पुदिना (Mint) चे फायदे -Pudina information in Marathi

Pudina information in Marathi

Table of Contents

पुदिना चे फायदे मराठी-Mint information in Marathi

पुदिनाही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. याचे शास्त्रीय नाव मेंन्थाविहरीडीस असे नाव आहे. हिचे कुळ लॅमिएसी आहे. शरीरास थंडावा देणारी वनस्पती असून, वायूहारक, पाचक व वातानुलोमन करणारी आहे. पोटदुखीवर उपयोगी आहे. पुदिना खाल्ल्याने पोट साफ व लघवी साफ होते. याचे सेवनाने लघवीचे प्रमाण वाढते.

  • थंडाई (मेंथॉल) यातील एकघटक असल्याने सर्दी, वातकारक पदार्थ खाल्ल्यामुळे होणारी डोकेदुखी, दातदुखी, वातविकार इत्यादी याचे सेवनाने बरे होतात. वांतीहारक म्हणून ब आम्लपित्तातही याचा चांगला प्रभाव पडतो. आतड्यांचे रोगातही हा उपकारक आहे.
  • तुळशीच्या पानासारखेच, विषारी कीडा चावल्याच्या जागी हिची पाने चोळल्यास, कीडा चावल्यामुळे होणारी आग व कंड कमी होतो.
  • या वनस्पतीचा स्वयंपाकातही वापर होतो. पाणीपुरी, कैरीची चटणी, जलजीरा आदींमध्ये हा एक महत्त्वाचा घटक आहे. स्वयंपाकातील अन्य पदार्थांसाठी ही याचा वापर होतो. भारतात, उन्हाळ्यात याचा वापर जास्त करण्यात येतो.
  • पुदिन्यामध्ये असलेले फायबर आपले कोलेस्ट्रॉल (चरबी) चे प्रमाण कमी करण्यास मदत करतात, तसेच याच्यात उपलब्ध असलेले मॅग्नेशियम आपली हाडे मजबूत करतात
  • जर कोणाला उलटी होत असेल तर २ चमचे पुदिना दर २ तासात त्या व्यक्तीला द्या यामुळे त्याची उलटी थांबेल व त्याला बरे वाटेल.
  • जर आपल्याला पोटा संबंधी आजार असतील तर पुदिन्याच्या ताज्या पानामध्ये लिंबाचे रस व त्याच्या समान मात्रेत मध मिळून सेवन केल्याने जवळ जवळ पोटाच्या सर्वच आजारांवर लवकर आराम मिळतो.
  • सर्दी झाल्यावर थोडा पुदिन्याचा रस घ्या आणि त्यात काळी मिरी आणि थोडा काळा मीठ मिळवा आणि ज्या प्रकारे आपण चहा बनवतो त्याच प्रकारे चहा सारखे उकळवून घ्या व ते प्या, हा काढा सर्दी, खोकला, तसेच तापावर गुणकारी आहे.
  • जर कोणाला खूप वेळ उचकी येत असेल तर त्याला पुदिन्याची काही पाने खायला सांगा त्यामुळे त्याची उचकी बंद होईल.
  • मासिक पाळी वेळेवर येत नसेल तर आपण पुदिन्याची सुकी पाने घ्या ब त्याचा चूर्ण बनवा आणि दिसातून दोन वेळा मधात मिसळवून तो नियमित पणे काही दिवस घ्या असे केल्याने मासिक पाळी वेळेवर न येण्याची समस्या दूर होईल.
  • जर कोणाला जखम झाली असेल तसेच खरचटले असेल तर त्याच्यावर पुदिन्याची ताजी पाने वाटून घेऊन लावा यामुळे जखम लवकर सुकेल.
  • जर आपल्या तोंडाला वास येत असेल तर पुदिन्याची पाने घ्या त्यांना सुकवून घ्या आणि त्याचा चूर्ण बनवा आणि याचा तुम्ही मशेरी सारखा वापर करा. असे केल्याने तुमच्या हिरड्या मजबूत होतीलआणि तोंडाची दुर्गंध बंद होईल, असे तुम्ही एक महिन्याहून अधिक काळासाठी करा आपल्याला याचा फायदा नक्की होईल.
  • पुदिन्याच्या रस मिठाच्या पाण्यात मिसळवून गुळण्या करा, असे केल्याने आपला आवाज बसला असेल तर तो ठीक होईल.
See also  HR म्हणजे काय? Human Resource Information in Marathi

उन्हाळ्यामध्ये पुदिन्याचे फायदे – Pudina information in Marathi

 कधी कधी गरमीच्या दिवसात अस्वस्थ तसेच घाबरल्या सारखे होते. त्यासाठी काही पुदिन्याची पाने तसेच अर्धा चमचा वेलचीचे चूर्ण एक ग्लास पाण्यात घेऊन ते उकळवा आणि ते पाणी गार झाल्यावर प्या, असे केल्याने आपल्याला बरे वाटेल.

कॉलरा झाला असेल तर कांद्याचा रस व लिंबाचे रस पुदिन्याच्या रसासोबत मिसळवून प्यायल्याने आराम मिळतो.

सौंदर्य वाढवण्यासाठी पुदिन्याचा उपयोग

जर आपली त्वचा तेलकट असेल तर पुदिन्यापासून बनवलेला फेशियल आपल्यासाठी चांगला ठरेल. दोन मोठे चमचे पुदिन्याचे वाटण आणि दोन चमचे दही तसेच एक मोठा चमचा ओट मील (ओटचे जाडे ‘भरडे पीठ) यांना मिसळवून याचा जाड लेप बनवा आणि हा लेप १५ मिनिटासाठी आपल्या चेहऱ्यावर लावा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्या आठवड्यातून कमीत कमी असे दोन वेळा करा.

आपल्या त्वचेचा तेलकटपणा कमी होईल, तसेच चेहऱ्यावरील पिंपल्स दूर होतील. पुदिन्याचा रस मुलतानी माती सोबत मिसळवून त्याचा चेहऱ्यावर फेशियल सारखा वापर केल्याने त्वचेचा तेलकट पणा कमी होईल तसेच सुरकुत्या कमी होतील आणि आपल्या चेहऱ्याची चमक वाढेल.

पुदिन्याच्या हिरव्यागार आणि स्वादिष्ट चटणीसोबत भजीचा आस्वाद घ्यायला सर्वांनाच आवडते. पुदिना चटणी कोशिंबीर, भजी  सविस्तर माहिती स्मरणशक्ती वाढते.

पुदिन्यातील औषधी गुणधर्म आपली स्मरणशक्ती वाढवण्याचे कार्य करतात. पुदिन्यामधील पोषक घटक मेंदूची आकलनशक्ती ही वाढवण्यास मदत करतात. यामुळे आसपास घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींबाबत आपल्यामध्ये शारीरिक तसंच मानसिकरीत्या सतर्कता वाढते. नियमित पुदिन्याचे सेवन करणारी लोक इतरांच्या तुलनेत अधिक सक्रिय असतात.

यकृत निरोगी राहण्यासाठी

आपल्याला होणारे बहुतेक आजार यकृताशी कोणत्या ना कोणत्यास्वरूपात जोडलेले असतात. कारण पचनप्रक्रियेमध्ये यकृताची महत्त्वपूर्ण भूमिका असते. तसंच शरीराला आवश्यक ती ऊर्जा देण्याची जबाबदारी सुद्धा या अवयवाची असते. यकृताची कार्य करण्याची गती मंदावल्यास तुमचीही काम करण्याची गती आपोआप कमी होते. म्हणजेच स्वतःला सक्रिय ठेवण्यासाठी तुमचे यकृतदेखील सक्रिय असणे आवश्यक आहे. यासाठी नियमित पुदिन्याचे सेवन करावे. पुदिन्याची ४ ते ५ पाने तुम्ही चावून देखील खाऊ शकता.

See also  जेवलीस का तसेच जेवलास का?चा अर्थ काय होतो?- Jevlis ka and jevlas ka meaning in Marathi

वजन कमी करण्यासाठी लाभदायक

फिट राहण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी हल्ली प्रत्येक जण वेगवेगळेउपाय करत असतात. पण तरीही काही जणांचे वजन नियंत्रणात राहत नाही. वजन कमी करण्यासाठी तुम्ही आपल्या आहारामध्ये पुदिन्याच्या पानांचा समावेश करू शकता. पुदिन्याची चटणी, पुदिनायुक्‍त ताक, कोंशिबिरीमध्ये पुदिना मिक्स करून त्याचे सेवन करा. यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास नक्कीच मदत मिळेल. शरीरामध्ये ऊर्जा देखील टिकूनराहील.

पुदिन्यामुळे तुम्हाला आरोग्यवर्धक तसेच सौंदर्यवर्धक देखील लाभ मिळतात. चेहऱ्यावरील मुरुम, त्यांचे डाग, चेहऱ्याचा काळपट कमी करायचा असेल तर पुदिन्याचा वापर करा.

पुदिन्यातील औषधी गुणधर्मामुळे सौंदर्य खुलण्यास मदत मिळते. पिंपल, ब्लॅकहेड्स किंवा व्हाईटहेडसमुळे तुम्ही त्रस्त आहात तर पुदिन्याचा पानांचा लेप तयार करा आणि चेहऱ्यावर लावा. सोबत स्वयंपाकामध्येही पुदिन्याचा समावेश करावा.

पुदिना नॅचरल पेन किलर प्रमाणे कार्य करते. म्हणूनच काही आयुर्वेदिक औषधांमध्ये पुदिन्याच्या अर्काचा वापर केला जातो. पुदिन्यामुळे आपल्या शरीराला थंडावा मिळतो. जळजळ होणे,त्क्वेला खाज सुटणे इत्यादी समस्यादेखील कमी होतात. पुदिन्यातील पोषण तत्व मुळे एखाद्या वेदनेपासून आपल्याला आराम मिळतो.

तोंड, दात योग्य पद्धतीने स्वच्छ केल्यानंतरही काही जण तोंडाला येणाऱ्या दुर्गंधाच्या समस्येमुळे त्रस्त असतात. ही समस्या दात किंवा तोंडाच्या अस्वच्छतेमुळे नव्हे तर पोटाच्या समस्येमुळे उद्भवते.

पचनप्रक्रियेशी संबंधित त्रासामुळे शौचास न होणे, बद्धकोष्ठता किंवा आतड्यांमध्ये एखाद्या प्रकारचा संसर्ग झाल्यास काही जणांच्या तोंडाला दुर्गंध येऊ शकतो. झोपेतून उठल्यानंतर किंवा खूप वेळ काहीच न खाल्ल्यास तोंडाला वास येतो त्यांनी पुदिन्याचा अर्क किंवा स्क्यंपाकामध्ये पुदिन्याचा समावेश केल्यास त्यांना भरपूर फायदे मिळतील.


Amazon-24 Mantra Organic Sonamasuri Brown Rice, 5kg

Best Discount Coupons

पुस्तके – फिशिंग

1 thought on “पुदिना (Mint) चे फायदे -Pudina information in Marathi”

Comments are closed.