आपल्याला रात्री झोप का येत नाही? – Why can’t we sleep ? Possible reasons and what to do

आपल्याला रात्री झोप का येत नाही? – Possible  Reasons and What To Do

 विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे आज आपली खुप प्रगती आणि विकास घडुन आला आहे.पण आज ह्याच विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा मर्यादेपेक्षा अधिक वापर करणे आपल्या आरोग्यासाठी घातक देखील ठरत आहे.

आज इंटरनेट आणि सोशल मिडियाचा अमर्याद वापर हा निद्रानाशाचे प्रमुख कारण ठरतो आहे.कारण आपण रात्री उशिरापर्यत सोशल मिडियावर आपल्या मित्र मैत्रीणींसोबत चँट करत बसत असतो.ज्याने आपण लवकर झोपत नसतो.आणि आपली झोप पुर्ण होत नसते.

आणि आरोग्य तज्ञांचे असे मत आहे की दिवसभर काम केल्यानंतर,थकल्यानंतर आपल्या शरीराला कमीत कमी सात ते आठ तासांची विश्रांती म्हणजेच झोप मिळायलाच हवी.

याबाबद आरोग्य तज्ञांचे असे मत आहे की सहा ते नऊ वर्षाच्या मुलामुलींनी कमीत कमी सात ते आठ तास तसेच जास्तीत जास्त अकरा तास झोप घेणे खुप आवश्यक आहे.

तरुण युवकांनी कमीत कमी सात ते आठ तास आणि जास्तीत जास्त दहा तास झोपणे फार गरजेचे आहे.पण तरूण युवकांनी हे देखील लक्षात ठेवायला हवे की अकरा तासापेक्षा अधिक वेळ झोपणे हे त्यांच्या आरोग्यासाठी घातक देखील ठरू शकते.

याचठिकाणी अठरा ते पासष्ठ ह्या वयोगटातील व्यक्तींनी कमीत कमी सात आणि जास्तीत जास्त नऊ तास झोप घेणे देखील महत्वाचे असल्याचे आरोग्य तज्ञ सांगतात.

आणि वयोवृदध व्यक्तींनी सात ते आठ घेणे देखील पुरेसे असते ज्या वयोवृदध व्यक्तींना सकाळी लवकर उठण्याची सवय असते त्यांच्यासाठी सहा तासाची झोप देखील खुप असते.

चला तर मग आता जाणुन घेऊया आपल्याला रात्री शांत झोप का लागत नाही.

 

आपल्याला रात्री झोप का येत नसते? – Why Can’t we Sleep?

 आपल्याला रात्री झोप न येण्याची पुढीलप्रमाणे अनेक कारणे असु शकतात :

See also  आरोग्यसाठी चांगले असणारे 6 तेल – Best Cooking Oils Marathi

 

1)दुपारी झोप काढणे  :

2) रात्री झोपताना प्रमाणापेक्षा अधिक जेवण करणे  :

3) विडी,सिगारेट तसेच दारू पिणे  :

4) चहा काँफीचे अधिक सेवण  :

5) रात्री जास्त पाणी पिणे  :

6) झोप लागण्याअगोदरच अंथरूणात जाऊन पडणे  :

7) झोपायच्या अगोदर व्यायाम करणे  :

8) झोप येण्यासाठी झोपेच्या गोळया खाणे  :

9) खुप विचार आणि चिंता करणे  :

10) झोपण्याची चुकीची पदधत  :

11) रात्री उशिरापर्यत मोबाईलवर चँट करणे,टिव्ही बघत बसणे  :

 

 

1)दुपारी झोप काढणे  :

आपल्यातील खुप जणांना दुपारी जेवण झाल्यावर एक डुलकी घेण्याची म्हणजेच दुपारी थोड झोपण्याची सवय असते.

कारण असे म्हणतात की दुपारी थोड झोपल्याने आराम केल्याने आपला थकवा कमी होतो.पण जे व्यक्ती दुपारी झोपत असतात.त्यांना रात्री लवकर झोप लागत नसते.आणि मग रात्री उशिरा झोपल्याने आणि दुसरे दिवशी सकाळी लवकर उठुन गेल्याने आपला चेहरा निस्तेज तसेच निरूत्साही देखील दिसत असतो.

 

2) रात्री झोपताना प्रमाणापेक्षा अधिक जेवण करणे:

असे म्हटले जाते की आपल्याला जर आपले आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर त्यासाठी आपण सकाळी भरपेट नाश्ता करायला हवा.दुपारी मध्यम प्रमाणात जेवण करायला हवे.आणि रात्री खुपच कमी जेवण करायला हवे.

आणि सगळयात महत्वाचे म्हणजे रात्री जेवणानंतर लगेच झोपु नये जेवणानंतर थोडा फेरफटका मारावा याने आपले अन्न व्यवस्थित जिरते.

साधारणत आपण रात्री जेवण झाल्यानंतर लगेच न झोपता जेवण झाल्यावर दोन ते तीन तासांनंतर आपण झोपायला हवे.

3)विडी,सिगारेट तसेच दारू पिणे  :

खुप जण असे म्हणतात की रात्री दारू पिल्यानंतर आपल्याला शांत झोप लागते.पण रात्री झोपण्यापुर्वी दारू पिल्याने जी झोप लागते ती नैसर्गिक झोप नसते.त्यामुळे आपल्याला रात्री अपरात्री सतत जाग येत असते.

तसेच सिगारेटमध्ये निकोटीन नावाचा घटक असतो ज्याचा आपल्या झोपेवर विपरीत परिणाम होत असतो.

4) चहा काँफीचे अधिक सेवण  :

See also  ट्रोपोनिन टी टेस्ट म्हणजे काय? ट्रोपोनिन टी टेस्ट का केली जाते? - What is the troponin T test for?

 चहा आणि काँफीमध्ये कँफिन नावाचा घटक समाविष्ट असतो जो आपल्या झोपेसाठी खुप घातक असतो.रात्री जर आपण चहा तसेच काँफीचे सेवण तर याने आपली डोळयावरची झोप उडत असते.

तसेच रात्री वारंवार लघवीला जाण्याची वेळ देखील येत असते.ज्याने आपली रात्री पुन्हा पुन्हा झोपमोड होत असते.

 

5) रात्री जास्त पाणी पिणे :

रात्री झोपण्याअगोदर जर आपण खुप जास्त पाणी पिले तर आपल्याला रात्री अपरात्री लघवीला जाण्यासाठी उठावे लागत असते.ज्याने आपली वारंवार झोपमोड होत असते.

6) झोप लागण्याअगोदरच अंथरूणात जाऊन पडणे :

जे व्यक्ती झोप लागण्याअगोदरच अंथरूणात जाऊन लोळत असतात अशा व्यक्तींना निद्रानाशाची समस्या खुप अधिक प्रमाणात जाणवत असते.

कारण झोप येण्याच्या अगोदर अंथरुणात जाऊन पडत असताना आपल्या मेंदुचे कार्य करणे हे सुरूच असते.ज्यामुळे आपली रात्री झोप पुर्ण होत नसते.आपली अर्धवट झोप होत असते.

 

म्हणुन आपण आपला मेंदु पुर्णपणे थकल्यावर आणि झोप येऊ लागल्यावरच अंथरूणात जाऊन झोपायला जावे.

 

7) झोपायच्या अगोदर व्यायाम करणे  :

खरे पाहायला गेले तर आपण सकाळी उठल्यावर रोज व्यायाम करायला हवा.पण दिवसभराच्या कामात, वणवणीत,धावपळीत आपल्याला दिवसभरात व्यायाम करायला वेळच मिळत नसतो.

म्हणुन आपल्यातील खुप जण संध्याकाळी किंवा रात्री व्यायाम करीत असतात.ज्याने आपल्या शरीराच्या चलनात वाढ होते आणि आपल्याला निद्रानाशाची समस्या देखील उदभवत असते.

म्हणुन आपण झोपायच्या पाच ते सहा तास अगोदर व्यायाम करायला हवा.

 

8) झोप येण्यासाठी झोपेच्या गोळया खाणे  :

खुप जण असे देखील असतात ज्यांना रात्री झोप लागत नाही म्हणुन ते रात्री शांत झोप येण्यासाठी झोपेच्या गोळया खात असतात.ज्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतो.

कारण झोपेच्या गोळया खालल्याने आपल्याला नँचरल पदधतीने झोप येणे बंद होत असते.प्रत्येक वेळी झोपेसाठी आपल्याला गोळया खाव्या लागत असतात.आणि ह्या गोळयांचे अतिसेवण आपल्या आरोग्यासाठी खुप घातक देखील ठरत असते.

See also  नोरोव्हायरस गॅस्ट्रोएन्टेरिटिस व्हायरस काय आहे - Norovirus Symptoms | Norovirus spreading in 2023

 

9) खुप विचार आणि चिंता करणे :

जेव्हा आपल्या डोक्यात खुप विचार चालू असतात आपण रात्री झोपण्याच्या वेळी खुप चिंतेत तसेच तणावात असतो तेव्हा आपल्याला शांतपणे झोप लागत नसते.कारण डिप्रेशन मुळे डोक्यात चालत असलेल्या विचार चक्रामुळे आपल्याला अजिबात झोप लागत नसते.

10) झोपण्याची चुकीची पदधत  :

खुप जणांना पोटावर तसेच पोटात पाय घालुन झोपण्याची सवय असते.याने आपल्या लिगँमेंटसवर ताण पडत असतो आणि आपली झोप उडत असते.

11) रात्री उशिरापर्यत मोबाईलवर चँट करणे,टिव्ही बघत बसणे  :

आपण रात्री झोप येत असताना देखील जांभळया देत देत रात्री उशिरापर्यत मित्र मैत्रीणींसोबत गर्लफ्रेंड बाँयफ्रेंडसोबत मोबाईलवर चँट करत बसतो.किंवा टिव्ही पाहत असतो ज्याने आपले झोपेचे रोजचे चक्र बिघडत असते.आणि चँट करून झाल्यावर आपण कितीही बळजबरी झोपण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला झोप येत नसते.

 

रात्री झोप यावी यासाठी आपण काय उपाय करायला हवेत? Can’t sleep possible  Reasons and What To Do ?

 रात्री आपल्याला शांत झोप यावी यासाठी आपण पुढील उपाय करू शकतो:

 

  • दुपारी झोपणे आपण शक्यतो बंद करायला हवे कारण याने आपल्या झोपेवर विपरीत परिणाम होत असतो.
  • रात्री झोपताना प्रमाणापेक्षा अधिक जेवण करू नये कमी प्रमाणात जेवण करावे कारण याने आपल्याला पचनाची,निद्रानाशाची समस्या उदभवू शकते.
  • रात्री झोपण्याअगोदर विडी सिगारेट दारू याचे सेवण करणे बंद करायला हवे.आणि शक्य असेल तर अशी वाईट व्यसने करूच नये कारण याने आपल्या आरोग्याचे फक्त नुकसान होत असते.
  • रात्री झोपण्याच्या अगोदर चहा तसेच काँफीचे सेवण करू नये.
  • रात्री झोपण्यापुर्वी जास्त पाणी पिऊ नये.
  • झोप लागण्याच्या अगोदरच अंथरूणात जाऊन पडु नये.
  • झोपण्याच्या अगोदर व्यायाम करू नये.
  • झोप येण्यासाठी सतत झोपेच्या गोळयांचे सेवण करू नये.
  • रात्री झोपत असताना मनात आणि डोक्यात कसलेही विचार,चिंता,तणाव ठेवू नये.
  • पोटावर तसेच पोटात पाय घालुन झोपु नये.सरळ झोपायला हवे.
  • रात्री उशिरापर्यत मोबाईलवर चँट करत बसु नये तसेच टिव्ही बघत बसु नये आणि रोज रात्री लवकर झोपण्याची सवय आपण पाडायला हवी.

मनाची एकाग्रता  – आनंदी जीवन आणि यशाची गुरुकिल्ली