डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथि 2022 विषयी माहीती – Dr. Babasaheb Ambedkar death anniversary 2022 information in Marathi

डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथि 2022 विषयी माहीती – Dr.Babasaheb Ambedkar Death anniversary 2022 information in Marathi

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कोण होते?

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या भारतीय संविधानाचे जनक तसेच दीन दुबळयांचे दलितांचे कैवारी होते.याचसोबत ते एक उत्कृष्ठ अर्थतज्ञ,कायदेतज्ञ,लेखक,वकिल,राजनेते,समाजसुधारक देखील होते.

आंबेडकरांना एकुण अकरा ते बारा भाषांचे ज्ञान होते.अणि ते 60 पेक्षा अधिक विषयात पारंगत होते.

भारताच्या इतिहासात अनेक वीर अणि महापुरूष होऊन गेले आहेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे त्यातीलच एक अत्यंत महत्वाचे व्यक्तीमत्व आहे.

शिका संघटित व्हा अणि संघर्ष करा हा संदेश त्यांनी जनतेला दिला.भारतामधल्या जातीव्यवस्थेला समुळ नष्ट करण्यासाठी त्यांनी अनेक सामाजिक चळवळी उभारल्या.त्यांनी दलितांवर होणारया अन्याय अत्याचार विरूदध आवाज उठविला.

2022 मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथि कधी अणि केव्हा आहे?

2022 मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथि 6 डिसेंबर 2022 रोजी म्हणजेच आज साजरी केली जाणार आहे.ज्याला आपण महापरिनिर्वाण दिन असे देखील म्हणतो.

6 डिसेंबर 1956 ला आपल्या दिल्ली येथील राहत्या घरी त्यांनी प्राण त्यागले होते.अणि 7 डिसेंबर रोजी त्यांच्या पार्थिवावर मुंबई येथील चैत्यभुमीमध्ये अंत्यसंस्कार करण्याल आला.

म्हणुन दरवर्षी 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनी आंबेडकरी अनुयायी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायला चैत्यभुमीवर एकत्र जमत असतात.
चैत्यभुमी हे आंबेडकरी जनतेचे सर्वात मोठे श्रदधास्थान म्हणुन ओळखले जाते.

या दिवशी संपुर्ण भारतातील विविध संस्था कार्यालय तसेच शाळा महाविद्यालयात आंबेडकरांची पुण्यतिथी साजरी करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जात असतात.

See also  बैलपोळा सण निबंध - Bail pola essay in Marathi

या दिवशी विदयार्थी शाळेत महाविद्यालयात आंबेडकरांच्या जीवनावर भाषण करीत असतात.

डॉ.बाबासाहेब हे जग सोडुन निघून गेले पण आजही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अनमोल शैक्षणिक सामाजिक विचार आपणास जीवणाची योग्य दिशा दाखवण्याचे काम करत आहेत.

2022 मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची कितवी पुण्यतिथि साजरी केली जात आहे?

2022 मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 67 वी पुण्यतिथि साजरी केली जाणार आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षण –

1907 मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे मँट्रीकच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले होते.त्यांनी अर्थशास्त्र अणि राज्यशास्त्र या दोघे विषयांत आपले बीए पर्यतचे शिक्षण पुर्ण होते.

आपले पदव्युत्तर शिक्षण त्यांनी कोलंबिया ह्या विद्यापिठातुन पुर्ण केले होते.1927 मध्ये त्यांनी अर्थशास्त्र ह्या विषयात पीएचडी घेतली.उच्च शिक्षण करणारे ते पहिले दलित होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी ह्या संस्थेची स्थापणा कधी केली होती?

1923 च्या सुमारास डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी ह्या संस्थेची स्थाप केली होती.

या संघटनेचा मुख्य हेतु हा आपल्या देशात जेवढेही निम्नवर्गीय लोक आहेत त्यांच्या स्थितीत सुधारणा घडवून आणने तसेच त्यांना शिक्षणाचे महत्व पटवून देऊन समाजात जागृकता निर्माण करणे.

अस्पृश्यांना देखील समान हक्क प्राप्त व्हावे यासाठी त्यांनी महाड येथे मोर्चा उभारला ज्याचे त्यांनी स्वता नेतृत्व केले होते.अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश देण्यात यावा यासाठी नाशिक येथील काळाराम मंदिरात आंदोलन केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते?

देशाच्या गोरगरीबांच्या कल्याणासाठी दिलेल्या आपल्या अमुल्य योगदानाबाबद डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना 1990 मध्ये भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला होता.

महापरिनिर्वाण म्हणजे काय?

महापरिनिर्वाण म्हणजे मृत्यु नंतर प्राप्त होणारे निर्वाण.ज्या मानवास निर्वाण प्राप्त होत असते ती व्यक्ती मृत्युनंतर सर्व संसारीक दुख,मोह माया, पीडा ईच्छा वासना ह्या सर्व जीवन चक्रांमधुन कायमचा मुक्त होत असतो.त्याला मोक्ष प्राप्त होत असतो.

निर्वाण प्राप्त करण्यासाठी आपण सदाचारी अणि धार्मिक जीवन जगायला हवे.आंबेडकर अणि गौतम बुद्ध यांच्या मृत्युस महापरिनिर्वाणदिन असे संबोधिले जाते.

See also  कर्मचारींच्या संप काळातील वेतनामध्ये कुठलीही कपात केली जाणार नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदेश -Salary during strike