिंग केली जाते.

डिजिटल विपणनाची ची  तुलना जर  पारंपारिक विपणन (traditional ) शी केली जाते ज्यात  साप्ताहिक किंवा मासिक द्वारे  जाहिराती दिल्या जातात किंवा , शहरात , रेल्वे स्टेशन किंवा गर्दीच्या ठिकाणी  जाहिरातीचे होर्डिंग्ज लावले जातात तसेच आणि ईमेल द्वारे सुद्धा मार्केटिंग केले जाते.

पारंपारिक मार्केटिंग पद्धतीत  ग्राहक आणि उत्पादन निर्मात्यात काही संवाद नसतो तर डिजिटल विपणन ही सतत बदलणारी, आणि गतिशील प्रक्रिया असते  डिजिटल मार्केटिंग द्वारे  व्यवसायिक आणि  संभाव्य ग्राहकांमधे एक सुसंवाद स्थापन करता येतो

ग्राहकना  जाहिरातदारांशी बोलता येत , प्रश्न विचारता येतात , शंकांच समाधान करून घेता येते

आजकाल आपण जास्त वेळ स्मार्टफोन  असतो याच  वास्तविकतेचा डिजिटल विपणन मध्ये  फायदा घेवून संपूर्ण इंटरनेटवर व्यवसाय संबधित उत्पादने आणि सेवांची जोरात  जाहिराती केल्या जातात , प्रमोशन केले जाते अशाप्रकारे, डिजिटल  मार्केटिंग मध्ये व्यवसाय, उद्योग , कंपन्या  हे सुनिश्चित करतात की त्यांचे मार्केटिंग प्रयत्न ग्राहकांपर्यंत  सहज , सुलभरित्या  पोहोचतील आणि त्यांची उत्पादनं व सेवा ग्राहकांना आवडतील , लोकप्रिय होतील व डिजिटल मार्केटिंग मुख्य उद्देश म्हणजे सेल्स वाढवणे तो पूर्ण होईल.

See also  एफडी काढण्यासाठी आर्ज कसा करावा? । Application for Withdrawal of FD In Marathi

वाचा माहिती –  डिजिटल मार्केटिंग कोर्सेस

डिजिटल मार्केटिंग च्या सध्या वापरल्या जाणत्या common पद्धती कोणत्या आहेत: What is digital marketing and the 8 Types of Digital Marketing?

  1. शोध इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO) – Search Engine Optimization -आपल्या वेबसाइट वर जास्तीजास्त लोकांनी याव या करता ऑनलाइन रहदारी वाढविण्यासाठी SEO  च वापर करणे. .
  1. शोध इंजिन विपणन (SEM) -Search Engine Marketing – शोध इंजिनमध्ये आपली वेबसाइट माहिती शोधनार्‍यांना समोर लवकर दिसावी या करता ऑनलाइन जाहिराती चा वापर करणे . SEM चा वापर SEO च्या मदतीने केला जातो
  1. पे-पर-क्लिक (पीपीसी) – Pay-Per-Click पीपीसी ही जाहिरातीं ची एक सामान्य ऑनलाइन पद्धत आहे जिथे जेव्हा व्यक्ती त्या जाहिराती वर  क्लिक करतात तेव्हाच  जाहिरात देणार्‍या बिझनेस कंपन्या त्या जाहिरातींसाठी पैसे मोजतात.
  1. Media सोशल मीडिया मार्केटिंग (एसएमएम) – Social Media Marketing एसएमएम ही व्यवसाय उत्पादने किंवा सेवांची  जाहिरात कंरन्या र्साठी  सोशल मीडिया वरील अकाऊंट फेसबुक , ट्विटर , इनस्टा यांचा वापर केला जातो . तसेच जे सोशल मीडिया इन्फ्ल्युंसर वापर करून उत्पादन ची  जाहिरात करतता त्याला इन्फ्लुंस मार्केटिंग influencer marketing म्हणतात , ज्यांना बहुतेकदा प्रभाव विपणन म्हणून संबोधले जाते, ते एसएमएममध्ये प्रचलित आहे
  1. ईमेल मार्केटिंग विपणन – Email Marketing ईमेल विपणन द्वारे , मार्केटिंग करणार्‍या  व्यवसायांना ईमेलद्वारे त्यांच्या संभाव्य ग्राहकांना, जाहिरा ती द्वारे ब्रंडेड  उत्पादन व सेवांची माहिती पाठवता येते , तसेच यात न्यूलेटर च मोठ्या प्रमाणवर वापर होतो
  1. Marketing संबद्ध विपणन – Affiliate Marketing– ही एक कामगिरी व स्किल वर आधारित मार्केटिंग च प्रकार असतो ज्यात मिळालेल्या उत्पन्नातून काही टक्के कमिशन शेअर केल जाते
  1. कंटेंट विपणन Content Marketing – सामग्री विपणन  या डिजिटल मार्केटिंग प्रकारात बिझनेस कंपन्या ऑनलाइन ग्राहकांना, व्हिडिओ किंवा ऑडिओ द्वारे आपल्या उत्पादनं ची माहिती देतात . उदाहरण – ब्लॉग , युटुब विडियो आणि पोडकोस्ट
  1. नेटीव जाहिराती – Native Advertising – या डिजिटल मार्केटिंग प्रकारात जाहिराती अश्या प्रकारे प्रकाशित केल्या जातात की ग्राहकांना किंवा वाचकांना  सहसा लक्षात येत नाही की या जाहिरतो आहेत की मूळ लेख किंवा विडियो चा  भाग आहे
See also  प्रोडक्ट अणि सर्विस ( उत्पादन व सेवा) मधील फरक Difference between product and service in Marathi

उदाहरण – समजा आपण केसांची निगा कशी राखावी – हा लेख वाचत असाल तर त्या लेखा दरम्यान केसांची निगा बाबत  उत्पादन च्या जाहिराती अगदी चपखल व सराईतपणे ग्राहकांना दाखल्या जातात  की त्या मूळ महितीचा चा भाग वाटतात व त्या मुळे ग्राहक अश्या जाहिरातीकडे लगेच आकर्षित होतात.

Best Digital marketing courses available online -भारतात उपलब्ध असलेले उत्तम डिजिटल मार्केटिंग कोर्सेस

  • Google Digital Marketing Courses (मोफत )
  • Hub Spot Online Marketing Courses (मोफत )
  • Optinmonster Digital Marketing Training (मोफत )
  • SEMRUSH Academy (मोफत )
  • Simplilearn Digital Marketing Specialist (फी सहित )
  • Udemy Digital Marketing Course (फी सहित )

 

 

Dropshipping म्हणजे काय ? जाणून घ्या ८ महत्वाचे मुद्दे

1 thought on “Digital Marketing  म्हणजे काय? आणि 8 प्रकार. What is digital marketing and the 8 Types of Digital Marketing?”

Comments are closed.