Trade mark म्हणजे काय? ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्स – Trade mark complete information in Marathi

Trade mark म्हणजे काय?Trade mark complete information in Marathi

 जेव्हा एखादी कंपनी मार्केटमध्ये आपले एखादे नवीन प्रोडक्ट तसेच सर्विस आणत असते.तेव्हा मार्केटमध्ये आपल्या कंपनीचा आपल्या प्रोडक्टचा एक ब्रँण्ड तयार करण्यासाठी कुठलीही कंपनी आपल्या कंपनीचा एक लोगो डिझाईन करत असते.

जो इतर प्रतिस्पर्धींपेक्षा आपले उत्पादन किती वेगळे आहे हे दर्शवण्याचे काम करत असतो.म्हणजे समजा जेव्हा आपण एखादे प्रोडक्ट खरेदी करत असतो तेव्हा प्रोडक्ट खरेदी करण्याच्या अगोदर आपण त्या कंपनीचा ट्रेडमार्क सर्वात आधी चेक करत असतो.

याला देखील एक कारण आहे बाजारात आज अशा देखील खुप फेक कंपन्या आज उपलब्ध आहेत ज्या आपल्याला त्यांचे नकली प्रोडक्ट देऊन मोकळे होत असतात.

म्हणुन असे नकली प्रोडक्ट आपल्या माथी पडु नये म्हणुन बाजारातील कुठल्याही प्रकारचे प्रोडक्ट खरेदी करण्याआधी आपण सर्वप्रथम त्याचे ट्रेडमार्क बघत असतो.

आजच्या लेखात आपण ह्याच ट्रेडमार्कविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

ट्रेडमार्क म्हणजे काय? What is Trademark

ट्रेडमार्क हा एक लोगो तसेच सिम्बाँल असतो.जो आपण आपल्या कंपनीच्या प्रोडक्टच्या सुरक्षेसाठी तयार करत असतो.

म्हणजेच समजा आपण स्वताचा एखादा बिझनेस सुरू केला आणि आपण मार्केटमध्ये आपले एखादे प्रोडक्ट विकतो आहे तेव्हा ते प्रोडक्ट आपल्याच कंपनीचे आहे की  नकली प्रोडक्ट आहे हे कस्टमरला कळण्यासाठी आपण आपल्या प्रोडक्टवर आपल्या कंपनीचे ट्रेडमार्क देत असतो.

ट्रेडमार्क हे विविध स्वरूपात असु शकते ज्यात कंपनीचा लोगो,सिम्बाँल,नाव,डिझाईन किंवा एखादे पिक्चर शाँर्ट स्लोगन इत्यादींचा समावेश असतो.

See also  बाबासाहेब आंबेडकर यांचे आडनाव आंबेडकर कसे पडले? तसेच आंबेडकरांच्या संपुर्ण वंशावळ अणि तिचा इतिहास काय आहे? - Ambedkar surname History

ट्रेडमार्कमुळे आपण जे प्रोडक्ट खरेदी करतो आहे ते नेमके कुठल्या कंपनीचे आहे हे कस्टमरला कळत असते.सोबतच याने आपल्या कंपनीचा तसेच प्रोडक्ट सर्विसचा एक ब्रँण्ड तयार होत असतो.

ट्रेडमार्क करण्याचे फायदे कोणकोणते असतात?

आपण आपला नवीन व्यापार तसेच उद्योग सुरू करत असताना ट्रेड मार्क बनवणे खुप आवश्यक असते.कारण ट्रेड मार्क करण्याचे अनेक फायदे आपल्याला आपल्या उद्योग व्यवसायात प्राप्त होत असतात.

 • ट्रेड मार्क करण्याचा पहिला फायदा हा असतो की याने इतर कुठलीही कंपनी आपल्या कंपनीच्या नावाचा तसेच ब्रँण्डचा वापर त्यांच्या कंपनीचे प्रोडक्ट सेल करण्यासाठी करू शकत नसते.कारण ट्रेड मार्क रेजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला आपल्या उत्पादनावर एक विशेष मालकी हक्क प्राप्त होत असतो.
 • जेव्हा आपण आपल्या कंपनीचे तसेच आपल्या व्यापार उद्योगाचे एक ट्रेडमार्क तयार करत असतो.त्यानंतर इतर कुठलीही कंपनी तसेच व्यावसायिक आपल्या कंपनीच्या नावाचा उपयोग त्याच्या व्यावसायिक लाभासाठी करू शकत नसते.
 • ट्रेड मार्क केल्याने आपल्या व्यापार तसेच उद्योगात भरभराट होत असते.याचसोबत कस्टमर आणि कंपनी या दोघांमध्ये देखील चांगले रिलेशन तसेच बाँण्डिंग तयार होत असते.
 • सगळयात महत्वाचे म्हणजे कस्टमरला हे लगेच कळुन जाते की तो जे प्रोडक्ट खरेदी करतो आहे ते कोणत्या कंपनीचे आहे.ज्याने कस्टमरला वस्तु खरेदी करत असताना एक समाधान प्राप्त होत असते.
 • ट्रेड मार्क रेजिस्ट्रेशन केल्याने आपल्याला मार्केटमध्ये आपल्या कंपनीचा एक अलग ब्रँण्ड तयार करता येतो.एक वेगळी ओळख निर्माण करता येते.
 • कस्टमरला आपल्या कंपनीचे प्रोडक्ट शोधायला ओळखायला अधिक सोपे जात असते.

Copyright म्हणजे काय ? काय आहे स्वामित्व कायदा ?

ट्रेड मार्क करण्याचे तोटे कोणकोणते आहेत?

जसे ट्रेड मार्क केल्याने आपल्याला कोणकोणते फायदे होत असतात हे माहीत असणे गरजेचे आहे तसेच आपल्या कंपनीचा,उद्योग व्यवसायाचा ट्रेड मार्क न केल्याने आपल्याला कोणते नुकसान होऊ शकते हे देखील माहीती असणे खुप आवश्यक आहे.

 • ट्रेड मार्क न केल्याने इतर कुठलीही कंपनी आपल्या कंपनीच्या नावाचा ब्रँण्डचा वापर स्वताचे प्रोडक्ट सेल करण्यासाठी करू शकते आणि त्यातच ते प्रोडक्ट खराब असले तर आपल्या कंपनीच्या नावाने ते कस्टमरला विकले जात असल्याने मार्केटमध्ये आपल्या कंपनीचे नाव खराब होत असते.जे कुठल्याही व्यापार उद्योगात खुपच घातक ठरू शकते.
 • याचसोबत कस्टमरला विविध कंपनींच्या प्रोडक्टमध्ये आपल्या कंपनीचे प्रोडक्ट शोधायला ओळखायला खुप तकलीफ होत असते.
 • ट्रेड मार्क न केल्याने आपल्याला आपल्या कंपनीचा उद्योग व्यवसायाचा मार्केटमध्ये एक ब्रँण्ड तयार करता येत नाही.आपल्या प्रोडक्ट सर्विसची एक वेगळी ओळख निर्माण करता येत नसते.
See also  श्री स्वामी समर्थ यांचे प्रेरणादायी विचार कोटस - Swami Samarth inspirational thoughts and quotes in Marathi

ट्रेडमार्क रेजिस्ट्रेशनसाठी कोणकोणते डाँक्युमेंटस लागत असतात?

 

ट्रेड मार्क रेजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला पुढील कागदपत्रांची आवश्यकता भासत असते.

 • अर्जदाराविषयी पुरावा
 • पँन कार्ड
 • अर्जदाराचे अँड्रेस प्रुफ
 • ब्रँण्डचे नाव आणि लोगो
 • ट्रेड मार्क वापर कर्त्याचे एक प्रतिज्ञापत्र
 • टी एम वापरत असल्याचा प्रूफ
 • पीओ ए
 • आपल्या उत्पादन तसेच सेवेविषयी माहीती

ट्रेड मार्कसाठी कोणाला अर्ज करता येतो?

ट्रेड मार्कसाठी कुठलीही व्यक्ती तसेच खासगी संस्था तसेच नाँन काँपर्रेटिव्ह सोसायटी देखील अँप्लाय करू शकते.

ट्रेड मार्कची व्हँलीडिटी किती दिवसांकरिता राहत असते?

कुठल्याही ट्रेड मार्कची व्हँलीडीटी ही दहा वर्षाची असते.आणि मग दहा वर्षानंतर आपल्याला तीन महिन्याच्या आत हे ट्रेड मार्क रिनिव्ह देखील करावा लागत असते.

ट्रेड मार्क रेजिस्ट्रेशन करण्यासाठी साधारणत किती कालावधी लागत असतो?

ट्रेड मार्क रेजिस्ट्रेशन करण्यासाठी साधारणत आपणास दीड ते दोन वर्षाचा कालावधी लागु शकतो.

ट्रेड मार्क रेजिस्ट्रेशन कसे करावे?

 • ट्रेड मार्क रेजिस्ट्रेशन आपल्याला आँनलाईन आणि आँफलाईन ह्या दोघेही पदधतीने करता येत असते.
 • ट्रेड मार्क रेजिस्ट्रेशन करण्याअगोदर आपण ज्या नावाचा,लोगो सिम्बाँलचा ट्रेडमार्क तयार करत आहे तो आपल्या आधी कोणी रेजिस्टर तर केलेला नाहीये हे चेक करून घ्यावे.
 • मग ट्रेडमार्क अँव्हँबलिटी चेक करून झाल्यावर आपल्याला ज्या लोगो सिम्बाँल तसेच नेमचा ट्रेडमार्क तयार करायचा आहे त्याच्यासाठी आवश्यक अशी महत्वाची कागदपत्रे जोडुन आँनलाईन तसेच आँफलाईन अँप्लाय करायचे असते.
 • मग आपले अँप्लीकेशन चेक केले जाते आणि यात आपले अँप्लीकेशन अँप्रुव्ह झाल्यावर याची जाहीरात ट्रेडमार्क जनरलमध्ये प्रकाशित केली जाते.

1 thought on “Trade mark म्हणजे काय? ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्स – Trade mark complete information in Marathi”

Comments are closed.