CV आणि RESUME या दोघांमध्ये काय फरक आहे? – Difference Between CV And Resume in Marathi

CV आणि RESUME म्हणजे काय ?Difference Between CV And Resume in Marathi

 आपले शिक्षण पुर्ण झाल्यानंतर आपण घेतलेल्या शिक्षणाच्या आधारावर जेव्हा आपण एखाद्या कंपनीत,संस्थेत तसेच इतर कुठल्याही ठिकाणी जाँबसाठी अँप्लाय करत असतो तेव्हा त्या कंपनीकडुन कधी आपला रिझ्युम तर कधी सीव्ही मागितला जात असतो.

अशा वेळी आपल्या मनात एक प्रश्न निर्माण होत असतो की प्रत्येक ठिकाणी आपण जेव्हा जाँबसाठी अँप्लाय करत असतो तेव्हा काही कंपनी आपला सीव्ही मागत असतात तर त्याचठिकाणी काही कंपनीत आपला रिझ्युम देखील मागितला जात असतो असे का होते?

रिझ्युम आणि सीव्ही दोघेही आपण जाँबसाठी अँप्लाय केल्यावर आपल्याकडुन मागितले जात असतात.मग अशा वेळी आपण जाँबसाठी अँप्लाय करण्यासाठी जाताना रिझ्युम सोबत घेऊन जायचा की सीव्ही हा सगळयात मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहत असतो.

यातच जाँबसाठी अँप्लाय करताना सीव्हीचे काय महत्व असते?आणि रिझ्युमचे काय महत्व असते?हे आपल्यापैकी खुप जणांना माहीतच नसते.तसेच रिझ्युम आणि सीव्ही या दोघांमध्ये काय फरक आहे हे देखील आपल्यापैकी खुप जणांना माहीत नसते.ज्यामुळे आपली अनेकदा फजिती देखील होत असते.

चेक आणि डिमांड ड्राफ्ट या दोघांमध्ये काय फरक आहे?

कारण रिझ्युम आणि सीव्ही दोघांमधला फरक माहीत नसल्याने जाँबसाठी अँप्लाय करताना आपण आपला रिझ्युम मागितल्यावर सीव्ही दाखवत असतो.आणि सीव्ही मागितल्यावर रिझ्युम दाखवत असतो असे देखील खुप गंमतीशीर प्रकार घडत असतात.

आपली देखील अशी फजिती तसेच दिशाभुल होऊ नये यासाठी आपण आज सीव्ही आणि रिझ्युम या दोघांमधला फरक सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

 

CV आणि RESUME Difference Between CV And Resume in Marathi

सीव्हीचा फुल फाँर्म (curriculum vitae) असा होत असतो.

जेव्हा आपण एखाद्या जाँबसाठी अँप्लाय करत असतो तेव्हा आपल्या शैक्षणिक अहर्तेविषयी सविस्तर माहीती जाणुन घेण्यासाठी आपल्याकडुन आपला सीव्ही मागितला जात असतो.

 

रिझ्युममध्ये खालील गोष्टी दिलेल्या असतात

 

रिझ्युमचा अर्थ समरी असा होत असतो. रिझ्युममध्ये आपली सर्व माहीती ही संक्षिप्त स्वरूपात दिलेली असते.जाँबसाठी रिझ्युम हा विशेषकरून ईमेल द्वारे पाठविला जातो.

 

 

सीव्ही हा साधारणत तीन ते चार पानांचा असतो.

 

जेव्हा आपली नोकरीसाठी मुलाखत घेतली जाते तेव्हा इंटरव्युहच्या दरम्यान आपल्याविषयी सर्व काही डिटेल जाणुन घेण्यासाठी आपला सीव्ही मागितला जात असतो.

 

रिझ्युम हा जास्तीत जास्त एक किंवा दोन पानांचा असतो.

रिझ्युम मध्ये आपल्या अंगी असलेल्या कलागुणांविषयी,आपल्या शैक्षणिक अहर्तेविषयी,आपल्या स्पेशलाइझेशन बददल अत्यंत संक्षिप्त स्वरुपात माहीती दिलेली असते.

 

सीव्ही हा आपल्याकडुन मुलाखतीच्या दरम्यान आपल्याविषयी सविस्तर माहीती जाणुन घेण्यासाठी मागितला जात असतो.

 

आपला रिझ्युम बघुन मुलाखत घेत असलेल्या व्यक्तीला आपल्या अनुभवाविषयी तसेच शैक्षणिक पात्रते विषयी थोडक्यात माहीती मिळत असते.

 

जे उमेदवार नुकतेच पदवी प्राप्त करून जाँबसाठी फ्रेशर्स म्हणुन अँप्लाय करत आहे अशा उमेदवारांकडुन सीव्हीची मागणी केली जाते.कारण अशा फ्रेशर्सला जाँब विषयी अधिकतम माहीत नसते.रिझ्युम मध्ये आपल्याविषयी सर्व माहीती सविस्तरपणे दिलेली नसते.म्हणजे यात फक्त आपली शैक्षणिक पात्रता,आणि घेतलेल्या पदव्यांची नावे दिलेली असतात.
 

सीव्ही मध्ये आपल्या संपुर्ण शैक्षणिक कारकिर्दीत कोणता प्रसंग कधी घडला याचा क्रम माहीत असणे गरजेचे असते तसेच हे क्रमाने देणे आवश्यक असते.

सीव्ही मध्ये जसे आपले शिक्षण,कला गुण,एक्सपर्टीज डिग्री,कोर्सेस,याआधी जाँब केलेली पोझिशन तसेच अँचीव्हमेंटविषयी सविस्तरपणे सांगितलेले असते तसे इथे सांगितले जात नाही.इथे फक्त आपले शिक्षण आणि प्राप्त केलेल्या पदवीविषयी केलेल्या कोर्सेसविषयी,थोडक्यात दिलेले असते.
सीव्हीमध्ये आपला कामाचा संपुर्ण अनुभव दिलेला असतो.म्हणुन एखाद्या हाय पोस्टसाठी अँप्लाय करताना आपण सीव्ही देणे अधिक चांगले असते.

सीव्ही मध्ये आपले शिक्षण,आपल्या अंगी असलेले गुण तसेच आपण प्राप्त केलेल्या डिग्री,यश अवाँर्डस आपले स्पेसलाइझेशन,आधी कुठे आणि कोणत्या पदावर होतो इत्यादी छोटयात छोटया बाबी देखील दिलेल्या असतात.

 

 

रिझ्युम आपण जाँबसाठी अँप्लाय केल्यावर आपल्याविषयी थोडक्यात आणि महत्वपुर्ण अशी संक्षिप्त स्वरुपात माहीती प्राप्त करण्यासाठी मागितला जातो.

 

 

 

 

 

See also  आषाढी एकादशीच्या शुभेच्छा,कोटस अणि अभंग