जीवनातील यशाचं रहस्य – Earl Nightingale – Strangest secret Summary in Marathi

जीवनातील यशाचं रहस्य – Earl Nightingale – Strangest secret Summary in Marathi

आपल्या समाजामध्ये खूप जण असे आहे आहेत जे की यशस्वी आहेत ,त्यांच्या कडे धन दौलत भरपूर आहे आणि या विरूद्ध खूप जण असे आहेत जे की फार गरीब आहेत किंवा घर चालवण्यासाठी जॉब शोधत आहेत.अशा यशस्वी आणि अयशस्वी लोकांमधे काय फरक आहे नेमका ? याचेच रहस्य Strangest secret या पुस्तकामध्ये Earl nightengale यांनी सांगितले आहे.तुम्ही जर Strangest secret हे पुस्तक वाचले तर तुम्हाला पण ते सिक्रेट ज्याचा वापर करून यशस्वी बनता येतं हे समजेल आणि त्या सिक्रेट चां वापर करून तुम्ही यशस्वी होऊ शकता.

Earl nightengale यांनी Strangest secret हे पुस्तक लिहिले.

The Strangest Secret Paperback – 9 January 2017 by Earl Nightingale (Author) 4.7 out of 5 stars 2,901 ratings

Strangest secret म्हणजे काय ?

Strangest secret याचा अर्थ असा की ,जो आपण मनात विचार करतो तसेच आपल्या सोबत घडत असते.

आपण मनात जर विचार करत असलो की आपण परीक्षेत नापास होणार तर आपण नापासच होतो आणि आपण जर मनात विचार केला तर पेपर आपल्याला सोपे गेलेत आणि आपल्याला चांगले मार्क्स पडतील.तर तुम्हाला परीक्षेत चांगले मार्क्स पडण्याचे चान्सेस खूप वाढतात.

आपण जर मनात विचार करत असलो की,आपण कायम गरीबच राहणार ,तर आपण कधीही श्रीमंत होऊ शकणार नाही.

हा विचार आपला समाजच किंवा आपले पालकच आपल्या मनामध्ये भरवत असतात..तुम्ही खूप वेळा पालकांकडून हे वाक्य नक्की ऐकले असेल ,”तू आयुष्यात काहीच करू शकनार नाहीस” हे वाक्य आपल्या मनात घर करते.

See also  सर्दीवर करावयाचे घरगुती उपाय -Home remedies for cold

जर तुम्हाला कमी मार्कस पडले तर शिक्षक तुम्हाला लगेच म्हणतात ,”तू आयुष्यात काहीच करू शकणार नाही” या वाक्याचा देखील आपल्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम होतो आणि आपण मोठे स्वप्न पाहायला घाबरतो.आपण लहापणापासून च नकारात्मक विचारांपासून शक्य तितके लांब राहिलो पाहिजे.

काय होईल जर तुम्हाला मार्कस कमी पडले तर ? मार्कस कमी पडले म्हणून तुम्ही मोठा डॉक्टर किंवा इंजनिअर बनू शकणार ,परंतु तुम्ही मोठा व्यावसायिक जरूर बनू शकता.व्यावसायिक ,फिल्म स्टार , स्पोर्ट पर्सन बनण्यासाठी तुम्हाला कोणत्याही मार्कस ची आवश्यकता लागत नाही ,फक्त तुमच्याकडे टॅलेंट असले पाहिजे.

त्यामुळे कधीही कोणत्याही परिस्थितीत नकारात्मक विचार आपण केला नाही पाहिजे आणि आपण सतत सकारात्मक विचार केला पाहिजे.कारण Strangest secret पुस्तक तर हेच सांगते की,जसे तुम्ही सारखे मनात म्हणता तेच तुम्ही बनता.

२) यशाची व्याख्या –

एका रिसर्च नुसार १०० लोक जर २५ वयाचे असतील तर पंचवीस वयानंतर ते काय बनतील ? एका रिसर्च नुसार त्या १०० मधील एक जण श्रीमंत बनेल ,५ जण चांगल्या प्रोफेशन मधे जातील ,१० जणांना चांगली नोकरी लागेल आणि राहिलेले ८६ जण स्ट्रगल ची जिंदगी जगतील.

उरलेल्या ८६ मुलानंयशा पर्यंत पोहोचण्याचे सिक्रेट च माहित नसते.त्यांचे विचार नेहमीं छोटे असतात.एक म्हण आहे ,माणूस कमाई ने श्रीमंत नसला तरी चालेल ,परंतु माणूस विचाराने श्रीमंत असला पाहिजे.

तुमचे श्रीमंत विचारच तुम्हाला एकदिवस श्रीमंत बनवतील.याविरुद्ध ते ८६ जण हा विचार करत असते ,

आपण ही एक दिवस नक्की मोठे होऊ ,त्यांनी जर सकारात्मक विचार केला असता आणि स्वतःला कधीही कमी समजले नसते ,तर ते मोठे झाले असते.तुमचे जे काही ध्येय आहे त्याबाबतीत दिवसातून कमीतकमी ५ मिनिटे तरी तुम्ही विचार केला पाहिजे.

३) माणसे यशस्वी का होत नाहीत ?

लेखकांच्या मते आपल्या आसपास खूप प्रकारची संधी आहे ,परंतु लोकांना यशाचे सिक्रेट माहित नाही त्यामुळे त्यांना या संधीचे सोने करता येत नाही.

See also  दुसर्यां चे व्हाट्सएप स्टेटस कसे डाऊनलोड करावे ? how to download whatsapp status of others marathi

समजा एका गरीब वस्तीतील मुलाला यू ट्यूब र बनायचे असेल तर त्याने आधी त्यावर दररोज विचार केला पाहिजे.नंतर त्याने एखादा निचे निवडून त्या सबंधित चे व्हिडिओ बनवले पाहिजे आणि दररोज किंवा दर आठवड्याला व्हिडिओ अपलोड केले पाहिजेत.त्याने आपले स्वतःचे व्हिडिओ स्वतः पाहून त्यामध्ये झालेल्या चुका पुढच्या व्हिडिओ मधे केल्या नाही पाहिजेत.असे जर त्याने केले तर तो एकदिवस मोठा यू ट्यूबर नक्की बनेल.

४) आपल्यावर आणि आपल्या ध्येयावर आपला विश्वास असला पाहिजे.तुम्हाला Strangest secret या पुस्तकातील सिक्रेट वरती विश्वास असला पाहिजे.नाहीतर काहीजन म्हणतात हे सिक्रेट फालतू आहे ,याचा भविष्यात काहीही फायदा होणार नाही.तुम्ही त्यांच्या गोष्टीला न जुमानता या पुस्तकात दिलेल्या सिक्रेट वर विश्वास ठेऊन त्यात सांगितल्या प्रमाणे प्रयत्न केले पाहिजेत.

५) तुम्ही तुमच्या आयडिया ला आपल्या ब्रेन मधे रोवले पाहिजे आणि त्याला खतपाणी म्हणून त्या संबंधी दररोज विचार केला पाहिजे आणि त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

६) आपण जे होणे शक्य आहे असेच ध्येय ठेवले पाहिजेत.जे घडने अशक्य आहे असे ध्येय ठेवले नाही पाहिजे.समजा एखादा गरीब घरातील मुलगा मोठे रेस्टॉरंट टाकू इच्छितो ,परंतु त्याच्याकडे मोठे हॉटेल टाकण्या इतके पैसे नाहीयेत.तर अशावेळी त्याने मोठ्या हॉटेलची इच्छा न ठेवता छोट्या हॉटेल ची किंवा छोट्या टपरी ची ईच्छा ठेवावी आणि त्यासाठी प्रयत्न करावे.

७) स्वतःला कमी समजण्याची चूक कधीही करू नये.आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक म्हणजे स्वतःला कमी समजणे.आपण कधीही कोणत्याही परिस्थितीत स्वतःला कमी समजले नाही पाहिजे.आपण आपली क्षमता ओळखली पाहिजे आणि ती वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

८) ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी काम केले पाहिजे.तुम्ही हे काम करताना तुम्हाला ती कामे का करू नये याची खूप कारणे मिळतील.पण अशा कारणांना न जुमानता आपण आपले काम केले पाहिजे.

See also  भारतातील सर्वोत्तम दहा बँक - 2021  - List of top Indian Banks in Marathi

९) आपले गोल वहीवर लिहिणे – आपण आपले गोल वहीवर लिहिले पाहिजे.त्यात सुरवातीला एका वर्षापर्यंत आपण स्वताला कुठे पाहू इच्छितो हे वहीवर लिहून आणि तिथं पर्यंत पोहोचण्यासाठी करावी लागणारी कामे केली पाहिजेत.