घर खरेदी करताना घ्या काळजी – Home buying documents Marathi

आपलं स्वतःच घर असावं हे प्रत्येक मिडल क्लास कुटुंबातील व्यक्तीच स्वप्न असत.परन्तु वर्तमानात घर घेताना बरेच फसवणुकीचे प्रकार व्हायला लागलेत.तुम्ही मेहनत करता,मेहनतीच्या कमाई मधून काही रक्कम इन्व्हेस्ट करता आणि घर घेण्यासाठी पुरेसे पैसे जमले तर घर खरेदी करता.परन्तु काही ठिकाणी मेहनतीच्या पैशाने घर घेताना आपल्याला फ्रॉड लोकांचा सामना करावा लागेल.यासाठी आपण घर खरेदी करताना  पुरेपूर काळजी घेतली पाहिजे..

घर खरेदी करताना व्हेरिफिकेशन करणे गरजेचे आहे.- Home buying documents Marathi

  • घर खरेदी करताना त्या टाउनशिप ला बँका लोन देतात की नाही याची चौकशी करा;कारण त्या टाउनशिप चे क्लिअर टायटल आणि सर्च क्लिअर असेल तर बँका लोन देतात,सर्च क्लिअर नसेल आणि टायटल  क्लिअर नसेल बँका लोन देत नाहीत.
  • कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करताना त्या प्रॉपर्टी चे डॉक्युमेंट लिंक आहेत की नाही याची चौकशी करा.ती प्रॉपर्टी किती वेळा खरेदी केली आहे आणि किती वेळा विकली आहे याची चौकशी करा.तुम्हाला जो व्यक्ती घर देत आहे ,त्याचा आयडेंटिटी प्रूफ पहा.
  • वरील माहिती कलेक्ट केल्यानंतर सर्व डॉक्युमेंट लिंक होतात की नाही ते पहा.
  • तुम्ही कोणतेही प्रॉपर्टी घेत असाल तर त्या प्रॉपर्टी चा रेकॉर्ड पहा.समजा तुम्ही शेत जमीन खरेदी करत असाल तर त्या शेत जमिनीचे डॉक्युमेंट व्यवस्थित पहा.तुम्हाला ते डॉक्युमेंट राज्य सरकारच्या राजस्व विभागामार्फत मिळतात .
  • जर तुम्ही जमीन खरेदी करून तिथे कोणतेही दुकान टाकणार असला तर,जमीन घेण्यापूर्वी त्या जमिनीला रसिडेंटल परवानगी आहे की नाही हे चेक करा.
  • सर्वात महत्वाचे म्हणजे,तुम्ही ज्या कॉलनीत प्रॉपर्टी खरेदी करणार आहात ती कॉलनी वैध आहे की नाही हे पहा.

प्रॉपर्टी खरेदी करताना खालील गोष्टींची पाहणी करणे गरजेचे आहे :

घर घेणे सर्वांसाठी कठीण असते,खासकरून मिडल क्लास फॅमिली साठी.आपण जर मिडल क्लास फॅमिली मधून असलो तर घर घेण्यासाठी आपण आपल्या जीवनाची कमाई खर्च करतो.त्यामुळे घर घेताना आपण आपल्याला परवडणाऱ्या दरात आणि चांगले घर खरेदी केले पाहिजे.

  • टायटल डिड – प्रॉपर्टी खरेदी करताना टायटल डिड चेक करणे गरजेचे आहे;कारण टायटल डिड मुळे तुम्हाला समजते की तुम्ही जी प्रॉपर्टी खरेदी करत आहात ती प्रॉपर्टी विकणारा बिल्डर ची स्वतःची ती प्रॉपर्टी आहे की नाही .त्या प्रॉपर्टी वरती सरकारी कारवाई चालू आहे की नाही हे तुम्हाला टायटल डिड वरून समजेल.तुम्ही टायटल डिड ची चॉकशी करण्यासाठी वकिलाचा वापर करा,त्याचा तुम्हालाच फायदा होईल.
  • नो ओब्जर्वेशन सर्टिफिकेट (NOC) – तुम्हाला ही गोष्ट माहीत नसेल की,प्रोजेक्ट बनवण्यासाठी बिल्डर ला विविध विभागातून 19 LOC घ्यावी लागते.वेगवेगळ्या ठिकाणी ही संख्या कमी-जास्त असते.
  • अडथळा प्रमाणपत्र – ज्या प्रॉपर्टी वर सरकारी कार्यवाही चालू आहे,त्या प्रॉपर्टी ला खरेदी करण्यासाठी कोणीही इच्छुक नसणार.यामुळेच बिल्डर किंवा ब्रोकर ही माहिती आपल्यापासून लपवतात.म्हणून तुम्ही अडथळा सर्टिफिकेट चेक करणे गरजेचे आहे.अडथळा सर्टीफिकेट वरून तुम्हाला समजेल की,तुम्ही खरेदी करत असणारी जमीन सरकारी कार्यवाही मध्ये आहे की नाही ते.
  • लेआऊट प्लॅन – तुम्ही लेआऊट प्लॅन चेक करणे गरजेचे आहे.लेआऊट प्लॅन मुळे तुम्हाला ती प्रॉपर्टी संबंधित औथोरिटी द्वारा मान्य आहे की नाही ते समजते.
  • परचेस ऍग्रिमेंट – जमीन खरेदी करण्यापूर्वी ही गोष्ट जाणून घेणे महत्वाचे आहे की,बिल्डर ने तुमच्या सोबत केलेल्या डील मधील संपूर्ण गोष्टी परचेस ऍग्रिमेंट वरती आहेत की नाही. घर पूर्ण बांधून कधी होईल? पैसे किती व कधी दिले जातील, घराचे स्पेसिफिकेशन म्हणजे खोल्यांची रुंदी लांबी , मोकळी जागा , वॉश रूम ,किचन, बाल्कनी या बाबत माहिती. समजा बिल्डर किंवा ग्राहक दोन्हीपैकी एकाने निययातमांचा , ऍग्रिमेंट पालन नाही केलं तर त्यातून  उद्भवणारे वाद कसे निवडणार त्या बाबत माहिती. इत्यादी.
See also  PCS म्हणजे काय? PCS Information In Marathi

प्रॉपर्टी खरेदी करण्यापूर्वी खालील डॉक्युमेंट पाहणे देखील गरजेचे आहे.- Home buying documents Marathi

  • तुम्ही खरेदी केलेली प्रॉपर्टी सब-सजिस्टर ऑफिस मध्ये जाऊन रजिस्टर करायला हवी.
  • Extract सर्टिफिकेट – ह्या सर्टिफिकेट वरून खरेदी केलेली प्रॉपर्टी मूनसिपल पार्टीमध्ये रजिस्टर आहे की नाही ते समजते.नवीन प्रॉपर्टी च्या रजिस्ट्रेशन साठी हे डॉक्युमेंट महत्वाचे आहे.प्रॉपर्टी चा मालकी हक्क दुसऱ्या व्यक्ती ला ट्रान्सफर करायचा असेल, तेव्हाही हे डॉक्युमेंट लागते.याशिवायू होम लोण देण्यापूर्वी बँक तुम्हाला Extract सर्टिफिकेट मागते.
  • जनरल पावर ऑफ अटर्नि- आपला घर किंवा कोणत्या ही मालमत्ते च्या खरेदीविक्री करता , संपत्ती मालकाकडून  एक अधिकृत व्यक्ति नियमीत केली जाते.
  • अलोटमेंट लेटर – अलोटमेंट लेटर हे होम लोण घेण्यासाठी लागणाऱ्या महत्वाच्या डॉक्युमेंट्स पैकी एक डॉक्युमेंट आहे.हे डॉक्युमेंट अथोरिटी द्वारे दिले जाते.ह्या डॉक्युमेंट मध्ये ग्राहकाने बिल्डर ला किती पैसे दिले याची माहिती असते.
  • सेल ऍग्रिमेंट – सेल ऍग्रिमेंट मध्ये प्रॉपर्टी संबंधी सर्व अटी आणि नियम याची महितो असते.होम लोण खरेदी करण्यासाठी तुम्हाला सेल ऍग्रिमेंट ची मूळ प्रत दाखवावी लागते.
  • पजेशन लेटर – हे डॉक्युमेंट बिल्डर द्वारे दिले जाते.
  • प्रॉपर्टी टॅक्स ची कागदपत्रे – प्रॉपर्टी टॅक्स प्रॉपर्टी मालकाला द्यावाच लागतो.हे चेक करा की,तुमच्या अगोदर च्या प्रॉपर्टी मालकाने प्रॉपर्टी टॅक्स भरलाय की नाही.
  • कंपलिशन प्रमाणपत्र – हे डॉक्युमेंट होम लोण घेण्यासाठी फार महत्वाचे असते.
  • ओक्युपेन्सी सर्टिफिकेट – बिल्डिंग पूर्ण रित्या राहण्या योग्य आहे की नाही याचे डॉक्युमेंट सरकारडून बिल्डर ला दिले जाते

लोन प्रकार किती असतात