हनुमान जयंतीचे महत्त्व काय आहे? हनुमान जयंती का साजरा केली जाते? -Hanuman Jayanti.

हनुमान जयंतीचे महत्त्व काय आहे?हनुमान जयंती का साजरा केली जाते?

दरवर्षी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती ही साजरा केली जात असते.म्हणजेच ह्या दिवशी आपण हिंदु दैवत पवनपुत्र संकटमोचक हनुमानाचा जन्म दिवस साजरा करत असतो.

पवनपुत्र संकटमोचक हनुमान हे वानरराजा केसरी अणि अंजना या दोघांचे पुत्र होते.पवनपुत्र हनुमान हे श्रीरामाचे परमभक्त होते.

एक सच्चा भक्त कसा असावा अणि भक्ती कशी असावी हे हे अंजनीपुत्र पवनपुत्र हनुमान यांच्याकडुन शिकण्यास मिळते.

ईश्वर भक्तीचे एक अत्यंत उत्तम उदाहरण म्हणजे संकटमोचक महाबली हनुमान हे आहेत.

मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्।

वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतम् शरणं प्रपद्ये।।

२०२३ मध्ये हनुमान जयंती कधी आहे?

ह्या वर्षी २०२३ मध्ये ६ एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे.

हनुमान जयंती कशी साजरी केली जाते?

हनुमानाच्या जयंतीच्या दिवशी आपण सुर्योदयाच्या वेळेला सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे करून हनुमानाची विधिवत पद्धतीने पुजा करत असतो.या दिवशी हनुमात मंदीरात सुर्योदय होण्याआधी पडोषोपचार पुजेची सुरूवात केली जाते.

पुजा संपन्न झाल्यानंतर मंदिरांमध्ये मग भजन कीर्तन केले जाते.असे सांगितले जाते की हया दिवशी अंजनेरी येथे सुर्योदयाच्या वेळेला पवनपुत्र संकटमोचक हनुमानाचा जन्म झाला होता म्हणून सुर्योदयाच्या आधी त्यांची पुजा केली जात असते.

महाराष्ट्र राज्यात तसेच भारत देशातील इतर राज्यात देखील मंगळवार तसेच शनिवारी हनुमानाची पूजा करण्यात येते.पुजा करत असताना आपण मारूती रायाला नारळ,पाने,शेंदूर,तेल तसेच रूईची फुले इत्यादी अपर्ण करत असतात.

See also  Brain Rules 12 Principles - बुक समरी मराठीत - Brain Rules 12 Principles for Surviving and Thriving at Work, Home, and School

हनुमानाचे पुजन झाल्यावर मारूतीरायाला नारळ अर्पण करून नंतर ते फोडले जाते अणि मग सर्वांना ते नारळ फोडुन प्रसाद म्हणून दिले जाते.

हनुमान जयंती वर्षातुन किती वेळा साजरी करतात?

आपण हनुमानाची जयंती ही वर्षातुन दोनदा साजरा करत असतो एक चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी अणि दुसरी जयंती ही दिवाळीच्या एक दिवस अगोदर म्हणजे कार्तिक महिन्यामध्ये कृष्ण पक्ष चतुर्दशीच्या दिवशी मंगळवारच्या दिवशी साजरा केली जाते.

हनुमान जयंती वर्षातुन दोनदा साजरी का करतात?

चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी हनुमान यांचा जन्म झाला होता म्हणून ह्या दिवशी आपण पहिली हनुमान जयंती साजरी करत असतो.

अणि दुसरी जयंती ही पवनपुत्र हनुमान यांच्या विजय अभिनंदनाच्या उत्सवात महोत्सवासाठी साजरी केली जाते.
बालपणी हनुमान यांनी सुर्याला फळ समजुन खाण्यासाठी आकाशात झेप घेतली.

असे सांगितले जाते की ह्या दिवशी सुर्यावर राहु ह्या नक्षत्राचे ग्रहण असल्याने सुर्यदेव यांनी अंजनीपुत्र हनुमान यांना देखील राहु समजुन वार करत बेहोश केले.यानंतर सर्व देवी देवतांनी हनुमान यांना नवजीवन प्रदान केले होते.

याचसोबत श्रीराम यांच्या प्रती हनुमानाची प्रखर निष्ठा आणि भक्ती बघुन माता सितेने हनुमान यांना अमरत्वाचे वरदान प्रदान केले.हा दिवस नरक चतुर्दशीच्या तिथीचा होता.हा दिवस दिवाळीच्या एक दिवस आधी येत असतो.

महाबली केसरीपुत्र अंजनीपुत्र पवनपुत्र हनुमान हे भगवान महादेव यांचा अकरावा रूद्र अवतार होते.

आपण जर हनुमानाची पूजा केली तर भुत पिशाच्च कुठलीही बाधा तसेच संकट दुर होत असते.आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात अणि आपणास कुठलाही शनिदोष ग्रहदोष देखील लागत नाही.

हनुमान जयंती अणि हनुमान जन्मोत्सव मध्ये काय फरक आहे?

अभ्यासकांचे असे मत आहे की जयंती अणि जन्मोत्सव हे दोन वेगवेगळे शब्द आहेत.काही जणांना याचा अर्थ अद्याप ज्ञात नाही म्हणून ते हनुमान यांच्या प्रकट दिनास जयंती म्हणून साजरा करतात.

See also  रॅमन मॅगसेसे पुरस्कार विषयी माहिती -Ramon Magsaysay award information in Marathi

जयंती अणि जन्मोत्सव हे दोन्ही जरी जन्मदिवस साजरा करण्यासाठी वापरले जाणारे शब्द असले.तरी एक गोष्ट आपणास लक्षात घ्यायला हवी जयंती आपण अशा व्यक्तींची साजरी करत असतो जो ह्या जगात हयात नाहीये.

अणि पवनपुत्र हनुमान हे कलियुगात अवतरलेले एक जागृत दैवत होते.अणि हनुमान यांना श्रीराम यांनी अमरत्वाचे वरदान दिले असल्याचे देखील सांगितले जाते.म्हणुन अभ्यासकांचे मत आहे की जो जिवंत आहे अमरत्व प्राप्त झालेला आहे त्याची जयंती नव्हे तर जन्मोत्सव साजरा केला जायला हवा

Leave a Comment