चालु आणि ताज्या घडामोडी (Current affair in Marathi)
1)सुप्रसिदध संतुरवादक पंडित शिवकुमार –
संतुर ह्या वादयाला राष्टीयच नव्हे तर आंतरराष्टीय पातळीवर देखील प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे महान तसेच सुप्रसिदध संतुरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे 10 मे रोजी सकाळी हदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे.
● नुकतेच निधन पावलेल्या पंडित शिवकुमार शर्मा यांचे वय 85 होते.
● पंडित शिव कुमार शर्मा हे फक्त संतुर वादक म्हणुन प्रसिदध नव्हते तर ते एक उत्तम गायक म्हणुन देखील खुप प्रसिदध होते.
● पंडित शिवकुमार शर्मा यांच्या वडिलांचे नाव उमा दत्त शर्मा असे आहे.आणि त्यांचे वडील देखील त्यांच्याप्रमाणे गायक आणि संगीतकार दोघे आहेत.
2) भारताच्या मुख्य निवडणुक आयुक्त पदासाठी निवड
भारताच्या मुख्य निवडणुक आयुक्त पदावर राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
● 15 मे 2022 रोजी भारताच्या मुख्य निवडणुक आयुक्त पदासाठी नियुक्ती केली जाणार आहे.
● भारताचे सध्याचे विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी 14 मे 2022 रोजी राजीनामा दिल्यानंतर दुसरया दिवशी 15 मे ला राजीव कुमार हे या पदाची सूत्रे त्यांच्या हातात स्वीकारणार आहेत.
● निवडणुक आयुक्ताची निवड ही राष्टपतींच्या हस्ते केली जात असते.सध्याचे राष्टपती रामनाथ कोविंद असल्याने त्यांच्या हस्ते ही नियुक्ती केली जाणार आहे.
3) आंतरराष्टीय वनस्पती आरोग्य दिन –
आंतरराष्टीय वनस्पती आरोग्य दिवस हा दरवर्षी 12 मे रोजी संपुर्ण जगभरात साजरा केला जात असतो.
● आंतरराष्टीय वनस्पती दिन साजरा करण्याचा मुख्य हेतु हा वनस्पतींच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी जनजागृती करणे हा आहे.
● वनस्पतींच्या आरोग्याचे संरक्षण करणे किती महत्वाचे आहे हे पटवून देण्याचा हा विशेष दिवस आहे.
● वनस्पतीच्या आरोग्याचे रक्षण केल्याने आपली भुकेची समस्या कशी संपुष्टात येते,देशाच्या आर्थिक विकासास चालना मिळुन देश अजुन जास्त प्रगती कसा करतो,पर्यावरणाचे संरक्षण कसे होत असते?हे ह्या दिवशी आपल्या निर्दशनास आणुन दिले जाते.
4) जगातील सर्वात वृदध बुदधीबळ पटटु,ग्रँण्डमास्टर युरी अँव्हरबाख काळाच्या पडद्याआड –
जगातील सर्वात वृदध बुदधीबळ ग्रँण्डमास्टर म्हणुन ओळखले जाणारे युरी अँव्हरबाख यांचे नुकतेच निधन झाले आहे.
● जेव्हा अँव्हर बाख हे निधन पावले तेव्हा त्यांचे वय शंभर होते.शंभर वय असताना बुदधीबळ खेळणारे हे पहिले ग्रँण्डमास्टर देखील ठरले आहेत.
● युरी अँव्हरबाख यांनी 1954 मध्ये सोव्हिएत जिंकण्यात यश प्राप्त केले होते.युरी अँव्हरबाख यांना आंतरराष्टीय बुदधीबळ महासंघाने ग्रँण्डमास्टर ही पदवी देऊन सन्मानित देखील केले आहे.
5) युकेमध्ये आढळुन आला मंकीपाँक्स –
युकेमध्ये नुकताच स्माँल पाँक्स सारखाच एक विषाणु आढळुन आला आहे.ज्याचे नाव मंकी पाँक्स असे आहे.
● युके मधील आरोग्य अधिकारींनी याबाबद पृष्ठी केली आहे.
● मंकी पाँक्स हा आजार कमी संसर्गजन्य आहे.याची लक्षणे देखील सौम्य प्रकारची आहेत
● मंकी पाँक्स हा आजार साधारणत तीन ते सहा आठवडे एवढा वेळ टिकत असतो आणि ह्या आजाराची लागण झाल्यानंतर 20 ते 25 दिवसांनी याची लक्षणे रूग्णामध्ये आपणास दिसुन येत असतात.
6) बी-आय-ए-एल कडुन करण्यात आली कोटक महिंद्रा सोबत पार्टनरशिप (banglore international airport ltd)
बी-आय-ए-एल (bang lore international airport ltd) कडुन कोटक महिंद्रा बँक आणि डिजीटल पेमेंट फर्म फी सोबत नुकतीच एक भागीदारी करण्यात आली आहे.
● ही भागीदारी केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील वन-स्टॉप सर्व चॅनेल पेमेंट सोल्यूशन सुलभ करणार आहे.
● विशेष करून विमान तळांसाठी डिझाइन करण्यात आलेले हे सौल्युशन एक सिक्युअर , स्केलेबल आणि युनिफाइड पेमेंटचा अनुभव आपणास प्राप्त करून देणार आहे.
7) हरियाणा राज्याकडून चारा उत्पादकांसाठी सुरू करण्यात आली एक विशेष योजना-
हरियाणा राज्याचे कृषीमंत्री जे-पी दलाल यांनी 2022 मध्ये नुकतीच एक योजना सुरू केली आहे जिचे नाव फोर सिडिंग असे आहे.
● ह्या योजनेदवारे राज्य सरकार अशा शेतकरींना प्रती एकर दहा हजार रूपये आर्थिक मदत म्हणून देणार आहे ज्या शेतकरीने त्याच्या गोठयाभोवती 10 ते 12 एकर इतका चारा पिकवला आहे.
● आणि ही आर्थिक मदतीची रक्कम त्या शेतकरीच्या बँक अकाऊंटमध्ये राज्य सरकारकडुन डायरेक्ट ट्रान्सफर केली जाणार आहे.
8) एचडी एफसी बँकेकडुन सादर करण्यात आली एक्सप्रेस कार लोन योजना –
एचडी एफसी बँकेकडुन नुकतीच एक योजना सादर करण्यात आली आहे जिचे नाव एक्सप्रेस कार लोन असे आहे.
● ह्या योजनेअंतर्गत वाहन खरेदी करत असलेल्या व्यक्तीकडुन संपुर्ण प्रोसेस पुर्ण केली गेल्यानंतर अवघ्या तीस मिनिटांत वाहन विकत असलेल्या व्यक्तीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे.
● विशेष बाब म्हणजे ज्यांचे बँक खाते नहीये असे व्यक्ती देखील ह्या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत.
9) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते केला जाणार मध्य प्रदेश स्टार्ट अप पाँलिसीची शुभारंभ –
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मध्य प्रदेश स्टार्ट अप पाँलिसीची शुभारंभ केला जाणार आहे.
● 13 मे 2022 रोजी इंदोर येथे होत असलेल्या ह्या मध्य प्रदेश स्टार्टअप कॉन्क्लेव्हमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टार्टअप समुदायाला संबोधित करणार आहेत.
● याचसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मध्य प्रदेश स्टार्टअप पोर्टलला लॉन्च देखील करणार आहे.आणि ह्या पोर्टलचा फायदा असा होणार आहे की ह्यामुळे स्टार्टअप इको सिस्टीमला चालना मिळण्यास हातभार लागणार आहे.
10) लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला यांनी लाँच केली साहित्यिक,लेखकांसाठी कलाम वेबसाईट-
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला यांच्याकडुन नुकतीच एक वेबसाईट लाँच करण्यात आली आहे जिचे नाव कलाम असे ठेवण्यात आले आहे.
● ही वेबसाईट लाँच करण्याचे ओम बिरला यांचे प्रमुख उददिष्ट हे लोकल साहित्यिक तसेच लेखकांना लेखन करण्यासाठी अजुन जास्त प्रोत्साहित करणे,त्यांना त्यांच्या साहित्यनिर्मितीच्या साहित्य प्रसाराच्या कार्यासाठी पाठिंबा देणे हे आहे.
● अनुभवी तसेच तरूण लेखक साहित्यिक यांना लिहिण्यासाठी स्वताचे हक्काचे व्यासपीठ प्राप्त व्हावे,हिंदी साहित्याचा जगभरात प्रचार प्रसार व्हावा याकरिता ही वेबसाईट लाँच करण्यात आली आहे.
● प्रभा खेतान फाऊंडेशनकडुन हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
11) 12 मे रोजी दुसरी जागतिक कोविड शिखर परिषद –
12 मे रोजी दुसरया जागतिक कोविड 19 शिखर परिषदेचे आयोजन आयोजन करण्यात आले आहे.
● भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील ह्या परिषदेत उपस्थित राहणार आहेत.
● अमेरिकेचे राष्टाध्यक्ष जो बिडन यांच्याकडुन ह्या परिषदेत उपस्थित राहण्याकरीता नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देखील आले आहे.
● याआधी 2021 मध्ये आयोजित केलेल्या जागतिक कोविड आभासी शिखर परिषदेत देखील नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती नोंदवली होती.
● ह्या जागतिक शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण देखील करणार आहेत ज्याचा विषय महामारीला प्रतिबंध करणे आणि त्यासाठी तयारीला लागणे हा असणार आहे.
12) बंगालच्या उपसागरातील चक्री वादळाचे नाव असानी चक्रीवादळ असे ठेवण्यात आले-
नुकतेच बंगालच्या उपसागरातील चक्री वादळाचे नाव असानी चक्रीवादळ असे ठेवण्यात आले आहे.आणि हे नाव श्रीलंका ह्या देशाकडुन ठेवण्यात आले आहे.
● भारतीय हवामानशास्त्र विभागाकडुन भारताच्या दक्षिण अंदमान समुद्रावरच्या चक्रिवादळाचे नाव असानी असे ठेवले आहे.
● गोंधळ टाळता येण्याकरीता आणि आपली रिस्क जागृकता आणि व्यवस्थापन कमी करण्याकरीता चक्रिवादळांना ही अशी नावे दिली जात असतात.
13) आसामकडुन सुरू करण्यात आली मिशन वसुंधरा 2.0 योजना-
नुकतीच आसाम ह्या राज्याकडुन मिशन वसुंधरा 2.0 ही योजना सुरू करण्यात आली आहे.
● ह्या योजनेचे उददिष्ट जमीनीच्या समस्यांचे निराकरण करणे तसेच शासनाच्या चौकटीत जलद शासन प्रदान करणे हे आहे.
● याधी आसाम राज्यात अजुन एक योजना सुरू करण्यात आली होती जिचे नाव सदभावना असे होते आणि तिचा हेतु राज्यातील प्रशासनात सुधारणा घडवून आणने हा होता.
14) आदीत्य ठाकरे यांनी केले पहिल्या ईव्ही चार्जिग स्टेशनचे उदघाटन –
आदीत्य ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच मुंबई या शहरात हाजी अली येथे बायोगँसवर चालत असलेल्या पहिल्या ईव्ही चार्जिग स्टेशनचे उदघाटन करण्यात आले आहे.
● आदित्य उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र सरकारचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आहेत.तसेच ते एक भारतीय राजकीय कार्यकर्ते देखील आहेत.आदीत्य ठाकरे हे महाराष्ट्र विधानसभेचे आमदार सुदधा आहेत.
15) महिंदा राजपक्ष यांनी दिला पंतप्रधान पदाचा राजीनामा-
महिंदा राजपक्ष यांनी नुकताच श्रीलंका ह्या देशातील पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे.
● महिंदा राजपक्ष हे श्रीलंकेतील राजकीय कार्यकर्ते आहेत.
16) रशियात साजरा करण्यात आला विजय दिवस-
रशियात नुकताच 9 मे रोजी विजय दिवस साजरा करण्यात आला आहे.
● हा दिवस रशियात विजयाचा दिवस मानला जातो.