बँक आँफ बडोदा पर्सनल लोन विषयी माहीती – Bank Of Baroda Personal Loan Information In Marathi

बँक आँफ बडोदा पर्सनल लोन – Bank Of Baroda Personal Loan Information In Marathi

Table of Contents

बँक आँफ बडोदा कडुन आपणास किती पर्सनल लोन दिले जाते?

बँक आँफ बडोदाकडुन साधारणत २० ते २५ लाखापर्यतचे लोन आपणास दिले जाते.

बँक आँफ बडोदा कडुन दिल्या जाणारया पर्सनल लोनवर किती व्याजदर आकारले जाते?

बँक आँफ बडोदा कडुन दिल्या जाणारया पर्सनल लोनवर किमान १०.२६% अणि कमाल १७.६०% टक्के इतके व्याजदर आकारले जात असते.

बँक आँफ बडोदा मधील पेंशनर खातेधारकांना वार्षिक ११.३५ ते ३६ इतके व्याजदर आकारून पेंशन लोन देखील दिले जात असते.

बँक आँफ बडोदा कडुन दिल्या जाणारया पर्सनल लोनचा कालावधी किती असतो?

बँक आँफ बडोदा कडुन दिल्या जात असलेल्या पर्सनल लोनचा कालावधी ७ ते ८ वर्ष इतका असतो.सात ते आठ वर्षात आपण हे पर्सनल लोन बँकेला फेडु शकतो.

बँक आँफ बडोदामध्ये प्रक्रिया शुल्क म्हणजेच प्रोसेसिंग फी किती आकारली जाते?

बँक आँफ बडोदामध्ये एकुण रक्कमेच्या दोन टक्के इतकी प्रोसेसिंग फी चार्ज केली जाते.किमान 1000 ते 10,000 +जीएसटी प्रक्रिया शुल्क भरावे लागते.

बँक ऑफ बडोदामध्ये पगार खाते म्हणजे सँलरी अकाऊंट असलेल्या सरकारी कर्मचारींना शुन्य प्रोसेसिंग फी प्रक्रिया शूल्क चार्ज लागणार आहे.

बँक आँफ बडोदा पँनल्टी चार्ज –

● जेवढी रक्कम आपली थकित आहे तिच्या दोन टक्के इतकी रक्कम आपणास दंड म्हणुन भरावी लागते.म्हणजे समजा आपण एखाद्या महिन्याचा ईएम आय नही भरला तर आपण जितक्या दिवसांपर्यत ईएम आयची रक्कम भरली नही तितक्या दिवसांकरीता जितकी ईएम आयची रक्कम आपणास भरायची असेल त्या रक्कमेवर दोन टक्के दंड आपणास भरावा लागतो.

बँक आँफ बडोदाचे फोरक्लोजर शुल्क किती आहे?

बँक आँफ झिरो फोरक्लोजर शुल्क आकारले जाते.

फोरक्लोजर शुल्क म्हणजे काय?

समजा आपण बँकेकडून एका वर्षाकरीता पर्सनल लोन घेतले आहे.अणि ते पर्सनल लोन आपल्याला पाच सहा महिने झाले की बँकेला परत फेडायचे आहे अशा वेळी बँक आपल्याकडुन कोणतेच शुल्क घेत नसते.ज्याला फोरक्लोजर चार्ज असे म्हणतात.

पण काही बँका फोरक्लोजर चार्जेस घेत असतात.

बँक आँफ बडोदा मधील दिल्या जात असलेल्या पर्सनल लोनचे प्रकार किती आणि कोणकोणते आहेत?

बँक आँफ बडोदा मधील पर्सनल लोनचे एकुण चार मुख्य प्रकार आहेत-

1) बडोदा पर्सनल लोन –

हे लोन आपणास धोकादायक तसेच जोखिमीने भरलेले काम सोडुन इतर कुठल्याही कामासाठी बँकेकडून दिले जाते.

बडोदा पर्सनल लोनची कमाल मर्यादा किती आहे?

बडोदा पर्सनल लोन मध्ये मेट्रो अणि शहरींना जास्तीत जास्त १५ लाखापर्यत लोन दिले जाते.

निमशहरी अणि ग्रामीण भागातील लोकांना जास्तीत जास्त १५ लाख इतके पर्सनल लोन दिले जाते.

बडोदा पर्सनल लोनची किमान मर्यादा किती आहे?

मेट्रो अणि शहरी भागातील लोकांना किमान एक लाखापर्यतचे पर्सनल लोन दिले जाते.अणि निमशहरी अणि ग्रामीण भागातील लोकांना ५० हजारापर्यतचे लोन दिले जाते.

बडोदा पर्सनल लोनचा एकुण कालावधी किती असतो?

बडोदा पर्सनल लोनचा कालावधी किमान ४८ महिने अणि कमाल ६० महिने इतका असतो.

2) बडोदा पर्सनल लोन कोविड १९ –

बडोदा पर्सनल लोन कोविड १९ हे कोविडमुळे उदभवलेल्या कुठल्याही आर्थिक गरजांची पुर्ती करण्यासाठी बँक आँफ बडोदा कडुन आपणास दिले जाते.

बडोदा पर्सनल लोन कोविड १९ मध्ये दिल्या जाणारया लोनच्या रक्कमेची किमान अणि कमाल मर्यादा किती आहे?

बडोदा पर्सनल लोन कोविड १९ मध्ये आपणास किमान २५ हजार अणि कमाल ५ लाखापर्यतची रक्कम दिली जाते.

बडोदा पर्सनल लोन कोविड १९ मध्ये दिल्या जाणारया लोनच्या रक्कमेचा एकुण कालावधी किती आहे?

बडोदा पर्सनल लोन कोविड १९ मध्ये दिल्या जात असलेल्या लोनच्या रक्कमेचा एकुण कालावधी ५ वर्ष इतका आहे.

3) पेंशनधारकांसाठी बडोदा पर्सनल लोन –

हे लोन निवृत्ती वेतन धारकाला म्हणजेच पेंशनरला त्याच्या वैयक्तिक गरजा पुर्ण करण्यासाठी दिले जाते.

फक्त यात निवृत्तीवेतन धारकाला कुठल्याही जोखमेच्या कामासाठी लोन दिले जात नही.ह्या लोनवर ११.३५ इतके व्याजदर आकारले जाते.

4) प्री अँप्रूव्ह पर्सनल लोन –

हे लोन कोविड १९ मुळे उदभवलेल्या आर्थिक गरजा पुर्ण करण्यासाठी बँक आँफ बडोदा कडुन दिले जाते.

प्री अँप्रूव्ह पर्सनल लोन मध्ये दिल्या जाणारया लोनच्या रक्कमेची किमान मर्यादा किती असते?

प्री अँप्रूव्ह पर्सनल लोन मध्ये दिल्या जाणारया लोनच्या रक्कमेची किमान मर्यादा ५ लाख इतकी असते.

प्री अँप्रुव्ह पर्सनल लोन मध्ये दिल्या जाणारया लोनच्या रक्कमेचा एकुण कालावधी किती आहे?

प्री अँप्रुव्ह पर्सनल लोन मध्ये दिल्या जाणारया लोनच्या रक्कमेचा एकुण कालावधी पाच ते सहा वर्ष इतका असतो.

प्री अँप्रुव्ह पर्सनल लोन मध्ये दिल्या जाणारया लोनच्या रक्कमेवर एकुण किती व्याजदर आकारले जाते?

प्री अँप्रुव्ह पर्सनल लोन मध्ये दिल्या जाणारया लोनच्या रक्कमेवर एकुण ११.५०% इतके व्याजदर आकारले जाते.

बँक आँफ बडोदामधुन पर्सनल लोन प्राप्त करण्यासाठी पात्रतेच्या अटी निकष काय आहेत?

बँक आँफ बडोदा पर्सनल लोन साठी कोण कोण अँप्लाय करू शकते?

● आपले वय किमान २१ वर्ष असायला हवे.

● नोकरदारांचे अधिकतम वय ६० अणि नोकरी न करणारयांचे गैरनोकरदारांचे वय ६५ असावे.

● लोन साठी अँप्लाय करणारा सरकारी संस्था तसेच खाजगी कंपनीमधील कर्मचारी हा किमान एक वर्षापासुन काम करत असावा.

● प्रायव्हेट लिमिटेड कंपनी,प्रोप्रायटरशिप फर्म, ट्रस्ट आणि पार्टनरशिप फर्म्सचा कर्मचारी ज्याला किमान एक वर्षाचा त्या क्षेत्रातील कामाचा अनुभव आहे

● नॉन-एम्प्लॉयड स्वयंरोजगार असलेली व्यक्ती ज्याचा व्यवसाय किमान एक वर्ष जुना चालू आहे.

बँक आँफ बडोदा मधुन पर्सनल लोन प्राप्त करण्यासाठी कोणते महत्वाचे डाँक्युमेंट लागतील?

● ओळख म्हणुन -आधार कार्ड,मतदान कार्ड, पासपोर्ट,ड्राईव्हिंग लायसन

● पासपोर्ट साईज दोन फोटो

● बँकेचे पासबुक

● मागील सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट

● नोकरदारांना सहा महिन्याचे बँक अकाउंट स्टेटमेंट,अणि मागील तीन महिन्याची सँलरी स्लीप

● व्यवसायिकांसाठी मागील एक वर्षाचे इनकम टँक्स रिटर्न,मागील एक वर्षाचे प्राँफिट लाँस स्टेटमेंट,बँलेस शीट इत्यादी याचसोबत इनकम टँक्स चलन /क्लिअरन्स सर्टिफिकेट /आयटी मूल्यांकन / TDS प्रमाणपत्र (फॉर्म 16A) / फॉर्म 26AS

आपल्या उद्योग व्यवसायाचा पुरावा व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र,गुमास्ता परवाना,सेवा कर नोंदणी इ.

● आपण काम करत असलेल्या कंपनीने जारी केलेला कर्मचारी आयडी,प्रँक्टिस सर्टिफिकेट आणि CFAI, ICAI, ICWA सारख्या व्यावसायिक संस्थांनी जारी केलेले ओळख दस्तऐवज.

बँक आँफ बडोदा पर्सनल लोन विषयी काही अत्यंत महत्वाचे मुददे –

● जे व्यक्ती बँक आँफ बडोदाचे कस्टमर आहेत त्यांचे सहा महिन्यापासुन बँक आँफ बडोदा मध्ये खाते आहे.त्यांच्या पर्सनल लोनचा व्याजदर प्रतिवर्ष 10.50 टक्के इतका असु शकतो.

● ज्या व्यक्तीचे बँक आँफ बडोदा मध्ये अकाऊंट आहे पण त्याने मागील सहा महिन्यापासुन बँकेचे कामकाज बंद ठेवले असेल त्यांच्यासाठी हा व्याज दर 12.50 इतका आकारला जाऊ शकतो.

See also  रेपो रेट म्हणजे काय - RBI मॉनेटरी पॉलिसी ? Repo rate meaning in Marathi

1 thought on “बँक आँफ बडोदा पर्सनल लोन विषयी माहीती – Bank Of Baroda Personal Loan Information In Marathi”

Comments are closed.