अजय बांगा कोण आहेत? – Who is Ajay Banga in Marathi

अजय बंगा कोण आहेत? | Who is Ajay Banga in Marathi

नुकतीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी वर्ड बॅकेच्या प्रमुखपदी अजय बंगा यांची नियुक्ती केली आहे.

अजय बंगा हे मुळचे भारतीय वंशाचे आहेत. अजय बंगा हे पहिले भारतीय व्यक्ती आहे ज्यांची जागतिक बॅकेचे प्रमुख ह्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

आजच्या लेखात आपण अजय बंगा यांच्या विषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

United States is nominating former CEO of Mastercard Ajay Banga to be President of the World Bank: The White House

राष्ट्रीय विज्ञान दिवस विषयी माहिती – National science day information 2023 in Marathi

अजय बंगा कोण आहेत?

अजय बंगा हे मास्टर कार्डचे माजी सीईओ म्हणजेच कार्यकारी अधिकारी होते.

१२ एप्रिल २०१० रोजी त्यांची मास्टर कार्डचे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. २०२१ मध्ये त्यांनी मास्टर कार्ड मधुन निवृत्ती घेतली होती.

एकुण बारा वर्षे अजय बंगा यांनी मास्टर कार्डचे सीईओ पद भुषविले होते.

सध्या अजय बंगा हे जगातील सर्वात मोठे खाजगी इक्विटी फर्म म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या जनरल अटलांटिकचे उपाध्यक्ष म्हणजे व्हाइस चेअरमन सुदधा आहेत.

अजय बंगा यांना ३० ते ३५ वर्ष इतका व्यवसायाचा अनुभव आहे.अजय बंगा यांनी अमेरीका मधील डाऊ इंक,रेड क्राॅस, क्राफ्ट फुडस इत्यादी मध्ये काम केले आहे.

याचसोबत नेस्ले सिटीग्रुप पेप्सिको इत्यादी कंपनींमध्ये अजय बंगा यांनी काम केले आहे.

अजय बंगा हे एक अमेरिकन अर्थतज्ज्ञ तसेच उद्योजक म्हणून आपणा सर्वांना परिचित आहे.अजय बंगा यांनी व्हाईट हाऊस सोबत मध्य अमेरिका करीता भागीदारी ह्या क्षेत्रातील सह अध्यक्ष म्हणून देखील काम केले आहे.

अजय बंगा यांनी २०१५ मध्ये बराक ओबामा यांच्या सोबत देखील काम केले आहे.ओबामा यांना व्यापार धोरण संदर्भात सल्ला मसलत करण्याचे काम ते करायचे.

अजय बंगा यांचे शिक्षण –

दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन महाविद्यालयातुन त्यांनी अर्थशास्त्र विषय घेऊन बीए केले.यानंतर अजय बंगा यांनी अहमदाबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मधुन आपली एमबीएची पदवी प्राप्त केली.

अजय बंगा जन्म अणि कुटुंब –

अजय बंगा यांचा जन्म १० नोव्हेंबर १९५९ रोजी पुणे येथे झाला होता.

अजय बंगा यांचा जन्म पुणे शहरातील सैनी ह्या शीख परिवारामध्ये झाला होता.अजय बंगा यांचे वडील भारतीय लष्करात लेफ्टनंट जनरल ह्या अधिकारी पदावर कार्यरत होते.

त्यांचा परिवार मुळचा पंजाब येथील जालंधर येथील आहे.

अजय बंगा यांना प्राप्त पुरस्कार –

भारत सरकारच्या वतीने अजय बंगा यांना २०१६ मध्ये पदमश्री हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.

अजय बंगा यांच्या पत्नीचे नाव काय आहे?

अजय बंगा यांच्या पत्नीचे नाव रितु बंगा आहे.

अजय बंगा यांची अपत्ये –

अजय बंगा यांना एकुण दोन अपत्ये आहेत एक मुलगा आणि एक मुलगी.मुलीचे नाव आदीती बंगा अणि मुलाचे नाव जोजो बंगा असे आहे.

अजय बंगा यांच्या पालकांचे नाव –

हरभजनसिंग बंगा अणि जसवंत बंगा

अजय बंगा यांची नेटवर्थ किती आहे?

सीएन बीसी टिव्ही कडुन देण्यात आलेल्या एका अहवालानुसार २०२१ पर्यंत अजय बंगा यांची एकुण संपत्ती २०५ ते २०६ दशलक्ष डॉलर्स इतकी होती.

अजय बंगा यांच्याकडे $113,123,489 पेक्षा जास्त किमतीच्या मास्टरकार्ड स्टॉकच्या 60,000 युनिट्सची मालकी असल्याचे सीएन बीसी टिव्हीच्या जाहीर केलेल्या अहवालात सांगितले आहे.

हाती आलेल्या एका अहवालानुसार असे सांगितले जाते आहे की अजय बंगा यांनी गेल्या 13 वर्षांत $69,986,261 पेक्षा जास्त किमतीचा MA स्टॉक विकला आहे.अजय बंगा हे मास्टरकार्डवर सीईओ म्हणून $23,250,000 इतके रूपये कमवत होते.