पीआयबी विषयी माहिती press information bureau in Marathi
पीआयबीचा फुलफाॅम काय होतो?
पीआयबीचा फुलफाॅम press information bureau असा होत असतो.यालाच मराठी मध्ये पत्र सुचना कार्यालय असे देखील म्हटले जाते.
पीआयबी काय आहे?
पीआयबी ही एक संस्था आहे जी भारत सरकारने सुरू केलेल्या नवनवीन योजना,शासनाकडुन राबविण्यात आलेले नवीन उपक्रम,कार्यक्रम,धोरणे दिल्या जात असलेल्या सामाजिक उपलब्धया इत्यादी
विषयी सर्व माहिती वर्तमानपत्र तसेच वृत्तपत्र यांना देण्याचे काम प्रेस इनफरमेशन ब्युरो करत असते.
पीआयबीचे काम काय असते?
भारत सरकार कडुन घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदा, घेण्यात आलेल्या विविध मुलाखती तसेच शासनाकडुन राबविण्यात येत असलेल्या शासकीय धोरणां विषयी सर्व माहिती देण्याचे काम ही पीआयबी वेबसाईट करते.
ही सर्व माहिती भारत सरकार पीआयबीच्या माध्यमातून आपणास देत असते.आपल्या पर्यंत पोहचवण्याचे काम करत असते.
पीआयबीचे फायदे कोणते असतात?
पीआयबी ह्या वेबसाईटदवारे आॅनलाईन पोर्टल दवारे शासन जनसामान्यांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचे काम करते की शासनाकडुन सध्या कोणते नवीन धोरण उपक्रम राबवले जात आहे.कोणती नवीन शासकीय योजना जनतेसाठी सुरू केली जात आहे.
शासनाने सुरू केलेल्या ह्या पीआयबी वेबसाईटमुळे सर्वसामान्य नागरिकांना सरकार कोणते नवीन उपक्रम धोरण कार्यक्रम योजना नागरीकांच्या हितासाठी राबवत आहे.जनतेसाठी सुरू करणार आहे हे आपणास माहीत होते.
शासनाच्या ह्या आॅनलाईन पोर्टलला भेट दिल्याने सरकारी धोरणे योजना उपक्रम यांविषयी माहिती जाणुन घेण्यासाठी सर्वसामान्य भारतीय नागरिकांना कुठल्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही.
शासनाच्या ह्या आॅनलाईन पोर्टलमुळे भारतीय नागरीक घरबसल्या मोबाईल इंटरनेटच्या माध्यमातून शासनाकडुन राबविण्यात येत असलेल्या सरकारी योजना,उपक्रम,धोरणांविषयी माहीती जाणुन घेऊ शकणार आहे.
यासाठी नागरीकांना कुठलेही वर्तमानपत्र वृत्तपत्र वाचण्याची देखील आवश्यकता भासत नाही.यामुळे शासन अणि नागरीक यांच्यामधील अंतर देखील कमी होण्यास मदत होणार आहे.
पीआयबीची इतर प्रमुख कार्ये-
पीआयबी मध्ये अनेक विभागीय अधिकारींची नियुक्ती केली जात असते हे विभागीय अधिकारी माहीती पुढे पाठविण्याचे काम करत असतात.
हे विभागीय अधिकारी प्रत्येक मंत्रालयाशी संबंधित सर्व प्रकारचे प्रकाशन हे इलेक्ट्रॉनिक मीडिया,न्यूज चॅनेल आणि वर्तमानपत्रांना पाठविण्याचे काम करत असतात.
कोणत्याही माध्यम वाहिनीने किंवा वृत्तपत्राने अशी कुठलीही चुकीची बातमी न्युज जनसामान्यांपर्यंत पोहोचवू नये,पसरवु नये जेणेकरून जनतेत अफवा पसरेल,सामाजिक असंतोष निर्माण होईल सामाजिक समतोल बिघडेल याकडेही लक्ष ठेवण्याचे काम हे पीआयबी विभाग प्रसिद्धी अधिकारी करीत असतात.
आणि समजा एखाद्या वृत्तवाहिनीने किंवा वृत्तपत्राने अशी धोकादायक माहिती प्रसिद्ध केली तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे काम देखील पीआयबी अधिकारी वर्गाचे असते.
पीआयबीचा मुख्य हेतु काय आहे?
सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या विविध शासकीय योजना धोरण उपक्रम कार्यक्रम यांविषयी माहिती इंटरनेटच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे.
इलेक्ट्रॉनिक मिडिया वृत्तपत्रे प्रसारमाध्यमे यांना देखील छापण्यासाठी योग्य अणि अचुक माहीती उपलब्ध करून देणे जेणेकरून समाजात कुठलीही अफवा पसरणार नाही.जनतेच्या मनात शासना विषयी कुठलाही गैरसमज निर्माण होणार नाही.
पीआयबी हया आॅनलाईन पोर्टलवर जाऊन बातमी कशी वाचायची?
सर्वप्रथम आपणास पीआयबीच्या आॅफिशिअल वेबसाईटवर जायचे आहे.
वेबसाईट वर गेल्यावर आपल्यासमोर एक होम पेज ओपन होईल तिथे वर दिलेल्या सर्च बार मध्ये आपणास ज्या विषयावर माहीती हवी आहे तो विषय त्याचा किवर्ड टाईप करायचा आहे अणि सर्च बटणावर क्लिक करायचे आहे.
पीआयबीची सुरूवात कधी करण्यात आली होती?
पीआयबीची सुरूवात १९१९ मध्ये करण्यात आली होती.
पीआयबीचे मुख्यालय कोठे आहे?
पीआयबीचे मुख्यालय नॅशनल मिडिया सेंटर नवी दिल्ली येथे आहे.
पीआयबीची आॅफिशिअल वेबसाईट कोणती आहे?
Pib.nic.in ही पीआयबीची आॅफिशिअल वेबसाईट आहे.