चालू घडामोडी – 25 आणि 26 जानेवारी 2022 – Current Affairs Marathi updates on 26

Table of Contents

आजच्या चालु आणि ताज्या घडामोडी : Current Affairs Marathi updates on 26

24 जानेवारी रोजी साजरा करण्यात आला राष्टीय बालिका दिन :

  • भारत देशात प्रत्येक वर्षी राष्टीय बालिका दिन साजरा केला जात असतो.आणि दरवर्षी प्रमाणे ह्या 2022 मध्ये देखील भारताने आपला राष्टीय बालिका दिन साजरा केला आहे.
  • 24 जानेवारी 2022 रोजी भारताने आपला 14 वा राष्टीय बालिका दिन साजरा केला आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी आयोजित केलेल्या आँनलाईन फंक्शनमध्ये देशभरातील २९ बालकांस राष्टीय बाल पुरस्काराने गौरविण्यात आले.
    ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असे प्रतिपादन केले की देशातील सर्व धोरणांच्या केंद्रस्थानी युवा वर्गाला प्रथम स्थान देण्यात आले आहे.म्हणुन बालकांनी vocal for local या मोहीमेचा अवलंब करायला हवा.
  • ब्लाँक चेन मेथडचा वापर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व पुरस्कार प्राप्त बालकांना डिजीटल सर्टिफिकिट देखील वितरीत केले.
  • राष्टीय बालिका दिन साजरा करायची सुरूवात महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडुन 2008 सालापासुन करण्यात आली होती.
  • राष्टीय बालिका दिन साजरा करण्याचा मुख्य हेतु हा मुलींचे अधिकार,त्यांचे शिक्षण,आरोग्य आणि त्यांच्यासाठी पोषक आहाराचे किती महत्व आहे हे पटवून देण्यासाठी राष्टीय बालिका दिन साजरा करावयास सुरूवात केली गेली होती.
  • याचसोबत आज समाजात मुलगा आणि मुलगी असा जो भेदभाव केला जातो आहे आणि ज्याचे परिणाम स्वरूप मुलींना विविध समस्यांना सामोरे जावे लागते आहे.
  • ह्या सर्व समस्यांवर समाजाचे लक्ष केंद्रित करणे करणे,समाजात मुलींच्या प्रती जो दृष्टीकोन बाळगला जातो आहे त्याविषयी समाजात प्रबोधन करून परिवर्तन घडवून आणने ह्या मुख्य हेतुने देखील राष्टीय बालिका दिन साजरा केला जातो.

स्मृती मंधाना बनली ICC Cricket women of the year :

  • भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मंधाना हिची 2021 मधील आयसीसी क्रिकेट वुमन आँफ द ईअर म्हणुन निवड करण्यात आली आहे.
  • स्मृती मंधाना हिची दुसरयांदा सर्वश्रेष्ठ महिला क्रिकेटपटटु म्हणुन निवड करण्यात आली आहे.पहिल्यांदा स्मृती मंधाना हिने हा मान 2018 मध्ये प्राप्त केला होता.
  • याआधी अमृती मंधाना हीला सर्वश्रेष्ठ महिला वनडे क्रिकेटरचा मान देखील प्राप्त झालेला आहे.
See also  जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिवस का साजरा केला जातो? हया दिवसाचे महत्त्व काय आहे? - World press freedom day in Marathi

 

 

 

 

*पेरू ह्या देशाने तेलगळतीनंतर 90 दिवसांसाठी पर्यावरणीय आणीबाणीची केली घोषणा :

  • दक्षिण अमेरिकेतील पेरू ह्या देशाने 22 जानेवारी 2022 रोजी तेल गळतीने प्रभावित होत असलेल्या लीमा येथील किनारी क्षेत्रावर 90 दिवसांसाठी पर्यावरणीय आणीबाणीची घोषणा केली आहे.
  • पेरु ह्या देशातील किनारी क्षेत्राजवळ स्पेनिश पाँवर फर्म रेप्सोलच्या एका टँकरमध्ये जवळजवळ सहा हजार बँरल इतक्या कच्च्या तेलाची गळती घडुन आली आहे.
  • आणि घडुन आलेल्या तेलगळतीचा परिणाम समुद्र किनारयाच्या आसपास वास्तव्यास असलेल्या इतर प्राणी तसेच वन्य जीवांवर झाला आहे.
  • आणि यामुळे स्थानिक पर्यटक आणि मासेमारी करत असलेल्या कोळी लोकांना खुप नुकसान देखील सहन करावे लागत आहे.
  • ही तेलगळती घडण्याचे कारण ज्वालामुखीचा विस्फोटामुळे उत्पन्न झालेल्या फ्रिक वेन्स म्हणजेच अत्याधिक प्रतिक्रियाशील लहरी असल्याचे सांगण्यात येत आहे.
  • ही दुर्घटना पेरू या देशाची राजधानी लिमा पासुन 30 किलोमीटर एवढया लांब अंतरावर उत्तर दिशेला असलेल्या पँम्पिला रिफाईनरी येथे घडुन आली आहे.

भारत देश बनला जगातील सर्वाधिक काकडीचा निर्यात करणारा देश :

  • नुकताच भारत देश हा जगात सर्वात अधिक काकडीची निर्यात करणारा देश बनला आहे.
  • भारत देशाने 2020-2021 मध्ये एप्रिल ते आँक्टोंबर महिन्याच्या दरम्यान 114 मिलियन अमेरिकन डाँलर या किंमतीमध्ये 1,23,846 टन एवढया काकडीची निर्यात केली आहे.
  • काकडीची शेती,प्रक्रिया,आणि निर्यातीची सुरूवात भारत देशात 1990 मध्ये कर्नाटक येथे छोटया पातळीवर करण्यात आली होती.
  • यानंतर कर्नाटकचे शेजारील राज्ये तामिळनाडु,तेलंगाना,आंध्र प्रदेश येथे काकडीवर प्रक्रिया कर लागु करण्यात आले.
  • जगभरात आवश्यक असलेल्या निर्यात केल्या जात असलेल्या 15 टक्के काकडीचे उत्पादन भारत देशात केले जाते.

पीव्ही सिंधु यांनी जिंकला सैयद मोदी आंतरराष्टीय बँटमिंटन टुर्नामेंटचा किताब :

  • 23 जानेवारी 2022 रोजी भारतीय शटलर पीव्ही सिंधु हिने लखनौ येथील सैयद मोदी आंतरराष्टीय बँटमिंटन टुर्नामेंटमध्ये महिला एकलचा किताब प्राप्त केला आहे.
  • पीव्ही सिंधु हिने तिची जोडीदार भारताचीच मालविका बंसोड हिला 21-13,21-16 ह्या लांब अंतराने पराभुत करून 2017 नंतरचा तिचा दुसरा सैय्यद मोदी किताब पटकावला आहे.
  • 2022 मधील सैयद मोदी आंतरराष्टीय बँटमिंटन टुर्नामेंटचे आयोजन हे 18 ते 23 जानेवारी दरम्यान लखनौ तसेच उत्तर प्रदेशातील बाबु बनारसी दास इंडोर स्टेडियम येथे करण्यात आले होते.

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आंबे यांना देण्यात आला 2022 चा नेताजी अवाँर्ड :

  • 23 जानेवारी 2022 रोजी नेताजी रिसर्च ब्युरोतर्फे जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना 2022 च्या नेताजी पुरस्काराने सम्मानित केले गेले आहे.
  • कोलकत्ता येथे जपानचे महावाणिज्य दुत नाकामुरा युताका यांनी आबे यांच्याजागी हा अवाँर्ड स्वीकारला.
  • नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त एलगिन रोड येथील आवासात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात हा अवाँर्ड देण्यात आला आहे.
  • यापुर्वी 2021 मध्ये शिंजो आबे यांना भारत देशाकडुन देशाचा दुसरा सर्वोच्च नागरीक हा पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला होता.
See also  चालु घडामोडी मराठी - 19 मे 2022 Current affairs in Marathi

हिमाचल प्रदेश आणि हरियाणा करणार आदी बंद्री बांधाची निर्मिती :

  • 21 जानेवारी 2022 रोजी हिमाचल प्रदेश आणि हरियाणा देशातील सरकारने यमुनानगर जिल्हयातील आदी बंद्री भागात बांध तयार करण्यासाठी एका करारावर हस्ताक्षर केले आहेत.
  • हा बांध हरियाणा येथील हिमाचल प्रदेशाच्या सीमेवर स्थित आहे.
  • या जागेला सरस्वती नदीचे उगमस्थान म्हटले जाते.सरस्वती नदीच्या जिर्णोदधारासोबत जुन्या धार्मिक मान्यतांना पुनर्जिवित केले जाणार आहे.ह्या क्षेत्राला तीर्थस्थळाचा रूपात देखील विकसित केले जाणार आहे.
  • ह्या बांधाची निर्मिती हिमाचल प्रदेशात 31.66 हेक्टर जमीनीवर केली जाणार आहे.याची लांबी 101.06 मीटर आणि रूंदी 20.5 मीटर इतकी राहणार आहे.ह्या योजनेसाठी एकुण 213.33 करोड इतका खर्च केला जाणार आहे.
  • आदी बंद्री बांधाला सोम नदीकडुन देखील पाणी मिळणार आहे.जी यमुना नगरातच आदी बंद्री च्या जवळ यमुना नदीला जाऊन मिळते.
  • आदी बंद्री बांधाची क्षमता दरवर्षी 224.58 हेक्टर पाण्याची असेल ज्यात हिमाचल प्रदेश आणि हरियाना यांना 61.88 हेक्टर पाणी प्राप्त होणार आहे.आणि उरलेले पाणी सरस्वती नदीत प्रवाहित होणार आहे.
  • आदी बंद्री बांध निर्माण करण्याचे दोन प्रमुख हेतु आहेत एक म्हणजे सरस्वती नदीला पुनर्जिवित करणे आणि दुसरा म्हणजे येथील भुजल पातळीत वाढ करणे हा आहे.
  • याव्यतीरीक्त ह्या बांधाजवळ एक नदी देखील तयार केली जाणार आहे.पर्यटनाला देखील बढती प्राप्त होईल.तसेच ह्या बांधामुळे अतिवृष्टीमुळे पुरग्रस्तांच्या निर्माण होत असलेल्या समस्येसोबत देखील निपटण्यास मदत होणार आहे.

जिओने आपल्या 6G शोधात गती

  • आणण्यासाठी फिनलँडच्या ओलु युनिव्हसिटी सोबत केला तडजोड करार:
  • जिओ कंपनीने आपल्या 6 G शोधात अधिक गती आणण्यासाठी फिनलँड येथील युनिव्हरसिटी आँफ ओलुसोबत एक तडजोड करार केला आहे.
  • ओलु विद्यापीठ जिओला हवाई आणि अंतराळ संवाद,होलोग्राफ बिम फाँरमिंग,सायबर सिक्युरीटी,मायक्रो इलेक्ट्राँनिक फोटोनीक्समधल्या थ्री डी कनेक्टेड इंटेलिजन्सच्या रिसर्च अँण्ड डेव्हलपमेंट मध्ये साहाय्य करणार आहे.

टाटा स्टील मास्टर बुदधीबळ

  • स्पर्धेत भारताचा विदीत गुजराती झाला विजयी आणि प्रज्ञानंद झाला पराभुत :
  • भारताचा ग्रँण्ड मास्टर विदीत गुजराती याने टाटा स्टील मास्टर बुदधीबळ स्पर्धेतील आठव्या फेरीत निल्स ग्रँण्डेलियसवर विजय प्राप्त केला आहे.मात्र आर प्रज्ञानंद सलग दुसरया वेळेस पराभुत झाला आहे.

कृषी क्षेत्रात ड्रोन

  • प्रसिदध व्हावे म्हणुन सरकारने केली 40 ते 100 टक्के इतके अनुदानाची घोषणा :
  • केंद्रीय कृषी मंत्रालयाकडुन कृषी यांत्रिकीकरणातील उपमिशनच्या मार्गदर्शक तत्वांत(guidelines) मध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
  • ज्यात कृषी यांत्रिकरणाकरीता ड्रोन खरेदी करावयास मार्च 2023 सालापर्यत 40 ते 100 टक्के इतके अनुदान दिले जाणार आहे.
  • दुरूस्तीनंतर ड्रोन खरेदी करावयास अँग्री ड्रोनच्या किमतीच्या शंभर टक्के तसेच 10 लाख यात जी रक्कम कमी पडेल ती अनुदान म्हणुन दिली जाणार आहे.
See also  आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस का साजरा केला जातो?ह्या दिवसाचे महत्त्व काय आहे? International family day 2023 in Marathi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळयाचे अनावरण :

  • भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पराक्रम दिनानिमित्त इंडिया गेट इथे सुभाषचंद्र बोस यांच्या hologram पुतळयाचे अनावरण केले आहे.
  • या होलोग्राम पुतळा 28 फुट उंच आणि 6 फुट इतका रूंद आहे.देशाला स्वातंत्र्य मिळवुन देण्यासाठी नेताजींनी केलेल्या संघर्ष आणि त्यागाला आदरांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या त्रणाचे प्रतिकाच्या स्वरूपात त्यांच्या 125 व्या जयंतीचे औचित्य साधुन हा पुतळा बसवण्यात आला आहे.
  • याचसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2020,2021आणि 2022 सालातील सुभाषचंद्र बोस आपत्ती प्रबंधन सम्मान देखील या कार्यक्रमात प्रदान केला गेला.यात एकूण सात पुरस्कारांचे वितरण केले गेले.
  • ज्यात विनोद शर्मा यांची निवड 2022 सालातील आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करण्यासाठी
    सुभाषचंद्र बोस आपत्ती प्रबंधन पुरस्कारासाठी केली गेली.

अधिक वाचण्या साथी इथे क्लिक करा -चालू घडामोडी जानेवारी

भारतातील प्रथम जिल्हा सुशासन निर्देशंकाची

  • करण्यात आली स्थापणा :
  • केंद्रीय गृह मंत्री तसेच सहकार मंत्री अमित शहा यांनी जम्मु आणि काश्मीर मधील एकुण वीस जिल्हयांकरीता
    भारतातील प्रथम जिल्हा सुशासन निर्देशांकाची घोषणा केली आहे.
  • ह्या जिल्हा सुशासन निर्देशांकात एकुण पाच अव्वल जिल्हे समाविष्ट आहेत.जम्मु,श्रीनगर,पुलवामा,डोडा,सांबा इत्यादी.
  • हा निर्देशांक जम्मु आणि काश्मीरच्या साहाय्याने प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाकडून तयार करण्यात आला आहे.

AVGC सेंटर तयार

  • करणारे कर्नाटक बनले भारतातील प्रथम राज्य :
  • कर्नाटकने भारतामधील प्रथम (AVG-animation,visual,gaming and comics ) सेंटर तयार केले आहे.
  • हे AVGC सेंटर बंगलौर कर्नाटक येथे सुरू करण्यात आले आहे.

बार्बाडोसचे पंतप्रधान मिया मोटली

  • सलग दोनदा विजयी झाले:
  • बार्बोडोसचे पंतप्रधान मिया मोटली यांनी सलग दुसरया वेळेस पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे.ही शपथ त्यांनी 20 जानेवारी 2022 रोजी घेतली आहे.
  • 2022 मधील निवडणुकीत त्यांच्या पक्षाने मोठा विजय प्राप्त केला आहे.मिया मोटली 2018 सालापासुन बीएलपीच्या(barbadose labour party) च्या लीडर आहेत.
  • मिया मोटली ह्या देशाच्या प्रथम महिला पंतप्रधान देखील आहेत.

इसरोने केली तामिळनाडु येथे विकास इंजिनची

यशस्वीपणे चाचणी :

  • इसरो(Indian space research organization)ने तामिळनाडु येथे विकास इंजिनची चाचणी यशस्वीपणे पार पाडली आहे.
  • याने भारतातील गगनयान मानवी अंतराळ मोहीमेस शक्ती मिळणार आहे.गगनयान मानवी अंतराळ मोहीमेकरीता विकास इंजिनची अँबीलिटी टेस्ट इसरोने येथे आयोजित केली होती.
  • आणि भविष्यात देखील इसरोकडुन अशा अनेक मोठया चाचण्या घेतल्या जाणार आहेत.

निती आयोग आणि आर-एम-आय

  • कडुन भारतामधील इलेक्ट्रीक वाहनांवर करण्यात आला बँकिंग अहवाल प्रकाशित :
  • निती आयोगाकडुन 22 जानेवारी 2022 रोजी भारतातील इलेक्ट्रीक वाहनांवर एक बँकिंग नावाचा अहवाल प्रकाशित केला आहे.
  • या अहवालातील आरबी आय प्राधान्य क्षेत्र कर्ज मार्गदर्शक तत्वात इलेक्ट्रीक वाहनांच्या सहभागाची गरज आणि महत्व सांगितले आहे.
  • हा अहवाल निती आयोगाकडुन नाँन प्राँफिट आँरगनाईझेशन (RMI-rocky mountain institute)आणि RMI india यांच्या साहाय्याने विकसित करण्यात आला आहे.

भारताचे माजी फुटबाँल खेळाडु सुभाष भौमिक यांचा दिर्घ विकाराने मृत्यु :

  • भारतीय संघाचे माजी फुटबाँलपटटु सुभाष भौमिक यांचा वयाच्या 72 व्या वर्षी दिर्घ विकाराने मृत्यु झाला आहे.
  • सुभाष भौमिक यांचा जन्म हा पश्चिम बंगाल या राज्यात झालेला आहे.मोहन बागान आणि पुर्व बंगाल सारख्या फुटबाँल टीमचे कोच म्हणुन देखील त्यांनी काम केले आहे.