गुरूपौर्णिमा निबंध अणि भाषण – Guru Purnima essay and speech in Marathi

गुरूपौर्णिमा निबंध अणि भाषण Guru Purnima essay and speech in Marathi

गुरूपौर्णिमा हा गुरू अणि शिष्य यांच्यामधील पवित्र नात्याचा सण तसेच उत्सवाचा दिवस आहे.हा दिवस महान त्रषी मुनी महर्षी व्यास यांच्या आठवणीत साजरा केला जातो.म्हणुन याला व्यास पौर्णिमा असे देखील म्हटले जाते.

महर्षी व्यास हे सर्व गुरूंचे गुरू होते.त्यांनी अठरा पुराण, श्रीमदभगवद्गीता,महाभारत यांचे लेखन केले.

गुरूपौर्णिमेचे महत्व –

गुरू अणि शिष्य या दोघांचे नाते खुप पवित्र असते.असे म्हटले जाते की जर आपणास जीवनात खुप यशस्वी व्हायचे असेल तर आपण एक चांगल्या गुरूचे मार्गदर्शन घेणे फार गरजेचे आहे.

गुरू,शिक्षक हा तो व्यक्ती असतो जो स्वता आहे तिथेच राहतो पण आपल्या प्रत्येक शिष्याला यशाच्या उंच डोंगरावर घेऊन जात असतो.अणि आपल्या शिष्याला जीवनात खुप यशस्वी झालेले पाहुन गुरूची मान अभिमानाने उंचावली जात असते.

गुरूला आज आपण देवाचा दर्जा दिला जातो.गुरूविना महान अणि मोठा झाला असा एकही व्यक्ती आज आपणास ह्या जगात दिसुन येत नाही.कारण तोच आपल्याला योग्य तो मार्ग दाखवून मार्गदर्शन करून आपल्या जीवनाला एक योग्य दिशा देत असतो.

गुरूचे मार्गदर्शन हे प्रत्येकाच्या जीवनात महत्वाचे असते.अणि असे म्हटले देखील जाते की गुरूशिवाय ज्ञान नाही.गुरूच आपल्याला ज्ञान प्रदान करून अज्ञानाचा सज्ञान बनवित असतो.

आपले गुरूच आपणास नेहमी खरे बोलावे अणि सत्याचा मार्ग अवलंबित करावा ही अनमोल शिकवण देत असतात.अणि समाजामधील एक आदर्श नागरीक तसेच व्यक्ती बनवून आपल्या व्यक्तीमत्वाला आकार देत असतात.

गुरूच तो व्यक्ती आहे जो आपल्या अंधकारमय जीवणाला ज्ञानाच्या प्रकाशात घेऊन जात असतो.गुरूच आहे जो दगडा प्रमाणे असलेल्या शिष्यास योग्य आकार देऊन त्याची मुर्ती साकारत असतो.

See also  हर घर तिरंगा मराठी घोषवाक्ये -Har Ghar Tiranga Marathi Slogans

म्हणुन आपल्या जीवनाला एक योग्य आकार दिशा प्राप्त करून देणारया गुरूविषयी कृतज्ञता आदर व्यक्त करण्यासाठी त्यांचे मनापासुन आभार मानण्यासाठी त्यांच्या समर्पणाचे कौतुक करण्यासाठी आपण दरवर्षी गुरू पौर्णिमा साजरी करत असतो.

हिंदु धर्मीय लोक यादिवशी महर्षी व्यास यांची पुजा करतात तर बौदध धर्मात याचदिवशी गौतम बुदध यांच्या प्रतिमेची पुजा केली जात असते.

गुरूपौर्णिमा हा तो दिवस आहे ज्या दिवशी प्रत्येक शिष्य आपल्या गुरूची भेट घेतो त्यांचा आर्शिवाद प्राप्त करतो.आषाढ महिन्यामधला हा पौर्णिमेचा दिवस हिंदु धर्मीय वर्षातील खुप शुभ दिवस मानला जातो.

गुरूपौर्णिमेला गुरूची उपासना केल्याने आपणास गुरूच्या दिक्षेचे पुर्ण फळ मिळत असते.याच दिवशी गुरूच्या नावाने काही जण दानपुण्य देखील करत असतात.

ह्या वर्षी 2022 मध्ये 13 जुलै रोजी बुधवार दिवशी हा सण उत्सव केला जाणार आहे.

गुरूचे महत्व –

असे म्हणतात की आपली पहिली गुरू आपली आई असते वडील असतात कारण आईच तिच्या गर्भात वाढत असताना आपल्यावर चांगले संस्कार करत असते.

ह्या जगात आपण जन्माला आल्यावर आपल्यास आपले आईवडीलच आपणास चांगले काय वाईट काय याचे ज्ञान देत असतात.आपल्यावर उत्तम संस्कार करत असतात.आपले पालन पोषण करत असतात.

 • मग हळुहळु आपण जसे मोठे होतो आपण शाळेत जाऊ लागतो शिक्षण करू लागतो तेव्हा तिथे शिक्षकाच्या रूपात आपल्याला आपला दुसरा गुरू मिळत असतो.
 • जो आपल्याला साक्षर अणि सामर्थ्यवान ज्ञानसंपन्न बनवित असतो.अणि आपणास एक कतृत्ववान अणि कर्तबगार व्यक्ती बनवित असतो.
 • आपला तिसरा गुरू असतो आपले जीवनातील अनुभव जे आपल्याला जसजसे आपण मोठे होते तसतसे रोज काही ना काही शिकवत असतात.गुरू शिष्याची आज अनेक महान आदर्श उदाहरणे आज आपण सांगु शकतो.
 • शिवाजी महाराज यांच्या गुरू राजमाता जिजाऊ होत्या म्हणून ते एवढे शुर धाडसी,पराक्रमी अणि धर्मनिष्ठ होते.शुर एकलव्याचे गुरू द्रोणाचार्य होते.
 • आपल्या गुरूला दक्षिणा म्हणुन आपला अंगठा काढुन देणारया एकलव्याने द्रोणाचार्याची प्रतिमा डोळयासमोर ठेवुनच धनुर्विदया प्राप्त केली होती.

2022 मध्ये गुरू पौर्णिमेला आपल्या गुरूंना गिफ्ट देण्यासाठी गिफ्ट आयडीया- Guru Purnima Best Gift Ideas For Teachers

 

गुरूपौर्णिमा व्रत पुजा-विधी शुभ-मुहुर्त -Guru Purnima muhurat and significance

गुरू पौर्णिमा कोटस अणि शुभेच्छा – Guru Purnima quotes and wishes in Marathi

5 thoughts on “गुरूपौर्णिमा निबंध अणि भाषण – Guru Purnima essay and speech in Marathi”

 1. Guru manje aaplya jivanatla important person to aaplayla kas vagave kas vagu nye he shikvat 1st guru hi aapli aai aste ani nantar aapn jasjase mothe hoto school la jato teva aaplayla ajun ak aai milte te manje aaplya jivnachi vat te aaplya future madhe kase success achieve karta yete te sangtat te aaplyala kalt ny manun aapn tyanchya var rag derto nantar aapan mothe jalyavar kalt te aaplya sathi ki important hote te manje guru me mun. Madhe ahe 10th la shikte mla aamche Teacher rancha khup abhindhan karav vatat karn te aamala ekdhem private school sarkha teach karatat me mala kup aavadat pan me tyana kadhi ny bole pan ak divas me bolen he mala khatri ahe mala maje Teachers kup aavadatat mala tynchavar garv ahe he majhe Teacher’s sarv teachers na mazya kadhun gurupornimechya hardhik subechhat

  • धन्यवाद. नक्कीच आपण गुरुबद्दल आपल्या भावना, कृतज्ञाता व्यक्त करायलाच हव्यात
   गुरु ब्रह्मा, गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा
   गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुदेव नम:

 2. २०२२ मध्ये गुरु पौर्णिमा बुधवार दिनांक १३ जुलै रोजी साजरी होणार आहे

  • धन्यवाद,, दिनांक 13 जुलै , लिहताना सोमवार असे लिहले गेले,, बुधवार हवे होते. दुरुस्त केली.

Comments are closed.