प्रेमपत्र – Love Letters In Marathi

प्रेमपत्र – Love Letters In Marathi

प्रेम ही एक अशी भावना आहे जी आपल्या प्रत्येकाच्या हदयात असते.आणि हे प्रेम एकाच प्रकारचे नसुन अनेक प्रकारचे असते.

उदा,आई मुलावर आणि मुलगा आईवर करतो ते प्रेम,बाप मुलावर आणि मुलगा बापावर करतो ते प्रेम,बहिण भावावर आणि भाऊ बहिणीवर करतो प्रेम,भाऊ भावावर करतो ते प्रेम.

आणि ह्या प्रेमाव्यतीरीक्त देखील एक स्पेशल प्रेम असते ते म्हणजे पती पत्नीवर आणि पत्नी पतीवर करते ते प्रेम,एक प्रेमिका,प्रेयसी आपल्या प्रियकरावर आणि प्रियकर आपल्या प्रेयसीवर करतो ते जीवापाड प्रेम.

याचाच अर्थ प्रेम हे आपण प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या स्वरूपात कोणावर तरी करत असतो.

फक्त फरक एवढाच असतो काही व्यक्तींना ही प्रेमाची भावना शब्दांतुन मग ती कविता असो किंवा शायरी इत्यादी दवारे व्यक्त करता येते.

पण काही जण असे देखील असतात ज्यांना आपल्या हदयात साठवलेले एखाद्या व्यक्तीविषयीचे आपले प्रेम शब्दांत व्यक्त करता येत नसते.

मग असे प्रियकर आणि प्रेयसी गुगलवर सर्च करतात की मराठीत आपल्या प्रियकराला तसेच प्रेयसीला प्रेमपत्र कसे लिहायचे?

पण खुप शोधुनही आपल्या मनात भरेल ज्यातुन आपल्या भावना आपल्या प्रियकर तसेच प्रेयसीसमोर स्पष्टपणे आपल्याला पाहिजे तशा पदधतीने व्यक्त होतील असे प्रेमपत्र आपल्याला सापडत नसते.

म्हणुन आज आपण प्रेयसीला प्रेम पत्र -Love Letters For Girlfriend) तसेच प्रियकराला प्रेम पत्र-Love Letters For Boyfriend) कसे लिहायचे हे बघणार आहोत.

सोबत काही प्रेमपत्राचे नमुने देखील आपण इथे पाहणार आहोत.

प्रेमपत्र म्हणजे काय?-What Is Love Letter In Marathi

प्रेमपत्र हे एक असे साधन तसेच माध्यम आहे.ज्याच्या माध्यमातुन एक प्रेयसी आपल्या प्रियकराजवळ,प्रियकर आपल्या प्रेयसीजवळ पती आपल्या पत्नी जवळ आणि पत्नी आपल्या पती जवळ तिच्या मनात असलेले त्याच्याविषयीचे प्रेम व्यक्त करत असते.

प्रेमपत्र -Love Letters In Marathi

श्री राम नवमी मराठीत शुभेच्छा २०२३ | Ram Navami 2023 Wishes In Marathi, Quotes, Images, Best Images Download

प्रेमपत्राचे काही नमुने :

Love Letter For Crush, First Time Propose Love Letter In Marathi

प्रिय…

खुप दिवसांपासुन मला तुला काही सांगायचे आहे पण कधी तुला माझ्या मनातील भावना सांगण्याची हिंमतच झाली नाही.

खुपदा ठरवले की आज तुला माझ्या मनातले सर्व काही सांगुन टाकायच पण तु समोर आली की ओठातुन शब्द फुटेनासे होतात.

आणि मी एकदम निशब्द होऊन जातो.हदयाची स्पंदने अधिक वेगाने वाढु लागतात.आणि हे आजपासुन नाही तर जेव्हापासुन मी तुला पहिल्यांदा काँलेजात वर्गात पाहिले तेव्हापासुन होते आहे.जे आज मी तुला ह्या प्रेमपत्रातुन सांगु इच्छित आहे.

तसे पाहायला गेले तर तुला देखील चांगलेच माहीत आहे की मी एक पुस्तकी किडा आहे जो वर्गात एवढया सुंदर सुंदर मुली समोर बसलेल्या असताना देखील नेहमी पुस्तकात मान घालून बसलेला असतो.ज्यामुळे काँलेजातील सर्व प्रोफेसर देखील माझी नेहमी पाठ थोपटतात.आणि मी त्यांचा खुप लाडका देखील आहे.

स्वभावाने मी लाजाळु एकलकोंडा असल्याने मला आधीपासुनच कोणाशी अधिक मैत्री करणे आवडायचे देखील नाही.काँलेजात गेल्यावर देखील दिवसभर लायब्ररी मधील नवनवीन लेख ग्रंथ कविता साहित्य वाचण्यातच माझा सर्व दिवस जायचा.

कधी कोणा मुलीशी बोलणे तिच्याशी मैत्री करणे असा प्रकार कधी माझ्या आयुष्यात घडला देखील नाही.कारण मी नेहमी माझ्या अभ्यासावर आणि करीअरवर पुर्णपणे फोकस असायचो.

पण अचानक तु माझ्या आयुष्यात आली आणि माझ्या आयुष्याचा पुर्ण कायापालटच झाला.नेहमी पुस्तकात गुरफटुन राहणारा मी कधी तुझ्यामध्ये हळुहळु गुरफटु लागलो माझे मलाच कळले नाही.

वर्गात नेहमी मी काही ना काही कारणाने जसे की तुला सरांनी लिहुन दिलेल्या नोटस देणे,अभ्यासक्रमाविषयी काही अडचण असेल तर नोटस देऊन गाईड करून तुझी मदत करणे असे करून मी नेहमी तुझे लक्ष माझ्याकडे वेधून घेण्याचा प्रयत्न करायचो.तुझ्याशी सतत काही ना काही कारण काढुन बोलण्याचा प्रयत्न करायचो.हे असे का व्हायचे हे माझे मलाच कळत नव्हते.

पण सतत तुझ्यासोबत बोलावा,तुझ्यासोबत जास्तीत जास्त वेळ व्यतित करावा असे वाटायचे.त्यातच तुझ्यासोबत कोणी दुसरा मुलगा बोलताना दिसुन आला की मनात त्या मुलाविषयी राग संताप आणि तुला गमवण्याची एक भीती सतत निर्माण व्हायची.

याचकरीता एकेदिवशी मनाशी दृढ निश्चय केला की तुला माझ्या मनातील तुझ्याविषयीच्या असलेल्या सर्व भावना सांगुन टाकायच्या,व्यक्त करून टाकायच्या,म्हणुन तुला आज हे पत्र लिहिले.

यावर तुझी काय प्रतिक्रिया असेल मला माहीत नाही.पण एवढेच सांगु शकतो कळत नकळत मी तुझ्यावर खुप करायला लागलो आहे.

मी माझे प्रेम तुझ्यावर अजिबात लादणार नाही.तुझा माझ्या प्रेमाला होकार असेल तर मला खुप आनंद होईल आणि नकार असेल तर मी तुझ्या त्या निर्णयाचा देखील हसतमुखाने स्वीकार करेन.

शेवटी आयुष्य तुझे आहे म्हणुन तु कोणावर प्रेम करावे हे ठरवण्याचा अधिकार तुझाच आहे आणि तुझाच राहणार.

पण मी फक्त एवढेच सांगेन की तु माझ्या आयुष्यातील पहिली अशी मुलगी जिच्याशी मला स्वताहुन तासनतास बोलत राहावेसे वाटते.

आणि माझ्या आयुष्यातील तुच ती एकमेव मुलगी आहे जिच्यासोबत मला माझा जास्तीत जास्त वेळ व्यतीत करावासा वाटतो.मी तुझ्या उत्तराची वाट बघेन.

तुझाच …

मैत्रिणीसाठी प्रेम पत्रLove Letter For Girlfriend In Marathi

प्रिये…

कशी आहेस तु?

तुझ्याशी आज खुप बोलावे असे वाटते आहे.कस सांगु तुला की तुझ्याविना माझे कशातच मन लागत नाहीये.

तुझ्याविना एक तास काढणे देखील एक वर्षासारखे वाटते आहे मला जेवण सुदधा गोड लागत नाही.

सध्या कुठल्याच कामात माझे मन देखील लागत नाहीये.सतत डोळयासमोर तुझाच चेहरा येत असतो.सतत तुझीच आठवण येत असते.

दिवसातील एक सुदधा असा क्षण नाही ज्यात मला तुझी आठवण येत नाही.तुझ्याशिवाय एक एक क्षण सुदधा जगणे आता खुप अवघड जाते आहे.

तुझ्यासोबत घालवलेला एक एक प्रेमाचा तो अनमोल क्षण मला सतत आठवत राहतो माझ्या डोळयांसमोर सतत ते चित्र येत राहते.मग तुला भेटण्याची तुला आपल्या मिठीत घेण्याची ओढ दिवसेंदिवस अधिकच वाढत जाते.

आता मला हा विरह हा दुरावा अजिबात सहन होत नाहीये.कधी तुला भेटेन तुझ्याशी बोलेन मनभरून तुला पाहील असे झाले आहे.

तु आज जिथेही असशील तिथुन लवकरात लवकर माझ्यासाठी परत ये.तुला खुप काही सांगायच आहे,खुप काही तुझ्याशी बोलायच देखील आहे.तुझा हात हातात घेऊन प्रेमाचे हितगुज करायचे आहे.

जेव्हापासून तु माझ्या आयुष्यात आली तेव्हापासुन माझे आयुष्य पुर्णत बदलून गेले.तु माझ्या आयुष्यात आल्यापासुन खरया अर्थाने मी आयुष्य जगायला सुरूवात केली.

तु जेव्हापासुन माझ्या आयुष्यात आली तेव्हापासुन मला आयुष्य अजुन जास्त सुंदर वाटु लागले आहे.

तुझ्या असण्याची थोडी चाहुल जरी मनाला लागली तरी मन कसे सैरभैर होऊ लागते.वेडयासारखे तुला इकडेतिकडे शोधू लागत.

तु माझी ताकद आहेस तु माझी स्फुर्ती आहेस तुझा फक्त चेहरा जरी डोळयासमोर आला की माझा सर्व थकवा शरीरातील सर्व मरगळ निघुन जाते.

तु माझा जगण्याचा आधार आहेस.माझ्या प्रत्येक श्वासामध्ये फक्त तुच आहेस.

फक्त तुझाच ..

बाँय फ्रेंडसाठी प्रेम पत्र – Love Letter For Boyfriend In Marathi

प्रिय,

मला आज तुला माझ्या मनातील सर्व काही सांगायच आहे.जेव्हा पासुन मी तुझ्या प्रेमात पडली आहे.तुझ्याशिवाय मला दुसरे काहीच दिसत नाही.

का कुणास ठाऊक माझ्यासोबत असे का घडते आहे.दिवसरात्र माझ्या मनात फक्त तुझाच विचार सतत चाललेला असतो.इतकी मी तुझ्यामध्ये आज गुरफटली आहे.

आयुष्यात कधी वाटले नव्हते की कोणीतरी मला इतक आवडायला लागेल की त्याच्याशिवाय जीवणात मला दुसरे काहीच नको असेल.जेव्हापासुन तुझ्या प्रेमात पडली आहे मी पुर्णपणे तुझीच झाली आहे.वाटले नव्हते की इतके प्रेम मी आयुष्यात कोणावर कधी करेल.

तशी मी कधीच कोणा मुलाशी जास्त बोलत नाही मैत्री करत नाही,कुठलीही जवळीक साधत नाही.कारण आत्ताची बरीच मुले मुलींना फसवतात,त्यांची छेडछाड करतात त्यांना त्रास देतात.

पण जेव्हा तु माझ्या सोबत असतोस मला खुप सुरक्षित वाटते.तुझ्यासोबत बोलणे,तुझ्यासोबत तासनतास गप्पा मारण्यात वेळ व्यतित करणे मला खूप आवडते.तुझ्यासोबत असताना मला कसली भीती देखील वाटत नाही.

असे का होते मला माहीत नाही.पण मला असे वाटते की तु मला आवडु लागला आहेस.मी तुझ्यावर खुप प्रेम करू लागले आहे.

हे पत्र वाचल्यानंतर तुला कसे वाटेल मला माहीत नाही.कारण तुझ्या मनात माझ्याविषयी तेच प्रेम आहे का जे मला तुझ्याविषयी जाणवते.हे मला अजुनही माहीत नाही.

माझे प्रेम तुला मान्य आहे का लवकरात लवकर तुझ्याही भावना मला कळव.

शेवटी एवढेच सांगते की माझ्या आयुष्यात सदैव असाच राहा.असाच माझा बनून राहा.कधीही मला एकटे सोडुन जाऊ नकोस.

तुझीच …

पतीसाठी प्रेम पत्र – Love Letter For Husband In Marathi

प्रिय पती,

आपले लग्न झाल्यानंतर मी तुम्हाला लिहिलेले हे पहिलेच प्रेमपत्र आहे.आपल्या लग्नाला आज कित्येक वर्षे झाली.

पण तुमच्या सोबत जीवन व्यतीत करताना मला कधी असे जाणवलेच नाही असे वाटते काही दिवसांपुर्वीच आपण लग्नाच्या बंधनात अडकलो आहे.

जेव्हापासुन तुम्ही माझ्या आयुष्यात आले आहे माझ्या आयुष्याचे अगदी सोने झाले आहे.तुम्हाला आठवते का आपण जेव्हा आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करायला बाहेरगावी फिरायला गेलो होतो.तेव्हा आपला अथर्व फक्त वर्षाचा होता.

तेव्हा नजरचुकीने तुमच्या हाताला माझ्याकडुन दुखापत झाली होती.त्याची खंत अजुनही माझ्या मनात आहे.

आज आपण भाडयाच्या घरात राहत असलो तरी आजपर्यत तुम्ही मला आयुष्यात कसलीही कमतरता भासु दिली नाही.माझे सर्व हटट पुरविले.मला नेहमी प्रत्येक बाबतीत सपोर्ट केला.

स्वताच्या ईच्छा मारून आधी माझ्या ईच्छा तुम्ही आत्तापर्यत नेहमी पुर्ण करत आले आहे.

मी खुप भाग्यवान आहे की मला तुमच्यासारखा जीवनसाथी प्राप्त झाला.जन्मोजन्मी मला तुम्हीच पती म्हणुन पाहिजे आहात.माझे तुमच्यावर खुप प्रेम आहे.

तुमची पत्नी …

बायकोसाठी प्रेम पत्र-Love Letter For Wife In Marathi

प्रिय,

आपल्या लग्नाला आज किमान आठ दहा वर्षे झाली असतील पण मी तुला कधीच एकदाही प्रेमपत्र लिहिले नाही तुझ्याशी लग्न झाल्यानंतरचे मी तुला लिहिलेले हे पहिलेच प्रेमपत्र आहे.

तुझ्या सोबत लग्न होऊन मला आठ दहा वर्षे झाली पण तुझ्यासोबत जीवन व्यतीत करताना ही आठ दहा वर्षे कशी निघुन गेली मला काही कळलेच नाही असे वाटते काही दिवसांपुर्वीच मी तूझ्यासोबत लग्नाच्या बंधनात अडकलो आहे.

जेव्हापासुन तु माझ्या आयुष्यात आली आहे माझ्या आयुष्याचे अगदी सोने झाले आहे.तुला आठवत असेल लग्नानंतर आपण कित्येक दिवस भाडयाच्या घरात किती हलाखीत दिवस काढले होते

प्रसंगी आपण अक्षरश एका ताटात चटणी भाकर खाऊन दिवस काढले.

आज आपण कित्येक वर्षे भाडयाच्या घरात राहीलो असेल पण तू कोणत्याच बाबतीत माझ्याजवळ तक्रार केली नाहीस.आजही सुखाने आणि आनंदाने अडीअडचणींना तोंड देत आपला संसार चालवते आहेस.आपल्या मुलांची काळजी घेते आहेस माझी काळजी घेते आहेस.

सुख असो किंवा दुख आजपर्यत तु नेहमी मला प्रत्येक बाबतीत सपोर्ट केला.माझ्या अडीअडचणीच्या काळात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीलीस.

स्वताच्या ईच्छा मारून आधी माझ्या आणि आपल्या मुलांच्या ईच्छा तु आत्तापर्यत नेहमी पुर्ण करत आली आहेस.

मी खुप भाग्यवान आहे की मला तुझ्यासारखी पत्नी जीवनसाथी म्हणुन प्राप्त झाली.जन्मोजन्मी मला तुच माझी बायको म्हणुन हवी आहेस.माझे तुमच्यावर खुप प्रेम आहे.

तुझाच

1 thought on “प्रेमपत्र – Love Letters In Marathi”

Comments are closed.