बँकेकडुन पर्सनल लोन कसे घ्यावे ? How to get a personal loan from the bank in Marathi

Table of Contents

बँकेकडुन पर्सनल लोन कसे ?How to get a personal loan from the bank in Marathi

मित्रांनो कधी कधी असे होते की काही वैयक्तिक कारणास्तव आपणास अर्जट पैसे लागत असतात.
पण ऐनवेळी आपल्याकडे लगेच पैसे उपलब्ध नसतात.

अशा परिस्थितीत आपण एखाद्या मित्राकडुन,घरच्यांकडुन किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकाकडुन तात्पुरता उसने पैसे घेत असतो.

पण खुप प्रयत्न केल्यावरही मित्र,कुटुंब नातलग इत्यादी कुठुनही जेव्हा आपणास गरज असल्यावर पैसे मिळत नसतात.

तेव्हा आपण बँकेकडुन अडीअडचणीत तसेच एमरजन्सीमध्ये आपल्या जीवनातील कुठलीही आवश्यकता पुर्ण करण्यासाठी पर्सनल लोन घेत असतो.

आजच्या लेखात आपण बँकेकडुन पर्सनल लोन कसे घ्यायचे?पर्सनल लोन घेण्यासाठी पात्रतेच्या अटी काय असतात?आपल्याला लोन प्राप्त करण्यासाठी डाँक्युमेंट कोणकोणते लागत असतात?हे पाहणार आहोत.

पर्सनल लोन म्हणजे काय?personal loan meaning in Marathi

कुठलीही बँक तसेच वित्तीय संस्था लोकांचे पैसे जमा करण्याचे काम करण्यासोबत त्यांना आपल्यावतीने विविध प्रकारच्या सेवा सुविधा तसेच कर्ज देखील उपलब्ध करून देत असते.यातच पर्सनल लोनचा देखील समावेश होतो.

पर्सनल लोन घेण्यासाठी कुठलेही विशिष्ट कारण असावे लागत नही.आपण कुठल्याही वैयक्तिक कारणासाठी बँकेकडुन पर्सनल लोन घेऊ शकतो.

See also  Polycythemia म्हणजे काय?polycythemia information in Marathi

उदा,मुलांचे शिक्षण,मुलांचे लग्न,घराचे बांधकाम,दवाखान्याचा खर्च,घरातील आवश्यक वस्तुंची खरेदी इत्यादी
पर्सनल लोन प्राप्त करण्यासाठी डाँक्यूमेंट लागत असतात ?document required for getting personal loan in Marathi

पर्सनल लोन प्राप्त करण्यासाठी कोणते महत्वाचे डाँक्यूमेंट लागतात?document required for getting personal loan in Marathi

पर्सनल लोन प्राप्त करण्यासाठी आपल्याला पुढील महत्वाचे डाँक्युमेंट लागत असतात-

● दोन पासपोर्ट साईज फोटो

● काँन्टँक्ट नंबर,ईमेल आयडी

● इन्कमचे प्रमाण -मागील तीन महीन्याचे बँक स्टेटमेंट

● मागील तीन महिन्याची पेमेंट स्लीप

● ओळखीचे प्रमाण म्हणुन आधार कार्ड,ड्राईव्हिंग लायसन,पासपोर्ट,पँनकार्ड मतदान कार्ड इत्यादी

● निवास प्रमाणपत्र म्हणुन रहिवासी दाखला, आधार कार्ड,लाईटबिलची राशन कार्डची झेराँक्स

पर्सनल लोन मिळविण्यासाठी पात्रतेच्या अटी कोणत्या

पर्सनल लोन मिळविण्यासाठी पात्रतेच्या अटी कोणकोणत्या आहेत?

जेव्हा बँक आपल्याला पर्सनल लोन देते तेव्हा बँक लोन देण्याच्या अगोदर आपल्या सर्व महत्वाच्या प्रक्रिया पुर्ण करत असते.

ज्यात सर्वप्रथम पर्सनल लोन देताना बँकेचे मँनेजर आपले इन्कम चेक करत असतात.म्हणजे आपण महिन्याला किती पैसे कमवतो हे बघत असतात.

आपली इंमपलाँयमेंट हिस्ट्री चेक करत असतात आपण नोकरी करतो की व्यवसाय कोणती नोकरी व्यवसाय करतो हे बघत असतात.

मग आपल्याला घेतलेले पर्सनल लोन परत फेडता येईल की नाही याचे आपल्या आर्थिक परिस्थिती आपल्या रोजगार व्यवसाय अणि इन्कम स्टेटमेंटनुसार योग्यरीत्या आकलन करून झाल्यानंतर बँक आपले लोन अखेरीस मंजुर करत असते.

● पर्सनल लोन प्राप्त करण्यासाठी अर्जदार हा भारताचा नागरीक असावा लागतो.

● पर्सनल लोन घेत असलेल्या व्यक्तीचे वय 18 ते 60 च्या आत तसेच दरम्यान असायला हवे

● पर्सनल लोन घेण्यासाठी खासगी नोकरी करणारयांचे मासिक वेतन किमान १५ हजार असावे.

● अणि व्यवसाय करणारयांचे वार्षिक उत्पन्न किमान ५ लाख असणे आवश्यक आहे.अणि त्याचा व्यवसाय सुरू करून किमान दोन तीन वर्ष पुर्ण झालेले असावे.त्याच्याकडे त्याच्या व्यवसायाचे प्रमाण देणारे सर्टिफिकेट असावे.

● अर्जदाराला आपल्या नोकरी व्यवसायातील किमान एक दोन वर्षाचा अनुभव असायला हवा.त्याच्याकडे आपल्या रोजगाराचे प्रमाण देखील असायला हवे.

See also  UDID 2022 - युडी आयडी कार्ड म्हणजे काय?अर्ज प्रक्रिया नोंदणी व फायदे - Benefits of UDID card 2022 in Marathi

● आपला क्रेडिट स्कोर 750 पेक्षा अधिक असायला हवा.

बँकेकडुन आपण कोणत्या पदधतीने पर्सनल लोन घेऊ शकतो?

बँकेकडुन आपण कोणकोणत्या पदधतीने पर्सनल लोन घेऊ शकतो?

बँकेत आपण आँनलाईन तसेच आँफलाईन अशा दोघे पदधतीने पर्सनल लोनसाठी अँप्लाय करू शकतो.

बँकेकडुन आँफलाईन पदधतीने पर्सनल लोन संपुर्ण प्रक्रिया -offline process of getting personal loan in Marathi

● सर्वप्रथम आपल्याला ज्या बँकेकडुन आपणास पर्सनल लोन हवे आहे त्या बँकेच्या शाखेत जावा लागेल.

● पर्सनल लोन प्राप्त करण्यासाठी आपणास काय काय करावे लागेल?कोणकोणते डाँक्युमेंट लागतील लोन घेण्यासाठी पात्रतेच्या अटी काय आहे याबाबद आपणास बँक मँनेजरला विचारावे लागेल.

● मग बँकेचे मँनेजर आपली सर्व माहीती संग्रहीत करतील जसे की आपली नोकरी व्यवसाय काय आहे आपले मंथली इन्कम किती आहे?इत्यादी

● अणि जेव्हा त्यांना सर्व विचारपुस करून झाल्यावर खात्री होईल की आपण लोन घेण्यासाठी पात्र आहोत तेव्हा ते आपल्याला लोनसाठी अर्ज करायला सांगतात एक फाँर्म भरायला सांगतात.

● मग मँनेजरने सांगितलेला फाँम व्यवस्थित भरून झाल्यानंतर त्याला काही आवश्यक डाँक्युमेंट जोडावे लागतात.अणि मग शेवटी तो फाँम बँकेत जमा करायचा असतो.

यानंतर बँक फाँर्ममध्ये भरलेल्या आपल्या सर्व माहीतीची व्यवस्थित पडताळणी करते.जर आपण भरलेली सर्व माहीती योग्य बरोबर आणि अचुक असेल अणि आपण सर्व आवश्यक डाँक्युमेंट फाँमला जोडलेले असतील तर बँक आपले लोन लगेच मंजुर करत असते.अणि मग शेवटी बँक कर्जाची रक्कम आपल्या खात्यावर जमा करत असते.

अणि समजा आपण फाँममध्ये भरलेली माहीती चुकीची असेल किंवा आपण आवश्यक ते डाँक्युमेंट जोडलेले नसतील तर बँक आपले लोन नामंजुर देखील करू शकते.

बँकेकडुन आँनलाईन पदधतीने पर्सनल लोन संपुर्ण प्रक्रिया-online process of getting personal loan in Marathi

● सर्वप्रथम ज्या बँकेकडुन आपणास पर्सनल लोन हवे आहे ती बँक आँनलाईन पर्सनल लोन देते का याचा तपास करावा.

See also  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे काही प्रेरणादायी विचार -30 Inspirational thoughts of Babasaheb Ambedkar in Marathi

● जर आपल्याला पर्सनल लोन देणारी बँक आँनलाईन पदधतीने पर्सनल लोन साठी अर्ज स्वीकारत असेल तर आपण बँकेच्या आँफिशिअल वेबसाइटवर जायचे.अणि लोनसाठी आँनलाईन अँप्लाय करायचे.

उदा,जर आपणास आयसी आयसी आय बँकेकडुन आँनलाईन लोन हवे आहे लोनसाठी अर्ज करायचा आहे तर आपल्याला पुढील प्रक्रिया पार पाडावी लागेल –

● सर्वप्रथम आयसी आयसी आय बँकेच्या आ़ँफिशिअल वेबसाइट वर जायचे.

● आपल्यासमोर एक होम पेज ओपन होईल तिथे अँप्लाय आँनलाईन सेक्शन मध्ये जायचे अणि पर्सनल लोन वर क्लीक करायचे.

● यानंतर आपल्यासमोर अजून एक नवीन पेज ओपन होईल ज्यात वेगवेगळे लोनचे आँप्शन दिलेले असतील त्यात आपण पर्सनल लोनला सिलेक्ट करायचे.

● ज्यांचे आयसी आयसी आय बँकेत आधीपासुन अकाउंट आहे ते डेबिट कार्ड,क्रेडिट कार्ड,नेट बँकिंगचा वापर करू शकतात.अणि पुढे जाऊ शकतात.ज्यांचे आयसी आयसीआय बँकेत अकाऊंट नहीये ते स्कीप अँण्ड कंटिन्यु अँज गेस्ट हे आँप्शन निवडु शकतात.

● यानंतर आपल्याला विचारलेली सर्व माहीती व्यवस्थित भरून घ्यायची अणि आवश्यक ते डाँक्युमेंट देखील अपलोड करायचे.

यानंतर बँक फाँर्ममध्ये भरलेल्या आपल्या सर्व माहीतीची व्यवस्थित पडताळणी करते.जर आपण भरलेली सर्व माहीती योग्य बरोबर आणि अचुक असेल अणि आपण सर्व आवश्यक डाँक्युमेंट फाँमला जोडलेले असतील तर बँक आपले लोन लगेच मंजुर करत असते.अणि मग शेवटी बँक कर्जाची रक्कम आपल्या खात्यावर जमा करत असते.

अणि समजा आपण फाँममध्ये भरलेली माहीती चुकीची असेल किंवा आपण आवश्यक ते डाँक्युमेंट जोडलेले नसतील तर बँक आपले लोन नामंजुर देखील करू शकते.

पर्सनल लोन दवारे आपण किती कर्ज प्राप्त करू शकतो?

पर्सनल लोन दवारे आपण बँकेकडुन ५० हजार ते ३० लाखापर्यत पर्सनल लोन घेऊ शकतो.यात काही अशाही वित्तीय संस्था आहेत ज्या ५० लाखापर्यत पर्सनल लोन देतात.

आपण पर्सनल लोन का घ्यावे?याचे फायदे कोणकोणते असतात?benefits of personal loan in Marathi

● पर्सनल लोनसाठी अर्ज केल्यावर हे आपणास दोन तीन दिवसात मंजुर होऊन जात असते.

● पर्सनल लोनमध्ये मिळालेली रक्कम आपण कुठल्याही वैयक्तिक कारणासाठी वापरू शकतो.

● पर्सनल लोनसाठी गँरेंटर देखील लागत नसतो.

● पर्सनल लोन प्राप्त करण्यासाठी जास्त कागदपत्रांची आवश्यकता नसते.

● कुठलेही तारण न ठेवता पर्सनल लोन प्राप्त होते.

● पर्सनल लोन मध्ये आपल्याला किमान चाळीस लाखापर्यत लोन प्राप्त होते.

● घेतलेले पर्सनल लोन फेडण्यासाठी पाच वर्षाचा कालावधी दिला जातो.यात वाढ देखील केली जात असते.

● कर्जाची रक्कम त्वरीत आपल्या खात्यावर ट्रान्सफर केली जाते.

पर्सनल लोनवरील आकारले जाणारे व्याजदर -personal loan interest rate in Marathi

प्रत्येक बँकेमध्ये,वित्तीय संस्था मध्ये वेगवेगळया व्याजदराची आकारणी केली जाते.

यात आकारले जाणारे व्याजदर आपल्या क्रेडिट स्कोर,नोकरी व्यवसाय,इन्कम,कर्जाची रक्कम परतफेडीचा कालावधी यावर आधारलेले असते यासर्वानुसारच व्याज दर आकारले जात असते.