श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती महत्व इतिहास अणि कथा – Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Mandir

श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती महत्व इतिहास अणि कथा

श्रीमंत दगडुशेठ हलवाई हे गणपती हा संपुर्ण पुण्यातील भक्तजणांचे श्रदधा स्थान मानले जाते.

गणपती उत्सवात प्रत्येक शहरातील मोठमोठया गणपतींची नावे आपणास नेहमी ऐकायला मिळत असतात.

ह्या सर्व नावांच्या यादीत पुण्यामधल्या दगडुशेठ हलवाई ह्या गणपतीचे नाव सगळयात पहिले घेतले जाते.

जे लोक गणेशोत्सवात पुण्यात जातात ते सगळयात आधी दगडुशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घ्यायला जात असतात.आज सुदधा खुप लांबुन लांबुन लोक इथे गणेशोत्सवात दर्शनासाठी येत असतात.

फक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नव्हे तर श्रदधेच्या पोटी समाजाने दान केलेल्या पैशातुन सामाजिक कार्याच्या माध्यमातुन मानवतेचे महामंदीर उभे करण्याचे प्रयत्न करणारया

श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्ट हे गणेश मंडळ अणि लाखो करोडो भाविकांचे श्रदधास्थान असलेल्या दगडुशेठ ह्या गणपतीने आज संपुर्ण जगभरात आपला नावलौकिक प्राप्त केलेला आहे.

आजच्या लेखात आपण ह्याच दगडुशेठ हलवाई गणपती विषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

सोबतच ह्या मंदीराचे धार्मिकदृष्टया अध्यात्मिकदृष्टया महत्व काय आहे?अणि याचा मुळ इतिहास काय आहे?हे सुदधा बघणार आहोत.

श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपतीचे महत्व अणि इतिहास कथा –

ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा भारतावर इंग्रज साम्राज्याचे अधिपत्य होते.म्हणजेच १८९१ मधील.

दगडुशेठ हलवाई हे पुण्यामधले एक प्रख्यात मिठाईचे व्यापारी होते.समाजात देखील त्यांना खुप आदर अणि मान दिला जायचा म्हणुनच लोकांनी त्यांना आदराने श्रीमंत ही उपाधी देखील दिली होती.

दगडुशेठ हलवाई हे समाजात एक प्रतिष्ठीत व्यक्तीमत्व असलेले व्यक्ति असल्यामुळे ब्रिटीश सरकारने देखील त्यांना नगरशेठ हा सन्मान देऊन गौरविले होते.

असे म्हटले जाते की श्रीमंत दगडुशेठ हलवाई यांच्या डोक्यावर साक्षात देवाचा आशिर्वाद होता.कारण नाव पैसा प्रसिदधी कुठल्याही गोष्टीची त्यांच्या जीवणात काहीच कमतरता नव्हती.

एकेकाळी पुण्यामध्ये प्लेग नावाच्च्या भयंकर रोगाचा साथीचा पसार सुरू झाला होता.ह्या आजारावर तेव्हा कुठलाही ठोस उपचार उपलब्ध नव्हता म्हणुन ह्या प्लेगच्या आजारामुळे अनेक नागरीकांना आपले प्राण देखील गमवावे लागले होते.अशीच महामारी पुण्यात याआधी १८२० मध्ये देखील पसरली होती.

See also  श्री स्वामी समर्थ यांचे प्रेरणादायी विचार कोटस - Swami Samarth inspirational thoughts and quotes in Marathi

१८९२ मध्ये पसरलेल्या ह्या प्लेग ह्या आजाराच्या साथीत दगडुशेठ यांच्या एकुलत्या एका मुलाचा मृत्यु झाला.दगडुशेठ यांच्यावर एकुलत्या एक मुलाच्या निधनामुळे जणु दुखाचा डोंगरच कोसळला होता.

दगडुशेठ ह्यांच्या जीवणात सर्व काही सुखसुविधा होत्या तरी देखील पुत्र वियोगामुळे ते नैराश्यमय जीवन जगत होते.

तेव्हा दगडुशेठ हलवाई यांचे आध्यात्मिक गुरू माधवनाथ महाराज यांनी दगडुशेठ यांना सल्ला दिला की तुम्ही एक गणपतीची मुर्ती दत्तक घ्या तिचा एकदम मुलाप्रमाणे सांभाळ करा पालन पोषण करा.

तुम्ही दत्तक घेतलेल्या ह्या मुर्तीची किर्ती संपुर्ण जगात सदैव राहील असे सुदधा त्यांचे गुरू त्यांना बोलले.

गुरूंचा सल्ला ऐकुन दगडुशेठ अणि त्यांच्या पत्नी या दोघांनी श्री कुंभार यांच्याकडून एक सुंदर अणि लोभक अशा स्वरूपाची गणेशाची मुर्ती बनवून घेतली.

अणि मोठया श्रदधेने भक्तीने ती मुर्ती स्थापित सुदधा केली.यानंतर ह्या गणपती मंदिरात लोक खुप अधिक संख्येने दर्शनासाठी येऊ लागले.

हा गणपती दगडु शेठ यांनी स्थापित केला असल्याने लोक ह्या श्रीमंत दगडुशेठ हलवाई यांचा गणपती म्हणुन संबोधु लागले.

हळुहळु हा गणपती श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती म्हणुन संपुर्ण पुण्यातील लोकांमध्ये प्रसिदध होऊ लागला.

पुर्ण पुण्यातील लोक इथे दर्शन घेण्यासाठी येऊ लागले.हा काळ ब्रिटीश राजवटीचा होता.जेव्हा भारत ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली गुलामीत जगत होता.लोकांना कुठलेही व्यक्ती स्वातंत्र्य नव्हते.

तेव्हा ब्रिटीश भारतीयांना गुलामासारखी वागणुक देत होते.त्यांचा छळ करत होते.स्वताला हवे तसे वागायचे देशात ब्रिटीशांचा एकदम मनमानी कारभार तेव्हा सुरू होता.

अणि अशातच ब्रिटीशांविरूदध कोणी आवाज उठविला तर त्याला शिक्षा केली जायची,जेरबंद केले जायचे.फासावर देखील चढविले जायचे.

ब्रिटीशांविरुदध भारतीयांच्या मनात एक आग लागलेली होती ज्या आगीने १८५७ च्या उठावानंतर भयंकर रौद्र स्वरूप धारण केले होते.

घाबरलेल्या ब्रिटीशांनी लोकांना संघटनेच्या स्वरूपात एकत्र येऊ देणे बंद केले ब्रिटीशांविरूदध बोलणे सुदधा तेव्हा अपराध मानला जायचा.

तेव्हाच देशाला स्वातंत्र्य प्राप्त करून देण्याकरीता अनेक देशभक्त प्रयत्न करीत होते अणि देशाला स्वातंत्र्य प्राप्त करून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती द्यायला देखील तयार होते.

See also  राष्टीय टपाल कामगार दिवस - National Postal Worker Day In Marathi

ज्यात बाल गंगाधर टिळक यांचा देखील समावेश होता.टिळकांना जनतेने लोकमान्य ही पदवी बहाल केली होती.

लोकमान्य टिळक यांनी वृतपत्राच्या माध्यमातुन ब्रिटीश भारताचा कसा छळ करत आहे भारताला कसे लुटत आहे हे सांगितले ब्रिटीश सरकारविरूदध जहालवादी टिका देखील केली.

ब्रिटीशांविरूदध भारतीय लोकांनी एकत्र यावे यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवास साजरा करावयास आरंभ केला.

ज्या गणपतीचे फक्त घरात पुजन केले जात होते त्याचे सार्वजनिक गणपती मंडळ स्थापित करून सार्वजनिक मंडळात आरती पुजा केली जाऊ लागली.अणि ह्या मोहीमेस पुणे शहरातुनच आरंभ करण्यात आला.

१८९३ मध्ये श्रीमंत दगडुशेठ हलवाई ह्या मंदीरात देखील एक मोठी सार्वजनिक अशी गणपतीची मुर्ती बसविण्यात आली.

तेव्हापासुन ही प्रथा आज देखील मोठया श्रदधा अणि विश्वासाने पाळली जात आहे.

आजपर्यत ह्या गणपतीजवळ अनेको लोकांनी वेगवेगळे नवस केले जे पुर्ण देखील झाले.म्हणुन हा पुण्यातील दगडुशेठ हलवाई गणपती नवसाला पावणारा गणपती म्हणुन देखील ओळखला जाऊ लागला.

जसे दगडुशेठ हलवाईंचे गुरू बोलले त्याचप्रमाणे आज हा गणपती संपुर्ण जगभरात ओळखला जातो.आज भारताच्या कानाकोपरयातुन तसेच परदेशातुन देखील अनेक दिग्दज उद्योजक,अभिनेते सेलिब्रिटी इत्यादी लोक ह्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी पुण्यात येतात.

वर्षभर ह्या मंदिरात आपणास भक्तांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते.ह्या गणपतीच्या पालखी आरती नैवेद्य प्रसाद याबाबत लोकांना नेहमी आकर्षण असते.

सार्वजनिक गणेशोत्सवात प्रतिष्ठापणा केल्या जात असलेल्या मुर्तीला देवाचा दर्जा प्राप्त होण्याचे नशिब दगडुशेठ हलवाई ह्या गणपतीस प्राप्त झाले आहे.

दगडुशेठ हलवाई ह्या गणपती मंडळाची स्थापणा 1893 मध्ये झालेली आहे.ह्या मंडळाच्या ज्या मुर्तीस दगडुशेठ हलवाई गणपती म्हणुन ओळखले जाते ती गणपतीची मुर्ती 1968 मध्ये तयार करून घेतली होती.

ही मुर्ती प्रख्यात शिल्पकार मुर्तीकार शंकर आप्पा शिल्पी यांनी ही दगडुशेठ हलवाई गणपती मुर्ती तयार केली आहे.

ही मुर्ती तयार करण्यात नागेश शिल्पी यांचे देखील विशेष योगदान आहे.

See also  घरातील आर्थिक अडचणी,आर्थिक संकटे,गरीबी तसेच कर्जबाजारीपणा दुर करण्यासाठी कोणती सेवा करावी?- Narali purnima satyanarayan vrat

ही मुर्ती बनविण्याचे काम सुरू असताना सुर्यग्रहण चालु होते.सुर्यग्रहणातील एका विशिष्ट वेळेला गणेशाच्या मुर्तीमध्ये गणेश यंत्र बसविण्यात आले तर ह्या मुर्तीचे तेज किर्ती वाढेल अणि ही मुर्ती संपुर्ण जगभरात देवत्व प्राप्त करेन अशी शंकर आप्पा शिल्पी यांची श्रदधा होती.

शिल्पी यांच्या गणेशा प्रतीच्या श्रदधेचा मान ठेवत मंडळाच्या कार्यकत्यांनी धार्मिक पदधतीने विधी केली मग ही मुर्ती स्थापित केली.

ही मुर्ती दिसायला एक शांत मन प्रसन्न करणारी अणि पाहताच तिथेच थांबावे असे वाटणारी ही दगडुशेठ हलवाई गणपती मुर्ती आहे.

मुर्तीचे डोळे एकदम दिसायला प्रसन्न आहे.ह्या डोळयांमध्ये एक सात्विकता जाणवते.जणु हा गणपती आपल्याकडेच बघतो आहे असे भाविकाला मुर्तीच्या डोळयाकडे पाहुन वाटते.

बैठया मुर्तीचे चारही हात सुटे आहेत अणि मुर्तीच्या डाव्या हातात गणपतीला प्रिय असणारे मोदक आहे.
इतर दोघा हातांत कमळाचे फुल आहे.

ह्या मुर्तीवरच्या सोंडेचे कलाकाम एकदम उत्कृष्ट पदधतीने करण्यात आले आहे.

गणेशोत्सवाच्या काळात पाच ते अकरा नारळाचे तोरण अपर्ण करायला अणि मुर्तीचे दर्शन करायला येथे भाविकांची खुप रांग लागलेली असते.

1984 मध्ये गुढी पाडव्याच्या मुहुर्तात मंदिरात गणपतीची स्थापणा करण्यात आली ह्या मंदिराचे ट्रस्टचे तात्पुरता अध्यक्ष प्रतापराव गोडसे आप्पासाहेब सुर्यवंशी यांच्या प्रयत्नांना यश मिळाले.

कुली चित्रपटाची शुटींग करताना अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक अपघात घडला तेव्हा अभिताभ बच्चन लवकर बरे व्हावे यासाठी त्यांच्या पत्नी जया बच्चन यांनी दगडुशेठ हलवाई मंदिरात नवस केला
यानंतर अभिताभ बच्चन बरे देखील झाले.

मग केलेला नवस फेडायला अभिताभ बच्चन आपल्या पत्नी समवेत येथे आले अणि त्यांनी येथील ट्रस्टला गणपतीला सोन्याचे कान अपर्ण केले.

ह्या ट्रस्टतर्फे बालसंगोपण केंद्र वृदधाश्रम देखील चालविण्यात येते.

पुर्वी बांधलेले मंदिर अपुरे पडु लागल्यानंतर 2002 मध्ये नवीन भव्य मंदिराची उभारणी केली गेली.ह्या ट्रस्टतर्फे प्रदर्शित केले जाणारे डेकोरेशन रोशनाई हे ह्याचे मुख्य आकर्षण असते.