विधानसभा अध्यक्ष निवडणूक माहीती – Legislative assembly speaker election information in Marathi
विधानसभा म्हणजे काय?
भारतातील जी घटक राज्ये आहेत त्याच्या कायदेमंडळा मधल्या कनिष्ठ गृहास विधानसभा असे म्हटले जाते.
घटनेत तरतुद केलेल्या 170 कलम अंतर्गत प्रत्येक राज्यामध्ये विधानसभा ह्या सभागृहाचे अस्तित्व आहे
विधानसभा हे राज्य कायदेमंडळाचे कनिष्ठ पण अधिकाराच्या बाबतीत वरिष्ठ मानले जाणारे सभागृह असते.
विधानसभेमध्ये किमान साठ किंवा कमाल पाचशे सदस्य असतात.
1)विधानसभा अध्यक्ष कोण असतो?
विधानसभा अध्यक्ष पद हे सभागृहातील सर्वोच्च पद असते.ज्याला सभापती असे देखील म्हटले जाते.
2) विधानसभा अध्यक्षाची निवड कशी केली जाते?
घटनेत केलेल्या काही तरतुदींनुसार विधानसभा अध्यक्षाची निवड करण्यात येत असते.
विधानसभा अध्यक्षाची निवड घटनेत दिलेल्या नियम 63 प्रमाणे गुप्त पदधतीने केली जात असते.यात सगळया आमदारांना आपले मतदान करायला दोन तासाचा कालावधी दिला जात असतो.
जर अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत दोन किंवा दोनापेक्षा अधिक उमेदवार उभे असतील तर अशा परिस्थितीत ज्या उमेदवारास खुप कमी मत मिळाले आहे त्याला वगळण्यात येते.अणि पुन्हा दोन व्यक्तींत ही निवडणुक पार पडत असते.
विधानसभा अध्यक्षाची निवड ही सभागृहातील सभासदांमार्फत मतदान प्रक्रियेच्या आधारे केली जाते.
ज्यात उमेदवार हा अध्यक्षपदासाठी सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाकडुन आपला उमेदवारी अर्ज भरू शकतो.
सर्वप्रथम यासाठी विधानसभेत प्रस्ताव मांडण्यात येतो अणि मग सर्वाच्या मताची सहमती प्राप्त झाल्यावर विधानसभा अध्यक्षाची निवड केली जात असते.
ज्या व्यक्तीला विधानसभेच्या अध्यक्ष पदाकरीता उभे केले जाते ती व्यक्ती विधानसभा अणि विधानपरिषद या दोघांची सभासद असणे बंधनकारक मानले जाते.
3)विधानसभा अध्यक्षाची जबाबदारी अणि अधिकार कोणकोणते असतात?
- विधानसभा अध्यक्षाला संविधानानुसार काही विशेष हक्क प्रदान करण्यात आलेले असतात.
- विधानसभा अध्यक्ष हे विधान मंडळ अणि विधानसभा सचिवालय या दोघांचे प्रमुख असतात.
- सत्ताधारी पक्ष अणि विरोधी पक्ष या दोघांमध्ये समन्वय ठेवून कुठलाही पक्षपातीपणा न करता काम करणे ही प्रमुख जबाबदारी विधानसभा अध्यक्षाची असते.
- सभागृहातील कुठलाही सभासद नियमांचे उल्लंघन करणार नाही याची काळजी सभागृहातील अध्यक्ष घेत असतो.
- अणि समजा सभागृहातील एखाद्या सभासदाने नियमांचे पालन नही केले तर त्याच्यावर काय कारवाई करायची हे ठरवण्याचा अधिकार देखील विधानसभा अध्यक्षाला असतो.
- विधानसभा अध्यक्षास कँबिनेट मंत्रीचा दर्जा बहाल करण्यात आलेला असतो.
- विधानसभा अध्यक्षाचे काम सभागृहातील चर्चेत कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप न करणे पण विधानसभेतील महत्वाच्या कामकाजा संबंधी आपले निर्णय घेणे हे असते.
- सभागृहातील सभासद आपला राजीनामा हा विधानसभा अध्यक्षांकडे देत असतात.
- सभागृहात चर्चा चालु असताना कोणत्या सभासदाने किती बोलायचे हे विधानसभा अध्यक्ष ठरवित असतात.
जेव्हा सत्ताधारी अणि विरोधी पक्ष दोघांना सारखे मत पडतात तेव्हा विधानसभा अध्यक्ष आपले स्वताचे मत देत असतो विधानसभा अध्यक्षाचे मत ज्याला प्राप्त होत तो अखेर विजयी घोषित केला जात असतो.
4) विधानसभा अध्यक्षांची निवड कधी करता येते?
निवडणुक तसेच इतर कुठल्याही कारणाने विधानसभेतील अध्यक्षपद जेव्हा रिकाम होत असते.तेव्हा एका नवीन विधानसभा अध्यक्षाची निवड केली जात असते.
5) विधानसभा अध्यक्षाची निवड कधी करण्यात यावी याची तारीख कोणाकडुन ठरविली जाते?
विधानसभा अध्यक्षाची निवड करण्याची तारीख मंत्रीमंडळाकडुन ठरवली जाते.
मग मंत्रिमंडळाकडुन शिफारस करण्यात आल्यानंतर राज्यपालांना ही तारीख कळवली जात असते.मग राज्यपालांकडुन ही तारीख घोषित केली जात असते.
राज्यपालांकडुन ज्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख घोषित केली जाते त्याच्या किमान एक दिवस आधी अध्यक्षपदासाठी किंवा अनुमोदन करण्याकरीता उमेदवारांकडुन फाँर्म भरला जात असतो.
निवडणुक चिन्हाविषयी माहीती- Electoral Symbol Information In Marathi