सत्यपाल मलिक कोण आहेत? सध्या ते एवढ्या चर्चेत का आहे? Satyapal Malik

सत्यपाल मलिक कोण आहेत?सध्या ते एवढ्या चर्चेत का आहे?

नुकतेच सत्यपाल मलिक यांनी १४ फेब्रुवारी २०१९ रोजी घडुन आलेला पुलवामा हल्ला नरेंद्र मोदी यांच्या निष्काळजीपणामुळे घडुन आला असल्याचा गौप्यस्फोट केला आहे.

सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्यास केंद्र सरकार, गुप्तचर यंत्रणा,अणि भारतीय संरक्षण मंत्रालय जबाबदार आहे असे म्हटले आहे.

सत्यपाल मलिक यांनी एकेकाळी भाजप सरकारच्या वतीने राज्यपाल पद भुषवले होते २००४ पासून ते भाजप पक्षात होते अणि भाजपच्याच जुन्या विश्वासु कार्यकर्त्यांने हा दावा सरकार विषयी केल्याने सर्वत्र चर्चेचा मुद्दा बनला आहे.

एका घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा खळबळजनक दावा सत्यपाल मलिक यांनी केला आहे तेव्हापासून सत्यपाल मलिक हे नाव सोशल मिडिया वर खुप चर्चेचा विषय बनले आहे.

याचसोबत सत्यपाल मलिक असे देखील म्हटले आहे की पुलवामा हल्ल्यानंतर आपण पंतप्रधान यांना ही आपली चुकी आहे असे सांगितले होते यावर पंतप्रधान यांनी त्यांना गप्प राहण्यास सांगितले होते.

सत्यपाल मलिक हे एकेकाळी नरेंद्र मोदी यांचे एक अत्यंत विश्वासू कार्यकर्ते होते.त्यांनीच मोदींवर हा आरोप केल्याने सत्यपाल मलिक चर्चेचा विषय बनले आहेत.

आजच्या लेखात आपण सत्यपाल मलिक कोण आहेत हे थोडक्यात जाणुन घेणार आहोत.

सत्यपाल मलिक कोण आहेत?

सत्यपाल मलिक हे एक भारतीय राजकीय कार्यकर्ते नेते आहेत जे मेघालयचे १९ वे अणि वर्तमान राज्यपाल म्हणून कार्यरत होते.

सत्यपाल मलिक हे गोवा येथील अठरावे राज्यपाल होते.याचसोबत ते आधीच्या जम्मु काश्मीर राज्याचे देखील राज्यपाल होते.

याचसोबत सत्यपाल मलिक हे जम्मु काश्मीर मधील तेरावे राज्यपाल होते.सत्यपाल मलिक यांच्याच कार्यकाळात जम्मु अणि काश्मीर यांना विशेष दर्जा प्राप्त करून देणारा कलम ३७० रदद करण्यात आला होता.हा निर्णय त्यांनी २०१९ मध्ये घेतला होता.

See also  जागतिक वसुंधरा दिनाचे महत्त्व तसेच इतिहास काय आहे -The History and Importance of Earth Day

याचसोबत सत्यपाल मलिक बिहारचे २७ वे अणि ओडिसाचे २५ वे राज्यपाल होते.

१९८९ ते १९९१ काळात सत्यपाल मलिक अलिगढ मतदार संघातील खासदार होते.१८८० ते १८८९ मध्ये सत्यपाल मलिक हे उत्तर प्रदेश मतदार संघातुन खासदार म्हणून निवडून आले होते.

सत्यपाल मलिक यांचा जन्म २४ जुलै १९४६ रोजी संयुक्त प्रांत हिसवाडा येथे झाला होता.सत्यपाल मलिक जाट समाजाचे आहेत.

पुलवामा हल्ल्याचा थोडक्यात इतिहास –

काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या एका ताफ्यावर दहशतवाद्यांच्या टोळक्याने १४ फेब्रुवारी २०१९ रोजी अचानक हल्ला केला.

ह्या हल्ल्यात सीआरपीएफचे चाळीस जवान शहीद झाले होते.अणि बाकी उरलेले जवान गंभीर जखमी झाले होते.

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मु काश्मीर हायवे वरून २५०० जवानांना घेऊन जात असलेल्या बसवर अचानक दहशतवादी टोळक्याने हल्लाबोल केला.

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मु काश्मीर हायवे वरून जात असलेल्या जवानांच्या बसला अडवले ज्यात दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेले वाहन जवानांच्या बसमध्ये घुसवले यामुळे एक भयंकर स्फोट झाला ज्यात बसचा चक्काचूर झाला.

अणि बसमध्ये बसलेले चाळीस जवान शहीद झाले होते अणि अनेक जवान गंभीररीत्या जखमी झाले होते.