महर्षी विठ्ठल रामजी शिंदे कोण होते?महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी कोणते सामाजिक कार्य केले?
आज २३ एप्रिल थोर समाजसुधारक,अस्पृश्ता निवारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची जयंती आहे.
आज महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जयंतीनिमित्त आपण महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे उर्फ अण्णासाहेब शिंदे यांचा २३ एप्रिल १८७३ रोजी कर्नाटक राज्यातील जमखंडी नावाच्या गावात झाला होता.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या आईचे नाव यमुनाबाई असे होते तर त्यांच्या वडिलांचे रामजी असे होते.हे दोघेही कानडी भाषिक होते अणि दोघेही वारकरी संप्रदायातील होते.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म एका सर्वसामान्य गरीब कुटुंबात झाला होता.महर्षी विठठल रामजी शिंदे हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे समाजसुधारक दलितोदधारक होते.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी समाजातील स्पृश्य अस्पृश्य भेदभाव संपुष्टात आणण्यासाठी अस्पृश्यता निवारण करण्यासाठी आपले खुप मोलाचे योगदान दिले होते.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेली सामाजिक कार्ये –
अस्पृश्यता निवारण साठी डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापणा –
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी समाजातील अस्पृश्यता निवारण्यासाठी अस्पृश्यांवर होत असलेले अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी १८ आॅक्टोंबर १९०६ रोजी मुंबई ह्या शहरात डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापणा केली होती.
हे समाजातील अस्पृश्यता निवारण करण्याचे दलितोदधार करण्याचे कार्य आजन्म करण्याचा निर्धार महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केला होता.
डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापणा केल्यानंतर समाजातील अस्पृश्यता निवारण्यासाठी तसेच दलितांचा उद्धार घडवून आणण्यासाठी अनेक नवनवीन योजना आखण्यात आल्या.
शिक्षण, दवाखाना, व्यवसाय,शाळा अशा विविध माध्यमांतून महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी दलितांच्या उद्धाराचे कार्य केले.
१९०५ रोजी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुणे शहरात अस्पृश्य जातीतील मुला मुलींसाठी रात्रीची शाळा नाईट स्कुल सुरू केले.
डिप्रेस्ड क्लास मिशनचे मुख्य उद्दिष्ट हे समाजातील अस्पृश्यता दुर करणे,अस्पृश्य जातीतील मुलामुलींना सर्व प्रकारच्या शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध करून देणे,
अस्पृश्यांसाठी शाळा वसतिगृहे तसेच रूग्णालयांची उभारणी करणे अणि ह्या सर्वामार्फत दलितांचा उद्धार घडवून आणने हे होते.
महर्षी विठ्ठल शिंदे यांनी आयुष्यभर कोणते कार्य केले?
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयुष्यभर समाजसुधारणेचे तसेच समाजातील अस्पृश्यता निवारणाचे काम केले.समाजातील अस्पृशयता निवारणाचा प्रश्न त्यांनी देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेशी जोडण्याचे कार्य केले.
त्यांच्या ह्याच सामाजिक कार्यामुळे जनतेने त्यांना महर्षी ही पदवी बहाल केली होती.
२ जानेवारी १९४४ रोजी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे निधन झाले होते.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेली इतर सामाजिक कार्ये-
- महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी १९०५ रोजी तरूण अस्तिकांचा संघ स्थापित केला.
- १९१० मध्ये जेजुरी ह्या शहरात मुरळी प्रतिबंधक चळवळ सुरू केली.
- २३ मार्च १९१८ २३ मार्च १९१८ वर्षी अस्पृश्यता निवारक संघाची स्थापना केली.
- १९१८ मध्ये मराठा समाजात जागृती करण्यासाठी मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना देखील त्यांनी केली होती.
- १९२० मध्ये पुण्यातील दुष्काळ पीडीतांकरीता दुष्काळ अणि आपत्ती निवारण संस्था स्थापित केली.
- १९३७ मध्ये स्त्रियांसाठी अहिल्याश्रम सुरू केले.
- १९२३ १९३७ मध्ये तरूण ब्रहयो तसेच बहुजन पक्षाची स्थापना केली.
- समाजातील अस्पृश्यतेची समस्या मांडण्यासाठी भारतीय अस्पृशयतेचा प्रश्न हा ग्रंथ त्यांनी लिहिला.