स्तनांच्या कर्करोगाची लक्षणे- Breast Cancer Symptoms In Marathi
आज भारतातील महिला वर्गामध्ये स्थनाच्या कर्करोगाचे प्रमाण फार अधिक प्रमाणात वाढताना आपणास दिसुन येत आहे.
कर्करोगतज्ञांनी दिलेल्या एका अहवालानुसार आज भारतात वाढत असलेल्या कर्करोगाच्या प्रमाणात किमान 35 टक्के प्रमाण हे स्तनांच्या कर्करोगाचे आहे.
खासकरून ज्या महिला 35 ते 40 वयोगटातल्या आहेत स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण फार अधिक पाहायला मिळते.
2017-2018 मध्ये एक सर्वे करण्यात आला होता ज्यात हे समोर आले होते की सुमारे एक लाख महिलांमध्ये 25 टक्के महिला स्थनाच्या कर्करोगाने ग्रस्त आहेत.
हा एक अत्यंत गंभीर स्वरुपाचा आजार मानला जातो.पण आपण जर वेळेत ह्या आजारावर योग्य ते औषधोपचार केले तर आपण ह्या आजारापासुन मुक्त होऊ शकतात.
पण कुठल्याही आजारावर उपचार करण्याच्या आधी त्या आजाराची प्रमुख लक्षणे कोणकोणती आहेत हे आपणास माहीत असणे फार गरजेचे आहे.
तरच मग आपण त्या आजाराची लक्षणे जाणुन घेऊन त्यानुसार त्यावर योग्य तो उपचार करू शकतो.त्याचे योग्य ते निदान करू शकतो.
आणि जर आपण वेळ असताच या आजारावर उपचार केले तर आपल्याला भविष्यात या आजाराचे निदान करण्यासाठी भरमसाठ खर्च देखील करावा लागत नाही आपले पैसे वाचत असतात.
चला तर मग अधिक वेळ वाया न घालविता जाणुन घेऊया स्तनांच्या कर्करोगाची लक्षणे किती आहेत आणि ती कोणकोणती आहेत?
स्तनांच्या कर्करोगाची लक्षणे किती आणि कोणकोणती आहेत?-Symptoms Of Breast Cancer In Marathi
स्तनांच्या कर्करोगाची काही सात प्रमुख लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत-
1)स्तनांच्या आकारात बदल होणे-
2) स्तनांग्र जाड होताना दिसुन येणे-
3) स्तनांग्रातुन न दाबता स्राव होऊ लागणे-
4) पोट फुगु लागणे :
5) काखेत सुज तसेच गाठ तयार होणे-
6) स्तनांमध्ये दुखणे –
7) स्तनांचा रंग बदलणे –
1)स्तनांच्या आकारात बदल होणे-
जर आपल्या दोघे स्थनांपैकी एका स्तनांनमध्ये गाठ झालेली असेल तर जो स्थन बाधित आहे त्याच्या आकारात आणि आकारमानात अनेक लक्षणीय बदल घडताना आपणास दिसुन येत असतात.
जसे की एक स्थन ओघळणे एक स्थन दुसरया स्थनापेक्षा अधिक मोठा होणे,स्थनाच्या कातडीवर सुरकुत्या तयार होणे,स्तनांनाफुगीरपणा येऊ लागणे
इत्यादी.
2) स्तनांग्र जाड होताना दिसुन येणे-
जर आपण आपल्या स्तननियमित स्वपरीक्षण करत असाल तर आपणास असे दिसुन येईल की आपल्या दोघे स्तनांग्रांपैकी एक स्थनाग्र हे नेहमीपेक्षा अधिक जाड दिसते आहे.
3) स्थनाग्रातुन न दाबता स्राव होऊ लागणे-
स्तनांग्रातुन स्राव होणे हे देखील स्तनांच्या कर्करोगाचे एक प्रमुख लक्षण आहे.
जर आपल्या स्तनांग्रांना न दाबता देखील त्यातुन स्राव होताना आपणास दिसुन येत असेल तर समजुन जावे की आपणास स्थनांचा कर्करोग झाला आहे.अशावेळी आपण त्वरीत तज्ञ डाँक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
पण काही कंडिशनमध्ये स्तनांग्रातुन स्त्राव होण्याची इतरही कारणे असु शकतात.ज्यात काळजी करण्यासारखी कोणतीही विशेष बाब नसते.
4) पोट फुगु लागणे :
जर आपले पोट सतत फुगलेले दिसत असेल तर आपणास कर्करोग झालेला असु शकतो.
काही इतर कंडिशनमध्ये पोट फुगणे ही समस्या महिलांना नेहमी जाणवत असते.म्हणुन पोट फुगण्याचे कारण नेमके काय आहे हे जाणुन घेण्यासाठी आपण त्वरीत आपल्या डाँक्टरांचा सल्ला घेणे फार आवश्यक असते.
5) काखेत सुज तसेच गाठ तयार होणे –
ज्या महिलांना स्तनांचा कँन्सर झाला असेल त्यांच्या काखेमध्ये(Underarm) गाठी तयार होत असतात.ही गाठ कडक असते.ह्या गाठी स्तनांच्या कँन्सरचे प्रमुख लक्षण मानल्या जातात.कारण स्तनांच्या नसा ह्या काखेशी कनेक्टेड असतात.
6) स्तनांमध्ये दुखणे –
स्थनांमध्ये सतत दूखणे,वेदना होणे हे देखील स्तनांच्या कँन्सरचे एक प्रमुख लक्षण मानले जाते.जर आपणास हे लक्षण दिसुन येत असेल तर अशावेळी आपण त्वरीत डाँक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
7) स्तनांचा रंग बदलणे –
जर आपल्या स्थनांवरील त्वचेचा रंग बदलला असेल आणि तो लालसर झाला असेल तर आपणास स्थनांचा कर्करोग असण्याची दाट शक्यता असते.
म्हणुन अशा वेळी आपण त्वरीत तज्ञ डाँक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
स्तनांच्या कर्करोगाची काही इतर लक्षणे –
● आतील बाजुस दाबले ओढले जाणे
● स्तनांवर छिद्र पडणे
● स्तनांमधुन रक्त वाहणे
● स्तनांमधील रक्तवाहिनी स्पष्टपणे दिसुन येणे
● स्तनांग्राच्या आसपासची कातडी सोलली जाणे
● वेदनारहित गाठ तयार होणे (यात स्त्रियांना स्थनांवर गाठ झालेली असते पण ह्या गाठीमुळे कुठलीही वेदना जाणवत नसते)
● स्तन घटट होणे
सूचना- हा लेख वाचकांना ब्रेस्ट कॅन्सर बद्दल किमान, बेसिक माहिती असावी हा असून , या संवेदनशील विषयावर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि चर्चा करन आवश्यक.