व्यक्तीमत्व विकास – Personality development information in Marathi
आपल्याला प्रत्येकाला आपल्या व्यक्तीमत्वामध्ये चांगला बदल घडवून आणायचा असतो अणि आपले व्यक्तीमत्व अधिक प्रभावी अणि रूबाबदार असे बनवायचे असते.
जेणेकरून आपली समाजात अणि आपल्या आजुबाजुच्या व्यक्तींवर जसे की आपले मित्र मैत्रीणी नातलग,आपण काम करतो त्या आँफिसमधील स्टाफ,आपल्या व्यवसायातील आपले कस्टमर यांच्यावर चांगली छाप पडते.
म्हणून आजच्या लेखात आपण व्यक्तीमत्व विकास ह्या विषयावर सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.
व्यक्तीमत्व विकास म्हणजे काय?
व्यक्तीमत्व विकास म्हणजे आपले दिसणे राहणीमान,वेशभुषा धारण करणे,बोलणे,वागणे,विचार करणे,आपला स्वभाव,रोजची जीवनशैली यामध्ये सुधारणा घडवून आणने.
जेणेकरून समाजातील इतर घटकांवर म्हणजेच लोकांवर मित्र मैत्रीणी,नातलग,आँफिसमधील स्टाफ,आपण करतो त्या आपल्या रोजच्या उद्योग व्यवसायामधील आपले रोजचे ग्राहक यांच्यावर आपला चांगला प्रभाव पडेल.
व्यक्तीरेखा म्हणजे काय?आपण कोणत्या दोन व्यक्तीरेखांमध्ये वावरत असतो?
आपण आपले जीवन जसे जगत असतो,जसे इतरांना जीवन जगताना दिसत असतो तसेच वरवर इतरांना आपण असे आहे हे दाखवत असतो त्याला व्यक्तीरेखा असे म्हटले जाते.
1)आंतरीक तसेच मुळ व्यक्तीरेखा –
एखादा व्यक्ती गरीब आहे त्यामुळे त्याचे राहणीमान जीवनशैली देखील साधीच आहे.अणि लोक देखील त्याला नेहमी तसेच पाहात असतात.याला म्हणतात मुळ व्यक्तीरेखा.
2) बाहय तसेच बनावट व्यक्तीरेखा –
एखादा व्यक्ती परिस्थीतीने गरीब आहे पण तो इतरांना मी श्रीमंत आहे पैसेवाला आहे मी माझ्या जीवणात खुप खुश आनंदी आहे हे इतरांना दाखवण्यासाठी पैशांची उधळमात करत असेल,चैनचंगळ करत असेल किंवा असे करण्याचा खोटा देखावा इतरांसमोर करत असेल तर त्यास बनावट व्यक्तीरेखा असे म्हणतात.
आपल्याला कुठलेही ज्ञान नसताना चारचौघात एखाद्या विषयाचे खुप ज्ञान असण्यासारखे फुशारक्या बढाया मारणे वागणे.हे देखील बनावट व्यक्तीरेखेचेच उदाहरण आहे.
3) दुय्यम व्यक्तीरेखा –
एखादी व्यक्ती एका ठिकाणी आपण खुप प्रामाणिक सभ्य अणि सोजवळ आहोत असे दाखवते अणि दुसरीकडे वैयक्तिक आयुष्यात त्या व्यक्तीची वागणुक अलगच असते.म्हणजे एकुण दोन व्यक्ती रेखांमध्ये तो वावरत असतो.
ज्याने आपले व्यक्तीमत्व इतरांसमोर अधिक झळकते त्यांच्यावर आपला प्रभाव टाकते असे व्यक्तीमत्व विकासामधील महत्वाचे घटक कोणकोणते आहेत?
● आपले दिसणे
● आपले राहणीमान
● आपली वेशभूषा केशभुषा
● आपली बोलण्याची इतरांशी संवाद करण्याची पदधत
● वागण्याची पदधत
● विचार करण्याची पदधत
● आपला स्वभाव
● आपली रोजची जीवनशैली
वरील सर्व घटक आपल्या व्यक्तीमत्वाचा महत्वाचा घटक आहेत.
कारण आपले दिसणे,राहणीमान,वेशभुषा
आपली बोलण्याची इतरांशी संवाद साधण्याची शैली वागणुकीची पदधत,विचार करण्याची पदधत,आपला स्वभाव,आपली रोजची जीवनशैली
यावरून लोक आपल्या मुळ व्यक्तीमत्वाचा अंदाज लावत असतात.
आपल्या व्यक्तीमत्व विकासामधील महत्वाचे घटक अणि त्यांचा आपल्या जीवनावर व्यक्तीमत्वावर पडणारा चांगला वाईट प्रभाव –
उदा,जर समजा एखादा व्यक्ती नेहमी पांढरेशुभ्र वस्त्र परीधान करत असेल तर लोकांना कळुन जाते की हा एक कुठल्या तरी पक्षाचा राजकीय कार्यकर्ता आहे.
एखादी व्यक्ती नेहमी सुट बुट कोटात वावरत असेल खुप मोठया कारमध्ये फिरत असेल मोठया बंगल्यात राहत असेल तर लोकांना कळुन जाते की हा एक मोठा करोडपती बिझनेसमँन आहे.
कारण तशी प्रतिमा आपल्या मनात त्या व्यक्तीविषयी निर्माण होत असते.यावरून आपणास कळुन येईल की वेशभूषा आपल्या व्यक्तीमत्वाविषयी सांगत असलेला व्यक्तीमत्वास उठावदारपणा आणणारा किती महत्वाचा घटक आहे.
म्हणुन आपण नेहमी स्वच्छ अणि व्यक्तीमत्वास साजेसे उठावदारपणा आणणारे कपडे परिधान केलेले असावे.याने समोरच्या व्यक्तीवर आपली चांगली छाप प्रभाव पडत असतो.
दुसरी गोष्ट म्हणजे आपली भाषा बोलण्याची शैली पदधत आपले जर आपल्या भाषेवर चांगले प्रभुत्व असेल तर याचा देखील समोरच्या व्यक्तीवर चांगला प्रभाव पडतो.
आपल्या भाषेवरूनच आपण शिक्षित आहे का अशिक्षित हे खुप जण ओळखुन घेत असतात म्हणजे समजा एखादा व्यक्ती हायफाय इंग्लिशमध्ये बोलत असेल तर आपल्या मनात त्याच्याविषयी उच्चशिक्षित सुसंस्कृत अशी प्रतिमा निर्माण होत असते.
अणि जर त्याच ठिकाणी ती व्यक्ती आपल्याशी गावंढळपणे बोलत असेल वागत असेल अधूनमधुन शिवीगाळ करत असेल तर आपणास ती व्यक्ती अशिक्षित गावंढळ अणि गुंड प्रवृत्ती असलेली आहे असे त्याच्या भाषा अणि बोलण्यावरून कळुन जाते.
यावरून आपणास कळुन येईल की आपली भाषा आपल्याविषयी सर्व काही आपण न बोलता ही सांगुन देत असते की आपली संस्कृती आपल्या वर केले गेलेले संस्कार कसे आहेत.
आपले विचार देखील आपल्या व्यक्तीमत्वाचा खुप महत्वाचा घटक आहे.कारण आपले विचार आपल्या जीवणाला आकार देत असतात.
आपले विचार जर सकारात्मक असतील तर आपण जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघत असतो पण जर आपले विचार नकारात्मक अणि नैराश्यवादी असतील तर आपला जीवणाकडे बघण्याचा दृष्टिकोण देखील तसाच बनत जातो.
अणि आपल्या आजुबाजुचे मित्र मैत्रीणी नातलग इतर लोक आपल्याकडे एक नकारात्मक विचारांची अणि नैराश्यवादी भुमिका असलेली व्यक्ती म्हणून बघु लागतात.अणि आपले व्यक्तीमत्वाचे हेच चित्र त्यांच्या डोळयासमोर सदैव राहते.
यावरून आपणास कळुन येईल की आपली समाजातील इतर लोकांवर चांगली छाप पडावी यासाठी आपले विचार सकारात्मक असणे किती गरजेचे आहे.
आपल्यात करूणा दया ही भावना असावी पण अतिभावुकता देखील आपल्या स्वभावात नसावी.याने लोक आपल्याला अतिभावुक म्हणून ओळखु लागतात अणि आपल्या इमोशनचा गैरफायदा देखील घेऊ शकतात.
व्यक्तीमत्व विकासासाठी काही टिप्स –
● आपले व्यक्तीमत्व आपल्या प्रोफेशनला साजेल शोभेल समाजात आपली लोकांवर चांगली अणि सकारात्मक छाप पाडेल असे असायला हवे.
● आपल्या व्यक्तीमत्वात कुठलाही खोटेपणा बनावटपणा नसावा.जसे आपले प्रोफेशन आहे जशी आपली फायनान्शिअल कंडिशन आहे तसेच आपण राहायला हवे आपण आहोत तसेच जगाला दिसावे.जास्त मोठेपणा अणि फुशारकी देखील आपण मारणे टाळावे.
● फक्त आपली वेशभूषा स्वच्छ असावी.
● विचार सकारात्मक असावेत.
● भाषा शुदध असावी.
● वागण्यात बोलण्यात नम्रपणा समजुतदारपणा शांतपणा असावा.
● संवाद करताना समोरच्याचे बोलणे आपण लक्षपुर्वक ऐकायला हवे.
● बोलताना आपल्या चेहरयावर नेहमी एक स्मित हास्य असायला हवे.
● नववनीन पुस्तकांचे वाचन करावे याने आपण अधिक विचार समृदध बनत जातो.अणि खुप अनेक नवनवीन गोष्टी कौशल्य-विचार आपल्याला शिकायला मिळतात.