Body Language – देहबोली च संवाद प्रक्रियेमध्ये मधील महत्व – Importance of body language in communication process in Marathi

संवाद प्रक्रियेमध्ये देहबोली भाषेचे महत्व – Importance of body language in communication process in Marathi

मित्रांनो जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीशी किंवा अनेक व्यक्तींशी एकाचवेळी संवाद साधत असतो.

तेव्हा ह्या संवाद साधण्याच्या प्रक्रियेत आपली बाँडी लँग्वेज म्हणजे देहबोलीची भाषा खुप महत्वाची भुमिका बजावत असते.

कारण आपण कुठल्याही व्यक्तीशी संवाद साधत असताना आपल्या भावना-विचार आपले व्यक्तीमत्व आपल्या देहबोली भाषेवरून देखील झळकत असतात.अणि बाँडी लँग्वेजमुळे आपला संवाद लोकांशी अधिक प्रभावीपणे साधला जात असतो.

याचकरीता आपण आज बाँडी लँग्वेजचे संवादामधील मुख्य महत्व आजच्या लेखातुन जाणुन घेणार आहोत.

जेणेकरून बाँडी लँग्वेजचे संवाद कौशल्यातील महत्व किती अणि काय असते हे आपणास सविस्तरपणे ज्ञात होईल.

देहबोली भाषा म्हणजे काय? Body language meaning in Marathi

आपल्या शब्दांबरोबरच आपले व्यक्तीमत्व आपली हालचाल,राहण्याची पदधत,बसण्या उठण्याची वागण्याची तसेच बोलण्याची पदधत यातुन देखील झळकत असते.म्हणजे ही एक शब्दांची नव्हे तर देहबोली भाषा असते जिच्या दवारे आपण आपल्या अवयवांदवारे खाणा खुणा करून त्याच्या आधारे भावना विचार व्यक्त करत असतो किंवा एखाद्याशी संवाद साधत असतो.ते ही न बोलता.

देहबोली भाषा म्हणजेच बाँडी लँग्वेजमध्ये कशाचा समावेश होत असतो?

पाहणे- डोळे-चेहऱ्यावरील हावभाव – हातवारे आणि शारीरिक बैठक या चार बाबींचा प्रामुख्याने समावेश होतो

  • चेहरयावरील हावभाव -हास्य,उदास होणे कपाळावरील आढया येणे,राग येणे,डोळे मिचकवणे,रागात बघणे,डोळयात डोळे घालुन आत्मविश्वासाने बोलणे हे सर्व बाँडी लँग्वेजचाच भाग आहेत.
  • या दवारे आपण काहीही न बोलता समोरच्याशी संवाद साधत असतो,त्याच्यासमोर आपल्या भावना विचार व्यक्त करत असतो.
See also  Data आणि information या दोघांमध्ये काय फरक आहे? - Difference between Information and Data

  •  याचसोबत हाताच्या खाणाखुणा करणे,हात वर करणे,हातात हात घेणे,हातवारे करून बोलणे,हाताच्या खाणाखुणा करून एखाद्याला बोलविणे किंवा एखादा संदेश देणे.
  • खाद्याकडे बोट दाखवणे.मान डोलुन एखाद्याला होकार तसेच नकार कळविणे.जोरात बोलणे, हळुवारपणे बोलणे,ओठांची पायांची हालचाल करणे हे बाँडी लँग्वेजचाच भाग आहेत.
  • ज्याच्या आधारे आपण निशब्दपणे एखाद्याशी संवाद साधु शकतो.एखाद्याचे व्यक्तीमत्व जाणुन घेऊ शकतो.

देहबोली भाषेचे,बाँडी लँग्वेजचे संवादामधील महत्व काय आहे?

importance of body language in communication process in Marathi

देहबोली भाषेचे संवादात खुप महत्व असते कारण आपल्या देहबोली भाषादवारेच आपले व्यक्तीमत्व समोरची व्यक्ती व्यवस्थित जाणुन घेण्याचा त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करत असते.

जर आपणास एखाद्या व्यक्तीचे व्यक्तीमत्व,वागणुक स्वभाव हे गुण जाणुन घ्यायचे असेल,त्याच्या मध्ये आत्मविश्वास किती आहे हे जाणुन घ्यायचा असेल तर त्याच्या देहबोली हालचालीवरून म्हणजेच बाँडी लँग्वेजवरून आपण सहज जाणुन घेऊ शकतो.

म्हणुनच बाँडी लँग्वेजला संवादा मध्ये खुप अधिक महत्व दिले जाते.कारण जे आपण बोलून व्यक्त करू शकत नाही ते आपले हावभाव शारीरिक हालचाली व्यक्त करत असतात.

● बाँडी लँग्वेजच्या आधारे आपण आपल्या चेहरयावरील हावभाव व्यक्त करू शकतो.आपण आनंदी आहे?दुखी आहे का निराश आहे?का रागात आहे हे समोरच्याला आपल्या बाँडी लँग्वेजवरून आपण काहीही न बोलता चटकन समजून जाते.

● आपल्यामध्ये बोलताना,आपले मत लोकांसमोर मांडतांना किती आत्मविश्वास आहे हे समोरच्याला,आँडियन्सला जेव्हा आपण त्यांच्या डोळयात डोळे घालून बघतो हे लगेच कळुन जात असते.ज्याला इंग्रजीत आय काँन्टँक्ट असे म्हटले जाते.जर एखादी व्यक्ती बोलताना डोळयात डोळे घालून खंबीरपणे आत्मविश्वासाने बोलत नसेल तर समजून जावे की त्याच्यात आत्मविश्वासाची कमतरता आहे.

● आपल्या चेहरयावरचे हास्य,नैराश्य,राग,भीती आपली बोलण्याची पदधत,वागणुक,बोलण्या वागण्यातील नम्रता उदधटपणा हे बघुन देखील समोरचा आपले व्यक्तीमत्व कसे आहे हे जाणुन घेत असतो.

संवाद प्रक्रियेतील अत्यंत महत्वपूर्ण भाग असणारे देहबोली कौशल्य कसे सुधारावे?

How to improve body language skill in communication process in Marathi

See also  17 -16मे रोजीच्या महत्वाच्या चालू घडामोडी current affairs in Marathi

● आपण बोलताना कधीही समोरच्याच्या डोळयात डोळे घालून बोलायला हवे याने समोरच्या व्यक्तीला आपल्यामधील आत्मविश्वास दिसून येतो तसेच आपल्याला त्याच्याशी संवाद साधण्यात रूची आहे हे देखील त्याला कळत असते.अणि जर आपण समोरच्याशी डोळयांत डोळे घालून बोललो नही तर त्याला असे स्पष्ट होते की आपल्यात आत्मविश्वासाची कमतरता आहे किंवा आपल्याला त्याच्याशी बोलण्यात संवाद साधण्यात काहीच रूची नाही.आपण त्याला ईग्नोर करतो आहे.

● संवाद साधताना आपले लक्ष समोरच्या व्यक्तीच्या बोलण्याकडे पुर्णपणे असायला हवे.त्यांचे बोलणे आपण व्यवस्थित नीट लक्ष देऊन ऐकायला हवे.

● आपल्या बोलण्यातुन वागण्यातुन नम्रता झळकायला हवी आपले बोलणे वागणे बघुन आपण समोरच्याला उदधट तसेच गर्विष्ठ वाटु नये.

● बोलताना खुप जोरात तसे खुप हळु देखील बोलु नये मध्यम आवाजात समोरच्याला ऐकु येईल असेच बोलावे.याने आपण काय म्हणतो आहे समोरच्याला स्पष्टपणे कळत असते.

● बोलताना आपल्या चेहरयावर स्मित हास्य असायला हवे याने आपला स्वभाव किती आनंदी आहे हे समोरच्याला कळत असते.

● आपले कुठलेही मत मांडतांना समोरच्या व्यक्तीची एकदा परवानगी मागणे याने आपल्यातील नम्रपणा झळकतो अणि आपण प्रोफेशनल देखील बनतो.

● समोरच्याच्या प्रत्येक शब्दावर बोलण्यावर मान डोलुन हा म्हणु नये याने समोरच्याला हे कळते की आपण त्याची – sycophancy- चमचागिरी करू पाहतो आहे.

● इंटरव्यू घेताना देखील आपल्या बाँडी लँग्वेजवरून चेहरयावरील हावभाव बघुन मुलाखत घेणारा आपली पारख करत असतो अणि हे ठरवत असतो की आपण सदर पदासाठी जाँब पोस्टसाठी किती योग्य उमेदवार आहोत.आपल्यात किती आत्मविश्वास आहे?आपण नरवस आहे का घाबरलेलो आहे का?इत्यादी म्हणुन इंटरव्यू देताना आपल्या डोळयात आत्मविश्वास असायला हवा.चेहरयावर भीती नरवसनेस ह्या भावना दिसायला नको.बोलण्या वागण्यातही नम्रता शिष्टाचार असावा.

● उभे राहताना छाती आत घेणे मागचा भाग बाहेर घेणे हे असे दर्शवत असते की आपण किती थकलेलो आहोत तसेच आळशी अणि सुस्त आहोत.म्हणून उभे राहताना कधीही आपली छाती बाहेर असायला हवी अणि आपण ताठ उभे असायला हवे.याने आपण किती चुस्त तंदुरूस्त फीट आहे हे समोरच्याला दिसत असते.

See also  सुंदर पिचाई यांच्याविषयी माहीती - Sundar Pichai Information In Marathi

थोडक्यात सांगायचे म्हटले तर आपली देहबोली हालचाल,वागणुक चेहरयावरील हावभाव आपल्याविषयी इतरांना सर्व काही सांगत असते.म्हणून संवाद प्रक्रियेच्या कौशल्यात बाँडी लँग्वेजला खुप जास्त महत्व देण्यात आले आहे.

असे म्हणतात की आपल्या व्यक्तीमत्वाविषयी ८० टक्के माहीती समोरच्या व्यक्तीला आपल्या बाँडी लँग्वेजवरून होत असते.ते ही आपण काही न सांगता आणि काही न बोलता.

 

#2 Confident Body Language Tips – By Sandeep Maheshwari I Personality Development I Hindi