झोंबी व्हायरस विषयी माहीती – Zombie Virus Information In Marathi

झोंबी व्हायरस विषयी माहीती – Zombie Virus Information In Marathi

मित्रांनो काही दिवसांपुर्वीच न्युज चँनलमध्ये अशी बातमी आपणास ऐकायला तसेच वाचायला मिळाली की कोरोनापेक्षा अत्यंत भयंकर अशी एक महामारी अस्तित्वात आहे जी पसरण्याची शक्यता देखील शास्त्रज्ञांकडुन वर्तवण्यात आली आहे.ह्या महामारीचे नाव आहे झोंबी व्हायरस.

आजच्या लेखात आपण हा झोंबी व्हायरस नेमका काय आहे?हा शास्त्रज्ञांना कुठे आढळुन आला आहे?याचा मानवी जीवनाला कितपत धोका आहे?इत्यादी महत्वाच्या बाबींविषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

झोंबी व्हायरस काय आहे?

रशियाच्या शास्त्रज्ञांना सायबेरिया मधील परमासिस्ट ह्या बर्फामध्ये 48 हजार 500 वर्षे इतका जुना व्हायरस आढळुन आला आहे.

शास्त्रज्ञांनी असे सांगितले आहे की हवामानात दिवसेंदिवस होत असलेले बदल अणि वाढत्या ग्लोबल वाँर्मिंगमुळे येथील बर्फ अधिक जलदगतीने वितळतो आहे.

अणि जर हा बर्फ असाच वेगाने वितळत राहीला तर ह्या बर्फाच्या खाली जेवढेही व्हायरस दडलेले आहेत ते बाहेर येऊन वातावरणात हवेत पसरू शकतात.

हा व्हायरस इतका भयंकर आहे की याचा संसर्ग झाल्यास मनुष्य जीवीत हानी देखील होऊ शकते.असे होऊ नये यासाठी शास्त्रज्ञांकडुन ह्या व्हायरसचा सखोल पदधतीने अभ्यास केला जात आहे.

अणि शास्त्रज्ञांना ह्या व्हायरसच्या अभ्यासात अजुन काही बारा ते तेरा व्हायरस सापडले आहेत.झोंबी व्हायरस हा त्यातीलच एक व्हायरस आहे.

शास्त्रज्ञांना झोंबी व्हायरस कुठे आढळुन आला आहे?

शास्त्रज्ञांना हा झोंबी नावाचा व्हायरस रशियामध्ये आढळुन आला आहे.रशियामधल्या याकुतिया नावाच्या क्षेत्रात शास्त्रज्ञांना हा व्हायरस आढळुन आला आहे.जो विश्वातील सर्वात शितल प्रदेशांपैकी मानवी अधिवासांपैकी एक म्हणुन ओळखला जातो.

See also  हायपर ग्लायसेमिया म्हणजे काय?Hyperglycemia information in Marathi

झोंबी व्हायरसचा इतिहास पार्शव भुमी काय आहे?

झोंबी हा एक फार जुना व्हायरस आहे.हा व्हायरस साधारणत 48 हजार वर्ष इतका जुना आहे.रशिया मधील तलावात हा व्हायरस हजारो वर्षपुर्वी दाबुन टाकण्यात आला होता.

अणि ह्या तलावाच्या आजुबाजुचा सर्व परिसर बर्फाळ असल्याने कोणाला याच्यापासुन काही धोका देखील नव्हता.

पण हवामानात सातत्याने होत असलेले बदल अणि वाढती ग्लोबल वाँरमिंग ह्यामुळे हा बर्फ वितळु लागला आहे ज्याचे परिणाम स्वरूप हा व्हायरस पुन्हा हवेत वातावरणात पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.
अणि हा व्हायरस मानवी आरोग्यास घातक असल्याचे सांगितले जात आहे.

झोंबी व्हायरस विषयी शास्त्रज्ञांचे काय मत आहे?

झोंबी व्हायरस हा एक संसर्गजन्य व्हायरस आहे म्हणजे हा एक असा व्हायरस आहे जो एका व्यक्ती मार्फत दुसरया व्यक्तीला देखील जडु शकतो.हवेत वातावरणात पसरू शकतो.

अणि हा व्हायरस अत्यंत घातक जीवघेणा असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.

शास्त्रज्ञांकडून आतापर्यत विविध व्हायरसचे सँपल संग्रहित करण्यात आले आहेत.ज्यातील तीन ते चार व्हायरस हे 30 हजार वर्ष पेक्षा अधिक जुने आहे असे तपासात आढळुन आले आहे.

अणि यातील पँडाव्हायरस नावाचा व्हायरस हा 48 हजार वर्ष एवढा जुना आहे.जो रशियामधीलच एका यूकेची अलास नावाच्या सरोवराच्या तळामध्ये शास्त्रज्ञांना आढळुन आलेला आहे.

यूकेची अलास सरोवर परिसरात शास्त्रज्ञांना हा व्हायरस सायबेरियन लांडग्याच्या कातडीमध्ये देखील आढळला आहे.

शास्त्रज्ञ असे देखील म्हणता आहे की परमासिस्ट मधुन जर अशाच प्रकारे बर्फ वितळुन सुप्त व्हायरस बाहेर पडत राहीले तर भविष्यात कोरोनासारख्या अनेक महामारी साथीचे रोग ह्या व्हायरसमुळे पसरतील.