मानवी शरीराचे अवयव – Human Body Parts In Marathi

मानवी शरीराचे अवयव – Human Body Parts In Marathi

एक गोष्ट आपल्या सर्वानाच चांगली माहीत आहे की आपल्या प्रत्येकाच्या शरीराचे विविध अंगे,भाग असतात.जवळजवळ आपल्या शरीराचे 70 ते 80 बाँडी पार्ट असतात.ज्यांचे प्रत्येकाचे वेगवेगळे कार्य असते.पण आपल्यातील खुप जणांना आपल्या शरीरात किती बाँडी पार्ट आहेत आणि सर्वांची नावे काय आहेत हे देखील माहीत नसते.

म्हणुन आजच्या लेखात आपण मानवी शरीराचे विविध महत्वाचे भाग(Human Body Parts)या विषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

ज्यात आपण आपल्या शरीरात किती बाँडी पार्ट असतात?त्यांची नावे काय आहेत?त्या प्रत्येकाचे कार्य काय आहे?इत्यादी महत्वपुर्ण बाबींचा आढावा घेणार आहोत.

मानवी शरीराचे किती भाग आहेत आणि ते कोणकोणते आहेत?(Human Body Parts In Marathi)

मानवी शरीराचे एकुण किमान 70 ते 80 अवयव आहेत आणि ते पुढीलप्रमाणे आहेत-

1)डोळे (Eyes) :

डोळे हा मानवी शरीराचा एक अत्यंत महत्वपुर्ण आणि संवेदनशील अवयव आहे.डोळयांनी आपण बघु शकतो.डोळयांचे कार्य बघणे हे असते.

2) कान (Ear) :

कान हे श्रवण इंद्रिय आहे ज्याने आपल्याला कुठलाही आवाज ध्वनी ऐकु येत असतो.कानाचे प्रमुख कार्य श्रवण करणे आणि संपुर्ण शरीराचे संतुलन राखणे हे असते.

कान सुदधा मानवी शरीराचा एक अत्यंत महत्वाचा आणि संवेदनशील अवयव आहे.

3) नाक (Nose) :

नाक हे पंचेद्रियांपैकी एक महत्वाचे इंद्रिय म्हणुन ओळखले जाते.नाकाने आपल्याला श्र्वास घेता येत असतो.वास घेता येतो.

4) तोंड (Mouth) :

तोंड हे आपल्या पचनसंस्थेचे प्रवेशदवार म्हणुन ओळखली जाते कारण आपण जे अन्न खातो,पाणी पितो ते तोंडावाटेच आपल्या शरीरात प्रवेश करत असते.

आपल्या तोंडामध्ये ओठ,जीभ,दात लाळग्रंथी इत्यादी अवयव असतात.तोंडाने आपल्याला बोलता येत असते.

5) तळहात (Palm) :

तळहात हा सुदधा आपल्या शरीराचा एक संवेदनशील अवयव आहे जो आपल्या बोटांना हातांशी जोडुन ठेवण्याचे काम करत असतो.

6) कोपर (Elbow) :

याने आपल्या हाताला मजबुती प्राप्त होते.कोपर हे आपल्या हाताला हालचाल करण्यास मदत करीत असतात.

7)मनगट (Wrist) :

मनगट हा सुदधा मानवी शरीराचा महत्वाचा भाग आहे.हे आपल्या हाताला वेगवेगळया दिशेने हालचाल करण्यास मदत करत असते.

8)मुठ( Fist) :

मुठ आवळुन आपण कोणालाही बुक्की तसेच ठोसा मारू शकतो.

9) कपाळ(Forehead) :

कपाळाच्या आढयांवरून आपण समोरच्या व्यक्तीच्या चेहरयावरचे भाव ओळखु शकतो.

10) रक्त(Blood) :

रक्त हा सुदधा मानवी शरीराचा महत्वाचा घटक आहे कारण शरीरात रक्त असेल तरच आपल्या शरीराला उर्जा प्राप्त होत असते.

11) भुवया (Eye Brow) :

भुवया ह्या आपल्या डोळयांना प्रकाशापासुन तसेच जंतुंपासुन वाचवण्याचे काम करतात.

12) फुप्फुसे (Lungs) :

फुफ्फुसे ही आपल्या शरीरातील श्वसन संस्थेचा प्रमुख भाग असतात.फुफ्फुसांच्या मदतीने आपल्या शरीराला श्वास घेण्यास मदत होते.ज्याने आपल्या शरीराला नियमित आँक्सिजन मिळत राहतो.आणि आपले शरीर व्यवस्थित कार्य करत राहते.

13) मुत्रपिंड (Kidney) :

हा सुदधा मानवी शरीराचा एक महत्वाचा भाग आहे.मुत्रपिंडावाटे आपल्या शरीरातील नको असलेले पदार्थ बाहेर टाकण्याचे काम करते.

किडनीचे काम शरीरामधील रक्ताला शुदध करणे,लघवी निर्माण करणे हे असते.

14) जीभ( Tongue) :

जीभ हा देखील मानवी शरीरातील एक महत्वाचा अवयव आहे.जीभेचा मुख्य उपयोग आपण अन्नाची चव चाखण्यासाठी,अन्न चघळण्यासाठी,गिळण्यासाठी करत असतो.

याचसोबत जिभेचे दुसरे काम स्वर नियंत्रित करणे हे आहे.

15) दात (Tooth) :

दात ह्या अवयवाचा उपयोग अन्न चावण्यासाठी केला जात असतो.

16) हदय(Heart) :

हदय हा आपल्या शरीराच्या आतील भागात असणारा महत्वाचा अवयव आहे.रक्ताचे उत्प्रेक्षण करणे आणि आपल्या शरीरातील सर्व इंद्रियांपर्यत ते पोहचवण्याचे काम करणे हे आहे.

17) डोके (Head) :

डोके हा सुदधा मानवी शरीराचा अत्यंत महत्वाचा अवयव आहे.डोक्यामध्ये आपला जो मेंदु असतो त्याचे काम कुठल्याही गोष्टींचा घटना प्रसंगाविषयी बुदधीमत्तेने आणि समजुतदारपणे विचार करणे हे आहे.

18)यकृत(Liver) :

आपल्या रक्तामध्ये जेवढेही साखरेचे प्रमाण असते त्याला नियंत्रणात ठेवण्याचे काम यकृत करत असते.यकृताचे अजुन एक महत्वाचे कार्य असते ते म्हणजे आपल्या शरीरात रक्त निर्माण करणे.

आपल्या शरीरात जे विषारी पदार्थ असतात त्यांना फिल्टर करून लघवी तसेच मलाच्या रुपात बाहेर टाकण्याचे काम देखील यकृताचे असते.अशाप्रकारे अशी अनेक कार्ये यकृत आपल्या शरीरात पार पडत असते.

19) पोट(Stomach) :

पोट हा देखील मानवी शरीराचा एक अत्यंत महत्वाचा अवयव मानला जातो.आपण जे अन्न खात असतो ते खाल्लेले अन्न पचवण्याचे कार्य पोट करत असते.

20) हाडे (Bone) :

हाडे आपल्या शरीराला आधार देण्याचे काम करतात.हाडाचे अजुन एक महत्वाचे काम आहे ते म्हणजे मेंदुला सुरक्षा प्रदान करणे.

21) अँपेन्डिक्स(Appendix) :

अँपेंडिक्स हे 4 ते 5 इंच लांब नळीप्रमाणे असते.
हे आपल्या मोठ्या आतडीच्या पहिल्या भागाशी संलग्न असते.

एका सिद्धांतात दिल्यानुसार अपेंडिक्स हे चांगल्या बॅक्टेरियासाठी स्टोअर हाऊस म्हणून कार्य करते.जे डायरियासारख्या आजारानंतर पाचन तंत्राला रीबूट करते किंवा सुरळीत चालण्यास मदत करत असते.

22) मेंदु (Brain) :

मानवी शरीरातील अजुन एक महत्वाचा अवयव म्हणजे मेंदु.मेंदु प्रमुख कार्य चेतना उत्पन्न करणे,जाणीव करणे,लक्षावधान असणे,विचारपुर्वक निर्णय घेणे इत्यादी कार्ये मेंदुची असतात.

23) प्लीहा (Spleen) :

प्लीहा हा सुदधा शरीराचा एक महत्वपुर्ण अवयव आहे जो पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये मुख्यकरून आढळुन येत असतो.

याचे काम जुन्या लाल रक्तपेशींना नष्ट करणे हे असते.

24) स्वादुपिंड(Pancreas) :

स्वादुपिंड हा आपल्या शरीराच्या वरच्या ओटीपोटी असलेल्या ठिकाणी वाढणारा एक मृदु प्रकारचा अवयव आहे.

प्रौढ व्यक्तींमध्ये स्वादुपिंडाचे मुख्य कार्य हे स्वादु नलिकेमधुन ग्रहणीमध्ये विकरे स्रवणे इतकेच असलेले आपणास दिसुन येत असते.

25) केस(Hair) :

केस सुदधा आपल्या शरीराचा एक महत्वाचा भाग आहे.केरोटिन नावाच्या प्रथिनापासुन केस तयार होत असतात.

जसे आपल्या शरीराच्या इतर अवयवांची वाढ होत असते एकदम त्याचप्रमाणे केसांचीही दिवसेंदिवस वाढ होत असते.

26)गुडघा( Knee) :

गुडघा हा सुदधा मानवी शरीराचा अत्यंत महत्वाचा अवयव आहे.

गुडघा हा आपला सांधा आहे जो मांडीचे हाडुक आणि नडगीचे हाडुक यांच्यात असतो.ज्याच्या पुढील भागात एक वाटी असते.

गुडघा हा आपल्या शरीराचा असा एक अवयव आहे ज्याच्यामुळे आपल्या शरीराच्या खालच्या बाजुस स्थेर्य प्राप्त होत असते तसेच लवचिकता प्राप्त होते.

27) पायथा(Foot)

फुट हा आपल्या पायाच्या सर्वात खालचा,टाचेच्या खालील भाग असतो.आपल्या शरीराच्या टाचेवरून आपली उंची मोजली जात असते.

28) मोठी आतडी(Large Intestine) :

हा आपल्या शरीराचा लांब,आणि नळीसारखा अवयव असतो.जो एका टोकाने लहान आतड्याला आणि दुसऱ्या टोकाला गुदद्वाराशी जोडलेला असतो.

आपल्या शरीरातील मोठे आतडे अन्नाच्या साठलेल्या कचऱ्याचे स्टूलमध्ये रूपांतर करत असते आणि जेव्हा आपण मलविसर्जन करता असतो तेव्हा ते आपल्या विष्टेवाटे शरीरातून बाहेर टाकले जात असते.

29) मान (Neck) :

मान सुदधा आपल्या शरीराचा महत्वाचा अवयव आहे.आपले डोके आणि शरीर हे मानेदवारेच एकमेकांना जोडलेले असते.

30) हनुवटी (Chin ):

हे आपल्या ओठाच्या खालच्या भागात असलेले हाडुक असते.हनुवटी मुळे आपणास बोलतांना ओठांची हालचाल करता येत असते.

31) छाती(Chest ) :

आपल्या मान आणि पोट यांच्या मधल्या भागास छाती असे म्हटले जाते.हा अवयव आपल्या शरीराच्या पुढच्या दिशेला असतो.

यात हृदय,फुफ्फुस,श्वासनलिका,अन्ननलिका आणि थायमस ग्रंथी यांच्यासारखे अनेक स्नायू आणि महत्त्वाचे अवयव देखील असतात.

मानवी शरीरातील इतर अवयव-(Other Parts Of Human Body In Marathi)

● नाभी(Navel) :

● हात (Hand) :

● बोटे( Finger ):

● पाय( Leg ):

● घोटा (Ankle) :

मानवी शरीरातील इतर अवयव- Other Parts Of Human Body In Marathi

● पायाची बोटे( Toes) :

● त्वचा(Skin) :

● गाल (Cheek) :

● ओठ( Lip) :

● खांदा( Shoulder) :

● बाहु ( Arm) :

● कंबर( Waist ):

● मनगट (Wrist ):

● अंगठा (Thumb) :

● तळहात(Palm ):

● मांडी (Thigh) :

● टाच( Heel) :

● कपाळ(Forehead) :

● चेहरा(Face) :

● मागची बाजु (Back) :

● घसा( Throat ):

● दाढी (Beard) :

● मिशा (Moustache) :

● नितंब (Hip ):

● नखे(Nail ):

● रक्त(Blood) :

● स्थन(Breast ):

● बगल(Armpit ):

● डोळयांवरची पापणी( Eyelid ):

● स्वरयंत्रात असणारे कंठातील पोकळी(Larynx):

● कवटी( Skull) :

● जबडा(Jaw) :

● सांधा(Joint) :

● नाकपुडी (Nostril ):

● नस(Nerve ):

● पंजा(Paw) :

● बरगडी( Rib ):

● फुप्फुसे(Lungs)

● स्नायु (Muscles) :

● पाठीचा कणा(Spine) :

Human Body Part विषयी वारंवार विचारले जाणारे अत्यंत महत्वाचे प्रश्न –

1)मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे?(Largest Organ In Human Body In Marathi)

त्वचा हा मानवी शरीरातील सगळयात मोठा अवयव आहे.

2)मानवी शरीरात मूत्रपिंडाचे स्थान कोठे आहे?(Location Of Kidney In Human Body In Marathi)

मूत्रपिंड(Kidney) हे आपल्या शरीरातील ओटीपोटाच्या आत,पाठीमागे,पाठीच्या कण्याच्या दोन्ही बाजूस(मागे), ते छातीच्या फासोळ्यांपर्यंत सुरक्षितपणे स्थित असते.

3)मानवी शरीरातील महत्वाचे अवयव कोणकोणते आहे?(Organ Of Human Body,Internal Body Parts In Marathi)

मानवी शरीरातील काही अत्यंत महत्वाच्या अवयवांची नावे पुढीलप्रमाणे आहे-

● यकृत(Liver)

● मुत्रपिंड (Kidney )

● हदय(Heart)

● फुप्फुसे (Lung )

● पोट(Stomach )

● आतडी(Intestine )

● मेंदु (Brain)

● स्वादुपिंड(Pancreas)

● प्लीहा (Spleen)

4 thoughts on “मानवी शरीराचे अवयव – Human Body Parts In Marathi”

Comments are closed.