चालु घडामोडी मराठी – 14 मे 2022 Current affairs in Marathi

चालु आणि ताज्या घडामोडी – Current affair in Marathi

1) इलाँन मस्क – टविटर खरेदी करार  तात्पुरता स्थगित-

टेस्ला कंपनीचे ओनर यांनी काही काही दिवसापुर्वीच टविटर खरेदी करत असल्याचे जाहीर केले होते.पण आता इलाँन मस्क यांनी टविटर खरेदी करण्याचा करार तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

● हा निर्णय घेण्यामागचे कारण आहे टविटरवरील फेक तसेच बनावट अकाऊंट ज्यांची सविस्तर तपशीरवार माहीती टविटरने अजुनही इलाँन मस्क यांना दिलेली नाहीये.

2) नीट तसेच पीजी परीक्षा पुढे ढकलण्याच्या याचिकेस सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले-

नीट तसेच पीजीच्या परिक्षांची तारीख पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका काही मेडिकल स्टुडंटकडुन सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.पण शुक्रवारी ही याचिका सर्वोच्च न्यायालयाकडुन फेटाळुन लावण्यात आली आहे.

● ही याचिका फेटाळण्याचे कारण सांगताना न्यायायालयाने आपले असे मत प्रतिपादीत केले आहे की जर परिक्षा आयोजित करण्यात विलंब करण्यात आला तर याने निवासी डाँक्टरांच्या संख्येत कमी होऊ शकते.

● आपल्या परिक्षा पुढे ढकलल्या जाव्यात या मागणीची पुर्तता केली जावी यासाठी अनेक विदयार्थ्यांनी आंदोलने देखील केली आहेत.

3) भारतीय नेमबाजांनी कनिष्ठ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत तब्बल चार सुवर्णपदके-

● भारतीय नेमबाजांनी कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेत आपल्या दमदार कामगिरीचे प्रदर्शन सुरू ठेवत शुक्रवारी आणखी चार सुवर्णपदके पटकावली आहेत.

4) जी -७ च्या परराष्टमंत्रीय परिषदेस जर्मनीमध्ये आरंभ-

12 मे गुरूवारपासुन उत्तर जर्मनी येथे जी-७ देशांच्या परराष्टमंत्रीय परिषदेस आरंभ झालेला आहे.आणि ही परिषद गुरूवारपासुन दोन दिवस म्हणजेच 14 मे पर्यत चालणार आहे.

● ह्या परिषदेत काही महत्वाच्या विषयांवर विचारविनिमय केला जाणार आहे ज्यात युक्रेनमधील वाँर,अन्नसुरक्षेचा प्रश्न तसेच चीन सोबत असलेले संबंध,इत्यादी महत्वाच्या विषयांवर चर्चा केली जाणार आहे.

5) उत्तर प्रदेश येथील मदरसा मध्ये – राष्टगीत अनिवार्य-

See also  इलाॅन मस्कने सर्व व्हेरीफाईड टविटर अकाऊंट वरून ब्लु टिक का काढले ? कारण काय ? why Twitter remove blue tick

गुरूवारी 12 मे रोजी उत्तर प्रदेश राज्यात असलेल्या सर्व मदरशांमध्ये राष्टगीत अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

● 24 मार्चला शिक्षण मंडळाकडुन भरविण्यात आलेल्या शैक्षणिक बैठकीमध्ये हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

6) विश्वातील सर्वात मौल्यवान कंपनी बनण्याचा मान सौदी अरामकोने मिळविला.

विश्वातील सर्वात मौल्यवान कंपनी बनण्याचा मान नुकताच सौदी अरामकोने मिळविला आहे.

● याआधी हा मान अँपल ह्या बनवत असलेल्या कंपनीकडे होता जो आता सौदी अरामकोने प्राप्त केला आहे.

● मागील काही महिन्यांमध्ये टेक कंपनींच्या शेअर्सची विक्री तसेच मागणी देखील कमी कमी होत गेली आणि त्याबरोबरच तेलाच्या किंमती अलीकडे वाढु लागल्याने सौदी अरामकोला ही मजल मारता आली आहे.

7) आता भारत देशात डिजीटल पदधतीने जनगणना केली जाणार –

मागील काही एक दोन वर्षात कोरोनाच्या वाढत्या थैमानामुळे देशभरात जनगणनेची प्रक्रिया यशस्वीपणे राबवता आली नव्हती.

● पण आता जनगणनेची पदधत बदलण्यात येऊन आधीप्रमाणे घरोघरी जाऊन कागदोपत्री नोंद न करता डिजीटल मेथडचा वापर करून ही जनगणना पार पाडली जाणार आहे.अशी घोषणा गृहमंत्री अमित शाह यांच्याकडुन करण्यात आली आहे.

● भारतात दहावर्षातुन एकदा जनगणना केली जात असते.

● जन्म आणि मृत्युनंतर देखील जनगणनेत महत्वाचे अपडेटस करता यावे याकरीता बर्थ आणि डेथचे रजिस्टरही याला लिंक केले जाईल असे गृहमंत्री म्हणाले आहे.

● जनगणना करण्यासाठी डिजीटल पदधतीचा अवलंब केल्याने जनगणनेची प्रक्रिया अधिक सहज आणि सोपी होईल.

8) भारतीय उत्तर रेल्वेकडुन बेबी बर्थ सीटची- सुरूवात

भारतीय उत्तर रेल्वेकडुन झोनने प्रवाशींची सोय व्हावी याकरीता नुकताच एक नवीन उपक्रम राबवला आहे.यात जे प्रवासी लहान मुलांना सोबत घेऊन प्रवास करत असतात त्यांच्या सोयीकरीताबेबी बर्थ सीटची सुरूवात करण्यात आली आहे.

● बेबी बर्थ सीट बसविण्यात आल्याने लहान मुलांना सोबत घेऊन प्रवास करणारे प्रवासींचा प्रवास अधिक सुकर होणार आहे.

See also  सरकारने कच्च्या तेलावरील आकारलेला विंडफॉल टॅक्स कमी केला - Government reduce windfall tax on crude oil

9) दानिश सिदधीकी यांना दिला जाणार फोटोग्राफी क्षेत्रातील नोबेल पुरस्कार पुलित्झर-

भारताचे दानिश सिदधीकी जे अफगाणिस्थान येथे आपले कर्तव्याचे पालन करत असताना त्यांचा मृत्यु झाला होता त्यांना फोटोग्राफी क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जात असलेल्या नोबेल पुरस्काराने म्हणजे पुलित्झर ह्या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

● दानिश सिदधीकी यांनी दिलेल्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी त्यांना हा 2022 मधील पुलित्झर पुरस्कार दिला जात आहे.

10) आयोध्या येथे लता मंगेशकर यांच्या नावाने  चौक-

भारताच्या नुकत्याच निधन पावलेल्या गानकोकिळा लता मंगेशकर यांनी गायन क्षेत्रात दिलेल्या त्यांच्या अमुल्य योगदानाचा सम्मान करण्यासाठी अयोध्येत त्यांच्या नावाचा चौक बांधला जाणार आहे.

● मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडुन याबाबद तशा सुचना देखील देण्यात आल्या आहेत.

11) भारतात महिलांवर होत असलेल्या अत्याचारात 30 ते 35 टक्के वाढ-

राष्टीय कौटुंबिक आरोग्य विभागाकडुन नुकताच एक सर्वे करण्यात आला आहे ज्यात भारतात स्त्रियांवर होत असलेल्या अत्याचाराच्या प्रमाणेमध्ये 30 ते 35 टक्के वाढ झाली असल्याचे समोर आले आहे.

● आरोग्यमंत्री यांच्याकडुन हा अहवाल जाहीर करण्यात आला आहे.ज्यात फक्त 15 ते 20 टक्के महिलांनीच आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराविरूदध आवाज उठविण्याचे धाडस केलेले दिसुन आले आहे.

● कर्नाटक ह्या राज्याचा महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या प्रमाणाच्या बाबतीत प्रथम क्रमांक आहे.

12) अविनाश साबळे यांनी मोडला बहादुर प्रसाद यांचा विक्रम –

अविनाश साबळे यांनी पाचशे मीटर शर्यतेत बहादुर प्रसाद यांनी रचलेला तीस वर्षापुर्वीचा अत्यंत जुना विक्रम मोडीत काढला आहे.

13) आशियाई निवडणुक प्राधीकरण संघाच्या अध्यक्षपदी भारताची निवड –

आशियाई निवडणुक प्राधीकरण संघाच्या अध्यक्षपदी भारत देशाची निवड करण्यात आली आहे.

आशियाई निवडणुक प्राधीकरण संघाच्या अध्यक्षपदी भारत देशाची 2022 ते 2024 पर्यत निवड करण्यात आली आहे.

14) राजेश उन्नी यांची मेरिटाईन अँण्टीकरप्शन नेटवर्कच्या उपाध्यक्षपदी निवड-

See also  बांदीपुर टायगर रिझर्व म्हणजे काय?हे नाव सध्या एवढ्या चर्चेत का आहे? - Bandipur Tiger Reserve

राजेश उन्नी यांची मेरिटाईन अँण्टीकरप्शन नेटवर्कच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

● मेरिटाईन अँण्टीकरप्शन नेटवर्कची स्थापणा ही 2011 मध्ये करण्यात आली होती.

● याचे मुख्य कार्यालय डेन्मार्क येथे आहे.

● याचे सध्याचे अध्यक्ष एन सजील हे आहेत आणि उपाध्यक्षपदी राजेश उन्नी हे असणार आहेत.

15) प्रकाश सिंह यांनी लिहिलेल्या द स्ट्रगल फाँर पोलिस रिफाँर्म इन इंडिया पुस्तकाचे विमोचन उपराष्टपतींच्या हस्ते-

लेखक प्रकाश सिंह यांनी लिहिलेल्या द स्ट्रगल फाँर पोलिस रिफाँर्म इन इंडिया पुस्तकाचे विमोचन भारताचे सध्याचे उपराष्टपती एम व्यंकय्या नायडु यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

16) युक सुक योल हे बनले दक्षिण कोरियाचे 13 वे राष्टपती –

युक सुक योल हे नुकतेच दक्षिण कोरियाचे 13 वे राष्टपती बनले आहेत.

● दक्षिण कोरियाचे पहिले स्वदेशी अंतराळ क्षेपनास्त्र हे लौरी हे होते.

17) रोड्ररिगो चा़वस बनले कोस्टारिका चे नवीन राष्टपती –

रोड्ररिगो चा़वस हे नुकतेच कोस्टारिका ह्या देशाचे नवीन राष्टपती बनले आहेत.

● कोस्टारिकाची राजधानी सँनजोश ही आहे.

● कोस्टारिकाचे चलन कोलोन आहे.

18) टाटा टेक्नाँलाँजी – आसामसोबत समझोता

नुकताच टाटा टेक्नाँलाँजीने आसामसोबत एक सामंजस्य करार केला आहे.

● याचे उददिष्ट पाँलीटेक्निकला बदलणे हे आहे.

● 34 पाँलीटेक्निकला बदलण्यासाठी जवळपास दोन हजार तीनशे नव्वद करोड रूपये खर्च करून याठिकाणी फ्युचिरीस्टिक सेंटर आँफ एक्सलेन्सने आसामसोबत सामंजस्य करार केला आहे.