गुढीपाडवा सण महत्व अणि इतिहास – Gudi Padwa Festival History And Importance In Marathi

गुढीपाडवा सण महत्व अणि इतिहास Gudi Padwa Festival History And Importance In Marathi

गुढी पाडवा ह्या सणाला सामवत्सारा पाडो म्हणुन देखील संबोधिले जाते.

ॐ ब्रह्मध्वज नमस्ते स्तु सर्वाभीष्ट फलप्रद !
प्राप्ते स्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरू !!
। । ब्रह्मध्वजाय नम:।।

Gudi Padwa Festival History And Importance In Marathi

ज्योतिष शास्त्रानुसार साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त हा आहे.

सामवत्सारा पाडो याचा अर्थ नवीन वर्षाचा पहिला दिवस किंवा सामवत असा होत असतो.हाच दिवस आपण चैत्र नवरात्रीचा प्रथम दिन म्हणून देखील साजरा करत असतो.
उत्तर भारत तसेच आंध्र प्रदेश राज्यात याला उगदी असे म्हटले जाते.

गुढी पाडवा अणि मराठी नववर्षाचे नाव आपणास गुढी अणि पाडवा ह्या दोन शब्दांमधून प्राप्त होताना दिसुन येते.

गुढी ह्या शब्दाचा अर्थ हिंदु लाॅर्ड ब्रम्हा असा होतो तर पाडवा याचा अर्थ ध्वज किंवा चिन्ह असा होत असतो.चंद्राच्या अवस्थेचा हा प्रथम दिन असतो.

गुढी पाडवा हा सण तसेच उत्सव कापणीच्या हंगामाच्या प्रारंभास चिन्हांकित करत असतो.

पीएम मित्रा योजना काय आहे? -PM MITRA scheme meaning in Marathi

२०२३ मध्ये गुढीपाडवा कधी साजरा केला जाणार आहे?

२०२३ मध्ये हिंदु दिनदर्शिका प्रमाणे चैत्र महिन्याच्या प्रथम दिवशी २२ मार्च रोजी गुढी पाडवा हा सण उत्सव साजरा केला जाणार आहे.

Gudi Padwa Festival History And Importance In Marathi

गुढी पाडवा सण महत्व अणि इतिहास –

हिंदु पौराणिक कथेमध्ये असे सांगितले गेले आहे की ब्रम्हा यांनी गुढी पाडव्याच्या दिवशीच विश्वाची निर्मिती केली होती.
गुढी पाडव्याच्या ह्याच दिवशी भगवान ब्रम्हा यांनी वर्षे,दिवस,आठवडे महिने सादर देखील केले.

तसेच दुसऱ्या आख्यायिका मध्ये सांगितल्यानुसार राजा शालिवाहन याचा विजय दिवस देखील ह्याच दिवशी साजरा केला जात असतो.हयाच दिवशी तो पैठणला परतला अणि त्याच्या विजयाच्या आनंदात त्याच्या लोकांकडून गुढी अणि ध्वज उभारण्यात आले होते.

असे म्हटले जाते की महाभारताच्या आदीपर्वात उपपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी ही जमिनीमध्ये रोवली होती अणि ह्या काठीचे पुजन नववर्षाच्या सुरुवातीला केले.तेव्हापासुन दरवर्षी हीच परंपरा पाळली जाऊ लागली अणि गुढी पुजन करण्यात येऊ लागले.

श्रीराम देखील आपला १४ वर्षांचा वनवास पुर्ण करून हयाच दिवशी अयोध्येत परत आले होते म्हणून गुढी उभारून हा यशाचा दिवस साजरा केला जातो.

महादेव अणि पार्वती यांचा विवाह देखील पाडव्याच्या दिवशी ठरला होता.अणि तृतीयेला हा विवाह पार पडला होता.म्हणुन हया दिवशी देवी पार्वतीचे पुजन देखील केले जाते.

आजही आधुनिक काळात गुढीपाडवा ह्या सणाला ऐतिहासिक,धार्मिक,नैसर्गिक, सांस्कृतिक अशा सर्व दृष्टीने विशेष महत्त्व दिले जाते.

म्हणुन ह्या सणाचे महत्व प्रत्येकाने आपल्या पुढच्या पिढीला सांगायला हवे.आपले पुर्वज वाडवडील जो काही सण उत्सव साजरा करत होते त्यामागे एक विशिष्ट कारण तसेच हेतु असायचा.

जसे की चैत्र महिन्यांपासून वसंत त्रतुच्या आगमनाची सुरूवात होताना दिसते.म्हणुन या काळात वातावरणात देखील परिवर्तन घडून येताना दिसते.

झाडांची जुनी सुकलेली पाने गळुन पडतात आणि झाडांना नवीन पालवी फुटायला सुरुवात होत असते.आंब्याला मोहोर देखील येताना दिसतो हेच कारण आहे की गुढी पाडव्याच्या दिवशी गुढी बांधत असताना गुढीला आंब्याची डहाळी फांदी बांधण्यात येत असते.

पुर्वीपासून ह्या नैसर्गिक बदलांचे आपल्या वाडवडील पुर्वज हे स्वागत करीत आले आहेत.प्राचीन काळापासून चैत्र प्रतिपदेच्या दिनी साखर,ओवा,मिरी,हिंग,मीठ हे कडुलिंब यांच्या पानांसोबत वाटुन खाल्ले जाते.

याने आपल्या पचनक्रिया मध्ये चांगली सुधारणा होताना दिसुन येते.त्वचेचे जडलेले अनेक आजार देखील दुर होत असतात.पित्ताचा नाश देखील होतो.

धान्याला जर कीड लागत असेल तर ती कीड लागणे देखील कडुलिंबाच्या पानांमुळे थांबते.शरीराला थंडावा प्राप्त होण्यासाठी कडुलिंबाच्या पानांना अंघोळीच्या पाण्यात मिसळून अंघोळ केली जाते.अशा पदधतीने कडुलिंबाच्या पानांचे अनेक आयुर्वेदिक फायदे आहेत.

गुढी पाडव्याच्या दिवशी सुमारे पाच फुट लांब इतक्या बांबुच्या काठीभोवती ताजा कापड तुकडा बांधुन गुढी बनवली जात असते.बांबुच्या टोकास साडी किंवा जस्त्रीचे कपडा बांधला जातो.

कडुलिंबाची पाने,फुलांची माळ गुढीला लावून त्याच्यावर तांब्या किंवा एखादा लोटा उलटा ठेवला जात असतो.अणि घरासमोर घराच्या छतावर ही गुढी उभारली जाते.

या दिवशी आपल्या घरासमोर घराच्या छतावर उभारली जाणारी गुढी ही समृद्धी आणि विजयाचे प्रतीक मानली जाते.