इस्लामिक बँके विषयी माहीती  – Islamic Banks Marathi Information

इस्लामिक बँके विषयी माहीती

 

जेव्हाही आपण कोणत्याही बँकेचे व्यवहार करत असतो तेव्हा आपल्याला बँकेविषयी एक सामान्य गोष्ट पाहायला मिळते की कोणत्याही बँकेत जमा केलेल्या आपल्या सर्व रक्केवर बँकेकडून आपल्याला चांगले व्याज मिळत असते.तसेच जेव्हा आपण बँकेकडुन काही कर्ज घेत असतो तेव्हा बँक आपल्याकडुन काही व्याज देखील वसुल करत असते.

पण इस्लामिक बँक ही एक अशी बँक आहे जिथे कर्जावर व्याज घेणे आणि व्याज देणे असे प्रकार अजिबात चालत नाही.कारण इस्लाम धर्मात कुठल्याही प्रकारचे व्याज घेणे तसेच व्याज देणे हे त्यांच्या शरीयता कायद्याच्या विरूदध आहे असे मानत असतात.

दैनंदिन जीवणात खुपदा आपल्याला इस्लामिक बँकेविषयी ऐकु येत असते.आणि जेव्हा आपल्याला ह्या बँकेविषयी असे ऐकायला मिळते की इस्लामिक बँक आपल्या बँक खातेधारकांना जमा केलेल्या रक्कमेवर कुठल्याही प्रकारचे व्याज देतही नाही शिवाय त्यांच्याकडुन कर्जावर कोणतेही व्याज घेत देखील नसते.

अशा वेळी आपल्या मनात सर्वप्रथम हा एकच प्रश्न निर्माण होत असतो की जर इस्लामिक बँक आपल्या बँक खातेधारकांना दिलेल्या कर्जावर त्यांच्याकडुन कुठलेही व्याज घेत नाही मग ह्या बँक चालतात तरी कशा?यांचे इन्कमचे साधन कोणते आहे?

आजच्या लेखात आपण इस्लामिक बँकेविषयी अशाच काही महत्वाच्या बाबींविषयी जाणुन घेणार आहोत.

इस्लामिक बँक म्हणजे काय?

इस्लामिक बँक ही इतर बँकाप्रमाणेच एक बँक आहे.पण ही बँक खास मुस्लिम धर्मियांसाठी बनवण्यात आलेली आहे.जिचे मुस्लिम धर्मियांच्या शरीयते कायदयानुसार गठन करण्यात आले आहे.

See also  राजस्थान मध्ये डाॅक्टरांचे राईट टू हेल्थ बील वरील चालु असलेले आंदोलन घेण्यात आले मागे -Right to health bill protest called off

इस्लामिक बँकेत इतर बँकेत जसे सेव्हिंग अकाऊंटमधील पैशांवर आपल्याला व्याज दिले जाते तसे व्याज यात दिले जात नसते.

याचसोबत इतर बँकेत कर्ज काढल्यावर जसे घेतलेल्या कर्जावर आपल्याला काही व्याज द्यावे लागत असते.तसे कुठलेही व्याज ह्या बँकेत आकारले जात नाही.कारण इस्लाम धर्मात व्याज घेण्यास आणि व्याज देण्यास सक्त मनाई केली गेली आहे.

असे देखील म्हटले जाते की मुस्लिम धर्मात व्याजाचे पैसे घेणे तसेच व्याजाचे पैसे देणे हराम मानले जात असते.

यात आपणास फक्त जेवढे कर्ज बँकेतुन घेतले आहे तेवढे फेडावे लागते याव्यतीरीक्त कुठलीही व्याजाची अतिरीक्त रक्कम आपणास देण्याची आवश्यकता भासत नाही.

जसे इतर बँकामध्ये क्रेडिट आणि डेबिट कार्डची सुविधा आपणास प्राप्त होत असते तसेच इस्लामिक बँकेत देखील क्रेडिट आणि डेबिट कार्डची सोय असते.

थोडक्यात सांगावयास गेले तर इस्लामिक बँकेत आपण फक्त आपले पैसे सेव्हिंग अकाऊंटमध्ये जमा करू शकतो.आणि गरज पडेल तेव्हा आपण जमा केलेले पैसे काढु शकतो पण बँक खात्यात जमा केलेल्या पैशांवर आपल्याला बँकेकडुन कोणतेही व्याज दिले जात नाही.

पण बँकेला आपल्या व्यवहारातुन एखादा मोठा नफा प्राप्त होतो तेव्हा ही बँक आपला प्राप्त केलेल्या नफ्यातील काही टक्के रक्कम आपल्या बँक खाते धारकांना भेट स्वरुपात देत असते.

इस्लामिक बँक कोणतेही व्याज घेता कशी चालते?

आपल्याला सर्वाना पडणारा महत्वाचा प्रश्न हा आहे की इस्लामिक बँका आपल्या बँक खातेधारकाला तसेच इतर कोणत्याही व्यक्तीला कर्ज दिल्यावर त्याच्याकडुन व्याज घेत नसते.मग ह्या बँकेचा सर्व खर्च चालतो कसा तसेच ह्या बँकेत काम करत असलेल्या कर्मचारींचे वेतन कसे दिले जाते?

इस्लामिक बँकांची प्राँफिट प्राप्त करण्याची पदधत थोडी वेगळीच असते.ह्या बँक आपल्याकडे जमा असलेल्या रक्कमेतुन घर तसेच दुकान इत्यादी अशा स्थावर मालमत्तेची खरेदी करत असतात.आणि मग ह्याच खरेदी केलेल्या मालमत्तेला काही प्राँफिट प्राप्त करून इस्लामिक बँका विकुन देखील देत असतात.

See also  डबल्यु एचओचा फुलफाॅम काय होतो - WHO full form in Marathi

आणि मग जो प्राँफिट आपल्याला प्राप्त होतो त्यातील काही हिस्सा ह्या बँक आपल्या खातेधारकांना उपहार  स्वरुपात वाटुन देखील देत असतात.

आणि उरलेल्या काही टक्के भागात बँकेत काम करत असलेल्या कर्मचारींचे दर महिन्याचे वेतन तसेच बँकेतील इतर महत्वाचा खर्च केला जातो.

पण एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे जी आपणास माहीत असणे गरजेचे आहे ज्या पदधतीने इस्लामिक बँक आपल्याला प्राप्त होत असलेला प्राँफिट आपल्या बँक खातेधारकांसोबत वाटुन घेत असतात.त्याचप्रमाणे आपल्या बँकेला होत असलेला तोटा देखील आपल्या बँक खातेधारकांसोबत वाटुन घेत असतात.

म्हणजे समजा बँकेला काही लाँस्ट झाला तर तो भरून काढण्यासाठी त्याची नुकसान भरपाई सर्व खातेधारकांना मिळुन करावी लागते.

जगातील सर्वात पहिली इस्लामिक बँक कधी स्थापण केली गेली होती?

 

जगातील सर्वात पहिली इस्लामिक बँक 1975 मध्ये दुबई ह्या देशामध्ये स्थापित करण्यात आली होती.

भारतातील पहिली इस्लामिक बँक कोणती?

भारतातील पहिली इस्लामिक बँकेचे नाव चिरामन फायनान्शिअर सर्विस लिमिटेड असे आहे आणि ही बँक केरळ येथे स्थापण करण्यात आली होती.

इस्लामिक बँकेचे फायदे कोणकोणते असतात?

इस्लामिक बँकेत आपले बँक खाते चालु करण्याचे अनेक फायदे बँक खातेधारकास मिळत असतात.

इस्लामिक बँकेतुन कर्ज घेतल्यावर आपणास कुठलेही व्याज दर भरावे लागत नसते.फक्त कर्ज घेतलेली मुळ रक्कम आपल्याला फेडावी लागत असते.

इस्लाम बँक आपला सर्व प्राँफिट आपल्या खातेधारकांसोबत वाटुन घेत असते.म्हणजेच बँकेला नफा झाल्यावर खातेधारकांना देखील याचे फळ प्राप्त होते.

इस्लामिक बँकेत होणारे नुकसान कोणकोणते असते?

इस्लामिक बँकेतुन जसे आपल्याला बँकेला घर दुकान अशा प्राँपर्टीमधुन मिळत असलेल्या लाभात भागीदारी प्राप्त होत असते.एकदम त्याचप्रमाणे इस्लामिक बँकेला झालेल्या कोणत्याही तोटयाची भरपाई सर्व खातेधारकांकडुन केली जात असते.

इस्लामिक बँक आपल्या पैशांची गुंतवणुक कुठे करत असते?

इस्लाम धर्मामध्ये फिक्स इन्कम तसेच तसेच व्याज प्राप्त करून देत असलेल्या कोणत्याही सिक्युरीटीजमध्ये गुंतवणुक करण्याची परवानगी नसते.

See also  सुर्यग्रहण म्हणजे काय?सुर्यग्रहण कधी कसे अणि का घडुन येते? -What is a solar eclipse?

इस्लामिक बँक आपल्या पैशांची गुंतवणुक घर,दुकान  इत्यादी स्थावर जंगम मालमत्तेत करीत असतात.

भारतामध्ये असलेल्या इस्लामिक बँकांची सध्याची स्थिती काय आहे?

भारतामधील इस्लामिक बँकांची स्थिती पाहावयास गेले तर आपणास असे दिसुन येते की भारतामध्ये कोचीन येथे पहिली इस्लामिक बँक चालू करण्यात आली होती.

याचसोबत दुबई ह्या देशात जी इस्लामिक डेव्हलपमेंट बँक आहे.तिचीच एक शाखा भारतातील गुजरात ह्या राज्यात सुरू करण्यात येणार आहे.जफर सरेश्वर यांनी ही बँक उभी करण्यासाठी पुढाकार घेतलेला आपणास दिसुन येतो.

स्टँनडर्ड चार्ट आणि एच एसबीसी बँकेने सर्वसामान्य बँकेसोबत इस्लामिक बँका देखील चालू केलेल्या आपणास दिसुन येतात.

Leave a Comment