फेक लोन अ‍ॅप्स म्हणजे काय? | Fake loan apps information in Marathi

फेक लोन अ‍ॅप्स म्हणजे काय? | Fake loan apps information in Marathi

आज आपण गुगल प्ले स्टोअर मध्ये जाऊन लोन अ‍ॅप्सअसे नाव देखील सर्च केले तरी घरबसल्या पर्सनल लोन उपलब्ध करून देत असलेल्या अशा १०० लोन अॅप्सची यादी आपणास पाहावयास मिळते.

ह्या सर्व अशा अ‍ॅप्सआहेत ज्या आपणास एकदम झटपट कुठलेही जास्त कागदपत्रे न देता एकदम सहजरीत्या कर्ज उपलब्ध करून देण्याची हमी घेत असतात.

पण प्ले स्टोअर वर आज जेवढ्याही लोन अॅप उपलब्ध आहेत ज्या आपणास झटपट लोन उपलब्ध करून देण्याची हमी देत असतात.

त्यात काही मोजक्याच २५ टक्के अॅप ह्या खरया अणि खरोखर आपणास लोन उपलब्ध करून देणारया जेन्युअन असतात.

अणि बाकीच्या काही अॅप्स ह्या लोन देण्याच्या नावाखाली ग्राहकांची पिळवणुक तसेच फसवणुक करण्याचे काम करताना दिसुन येतात.

याचकरीता आज आपण फेक लोन अॅप्स म्हणजे काय?फेक लोन अॅप्स कशा ओळखायच्या यांच्यापासून आपण कशापदधतीने आपला बचाव करू शकतो.

एफडी कॅल्क्युलेटर कसे वापरावे? । How to Use an FD calculator In Marathi

फेक लोन अ‍ॅप्स म्हणजे काय?

Fake loan apps information in Marathi
Fake loan apps information in Marathi

ज्या लोन अ‍ॅप्सआरबीआय नोंदणीकृत नाही अशा अनोंदणीकृत आरबीआयच्या गाईडलाईनसचे पालन न करणाऱ्या अ‍ॅप्सफेक बनावट लोन अॅप्स म्हटले जाते.

तसेच झटपट वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देण्याचे नाव करून आमिष दाखवून फेक लोन अ‍ॅप्सबनवुन मोबाईल युझरच्या मोबाईल मधील डेटा,फाईल,फोटो यांचा अॅक्सेस प्राप्त करून त्याचा गैरवापर करणारया अ‍ॅप्सला फेक लोन अ‍ॅप्स असे म्हटले जाते.अशा अ‍ॅप्सआपणास कुठलेही लोन देत नसतात.फक्त फसवणुकीसाठी अशा अॅप्स बनविण्यात आलेल्या असतात.

गुगल प्ले स्टोअर वर आज अशा कित्येक अ‍ॅप्स आहेत ज्या आपणास कुठल्याही document processing शिवाय फक्त आधार कार्ड वर instant personal loan उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत असतात.यातील अनेक अॅप ह्या खरोखर खरया असतात.

अणि हा प्रस्ताव ज्यांना पैशांची तत्काळ गरज आहे त्यांच्यासाठी खुपच फायदेशीर असतो.कारण त्यांची तात्पुरता पैशांची गरज भागत असते.

उदा, बेरोजगार व्यक्ती, विद्यार्थी वर्ग इत्यादी.

पण असे लोन घेत असताना आपण काही काळजी घ्यायला हव्यात.काही घातक जोखीम धोक्यांपासून सर्तक राहायला हवे.

मोबाईल अ‍ॅप्सदवारे झटपट सुक्ष्म कर्ज उपलब्ध करून देणारया वित्तीय संस्था फायनान्स कंपनी ह्या मुख्यत्वे कर्ज देण्यासाठी विद्यार्थी वर्गाला अणि बेरोजगार व्यक्ती गरजु व्यक्ती यांना लक्ष्य बनवत असतात.

कारण यांना आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला हवी ती वस्तू जसे की मोबाईल वगैरे खरेदी करण्यासाठी आपल्या तत्कालीन गरजा भागविण्यासाठी सर्वात जास्त पैशांची गरज भासत असते.

मोबाईल अ‍ॅप्सदवारे झटपट सुक्ष्म लोनसाठी अर्ज करणारे जेवढेही उमेदवार आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की मोबाईल अॅप्स दवारे झटपट सुक्ष्म कर्ज उपलब्ध करून देणारया बरयाचशा वित्तीय संस्था कंपन्या ह्या लोन देण्यासाठी आरबीआयने तयार केलेल्या ठरवलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत नसतात.

अणि कर्ज दिलेल्या ग्राहकाकडुन कर्जाचे पैसे वसुल करण्यासाठी कधी कधी हे अत्यंत कठोर,अनैतिक मार्ग आणि डावपेच यांचा अवलंब करत असतात

जेव्हा आपण एखादे झटपट वैयक्तिक कर्ज मिळविण्यासाठी मोबाईल मधील एखादे अॅप डाउनलोड करत असतो तेव्हा आपणास त्या अॅपला काही परमिशन द्यावा लागत असतात.आपल्या मोबाईलमधील संपर्क क्रमांक,चित्रे इत्यादींमध्ये प्रवेश करण्यासाठी ही परमिशन आपणास द्यावी लागत असते.

ही प्रक्रिया आपणास त्रासमुक्त वाटत असली तरी यात कर्ज देणारे अॅप आपल्याला साधारणपणे aprx चा संदर्भ विचारत असते.10 संपर्क क्रमांक मागते.

ह्या झटपट सुक्ष्म कर्ज देणारया अ‍ॅप्सआपणास कर्ज देण्यापूर्वी प्रक्रिया शुल्क प्रोसेसिंग फी म्हणून मोठी रक्कम देखील कापत असतात. 

अणि कधी कधी असे देखील दिसुन येते की कर्जदाराने देय रक्कम चुकवल्यास/विलंब केल्यास,ते आपले पैसे वसुल करण्यासाठी अनैतिक आणि कठोर दबावाचे डावपेच वापरतात.

ज्यात कर्ज घेतलेल्या व्यक्तीला त्याच्या संपर्क क्रमांकांवर नोटीस किंवा चेतावणी पाठवली जाते कर्जदाराला आणि त्यांच्या संपर्कांतील इतर लोकांना कॉल करून धमकावले जाते

काहीवेळा हे आपले कर्जाचे पैसे वसुल करण्यासाठी अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई देखील कर्ज घेतलेल्या व्यक्तीवर करत असतात.

प्ले स्टोअर वरील ऑनलाईन लोन अ‍ॅप्स वरून लोन घेण्याचे काही तोटे –

  • आपणास ह्या अ‍ॅप्सला आपल्या मोबाईल मधील डेटा फाईल फोटो व्हिडिओ ऑडिओ कॅमेरा इत्यादी सर्व काही अ‍ॅक्सेस करण्याची परवानगी द्यावी लागत असते अणि हे आपल्या डेटा प्रायव्हेसी साठी अत्यंत धोकादायक ठरू शकते कारण ह्या अ‍ॅप्स कडुन आपल्या डेटाचा गैरवापर देखील केला जाण्याची शक्यता यात असते.
  • लोन अ‍ॅप्सकडुन झटपट लोन घेणारया व्यक्तींकडुन वाजवीपेक्षा अधिक जास्त व्याज अणि दंड आकारला जाण्याची शक्यता असते.
  • काही लोन अ‍ॅप्सपैसे वसुलीसाठी कर्जदाराला धमक्या देखील देत असतात.
  • काही लोन अ‍ॅप्सकर्ज देण्याआधी व्याज कापुन घेतात.

लोन अ‍ॅप्स वरून लोन घेताना घ्यायची काळजी –

आपण ज्या लोन अॅप वरून कर्ज घेत आहात तिच्याकडे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा (RBI) मोबाईल-नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी (NBFC) परवाना असल्याची खात्री करुन घ्या ज्यामुळे ती अॅप तुम्हाला कर्ज देऊ शकते.

अॅप परवानग्यांचे नियमितपणे पुनरावलोकन करा आणि केवळ अॅपच्या उद्देशानुसार कुठल्याही अॅपला प्रवेश परवानगी द्या.

आपण ज्या अॅपवरून लोन घेत आहात तिच्या विषयी लोकांनी दिलेले रिव्युह वाचा तिला देण्यात आलेले रेटिंग चेक करा ती अ‍ॅप्सआतापर्यंत किती लोकांनी डाऊनलोड केली आहे ते बघा.यावरून ती अॅप कशी आहे हे आपणास कळेल.

कर्ज देत असलेल्या संस्था कंपनीचा पत्ता संपर्क क्रमांक ईमेल अॅड्रेस चेक करा.