मानव संसाधन यूनिट – Human Resource Information in Marathi
आपण प्रत्येक जण कधी ना कधी जाँब इंटरव्युहसाठी एखाद्या कंपनीत गेलेलोच आहे.त्यामुळे इंटरव्युह देताना एच आर हा शब्द आपण प्रत्येकाने ऐकलेला आहे.
जेव्हा आपण एखाद्या प्रायव्हेट कंपनीत जाँब इंटरव्युहसाठी जात असतो.तेव्हा आपली मुलाखत घेण्याचे काम हे त्या कंपनीतील एच आर करत असतो.
पण याव्यतीरीक्त आपल्याला एच आर विषयी इतर कोणतीही माहीती नसते.
जसे की एच आर हा नेमकी कोण असतो?त्याचे कोणत्याही कंपनीत काय स्थान असते?त्याचे काम काय असते?हे आपल्यातील बहुतेक जणांना माहीत नसते.
म्हणुन आजच्या लेखात आपण एच आर म्हणजे काय?एच आर कोण असतो?त्याची जबाबदारी काय असते इत्यादी सर्व बाबी सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.
HR चा FULL FORM काय होत असतो?
HR चा फुल फाँर्म HUMAN RESOURCE) (मानव संसाधन असा होत असतो.
HR म्हणजे काय?
- HR चा फुल फाँर्म (HUMAN RESOURCE) मानव संसाधन असा होत असतो.एच आर मँनेजरला मराठीत मानव संसाधन व्यवस्थापक असे देखील म्हटले जाते.
- एच आर हा शब्द सर्वप्रथम 1960 मध्ये वापरण्यात आला होता.
- एच आर हा आपल्या कंपनीत तसेच संघटनेत जेवढे कर्मचारी काम करीत असतात त्यांच्या हितासाठी आणि ह्क्कांसाठी लढण्याचे काम करतो.
- कारण कुठलीही कंपनी तेव्हाच यशस्वीपणे कोणतेही कार्य प्रोजेक्ट पार पाडु शकते जेव्हा त्या कंपनीतील वर्कस इम्पलाँई हे मन लावून श्रदधा निष्ठेने कंपनीसाठी काम करीत असतात.
- आणि एच आर हा कंपनीतील एक असा व्यक्ती असतो जो कंपनीतील कर्मचारी तसेच संघटनेतील कर्मचारींच्या समस्या अडचणी सोडवण्याचे काम करत असतो.
- एच आर ची जबाबदारी ही कोणत्याही कंपनीतील मँनेजमेंट आणि रिक्रुटमेंटची कामे सांभाळणे ही असते.
- तसेच कंपनीच्या उत्पादकतेत सुधार आणि वाढ करणे हे असते आणि त्यासाठी कंपनीच्या हितासाठी नवीन कुशल आणि पारंगत कर्मचारींची भरती करणे हे काम एच आर मँनेजरचे असते.
- एच आर हे कुठल्याही कंपनी तसेच संस्था संघटनेतील एक खुप महत्वाचे पद आहे जे प्रत्येक कंपनी आणि संघटनेत असणे फार गरजेचे असते.
बायोडाटा (Biodata) म्हणजे काय – वाचण्या साथी क्लिक करा
HR ची कामे कोणकोणती असतात?
एच आर मँनेजरला कुठल्याही कंपनीत तसेच संस्था,संघटनेत अनेक महत्वाची कामे करावी लागतात
जी पुढीलप्रमाणे आहेत :
- कंपनीत नवीन कर्मचारींची भरती करण्यासाठी नोकरीच्या जाहीरातीचे आयोजन करणे हे एच आर मँनेजरचे काम असते.
- कंपनीत नवीन कर्मचारींची भरती करण्यासाठी त्यांच्या मुलाखतीची एक योग्य वेळ ठरविणे तिचे नीट योग्यरीत्या मँनेजमेंट करणे हे एच आरचे काम असते.
- ज्या कर्मचारींची भरती केल्याने कंपनीचा फायदा होईल प्रगती होईल कंपनीच्या उत्पादकतेत वाढ होईल कंपनीसाठी अशा योग्य उमेदवाराची निवड करण्याचे काम तसेच जबाबदारी एच आर मँनेजरची असते.
- कंपनीतील कर्मचारींना काय हवे काय नको त्यांच्या गरजांकडे लक्ष देण्याचे काम देखील एच आर मँनेजरच करत असतो.
- कंपनीसाठी नवीन योग्य उमेदवारांची निवड करून झाल्यानंतर त्यांना कंपनीच्या कामाविषयी ट्रेनिंग देणे,ते काम नीट समजावून सांगणे मार्गदर्शन करणे हे देखील एच आर मँनेजरचेच काम असते.
- कंपनीचे कसे चालले आहे त्याकडे लक्ष देण्याचे काम देखील एच आर मँनेजरचे असते.
- कंपनीत नवीनतम भरती केलेल्या उमेदवारांचे बायोडेटा नीट व्यवस्थित लाँकरमध्ये सेफ जपुन ठेवण्याचे काम देखील एच आर मँनेजरच करतो.
- कंपनीतील कर्मचारींनी मन लावुन श्रदधेने निष्ठेने आणि स्फुर्तीने काम करावे यासाठी त्यांना प्रेरित करण्याचे काम देखील एच आर मँनेजरच करत असतो.
- आपल्या कंपनीत काम करत असलेल्या सर्व कर्मचारींना त्यांचा फायदा कशात आहे तसेच त्यांचे अधिकार कोणकोणते आहेत?याविषयी माहीती देण्याचे काम देखील एच आर मँनेजरचेच असते.
- कंपनीत काम करत असलेल्या सर्व कर्मचारींसोबत समानतेने वागणे कोणासोबत कुठलाही भेदभाव होऊ न देणे हे काम एच आर मँनेजरचेच असते.
- कोणत्या कर्मचारींला नोकरीत बढती द्यायची तसेच कोणत्या कर्मचारीला कामावरून काढुन टाकायचे हे ठरविण्याचा अधिकार देखील एच आर मँनेजर कडेच दिलेला असतो.
इत्यादी अशा पदधतीने कुठल्याही कंपनीतील अशा विविध जबाबदारी असतात ज्या त्या कंपनीच्या एच आर मँनेजरकडे सोपवल्या जात असतात.
HR MANAGER चे वेतन काय असते?
आपल्या प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न असतो की कुठल्याही कंपनीतील तसेच संस्थेतील एच आर मँनेजरची सँलरी काय असते?
तर कुठल्याही कंपनीतील एच आर मँनेजरची सँलरी किमान 25 ते 30 हजार इतकी असते.
याचसोबत कंपनीकडुन इतर फँसिलिटी देखील त्याला दिल्या जात असतात.आणि एच आर मँनेजरच्या सँलरीत टप्याटप्याने त्याच्या योग्यतेनुसार वाढ देखील होत असते.
HR MANAGER बनण्यासाठी आपली काय शैक्षणिक पात्रता असावी लागते?
HR MANAGER बनण्यासाठी आपल्याकडे HR MANAGEMENT ची MASTER DEGREE असावी लागते
(MASTER OF HUMAN RESOURCE MANAGEMENT)
HR MANAGER बनण्यासाठी खलील कोर्सेस यादी :
- (PGDHRD) पोस्ट ग्रँज्युएट डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट
- (PGDHRM) पोस्ट ग्रँज्युएट डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मँनेजमेंट
- (MHROD) मास्टर आँफ ह्युमन रिसोर्स अँण्ड आँरगनाईझेशनल डेव्हपमेंट
HR MANAGER बनण्यासाठी आपल्या अंगी कोणते गुण असावे लागतात?
एक उत्तम एच आर मँनेजर बनण्यासाठी आपल्या अंगी अनेक गुण तसेच स्कील असणे गरजेचे असते आणि त्या स्कील पुढीलप्रमाणे आहेत :
1)योग्य निर्णय घेण्याची क्षमता :
एक उत्तम एच आर मँनेजर बनण्यासाठी आपल्यामध्ये कुठल्याही कठिन परिस्थितीत देखील योग्य तो निर्णय घेण्याची क्षमता असायला हवी.
2) कंपनीतील कर्मचारींना सहयोग करणे:
एका उत्तम एच आर मँनेजरमध्ये सहयोगाची सहकार्याची भावना असायला हवी आपल्या कंपनीतील कर्मचारींना योग्य मार्गदर्शन करणे त्यांच्या हिताचा विचार करणे त्यांच्या हक्कासाठी लढणे कंपनीतील कर्मचारींसोबत मिळुन मिसळुन राहणे म्हणजेच कर्मचारी संघटनक्षमता हा गुण एच आर मँनेजरमध्ये असणे गरजेचे आहे.
3) तटस्थ असायला हवा:
एच आर याने कंपनीतील सर्व कर्मचारींसोबत समानतेने वागायला हवे.सगळयांना समान दर्जा द्यायला कोणासोबत भेदभाव करू नये म्हणजेच एच आर हा तटस्थ स्वभावाचा असायला हवा.
4)प्रामाणिक आणि विनम्र स्वभावाचा असायला हवा :
एच आर मँनेजरला आपल्या कंपनीतील सर्व कर्मचारींकडुन कंपनीचे काम व्यवस्थित करून घ्यायचे असते यासाठी एच आर हा सर्व कर्मचारींसोबत प्रेमाने,नम्रतेने वागणारा नम्र स्वभावाचा असणे आवश्यक आहे.जेणकरून तो सर्व कर्मचारींकडुन कंपनीचे काम व्यवस्थित करून घेऊ शकेल.
5) त्याला टेक्निकल नाँलेज देखील असायला हवे :
त्याला वर्ड एक्सेल पाँवरपाँईट इत्यादी साँफ्टवेअरचे नाँलेज असणे देखील आवश्यक असते.जेणेकरून वेळ पडल्यावर कंप्युटरवर बसुन स्वता देखील एमरजन्सीत कुठलेही काम करू शकतो.
या व्यतिरिक्त भारत सरकार सुद्धा मानव संसाधन विकासा वर भर देत असते
Job Requirements
Yess
Yes Am MSW student || year My Subject HRM I Need Job but I requested you am surching Job work from home
Sudarshani
Thank you
Thanks for the importance tips at HR post, Now I working at HR post.
Always welcome Mam And Congratulations
Good information H R &admin dept great