हायपर ग्लायसेमिया म्हणजे काय?Hyperglycemia information in Marathi

हायपर ग्लायसेमिया म्हणजे काय?Hyperglycemia information in Marathi

जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या रक्तातील साखरेचे प्रमाण प्रमाणापेक्षा अधिक वाढते तेव्हा त्याला हायपर ग्लायसेमिया असे म्हटले जाते.

यात व्यक्तीच्या रक्तातील साखर जास्त होते आणि हे साखरेचे प्रमाण २०० पेक्षा अधिक वर जात असते.

हे दोनशे पेक्षा अधिक वाढलेले साखरेचे प्रमाण आपल्या शरीरातील काही अवयवांना मानवत नाही ज्यात डोळे,किडनी,हदय, पायाच्या नसा इत्यादी अवयवांचा समावेश होतो.

त्यामुळे रक्तातील दोनशे पेक्षा अधिक वाढलेले साखरेचे प्रमाण नियंत्रित करणे खुप गरजेचे असते.

हायपर ग्लायसेमियाची लक्षणे कोणकोणती आहेत?

Hyperglycemia information in Marathi
Hyperglycemia information in Marathi

हायपर ग्लायसेमियाची काही प्रमुख लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत-

१)थकवा येणे तसेच अस्वस्थ वाटणे

२) वारंवार लघवी लागणे

३) वजन कमी होऊ लागणे

४) खुप भुक लागणे

५) खुप तहान लागणे

६) जखमा न भरणे

७) श्वास घ्यायला त्रास होणे

८) नजर कमजोर होणे

हायपर ग्लायसेमियाची इतर लक्षणे –

१)पोट दुखी

२) चक्कर येणे

३) मळमळ होणे

४) स्वभावात चिडचिडेपणा येणे

इत्यादी

हायपर ग्लायसेमिया झाल्यास काय करावे?

आपल्याला जर आपल्यामध्ये वरील दिलेली हायपर ग्लायसेमियाची लक्षणे दिसुन येत असतील तर आपण डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार स्वताच्या काही आवश्यक तपासण्या त्वरीत करून घ्यायला हव्यात.

यात आपणास रक्तातील साखर अणि ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन चेक करणे खुप आवश्यक असते.यात आपल्याला मागील तीन महिन्यात आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण किती वाढले त्याची सरासरी जाणुन घेता येते.

यानंतर डाॅक्टर आपणास जसा आहार घेण्यास सांगतील त्यानुसार आहारात जीवनशैलीत बदल करून आपला एक नवीन डाएट प्लॅन तयार करून घ्यायचा आहे.

नियमित व्यायाम करायचा आहे.अणि ताणतणाव डिप्रेशन चिंता यापासून दुर राहायचे आहे.अणि योग्य प्रमाणात पाणी प्यायला हवे.

See also  गोनिरिया आजाराची लक्षणे , त्यावरतीचे उपचार -Gonorrhea in Marathi -

हायपर ग्लायसेमिया कमी करण्यासाठी करावयाचा औषधोपचार –

हायपर ग्लायसेमिया कमी करण्यासाठी इंन्सुलिन गोळया तसेच इन्सुलिनचे इंजेक्शन घेतले जाते.

हायपर ग्लायसेमिया का होतो?हायपर ग्लायसेमिया होण्याची कारणे कोणकोणती आहेत?

जेव्हा आपण आपल्या शरीराची हालचाल तसेच शारीरिक व्यायाम खुप कमी प्रमाणात करत असतो किंवा शरीराची कुठलीही हालचाल व्यायाम करत नाही म्हणजेच शारीरिक हालचाली व्यायाम यात घट झाल्याने आपणास हायपर ग्लायसेमिया होतो.

याचसोबत आहारामध्ये गरजेपेक्षा जास्त प्रमाणात कार्बोहाइड्रेटचा समावेश करणे,

गरजेपेक्षा कमी प्रमाणात इन्सुलिन घेणे किंवा इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यायला विसरणे हे देखील हायपर ग्लायसेमिया होण्याचे प्रमुख कारण आहे.

इंन्सुलिन हे एक हार्मोन्स असते जे आपल्या रक्तामधील ग्लुकोजच्या प्रमाणाला नियंत्रण ठेवण्याचे काम करते.

शरीरात इंन्सुलिन कमी झाल्यास हायपर ग्लायसेमियाची समस्या निर्माण होत असते.कारण इंन्सुलिन शरीरात आवश्यक तेवढ्या प्रमाणात नसेल तर ग्लूकोज अणि साखर रक्तामध्ये व्यवस्थित विरघळत नसतात.ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक वाढत असते.

शारीरिक आणि मानसिक ताणतणाव,चिंता यामुळे देखील हायपर ग्लायसेमिया होतो.