चालु घडामोडी मराठी – 12 मे 2022 Current affairs in Marathi

चालु घडामोडी मराठी – 12 मे 2022 Current affairs in Marathi

1)सर्वोच्च न्यायालयाकडुन राजद्रोह कायदा करण्यात आला स्थगित :

● बुधवारच्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने एक मोठया ऐतिहासिक निर्णयाची घोषणा केली आहे.आणि तो निर्णय म्हणजे राजद्रोह कायद्याला स्थगिती देणे हा आहे.

2) नारायण राणे यांच्या हस्ते केले गेले खादी सेंटर आँफ एक्सलेन्सचे उदघाटन :

नुकतेच नारायण राणे यांच्या हस्ते दिल्ली येथे खादी सेंटर आँफ एक्सलेन्सचे उदघाटन करण्यात आले आहे.

हे खादी सेंटर आँफ एक्सलेन्स स्थापित करण्यामागचा मुख्य हेतु उद्योग तसेच व्यवसाय क्षेत्रास नवसंजीवनी प्राप्त करून देणे हा आहे.

3) ज्योती याराजीला मिळाले सुवर्णपदक –

सायप्रस अँथेलिटिक्स स्पर्धेत शंभर मीटर अडथळा स्पर्धेत ज्योती याराजी हिने सुवर्णपदक पटकावले आहे.

ज्योती याराजीला सलग तिसरयांदा प्रयत्न करताना 13.25 सेकंद ह्या नँशनल रेकार्डची नोंद करण्यात यश प्राप्त झाले आहे.

● ज्योती याराजी ही आंध्र प्रदेश येथे राहणारी 23 वर्षीय तरुणी आहे.जिने अनुराधा बिस्वाल हिने नोंदविलेला जुना विक्रम 13.39 सेकंद मोडीत काढत ह्या नवीन विक्रमाची नोंद केली आहे.

4) 11 मे रोजी साजरा करण्यात आला राष्टीय तंत्रज्ञान दिवस –

भारत देशात दर वर्षी नँशनल टेन्नाँलाँजी डे मोठया उत्साहात साजरा केला जात असतो.काल 11 मे रोजी देखील हा दिवस साजरा करण्यात आला.

● आपल्या भारत देशाने सायन्स आणि टेक्नाँलाँजीमध्ये आत्तापर्यत किती प्रगती करण्यात यश प्राप्त केले आहे?कोणकोणती कर्तबगारी दाखवली आहे?आपला देश आज प्रत्येक क्षेत्रात किती पुढे गेला आहे?हे आपल्या भारत देशातील जनतेला माहीत असावे यासाठी हा दिवस दरवर्षी साजरा करण्यात येत असतो.

5) मध्य प्रदेशात चालु होणार एन आय एचे आँफिस –

दहशतवादी संघटनेकडुन केला जात असलेल्या सततच्या कारवायांचा शोध घेता यावा याकरीता एन आय ए कडुन लवकरात लवकर मध्य प्रदेशात आपले एक आँफिस सुरू केले जाणार आहे.अशी माहीती मध्य प्रदेश राज्याचे गृहमंत्री नरोतम मिश्रा यांनी दिली आहे.

See also  ब्रदर्स डे लिए कोटस और शुभकामनाए - National Brother day quotes wishes in Hindi

● याआधी मध्य प्रदेशमध्ये एन आय एने आपले असे कुठलेही आँफिस सुरू केले नव्हते.पण आता एन आय ए कडुन बांग्लादेशी दहशतवादी संघटनेच्या कारवाहींचा शोध घेतला जात असल्याने ह्या कार्यालयाची स्थापणा केली जात आहे.

6) रूद्रांक्ष पाटीलने मिळविले कनिष्ठ नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक –

रूद्रांक्ष पाटील याने जर्मनीमध्ये चालु असलेल्या पुरूष गटाच्या दहा मीटर रायफल ह्या नेमबाजी टाईप स्पर्धेमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले आहे.

भारताचाच खेळाडु अभिनव शहा याला या गटामध्ये रौप्यपदक मिळाले आहे.

7) 12 मे आंतरराष्टीय नर्स दिवस –

दर वर्षी आंतरराष्टीय पातळीवर आंतरराष्टीस नर्स दिवस साजरा केला जात असतो.आज 12 मे 2022 रोजी देखील हा दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

● आंतरराष्टीय नर्स दिन साजरा करण्याचे उददिष्ट हे आहे की आपल्या मनात हाँस्पिटलमध्ये रूग्णांची दिवस रात्र निस्वार्थ भावनेने सेवा करत असलेल्या नर्सविषयी आदर आणि सम्मानाची भावना निर्माण व्हावी.तसेच आपल्याला त्या रोज देत असलेल्या त्यांच्या अमुल्य योगदानाची जाणीव आपणास व्हावी यासाठी हा दिवस आंतराष्टीय पातळीवर दरवर्षी साजरा केला जात असतो.

8) केरळ राज्यात टोमँटो फिव्हरचा शिरकाव-

कोरोना व्हायरसचा धोका अजुन पुर्णपणे टळलेला नसताना आता एक नवीन संसर्गाने टोमँटो फिव्हरने थैमान घालण्यास सुरूवात केली आहे.

● केरळ मध्ये ह्या टोमँटो फिव्हरने नुकतेच थैमान घातले आहे.ह्या संसर्गाची लागण होण्याचा धोका पाच वर्षाच्या खालील लहान मुलांना अधिक आहे.केरळ मधील 80 लहान मुलांना ह्या फिव्हरची लागण आत्तापर्यत झालेली आहे.

● टोमँटो फिव्हरची काही प्रमुख लक्षणे-अधिक ताप,थकवा जाणवने,अंग दुखी,डिहायड्रेशन इत्यादी आहेत.

9) मध्य प्रदेशमध्ये सुरू करण्यात आली लाडकी लक्ष्मी योजना-

मध्य प्रदेश येथे नुकतीच मूलींसाठी एक नवीन योजना सुरू करण्यात आली आहे जिचे नाव लाडकी लक्ष्मी योजना 2.0 असे आहे.

ही योजना येथील मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सुरू केली आहे.

See also  सत्यपाल मलिक कोण आहेत? सध्या ते एवढ्या चर्चेत का आहे? Satyapal Malik

● ही योजना सुरु करण्यामागचा मध्य प्रदेश सरकारचा मुख्य हेतु हा राज्यातील सर्व मुलींना स्वबळावर उच्च शिक्षण घेता यावे,त्यांच्यात स्वावलंबन निर्माण व्हावे,मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढावे हा आहे.

● ह्या योजनेचा लाभ मध्य प्रदेश मधील रहिवासी मुलींनाच घेता येणार आहे ह्या योजनेच्या च्या अंतर्गत प्रत्येक मुलीला तिच्या जन्मापासुन ते विवाह होईपर्यत इंस्टाँलमेंटच्या स्वरुपात आर्थिक मदत प्रदान केली जाणार आहे.

● ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे कुटुंब दारीद्रय रेषेखाली असणे गरजेचे तसेच अनिवार्य देखील आहे.ह्या शिवाय आपण ह्या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही.

● ह्या योजनेदवारे मध्य प्रदेशमधील रहिवासी असलेल्या प्रत्येक मुलीला पहिला हप्ता म्हणून ती इयत्ता सहावी मध्ये शिकत असताना 2000 रुपये दिले जातात.

● नंतर ती नववीत गेल्यावर तिला 4000 रुपये दिले जातात.मग जेव्हा ती 11वी मध्ये जाते तेव्हा तिला7500 रुपये दिले जातात आणि ती इयत्ता 12वी मध्ये प्रवेश करत असताना
तिला दरमहा 200 रुपये दिले जातात.

● मग अखेरीस त्या मुलीचे वय 21 वर्षे इतके पूर्ण झाल्यावर,तिला विवाहीत तसेच अविवाहित असताना उच्च शिक्षण प्राप्त करण्यासाठी ह्या योजने अंतर्गत 1 लाख रुपये इतकी अंतिम रक्कम दिली जाते.

10) भारतातील रिलायन्स कंपनी बनली शंभर अब्ज डाँलर कमवणारी प्रथम भारतीय कंपनी-

रिलायन्स कंपनीच्या नफ्यामध्ये 25 टक्के इतकी अधिक मोठी वाढ झाली आहे.

ज्यामुळे रिलायन्स कंपनीने भारतातील शंभर अब्ज डाँलर कमवणारया प्रथम भारतीय कंपनी बनण्याचा बहुमान प्राप्त करण्यात यश प्राप्त केले आहे.