गुगल पे ॲप मधून आपला सिबिल स्कोअर कसा चेक करायचा?How to check cibil score through Google pay app in Marathi

गुगल पे ॲप माध्यमातून आपला सिबिल स्कोअर कसा चेक करायचा?How to check cibil score through Google pay app in Marathi

आपल्याला लोन प्राप्त करायचे असल्यास आपला सिबिल स्कोअर चांगला असणे आवश्यक आहे.कारण आपला सिबिल स्कोअर चांगला असला तरच आपल्याला कुठलीही बॅक वित्तीय संस्था लोन देत असते अन्यथा नाही.

म्हणुन आपण आपला सिबिल स्कोअर चेक करणे खुप आवश्यक असते.

आपल्या दैनंदिन जीवनात आपला सिबिल स्कोअर किती आहे हे चेक करायला आपण नेहमी वेगवेगळ्या प्ले स्टोअर मधील अॅप्लीकेशन वेबसाईट वगैरेचा वापर करत असतो.

पण आज आपण आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड असलेल्या पेमेंट ॲप गुगल पे ह्याच्या माध्यमातून फ्री मध्ये आपला सिबिल स्कोअर कसा चेक करायचा हे जाणुन घेणार आहोत.

यासाठी सर्वप्रथम आपणास आपल्या मोबाईल मधील गुगल पे ॲप ओपन करायचे आहे.

गुगल पे ॲप ओपन करून झाल्यावर स्क्रोल करून आपणास थोडे खाली आल्यावर check your cibil score for free असे नाव दिसुन येईल त्यावर क्लिक करायचे आहे.ज्यांच्या गुगल पे ॲप मध्ये हे आॅप्शन दिसुन येत नसेल त्यांनी लगेच गुगल पे ॲप अपडेट करून घ्यायचे आहे.यानंतर आपणास हे आॅप्शन दिसुन येईल.

Check your cibil score for free ह्या आॅप्शनवर क्लिक केल्यावर आपणास स्क्रीनवर असे विचारले जाईल

 1. A good CIBIL score gets you better interest rates on loans. Wonder if you will have a good score?
 2. आपण आपला सिबिल स्कोअर आधी चेक केला असेल अणि आपल्याला आपला सिबिल स्कोअर चांगला आहे असे माहीत असल्यास yes करायचे नाहीतर no करायचे आहे.किंवा not sure वर क्लिक करायचे आहे.
 3. यानंतर खाली दिलेल्या lets check ह्या बटणावर क्लिक करायचे आहे.
 4. सिबिल स्कोअर चेक करण्यासाठी आपल्याला आपली काही बेसिक डिटेल भरावी लागेल.
 5. इथे आपणास आपले First name आपले नाव अणि last name आपले आडनाव टाकायचे आहे
 6. यामध्ये आपणास आपले नाव आडनाव तसेच टाकायचे आहे जसे आपल्या पॅन कार्ड मध्ये दिले आहे.खाली दिलेल्या कंडिशनवर टिक करायचे आहे.
 7. यानंतर आपणास Continue ह्या खाली दिलेल्या बटणावर वर क्लिक करायचे आहे.
 8. यानंतर cibil score fetching असे नाव येईल म्हणजे आपला सिबिल स्कोअर शोधला जातो आहे असे नाव येईल.
 9. यानंतर पुन्हा एकदा आपणास आपला पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे त्याच्या खाली आपला ईमेल आयडी आपोआप येउन जाईल.
 10. यानंतर आपणास पुन्हा continue वर क्लिक करायचे आहे.
 11. यानंतर आपणास सिक्युरिटी साठी काही चार पाच प्रश्न विचारले जातील ज्यात सर्वप्रथम आपल्यासमोर काही नावांची यादी येईल अणि आपणास विचारले जाईल आपण याआधी खालील दिलेल्या पैकी कोणाकडे लोनसाठी अॅप्लाय केले आहे का असे विचारले जाईल
 12. होय असेल तर दिलेल्या पर्यायांमध्ये जे पर्याय असेल तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे नाहीतर none of above वर सिलेक्ट करून खाली दिलेल्या next button वर क्लिक करायचे आहे.
 13. यानंतर अजुन तीनदा आपणास असे प्रश्न विचारले जातील तिथे देखील none of above सिलेक्ट करायचे आहे.
 14. यानंतर शेवटी सिबिल स्कोअर फेच केला जाईल मग आपल्यासमोर आपला सिबिल स्कोअर येऊन जाईल.आपला सिबिल स्कोअर चांगला असेल तर आपणास लोन प्राप्त होऊ शकते.
 15. यानंतर आपणास Continue वर क्लिक करायचे आहे एक इंटरफेस येईल तिथे later वर क्लिक करायचे आहे.
 16. यानंतर आपल्यासमोर आपला credit report येईल यात आपण see full report वर क्लिक केल्यावर आपणास आपला सर्व सिबिल स्कोअर रिपोर्ट दिसुन येईल.
 17. अशा पद्धतीने आपण गुगल पे च्या माध्यमातून एकदम फ्री मध्ये आपला सिबिल स्कोअर चेक करू शकतात.
See also  इंशुरन्स,इंशुअर्ड अणि इंशुरर म्हणजे काय? What is insurance,insured,insurer and insurance premium