Copyright म्हणजे काय ? काय आहे स्वामित्व कायदा ? Copyright law information Marathi

Copyright म्हणजे काय ? काय आहे स्वामित्व कायदा ? Copyright law information Marathi

आज स्वता:च साहित्य,कृती ,कंटेट तयार करत असलेल्या प्रत्येक व्यक्तीने काँपीराईटचा कायदा समजून घेणे खुप गरजेचे आहे.कारण आपण जो कंटेट तयार करतो त्याबाबतीत आपले मुलभुत हक्क कोणकोणते आहेत हे आज आपणा सर्वाना माहीती असायला हवे.जेणेकरून पुढे जाऊन आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही.

कारण काँपीराईट कायद्याचे उल्लंघन केल्यास आपल्याला शिक्षा आणि दंड हे दोघे आकारले जात असतात.म्हणुन कंटेट तयार करत असलेल्या प्रत्येक व्यक्तीने ह्या कायद्याची सविस्तर माहीती जाणुन घ्यायलाच हवी.

म्हणुन आजच्या लेखात आपण काँपीराईट विषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

Copyright म्हणजे काय? Copyright law information Marathi

 कॉपीराइट हा बौद्धिक संपदेचा अधिकार आहे जो एखाद्या लेखकाच्या  किंवा निर्मात्याच्या  त्यांनी निर्माण केलेल्या मूळ कार्यांचे संरक्षण करते.

मूलभूतपणे, कॉपीराइट हा एक असा  कायदा आहे जो तुमाला तुमी स्वता तयार केलेल्या गोष्टींवर तुमाला मालकी  हक्क  देतो. कॉपीराइट कायद्यात  मग सर्व काही येवू  शकते आपण काढलेले कलाकृती , कविता किंवा कादंबरी पेंटिंग , चित्रपट ,विडियो , संगीत , गाणी , म्युझिक रेकॉर्डिंग, संगणक प्रणाल्या, पुस्तके, कविता, वेबसाईट्स, अगदी काही जे तुमी स्वता निर्मिलेले आहे.  

आपण मालक असलेल्या कलाकृतींचा कॉपीराइट कायद्याने आपल्याकडे मालक म्हणून कित्येक विशेष: अधिकारां आपल्याला मिळतात यात खलील बाबी समाविष्ट होतात :

  • पुनरुत्पादित करण्याचा अधिकार मिळतो जसे की डुप्लिकेट किंवा छायाप्रत इ.) काम
  • त्या वस्तूतून नवीन काही निर्माण करणे
  • प्रती वितरित करू शकता
  • काच जाहीररीत्या सार्वजनिकपणे प्रदर्शन करता
  • निर्माता यापैकी कोणताही अधिकार पब्लिकसारख्या दुसर् यास विकू किंवा नियुक्त करू शकतो
  • .या कायद्यादवारे आपण आपल्या निर्माण केलेल्या कलाकृतीवर, साहित्य कृतीवर आपला मालकी हक्क ठेवू शकतो.
See also  Possessive म्हणजे काय? Possessive meaning in Marathi

म्हणजेच काँपीराईट हा एक असा कायदा आहे ज्याद्वारे

आपण आपल्या निर्माण केलेल्या साहित्यकृतीला आपल्याला हवे तिथेच आपण पब्लिश करू शकतो किंवा विकु देखील शकतो.

यात आपले निर्माण केलेले साहित्य कोणालाही आपल्या परवानगीशिवाय इतर कुठेही प्रकाशित करता येत नाही.त्यात कोणताही फेरबदल करता येत नाही.तसेच ते काँपी देखील करण्याचा अधिकार नसतो.

आणि असे जर कोणी केले त्याच्यावर काँपीराईट कायद्यानुसार योग्य ती कारवाई देखील आपण करू शकतो

Copy Right  मध्ये कशाकशाचा समावेश होत असतो?

 

आज कलात्मक निर्मिती तसेच साहित्य निर्मितीचे कार्य करत असलेल्या प्रत्येक निर्माण कर्त्याला आपल्या निर्मितीविषयी प्रदान केला जाणारा एक मुलभुत आणि कायदेशीर अधिकार असतो.त्यालाच आपण काँपीराईट असे म्हणत असतो.

Copy Right  कायद्यामध्ये खालील बाबींवर आपल्याला काँपीराईट प्रोटेक्शन प्राप्त होत असते.

  • साहित्यकृती
  • संगीताशी संबंधित विविध कार्ये
  • कलेशी संबंधित विविध कार्ये
  • कंप्युटर तसेच साँप्टवेअरशी संबंधित विविध कार्ये

वरील दिलेल्या इत्यादी क्षेत्राचा काँपीराईट कायद्यात समावेश होतो.थोडक्यात सांगायचे म्हटले तर कला आणि साहित्याशी संबंधित प्रत्येक निर्मितीशील क्षेत्रासाठी प्रोटेक्शन म्हणुन काँपीराईट कायदा बनवण्यात आला आहे.

Copy Right Holder चे कोणकोणते अधिकार असतात?Copyright law information Marathi

 भारतामध्ये तयार करण्यात आलेल्या 1957 ह्या काँपीराईट कायद्याच्या नियमा अंतर्गत काही अधिकार Copy Right Holder ला देण्यात आले आहेत.ते अधिकार पुढीलप्रमाणे आहेत:

1) पुननिर्मितीचा अधिकार :

2) वितरणाचा अधिकार :

3) रूपांतरीत करण्याचा अधिकार :

4) इतर भाषांमध्ये भाषांतरीत तसेच अनुवादीत करण्याचा अधिकार :

5)प्रकाशनाचा अधिकार :

1) पुननिर्मितीचा अधिकार :

 काँपी राईट कायद्याअंतर्गत काँपीराईट होल्डर आपल्या निर्माण केलेल्या साहित्य कृतीच्या विविध प्रती तयार करू शकतो.पण ह्याच ठिकाणी कोणा दुसरी व्यक्तीला त्या साहित्यकृतीच्या विविध प्रती तयार करायच्या असतील त्या साहित्त कृतीचा इतर कुठे वापर करायचा असेल तर त्याला काँपी राईट होल्डरची आधी परवानगी घ्यावी लागत असते.मगच त्या व्यक्तीला त्या साहित्य कृतीची पुननिर्मिती करता येत असते.

2) वितरणाचा अधिकार :

आपले निर्माण केलेले साहित्य आपल्याला लोकांपर्यत कसे पोहचवायचे आहे कोणत्या माध्यमातुन पोहचवायचे आहे तसेच ते फ्री मध्ये वितरीत करायचे की त्यावर काही चार्जेस घ्यायचे आहे हे ठरवण्याचा अधिकार काँपी राईट होल्डरला असतो.

See also  महाभारत आदिपर्व - 40 खंड Mahabharat In Marathi Pdf Free Download

3) रूपांतरीत करण्याचा अधिकार :

आपले एकच निर्माण केलेले साहित्य तसेच कलाकृती विविध पदधतीने जगासमोर सादर करण्याचा अधिकार काँपी राईट होल्डरला असतो.

उदा.समजा एखाद्या लेखकाने कादंबरी लिहिलेली असेल तर त्या कदंबरीला चित्रपटात रूपांतरीत करायचे की नाही हे देखील ठरवण्याचा अधिकार काँपी राईट होल्डरला असतो.

4) इतर भाषांमध्ये भाषांतरीत तसेच अनुवादीत करण्याचा अधिकार :

आपले निर्माण केलेले साहित्य इतर भाषेत भाषांतरीत करायचे का नाही तसेच ते इतर भाषेत अनुवादीत करायचे का नाही हे देखील ठरवण्याचा अधिकार काँपी राईट होल्डरला प्रदान केला जात असतो.

5) प्रकाशनाचा अधिकार :

आपले निर्माण केलेले साहित्य कुठे प्रकाशित केले जाईल कुठे प्रकाशित नाही केले जाणार हे देखील ठरवण्याचा अधिकार काँपीराईट होल्डरला असतो.

Copy Right Infringement म्हणजे काय?

जर एखाद्या व्यक्तीने एखाद्या लेखकाचे साहित्य त्याची वैयक्तिक परवानगी न घेता त्याचा कुठेही वापर केला किंवा ते साहित्य इतर कुठेही आपल्या नावाने प्रकाशित केले तर त्याला Copy Right Infringement असे म्हटले जात असते.

Copy Right Infringement मध्ये कशाकशाचा समावेश होतो?

  • एखाद्या लेखकाच्या साहित्याचे आपल्या वैयक्तिक उपयोगासाठी आपल्या नावाने त्याची कोणतीही परवानगी न घेता प्रकाशन करणे.
  • एखाद्या साहित्यिकाच्या साहित्यकृतीचे कलाकृतीचे कार्य त्याच्या परवानगी शिवाय पुननिर्मित करणे.
  • साहित्यिकाची कोणतीही परवानगी न घेता त्याचे साहित्य कुठेही प्रकाशित करणे.
  • एखाद्या साहित्यिकाचे साहित्य त्याची परवानगी न घेता रिसेल करणे हे देखील काँपीराईट इन्फ्रँगमेंटमध्ये येत असते.
  • कोणत्याही साहित्यिकाची परवानगी न घेता

इतर भाषेत त्याचे साहित्य भाषांतरीत तसेच  अनुवादीत करणे हे देखील काँपीराईट इनफ्रँगमेंटमध्ये येत असते.

काँपीराईट कायद्याचे उल्लंघन होऊ नये म्हणुन आपण काय करावे?

  • जर आपल्याकडुन कोणत्याही साहित्यिकाचे साहित्य त्याची परवानगी न घेता प्रकाशित केले,पुनमुर्द्रीत केले.अनुवादीत किंवा भाषांतरीत केले तर आपल्यावर काँपीराईट इन्फ्ँगमेंट कायद्यानुसार कारवाई देखील होऊ शकते.
  • आपल्यावर अशी कोणतीही कारवाई होऊ नये म्हणुन आपण कोणत्याही साहित्यिकाचे साहित्य त्याच्या परवानगीशिवाय पुनमुद्रित,प्रकाशित,भाषांतरीत,रूपांतरीत,अनुवादीत करु नये तसेच त्याची नक्कल देखील करू नये.
  • आणि आपल्याला त्याचे साहित्य जर उपयोगात आणायचे असेल तर आपण अशावेळी फेयर युझ पाँलिसीचा वापर करणे अधिक फायदेशीर ठरेल याने काँपीराईट कायद्याचे उल्लंघन देखील होत नाही.
See also  पर्यावरण संरक्षणाविषयी घोषवाक्ये - 65 environment slogans in Marathi

काँपीराईट साहित्य कसे ओळखावे?

एखाद्या वेबसाईटवर कंटेट काँपीराईट साहित्य आहे का नाही हे ओळखण्यासाठी आपण त्या वेबसाईटवर जावे आणि तिथे काँपीराईटचा काही सिम्बाँल म्हणजेच चिन्ह आपल्याला दिसुन येते आहे का हे बघावे.

जर तिथे आपल्याला काँपीराईटचे चिन्ह दिसुन येत असेल तर समजुन जावे की हे साहित्य काँपीराईट कायद्यामध्ये येते.

Copy Right कायद्याचे फायदे कोणकोणते आहेत?

 काँपी राईट कायद्याचे असे अनेक फायदे असतात जे काँपी राईट होल्डरला प्राप्त होत असतात.

 

  • आपल्या कार्यावर,निर्मितीवर आपला मालकी हक्क राहत असतो.ज्यामुळे कोणीही आपल्या साहित्य निर्मितीचा कार्याचा कलाकृतीचा आपल्या परवानगीशिवाय उपयोग करू शकत नाही.
  • आपण जर आपल्या नावाचे रेजिस्ट्रेशन केलेले असेल तर आपले साहित्य कोणी स्वताच्या नावाने प्रकाशित केल्यावर किंवा त्यावर आपला मालकी ह्क्क दाखवल्यावर आपण त्याच्याविरूदध आपल्याकडे आपल्या साहित्य कृतीचे असलेले ओनरशिप रेकार्डचा वापर करून आपल्या साहित्यावरची आपली मालकी सिदध करू शकतो आणि समोरच्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करू शकतो.
  • काँपीराईट कायद्यानुसार जोपर्यत आपण जिवंत आहे तोपर्यत त्या साहित्यकृतीवर आपला मालकी हक्क राहत असतो.आणि समजा जरी आपले देहांत झाले तरी आपल्या मृत्युनंतर 70 वर्षापर्यत आपल्या साहित्याचा कोणाला उपयोग करता येत नाही.तसेच त्यावर मालकी हक्क मिळवू शकत नाही.
  • काँपीराईट कायद्यामध्ये आपल्या साहित्याच्या प्रकाशनाचा,पुनमुद्रण करण्याचा,रुपांतरीत,भाषांतरीत,अनुवादीत करण्याचा इत्यादी ह्क्क काँपी राईट होल्डरकडे असतात.
  • निर्माण कर्त्याला एक शाश्वती मिळते की त्याच्या परवानगीशिवाय कोणीही त्याच्या साहित्यकृती,कलाकृतीचा वापर करू शकत नाही.जेणेकरून त्याला जास्तीत जास्त नवनवीन निर्मिती करण्यास प्रोत्साहन प्राप्त होते.

Copy Right कायद्याचे उल्लंघन केल्यावर मिळणारी शिक्षा

जर एखाद्या व्यक्तीने काँपी राईट कायद्याचे उल्लंघन केले तर त्याला 3 वर्ष तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते.सोबतच त्याला कमीत कमी एक लाखापर्यत दंड देखील भरावा लागत असतो.

 भारतातील काँपी राईट अँक्ट 1957 :

काँपी राईट कायदा 1957 नुसार निर्माणकर्त्याला आपल्या साहित्य कृतीवर कलाकृतीवर विशेष अधिकार दिला जात असतो.

  • ह्या कायद्यात सेक्शन 14 नुसार निर्माण कर्त्याला
  • Reproduction Right, Publication Right, Adaption Rights तसेच Translation Right दिला जात असतो.
  • ज्यात त्याच्या परवानगीशिवाय त्याच्या साहित्याचे कलाकृतीचे Reproduction Right, Publication ,Adaption तसेच Translation कोणीही करू शकत नाही स्पष्टपणे नमुद केलेले आहे.

 

1 thought on “Copyright म्हणजे काय ? काय आहे स्वामित्व कायदा ? Copyright law information Marathi”

Comments are closed.