मंकीपॉक्स आजार – प्रमुख लक्षणे व उपचार – Monkey pox information in Marathi

मंकी पॉक्स आजाराविषयी माहीती – Monkey pox information in Marathi

गेल्या दोन तीन वर्षापासुन आपला देश कोरोनाच्या जाळयात अडकलेला होता अद्यापही त्यातुन पुर्णपणे आपली सुटका झालेली नाहीये त्यातच एक नवीन आजाराने धुमाकुळ घालण्यास सुरूवात केली आहे.ज्याचे नाव मंकी पाँक्स असे आहे.

अहवालानुसार मे महिन्यामध्ये मंकी पाँक्स ह्या आजाराचे पहिले प्रकरण समोर आले होते.

नायजेरिया येथील एक व्यक्ती जेव्हा प्रवास करून परतला तेव्हा त्यास ह्या विषाणुची लागण झाल्याचे आढळुन आले होते.

युके मधील आरोग्य संरक्षण एजन्सीने ह्या आजाराबाबत असे सांगितले आहे की हा आजार एक व्हायरल इन्फेक्शनसारखा आहे.जो सहजासहजी पसरत नसतो.ज्या प्राण्याला याचा संसर्ग झाला आहे त्याच्यामार्फत हा मानवामध्ये पसरत असतो.

आपल्याला ह्या आजाराची लागण होऊ नये यासाठी आपण सतर्क असणे आवश्यक आहे.याचसाठी सुरक्षा आणि सतर्कता म्हणुन आजच्या लेखात आपण ह्या मंकी पाँक्स आजाराविषयी सांगण्यात आलेली काही बेसिक माहीती जाणुन घेणार आहोत.

मंकी पॉक्स म्हणजे काय?

मंकी पाँक्स हा एक विषाणुच्या संसर्गातुन पसरणारा सामान्य आजार आहे.हा रोग याचा संसर्ग झालेल्या प्राण्यांमार्फत मानवामध्ये पसरतो.याला झुनोसिस असे देखील म्हटले जाते.

ज्या व्यक्तीला याचे संक्रमण झालेले असते अशा व्यक्तीत याच्या फ्लूची लक्षणे आढळुन येत असतात.

आणि समजा काही दिशांतर आपणास बरे वाटु लागले नाही आणि स्थिती खुपच जास्त बिघडली तर अशा परिस्थितीमध्ये ह्या आजाराचे संक्रमण झालेल्या रूग्णाला न्युमोनिया हा आजार होण्याची शक्यता देखील असते.हा आजार झाला की आपल्या चेहरा तसेच संपुर्ण शरीरावर पुळया येतात.

मंकी पाँक्स ह्या आजाराची लक्षणे कोणकोणती आहेत?

मंकी पाँक्स ह्या आजाराची काही प्रमुख सुरुवातीला आढळून येणारी लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत-

1)अंगात ताप येणे

2) डोके दुखणे

3) स्नायुंमध्ये दुखु लागणे

4) थंडी वाजणे

5) थकवा येऊ लागणे

5) कंबर दुखु लागणे

6) पाठ दुखु लागणे

7) संपुर्ण शरीरावर कांजिण्यासारखा पुळया येऊ लागणे

इत्यादी काही प्रमुख लक्षणे ह्या आजाराची आहेत.

मंकी पाँक्स हा आजार कसा पसरतो?

मंकी पाँक्स हा विषाणुच्या संसर्गातुन पसरत असलेला आजार आहे.जो उंदीर,खार अशा इत्यादी प्राण्यांमधून मानवाला जडतो आणि ह्या आजाराचे संक्रमण झालेल्या व्यक्तीमार्फत हा आजार दुसरया व्यक्तीला देखील जडू शकतो.याचसोबत हा आजार दुषित वस्तुंमार्फत देखील पसरत असतो.

मंकी पाँक्सचे विषाणु असलेल्या प्राण्याने जर आपणास चावले,शरीरावर ओरखडले किंवा प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षरीत्या जरी आपण त्याला झालेल्या एखाद्या जखमेच्या संपर्कात आलो तरी हा आजार आपणास जडत असतो.

हा आजार आपल्या शरीरात जखमेचा संपर्क,डोळे,कान,नाक इत्यादीमार्फत पसरत असतो.

मंकी पाँक्स ह्या आजारावर आपण काय उपचार करू शकतो?

सध्या ह्या आजारावर कुठलाही ठोस उपचार उपलब्ध झालेला नाही.पण ह्या आजारावर आळा घालायला व्हीआयजी,स्माँल पाँक्स व्हँक्क्सिन तसेच अँटीव्हायरल यांचा वापर करण्यात येऊ शकतो.

जर आपणास ह्या आजारापासुन आपला बचाव करायचा असेल तर आपणास ह्या आजाराविषयी सतर्कता जागरूकता पाळावी लागणार आहे.

मंकी पाँक्स ह्या आजारापासुन स्वताचा बचाव कसा करायचा?

मंकी पाँक्स ह्या आजारापासुन स्वताचा बचाव करण्यासाठी आपण पुढील काळजी घ्यायला हवी-

1)ज्या प्राण्यांमार्फत हा विषाणु मानवामध्ये पसरत असतो अशा प्राण्यांच्या संपर्कात येणे टाळावे.

2) अशी जनावरे प्राणी जी आजारी आहेत त्यांच्या संपर्कात जाणे टाळावे.

3) ज्या व्यक्तीला ह्या आजाराचे संक्रमण झाले आहे त्याच्यापासुन सुरक्षित अंतर ठेवावे.

4) बाहेरून आल्यावर कोठे घाणीला हात लागल्यास पहिले हात पाय स्वच्छ धुवावेत.

5) बाहेर जाताना तोंडाला मास्क लावणे कारण हा आजार हवेतुन देखील पसरत असतो.

मंकी पाँक्स विषयी वारंवार विचारले जाणारे काही महत्वाचे प्रश्न –

1)मंकी पाँक्स ह्या आजाराचे नाव मंकीपाँक्स कसे पडले?

मंकी पाँक्स हा आजार सगळयात पहिले माकडांमधुन पसरायला सुरूवात झाली होती म्हणुन ह्या आजाराला मंकीपाँक्स असे नाव पडले.

2)आपल्याला मंकी पाँक्स झाला आहे की कांजिण्य हे कसे ओळखायचे?

मंकी पाँक्सची लागण झाल्यानंतर आपल्या संपुर्ण शरीरावर पुळया आणि डाग येऊ लागतात ज्याला आपण कधीकधी कांजिण्या असे देखील समजत असतो.

पण यादोघांमध्ये फरक असतो मंकीपाँक्स झाल्यावर आपल्या शरीराला जे फोड येत असतात ते छिद्र तसेच जखम बनु लागतात.आणि कांजिणे झाल्यावर असा कुठलाही प्रकार होत नसतो.

3)मंकी पाँक्स ह्या आजारापासुन कोणाला कमी धोका संभवतो?

मंकी पाँक्सचे जे विषाणु असतात ते कांजिण्य होण्यास कारणीभुत ठरणारया विषाणुंशी निगडीत असतात म्हणुन असे म्हटले जाते की कांजिण्याची लस घेतल्यावर आपणास ह्या आजाराची लागण होत नसते.

आणि असे देखील म्हटले जाते की ज्यांना कांजिण्य झाले आहे त्यांना मंकीपाँक्सची लागण होण्याचा धोका खुप कमी असतो.

4)मंकी पाँक्स हा लैंगिक संबंधातुन पसरणारा आजार आहे का?

नाही.वल्ड हेल्थ असोसिएशनचे अँन्डी सिले यांनी असे सांगितले आहे की आम्ही हा आजार समलैंगिक,उभयलिंगी,अशा सर्व गटातील इतर गटाशी लैंगिक संबंध ठेवत असलेल्या लोकांमार्फत जडतो का याचे निरीक्षण केले आहे.

ज्यात असे आढळुन आले की हा आजार समलैंगिक संबंधातुन पसरणारा आजार नाहीये.

5) मंकी पाँक्स ह्या आजाराचे रूग्ण आतापर्यत कोणकोणत्या देशात आढळुन आले आहेत?

मंकी पाँक्स ह्या आजाराचे रूग्ण आतापर्यत आँस्ट्रेलिया,स्पेन,अमेरिका,ब्रिटन,फ्रान्स,कँनडा इत्यादी देशांमध्ये आढळुन आले आहेत.

6) मंकी पाँक्स हा आजार सगळयात पहिले कधी सापडला होता?

मंकी पाँक्स हा आजार सगळयात पहिले 1958 साली सापडला होता.

Disclaimers :

(हा लेख फक्त आपणास मंकी पाँक्सविषयी बेसिक माहीती देण्यासाठी आहे.म्हणुन कुठलेही औषधोपचार करण्याआधी याबाबत आपण तज्ञ डाँक्टरांचा सल्ला नक्की घ्यायला हवा.)

 

रामसे हंट सिंड्रोम विषयी माहीती – Ramsay hunt syndrome information in Marathi

 

रामसे हंट सिंड्रोम विषयी माहीती – Ramsay hunt syndrome information in Marathi

Leave a Comment